Wednesday, June 23, 2010

काही वाचनीय -- खरेखुरे आयडांल्स

काही वाचनीय -- खरेखुरे आयडांल्स

अानंद अवधानी यांचे खरेखुरे आयडांल्स हे पुस्तक वाचण्यात आले. टी व्ही वर हल्ली या अायडाँल वाल्यांनी धुमाकुळ घातला अाहे. ४-५ महिन्यात तुम्हाला नवे नवे अायडाँल्स मिळतात. गाणे, नाच, अभिनय यात ही मंडळी स्वत ला शहाणी समजू लागतात. मिडिया त्याना खूप प्रसिद्धी देते. भरीत भर म्हणजे मतांच्या जोरावर निकाल देतात. म्हणजे पैसे असणारे जोरात.

अापल्या समाजात काही लोक असे अाहेत की जे खरोखर लोकोपयोगी काम करत अाहेत. अापले पैसे खर्च करून, अापला वेळ घालवून ही मंडळी एखाद्या कामात गुंतलेली आहेत. कित्येकांना गावातल्या लोकांना एकत्र आणण्यात खूप वेळ धालवावा लागला आहे. बरे या कार्यात सरकार पाठिंबा देईल असेही नाही. ही मंडळी खरी आयडांल्स. त्याच्याबद्दल टी व्ही वर फारच कमी कार्यक्रम ्असतात. इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रात केलेली ही कामे लोकांपर्यंत पोचवायचे काम या पुस्तकाने केले आहे असे म्हणावे लागेल.

पाणी टंचाई वर रेन वाँटर हार्वेस्टींग , ग्रीन हाउस , आदिवासींना आरोग्य सेवा, शेतीवर केलेले प्र.ोग, खरोखर महाराश्ट्रात राहुन या गोश्टी लोकांपर्यंत पोचत नाहीत. रेन वाँटर हार्वेस्टींग वर आजकाल खूप चर्चा , आवाज ऐकू येतो पण प्रत्यक्षात किती काम होते हे बघण्यासारखे आहे. शेवटी सरकार वर सगळे आरोप करतात. खरोखर का हे काम मोठ्या पातळीवर होत नाही ... फारसे खर्चिक पण नाही. आजकाल लोकांकडे पैसा खूप आहे मग बिझिनेस हाऊसेस का पुढे येत नाहीत ... ज्यांच्याकडे पैसा व ईच्छा आहे अशी मंडळी पण ही कामे करू शकतात.

या लोकांनी जी कामे केली आहेत त्याला प्रसिद्धि दिली पाहिजे, तिथल्या टूर्स ठेवल्या पाहिजेत. टी वही वर मुलाखती घेतल्या पाहिजेत. टी व्ही मुळे तळागालळात माहिती पटकन पोचते. अभय बंग, दिनकर कर्वे, अण्णा हजारे, मनिषा ंम्हैसकर, टाकळकर, गणपतराव पाटील, खोपडे, बारवाले ही त्यातील काही नावे.

विशेष म्हणजे यातील बरीच मंडळी ही ्अमेरिकेत शिकून तिथली नोकरी सोडून भारतात आली आहेत. बाहेरच्या लोकांपर्यंत पोचायचे कसे हे त्यांना माहीत आहे आणि त्याचा फायदा नककीच झाला आहे.

तुम्हीही भेटून पहा या लोकांना या पुस्तकामार्फत. तुम्हाला नककी आवडेल.

Monday, June 21, 2010

Saw this article on Yahoo....interesting so forwarding....

We always think healthy options are costly but.....

here is the list and benefits from the items.

my laptop is out of order so todays post is in English.

I hope u enjoy these food items

Tuesday, June 8, 2010

राग रंग

राग रंग

आपल्या जीवनात हिंदी, मराठी गाणी सतत आपली सोबत करत असतात. प्रवासात, घरी एकटेपणा घालवताना आपण बरीच गाणी गुणणतो. काही गाणी आपल्या नकळत आपण बर्‍याच वेळेला पुन्हा पुन्हा ऎकतो. काही गाण्यांशी आपल्या आठवणी निगडीत असतात. जुनी गाणी अर्थातच जास्त मनात घर करून रहातात. (काही नवीन गाणीही छान आहेत ). अमेरिकेत आल्यापासून बरेच शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम ऎकून आजकाल बंदिश हा प्रकार एकदम आवडायला लागला आहे. साहजिकच मग त्याचा रिसर्च आणि ऎकणे चालू होते. बरे मी काही शास्त्रीय संगीत शिकलेली नाही त्यामुळॆ सुरांशी फार परिचय नाही, पण ऎकायला छान वाटते हे नक्की. ह्या सूरांच्या रचनेत काही मॆथेमॆटिकल पॆटर्न्स असावेत असे वाटल्याने मी थोडा रिसर्चही करत आहे.

