Thursday, September 7, 2017

दोन दिवसात राॅकी माउंटन पार्क...पूर्वी  असे टुरिझम च्या पुस्तकात वाचले की हसायला यायचे. पण खरेच जर नीट प्लान केले तर खूप गोष्टी तुम्ही दोन दिवसात करू शकता.  आमच्या बरोबर एक माहितगार  फॅमिली मेंबर असल्याने आमचा खूप फायदा झाला. त्याने खूप ट्रेक्स वेगवेगळ्या वेळी इथे केले आहेत. पार्क ची वेबसाईट खूप माहितीपूर्ण आहे.    त्या वरून आपल्याला काय बघायचे हे ठरवता येते.

आमची ही व्हिजिट हायकिंग साठी होती. यापूर्वी कोलोरॅडो स्प्रिंग्ज, अेअर फोर्स म्युझियम, गाॅर्ज, गार्डन आॅफ द गाॅड्स, पाईक्स पीक, डेन्व्हर सिटी हाॅल व अॅंम्फीथिएट , ट्रेल रीज रोड व ग्रॅंड लेक तसेच काॅन्टीनेंन्टल डिव्हाईड बघून झाले होते.

अमेरिकेतच नॅशनल पार्क्स ही सगळ्यांसाठी मोठी भेट आहे. हे
पार्क विमानतळापासून दीड एक तासावर आहे. सकाळी जर पोचलो तर पूर्ण दिवस मिळतो. रहायचे ठिकाण शक्यतोवर पार्क च्या अगदी जवळ शोधले तर खूप वेळ वाचेल. भरपूर आॅप्शन्स आहेत नेटवर. जाताना गाडीत पाणी व भरपूर स्नॅक्स ठेवा. सकाळी एक ट्रेक करून मग चेक इन करता येते साधारण ३ वाजता.

आम्ही पहिल्या दिवशी चार लेक्स चा लूप केला. बेअर लेक ट्रेल हेड शी शटल घेउन जाणे सोईच. पार्किंग लगेच भरते. साधारण ९४७५ फूट ते १०२४० फूटावर आपण जातो. साधारण १००० फूट उंची  ६ मैल अंतरात आपण जातो. लगेच मनातल्या मनात सिंहगड शी तुलना झाली. त्यापेक्षा आपण कमी चढतो फरक इतकाच की हा हाय अल्टिट्यूड ट्रेक आहे. वाटेत भरपूर झाडी व उत्साही हायकर्स दिसत होते. लहान मोठे सगळे एकदम टिपटाॅप वेषात चढत होते.
निंफ लेक ला पहिला स्टाॅप घेतला. यात पिवळ्या पाॅंड लिलीज दिसल्या. या फक्त हाय अल्टिट्यूड वरच येतात. वाटेत भरपूर झाडी,अधूनमधून वेगवेगळे डोंगरमाथे दिसत होते. अतिशय फ्रेश हवा, मजा आली.
साधारण अर्ध्या पाउंड तासावर एक लेक लागते.

त्यानंतर ड्रीमलेक ला थांबलो. वाटेत भरपूर वाइल्ड फ्लाॅवर्स डोळे खुश करत होती.

यानंतर एमराल्ड लेक हे सुंदर सबअल्पाईन लेक आहे. नावाप्रमाणेच याचा रंग आहे. काही लोकांना इथे हाईट चा त्रास होतो पण आम्हाला फार जाणवला नाही. याच्या बॅकग्राउंड ला मस्त डोंगर आहेत.

शेवटी बेअर लेक हे ट्रेत हेड जवळ आहे. अजून एक मैल गेले तर अल्व्रटा फाॆल आहे.

काही महत्त्वाच्या टिप्स ... माउंटन मध्ये गार व गरम दोन्ही हवा असते, त्यानुसार जॅकेट टोपी गाॅगल्स सन स्क्रीन , आणि हो जाड सोलचे शूज मस्ट. वाटेत बरेच दगड आहेत म्हणून चांगले शूज हवेत.  पाणी भरपूर प्यायचे आणि हाय कार्ब वाटले स्नॅक्स जवळ ठेवायचे. शक्यतोवर लवकर ट्रेक चालू करायचा , थोडे उन वाचते. वाटेत फोटो साठी खूप वेळा आपण थांबतो. एवढ्या तयारीनंतर आपण हाय अल्टिट्यूडवर आहोत हे विसरतो.

संध्याकाळी फ्रेश होउन रेंजर चा अॅस्ट्राॅनाॅमी इन द पार्क प्रोग्रॅम अटेंड केला. खूप उत्साही मंडळी कुडकुडत आली होती. खूप दुर्बिणी सेट केल्या होत्या. शनि व त्याची कडी, गुरू व त्याचे चार चंद्र मस्त दिसले. आकाशगंगेचे पण दर्शन झाले. थोडे आभाळ असल्याने आकाशभर चांदण्या मात्र दिसल्या नाहीत. लहान व मोठ्याना हा एक चांगला अनुभव होता.

जाता येतां वाटेत थोडे वाईल्ड लाईफ दिसले. त्यासाठी पहाटेची किंवा तिन्हीसांजेची वेळ योग्य. तुम्ही जर खूप दमला नसाल तर सनसेट बरोबर हे करता येते.

एस्टेस पार्क मधे खूप रेस्टॅरंटस आहेत. जेवून किंवा पार्सल घेउन हाॅटेलवर जाता येईल. केबिन मधे राहिल्या कुकिंग ची सगळी सोय आहे.

दुसरे दिवशी लवकर वाॅटरफाॅल हाइक साठी निघालो. हे ट्रेल हे दूर असल्याने लवकर निघालेले चांगले. सुरूवातीला थोडी थंडी वाजली पण नंतर फारच छान झाडीतला रस्ता होता. एकदम रेिफ्रेशिंग. या ट्रेल वर सतत एका बाजूला पाणी असल्याने मजा येते. ५.४ मंगलाचा आमचा पल्ला होता.
Calypso Cascade .. उंची फार नाही पण भरपूर पाणी. बाजूला सतत अस्पेन ची सळसळ व पाईन्स साथीदार. वाईल्ड फ्लाॅवर्स भरपूर.

copeland falls upper ani lower. हा एकदम जोरदार धबधबा होताआॅगस्ट सप्टेंबर वाईल्ड मशरूम्स खूप दिसले. ते विषारी असतात पण रंग फार सुंदर. लाल पिवळा तपकिरी केशरी राखी खूप मस्त होते.. टराविक गारवा न मिळाल्यानंे बरीच वाईन ची झाडे जुळली होती. किती गोष्टी हवेवर अवलंबून असतात. 

मध्येच एक निनावी धबधबा लागला....मला हा जास्त आवडला. सगळ्यात शेवटी ओझूल फाॆल लागतो. त्यापूर्वी जरा चढण आहे दमवणारी, पण नंतरचे रूप ते विसरायला लावत होते. अजून थोडे वर गेल्य़ास जास्त चांगला व्ह्यू दिसतो.ओझूल हे राखी रंगाचे पक्षी असतात.

संध्याकाळी व्हिजिटर सेंटर ला फिल्म बघून पुढे ट्रेल रोज रोड, बरेच व्ह्यू पाॅईंटस बघितले. अल्पाईन व्हिजिटर सेंटर  हून परंतु फिरलो. काॅंटिनेंटल डिव्हाईड कॅनडा ते मेक्सिको जातो तोंही पाहिला. य़ा डोगराची रचना कौलासारखी असते.एका बाजूचे पाणी पॆसिफिक सागरात तर दुसरीकडते अॆटलांटिक मध्य़े जाते. सॆध्य़ाकाळी येताना थोडे वाईल्ड लाईफ दिसले. या सगळ्या ट्रीप मध्ये सतत माहिती आमच्या भाच्याने पुरवली म्हणूनच आम्ही एवढ्या गोष्टी पाहू शकलो. रेंजर प्रोग्रॅम ची माहिती व्हिजिटर  सेंटर वर मिळते.