आपल्या संगीतकारांनी ३-४ मिनिटाच्या गाण्यात अशी अनेक गाणी अजरामर करून ठेवली आहेत. आपण गाणी ऎकताना हे गाणे अमूक रागातले किंवा रागावर आधारित आहे असे ऎकतो. बर्‍याच वेळा नकळत तो राग गुणगुणत असतो पण त्यावेळेस आपल्याला तो राग माहित असतोच असे नाही. प्रत्येक राग हा काही विशिष्ट भाव प्रकट करतो( भक्ति, शृंगार, करूण, विरह वगॆरे). राग हे ठराविक वेळेला गायले जातात, काही वेळा दोन वेगळ्याच भावांची गाणीही एकाच रागात असतात. काही राग एकापेक्षा जास्त भाव प्रकट करतात. असे सगळे असताना एखादे गाणे कुठल्या रागात आहे हे ऒळखणे जरा कॉम्प्लिकेटेड असते.

नुसत्या भावावरून गाण्याचा राग ऒळखणे अवघड असते. जर आपल्याला गाण्याचे सूर कळत असतील तर साधारण रागाची कल्पना येऊ शकते. पण सगळ्यांना सूर माहित नसतात. प्रत्येक राग कसा म्हणायचा याचे काही नियम असतात. ठराविक स्वर ठराविक पद्धतिनेच म्हणावे लागतात. त्या रागाचे स्वर आणि त्या रागाचा ठराविक भाव हे दोन्हीही त्यातून प्रकट व्हावे लागते. याला रागाचे चलन ( मी त्याला सोप्या भाषेत रागाची चाल म्हणते) म्हणतात. आता हे चलन किंवा या फ्रेझेस आपल्याला हिंदि मराठी गाण्यात सतत दिसत असतात. आपण जर एकाच रागावर आधारित गाणी एका पाठोपाठ ऎकली तर हळूहळू या फ्रेझेस आपल्याला कळू शकतात आणि त्या गाण्याचा राग लक्षात येऊ शकतो. यासाठी आधी त्या रागाचे चलन ही ऎकले पाहिजे. मुख्यांगाचे स्वर ही ऎकले पाहिजेत.

उदा. राग भूप ....आता पुढील गाणी ऎकलीत तर तुम्हाल ही गोष्ट स्पष्ट होईल....प्रत्येक गाण्यात काहीतरी साम्य आहे हे जाणवेल. हे साम्य म्हणजे या फ्रेझेस ......कदाचित एकदा ऎकून भागणार नाही पुन्हा पुन्हा ऎकावे लागेल.

chk the following two links and then listen the songs.

link shws raag bhoop

chk this link

१. ज्योति कलश झलके
२. नील गगन की छाऒमे
३. सायोनारा सायोनारा
४. पंछी बनू उडती फिरू
५. गीतरामायण - शरयू तीरावरी
६. इन आंखोकी मस्ती....
अशीच इतर रागांवरही गाणी ऎकता येतील पण त्यासाठी निदान रागाचे चलन माहित करून घ्यायला हवे.


नेहेमी रागावर आधारित हे शब्द आपण ऎकतो कारण बरेच वेळा संगीतकारांना थोडेसे बदल करावे लागतात. म्हणून आधारित चा आधार घेतला जातो. काही गाण्यात आपण सरगम ऎकत त्यावरून त्या रागाची कल्पना येते. उदा. निगाहे मिलाने को जी चाहता हॆ मधील सरगम किंवा ए आर रेहमान बर्‍याच गाण्यात २-३ ऒळी सरगम घालून त्यातून गाणे चालू करतो त्यावरून त्याच्या स्वरांची कल्पना येते.(गुरू मधील गाणी) मला वाटते दर सिनेमात एक तरी गाणे असे सरगम व शब्द असे मिश्र गाणे असावे म्हणजे लोकांना आपोआप तसे ऎकायची सवय होईल व कानसेन तयार होतील. सिनेमातील गाणी जेवढ्या आवडीने ऎकली जातात व फॉलो होतात तेवढे दुसरे काही होत नाही. अशा गाण्यांवर आधारित पुढचे पोस्ट लिहायचा विचार आहे.

कधी कधी वाट्ते सिनेमातील गाणी छान वाटली की ती एनजॉय करावीत ...कुठल्या का रागावर आधारित असेनात............

Thursday, June 3, 2010

हॊस बागकामाची..........


हॊस बागकामाची..........