निसर्ग हा मोठा गुरू आहे हे पुन्हा एकदा अनुभवले.  धबधबे, लेक्स, फुले, टॆड्रा वनस्पती, वाइल्ड लाईफ, सूर्यास्त, रात्रीचे आकाश, आकाशगॆगा, उॆच शिखरे ..... अनॆत हस्ते कमलावराने ..... खरेच आहेFriday, March 17, 2017

पुराणातील देव देवता ....एक सफर

मी काही फार देवदेव करणारी नाही पण त्या एका शक्तीवर विश्वास जरूर आहे. या साऱ्या विश्वाचा पसारा पाहिला की आपण त्या शक्तीला नक्कीच मानतो.

लहानपणापासून अनेक देव देवता आपल्याला भेटतात काही घरात, काही गावात तर काही पुस्तकात. आपण अनेक गोष्टी ऐकत आपली मते बनवतो.जसे आपण मोठे होतो तसे काय खरे काय खोटे याचा आपण विचार करायला लागतो. हल्लीच देवदत्त पटनाईक यांची काही पुस्तके आणि भाषणे ऐकली व काही गोष्टींचे संदर्भ लागत गेले.  सध्या त्यांच्या चालू असलेल्या फेसबुक वरच्या कार्यक्रमावर आधारित......

वेदात वर्णन केलेले देव हे जास्त निसर्गातले होते त्या नंतर सामान्य लोकांपर्यंत ज्ञान पोचवण्यासाठी पुराणे व इतर गोष्टींची निर्मिती झाली. तेव्हा अनेक प्रथा पद्धति व चिन्हे ...सिंबाॅल्स ची कल्पना उदयाला आली व या गोष्टी पिढी दर पिढी आजपर्यंत पोचल्या.वेदातले ज्ञान हे पाठांतराने एका पिढीतून दुसरीकडे जात होते. छंद मात्रा यात ते गायले जात असे. नंकर पुराणांचे लेखन झाले त्यानंतर काही वर्षांनी कॅलेंडर आर्ट निघाली. एक चित्र अनेक शब्दांचे प्रतिक असते आणि सामान्य माणसापर्यंत पोचते म्हणून भित्तीचित्रे देवळातील मूर्ती यांचा उदय झाला. नंतर कॅलेंडर व त्यावरील देवदेवतांची चित्रे सर्व जातीधर्मांच्या घरात पोचली.

हिंदू धर्मात एवढे देव आहेत.प्रत्येक देव हा एक विचार असतो. अनेक विचारांनी मिळून बनलेली ही समृद्ध परंपरा आहे. स्थल, कालानुसार यात बदल होतात. म्हणून एक देव विविध रूपात दिसत.

गाया मदर गाॅड मातृ देवता ही कल्पना सगळ्या कल्चर मध्ये आहे. आई ही जन्म देते म्हणून तिला जास्त महत्व दिले जाते. पृथ्वी ला माता म्हणून खूप संस्कृती मानतात. आकाश हे पिता स्वरूपात बधितले जाते. वेदात निसर्गाला खूप महत्व दिले आहे. सुरूवातीला भूमाता मग अनेक देवांची उत्पत्ती, त्यानंतर पुन्हा एक ईश्वर वाद असे साधारण चक्र आहे. इतर धर्मा मध्ये स्त्री देवता फार कमी दिसतात. हिंदू धर्मात बऱ्याच रूपात पूजल्या जातात. सप्तमातृका या पाषाणयुगाच्या आधीपासून सापडतात. पुराणात आणि वेगवेगळ्या काळात वेगळ्या आख्यायिका सापडतात. कधी त्या देवाचे शक्तीरूप म्हणून समोर येतात तर कधी देवांच्या मदतनीस म्हणून. नेहेमी समूहात असतात आणि रक्षणकर्त्या रूपात दिसतात. प्रत्येकीचे वाहन असते. गाया किंवा देवीरूपाबद्दल ही बरेच विचार आहेत. सुरूवातीला आदि मायेपासून सृष्टीची निर्मितीझाली असा एक विचार आहे. त्या नंतर जेव्हा मनुष्य कळप करून राहू लागला तेव्हा स्त्रीला जास्त महत्व देत असत कारण तिच्यात प्रजननाची क्षमता होती. नंतर हळूहळू हे महत्व कमी झाले.  स्वतंत्र व्यक्तिमत्व दाखवणाऱ्या या देवीची रूपे असतात. स्त्री व पुरूष यांना समान व मानाने वागवले जावे.

देवी  देवी म्हणजे प्रकृती निसर्ग.  निसर्गातून सगळ्याची निर्मिती होते.  निसर्गावर आपले नियंत्रण नसते. पुरूष रूपी मन असते आणि देवी म्हणजे निसर्ग. पुराणात त्याला स्त्री रूपात दाखवले आहे.  आदि शक्ती म्हणजे निसर्ग म्हणजेच देवी. भाग्य आणि ईच्छा किंवा काम आणि कर्म या दोन गोष्टीवर आपली समाजरचना झाली आहे. काही गोष्टी आपल्या हातात नसतात आपण त्या बदलू शकत नाही ते भाग्य किंवा कर्म आणि आपल्या मनाप्रमाणे जे करतो ते काम. विष्णू रूप हे प्रवृत्ती दाखवते तर शिव रूप हे निवृत्ती दाखवते. मनुष्याच्या आधी व नंतर निसर्ग असतो आपण त्याला आपल्या इच्छेने बदलू शकत नाही. त्यामुळे देवीला महत्व आहे.

सरस्वती ..  ही देवी शाळेत सगळ्यांना भेटतेच. पाटीपूजन करून या विद्येच्या देवीला आपण पूजतो.  या कुंदे.....या
श्लोकात सुंदर वर्णन केले आहे. ही विद्येची देवता मानली जाते. शुभ्र वस्त्र तिचे बाकी मोहमायेतले वैराग्य दाखवते. ती हंसावर बसलेली असते. हंस हा नीर क्षीर विवेकासाठी प्रसिद्ध आहे. त्याच्या पंखाला पाणी चिकटत नाही. अलिप्तता यातून दिसते.तिच्या हातात वीणा आहे. कवि लोक जे कल्पनेच्या साम्राज्यात वावरतात त्यांची ही देवी आहे. सृजनशीलता , ज्ञान हे सगळे बुद्धी व कल्पनेच्या जोरावर मिळते म्हणून या देवीचे महत्व.

दुर्गा  ही देवी सांगते सर्व भितीच्या अमलाखाली असतात. दुर्ग म्हणजे किल्ला जो रक्षण करतो. महिषासुर राक्षसाला या देवीने मारले. हा राक्षस सर्व देवांना त्रास देत होता तेव्हा देवांच्या आंतरिक शक्तीतून जे तेज एकवटले त्यातून या देवीचा जन्म झला. सगऴेराजा या देवीची पूजा करतात. वेगवेगळी वाहने दिसतात. कधी वाघ तर कधीसिंह. कधी व्हेज तरकधी बळी दिला जातो. माणसाला एक आंतरिक शक्ती व एक बाह्य शक्ती मदत करतात.  बाह्य शक्ती ही शस्त्रे सत्ता यातून मिळते.

काली  कालीचे रूप भयंकर असते. काळा रंग, वस्त्रे नाहीत, गऴ्यात रूंड माळा रक्त पिणारी. काली ही मातेच्या रूपात पूजली जाते. मनुष्य जेव्ह पशूसारखा व्यवहार करतो तेव्हा काली जन्म घेते. संहार होतो. सीता द्रौपदीवर अन्याय झाला तेव्हा त्या पण आपले रूप बदलतात.  निसर्गावर कोणी सत्ता गाजबू शकत नाही हे काली सांगते.

गौरी  सस्कृती माणसाच्या दृष्टीकोनावर अवलंबून असते.  प्रकृतीत कमतरता आहे म्हणून मनुष्य नीती नियम बनवतो. गौरी श्वेतवर्ण फुलांनी सजलेली, दागिने घातलेली असते. गौरी ही कन्येच्या रूपात पूजली जाते. देवी पूजनात नेहमी कन्या पूजन केले जाते. सभ्यता असेल तेथे गौरी वास करते व असभ्यता आली की कालीचा प्रभाव येतो.