स्प्रिंग आला की मला खूप उत्साह संचारतो. सगळ्या नर्सरीज मला बोलवायला लागतात. हवामानाची लहर संभाळून बागेत माझ्या फेर्‍या वाढतात. गेल्या वर्षीची पेरिनिअल्स परत उगवताना पहाण्यातला आनंद आणि नवे काय लावावे याचा विचार सुरू होतो. भाज्या लावल्या जातात आणि अचानक वाढलेले गवत लक्ष वेधून घेते. मग ते काढताना कंबर मोडते. पण कुठेतरी लहानपणीची बाग आठवत असते. बागेत कुठेही हिंडा, पायाल एक दगड किंवा गवताची काडी लगणार नाही अशी स्वच्छ बाग...

माझ्या लहानपणी माझी आजी कायम बागकाम करत असे. दिवसाचे ३-४ तास तरी तिचे या कामात जात. सुरूवातीला मातीत काम करणे मला आवडत नसे पण हळूहळू पाणी घालणे, आळी साफ करणे अशी कामे आमच्या वाट्याला येउ लागली व त्यातून बहुदा माझी बागकामाची सुरूवात झाली. आजी चा एक आवडता उद्योग म्हणजे उन्हाळ्याच्या सुटीत सगळी नातवंडे जमली की त्यांना बाजूला बसवायची स्वतः मध्ये बसून पेरू, चिकू, आंबे, चिरायची व आम्हाला भरपूर खायला घालायची. आम्ही सगळे त्या खाण्याची वाट बघत असू. यात पक्षांनी टोची मारलेली फळे असत तशीच आढी लावून पिकवलेली फळेही असत. जांभूळ, आवळा, सीताफळ, रामफळ, विविध प्रकारचे आंबे, या सगळ्या चवी घरच्य़ा बागेत मिळायच्या. त्याच बागेत कंपोस्ट खत करतानाही तिला पाहिले आणि झाडांवर कलमे करतानाही. पूर्ण बागेत तिने पाट तयार करून पाणी द्यायची सोय केली होती. चार कोपर्‍यातले चार नळ सोडले की सगळ्या बागेत पाणी खेळत असे. नकळत आपण बघून किती गोष्टी शिकत जातो...तेव्हा कळत नाही.

अमेरिकेत आल्यावर पुन्हा बाग लावायची शक्यता निर्माण झाली. या पूर्वी सॊदी त होत तिथे काही शक्य नव्हते. इथे ज्या भागात बर्फ पडतो तिथे रहाणार्‍या लोकांना जेमेतेम ४-५ महिने बागेची मजा लुटता येते. पण पुरेपुर लुटता येते जणू वर्षाचा बहर ४ महिन्यात पूर्ण करायची त्यांना घाई होते. सुरूवातीला मला झाडांचे प्रकार माहित नव्हते. थंडीत सगळी झाडे मरून जातात व परत स्प्रिंग मध्ये त्यांच्यात चॆतन्य येते हे पाहून फारच मजा वाटायची. सुरूवातीला पेरिनिअल, ऍन्युअल हे झाडांचे प्रकार कळायचे नाहीत. इथले ससे खूप रोपे खातात. हळूहळू ससे तोंड न लावणारी झाडे कुठली हे पण कळ्ले. कमी उन्हात येणारी, जास्त उन्हात येणारी अशी वर्गवारी पण कळली.

इथले बागकाम खूप शिस्तबद्ध आहे. स्प्रिंगच्या आधी छोटया प्लास्टिक कुंड्यात माती व खत घालून रोपे तयार करतात. प्रत्येक कुंडीवर त्याचा प्रकार लिहिलेला असतो. कसे लावायचे, पाणी किती घालायचे एका छोट्या चिट्ठीवर सगळी माहिती असते.जमिनीवर माती घालून त्यावर काळे कापड घालतात (वीड येउ नये म्हणून,) हवे तिथे छेद देउन झाड लावायचे. पाणी त्यामानाने कमी घालायचे. किडे आले तर लगेच त्यावर ऒषधे तयार असतात. मे संपेपर्यंत सगळी झाडे स्थिरस्थावर होतात आणि पुढ्चे ४ महिने केवळ नेत्रोत्सव असतो. आपण जेवढे कष्ट बागेत घेतो त्यापेक्षा किती तरी पटीने त्याची फुलांकडून परतफेड होते. एका बी मधून पुढे छोटे रोप, झाड फुले एवढे सगळे मिळते. (आधी बीज एकले.....). खते, माती बदलणे हे अधून मधून करावे लागते.

झाडे लावताना नेहेमी जाणवते एका बी मध्ये केवढी शक्ती असते. आजीने जी झाडे लावली त्यांनी सगळ्या नातवंडांचे लाड पुरवले. त्यांना भरपूर फळे खायला घातली. इतके छोटे रोप किंवा एखादी बी काही दिवसात किती लोकांच्या उपयोगी पडते. इथे मी जी झाडे लावली ती ४ महिने का होईना भरपूर फुले देतात.

एक गोष्ट मात्र नक्की बाग गवताविना स्वच्छ ठेवणे हे माझ्यापुढे आव्हान असते.......