गणपति ही महाराष्ट्राची ईष्टदेवता. सुखकर्ता दुखहर्ता अशी याची महती. लंबउदर हे संपन्नतेचे लक्षण मानतात. पूर्वी
धान्याची कमतरता होती तेव्हा भूक मिटवणे यासाठी पूजन केले जाते. वाहन उंदीर आणि कमरेला साप हे परस्यर विरोधी आहेत. ते एकत्र नांदतात जेव्हा भूक हा प्रश्न नाही.  हत्तीचे मुख सामर्थ्य दाखवते, या सगळ्या गोष्टींची कामना आपण गणपती पूजनात करतो. प्रत्येक चित्रातून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

मुरूगन
 हा गणपतिचा भाउ. हातात शस्त्र आणि तेजस्वी. भिती चा सामना करा असे तो सुचवतो.  हा उत्तरेत वेगळ्या रूपात तर दक्षिणेत वेगळ्या रूपात दिसतो. अनेक लोककथा व पुराणातील कथा त्याची महती सांगतात. दक्षिणेत त्याला दोन बायका तर उत्तरेत अविवाहित. त्याच्यासाठी हिमालय व गंगा काही प्रमाणात दक्षिणेत आणली म्हणून दक्षिण काशी व दक्षिण गंगा अशी नावे पडली असे सांगतात. देव हे वेग ळ्या काळात वेगळ्या रूपात बघितले जातात. सहा आया त्यालाआहेत ज्यात अग्नि व वायू यांचाही सामावेश आहे. देवांचा सेनापती मानला जातो. बायकांना या देवळात जाण्याचीबहुतेक ठिकाणी बंदी असते.


कलकी  आता कलियुग चालू आहे व कली अवतार घेउन जग नष्ट करणार अशी कल्पना आपण ऐकतो. हा घोड्यावर
पांढरे कपडे घालून येतो. आपल्या धर्मात प्रत्येक गोष्ट जन्माला येते व अंत पावते व परत जन्माला येते ही कत्पना आहे.


Saturday, January 28, 2017

खजुराहो एक शिल्पप्रवास

emblem

     

या वर्षी मध्यप्रदेशातील कान्हा, जबलपूर व खजुराहो या ठिकाणांना भेट दिली.

कान्हा... जंगल सुरेख. स्वच्छता वाखाणण्याजोगी.. गाईड उत्तम.. वाघाचे दर्शन झाले. सकाळच्या वेळचे जंगल फार सुंदर दिसले.जबलपूर ला धुवांधार धबधबा, ६४ योगिनी देउळ व भेडा घाट ला भेट दिली. भेडा घाट ला नर्मदेचे दर्शन झाले. दोन्ही बाजूला संगमरवरी कपारीतून बोट राईड घेतली.म प्रदेशात रस्ते अतिशय खराब. तेवढीच माणसे बोलायला छान. आदरातिथ्य उत्तम. अधेमधे फार कमी गावे लागतात. माणसे जरा मागास वाटली. हाॅटेल बुकिंग करताना शक्यतो मध्य प्रदेश टूरीझम ची करावीत.

खजुराहो थोडेसे बाजूला आहे. आम्ही जबलपूरहून गेलो. शेवटचे ५० मैल खड्डयांचाच रस्ता आहे. इथे एवढा टूरिझम आहे तर सरकारने लक्ष घालून रस्ते सुधारायला हवेत. खजुराहोला १० व्या शतकातील २०-२२ देवळे आहेत. बरीच सुस्थितीत आहेत. चंडेल राजांच्या राजवटीत ही देवळे बांधली गेली. जवळच पन्ना येथील खाणीतला दगड वापरला आहे. साधारणपणे लढाईत विजय मिळाला की नवीन देउळ बांधले गेले. अशी ८५ देवळे होती असे म्हणतात. कालांतराने ही देवळे झाडीत झाकली गेली व नजरेआड गेली. या भागात विशेष काही पिकत नाही म्हणून पण शत्रू फार फिरकला नाही.तो जमाना डिजिटल नव्हता. टी व्ही सेल फोन सिनेमा अजून अस्तित्वात नव्हते. अशा वेळेस आपल्या राजेरजवाड्यांनी कलाकारांना आसरा देउन संस्कृती संवर्धनाचे मोठे काम केले आहे. यात शिल्पकारांचे योगदान फार मोठे आहे. त्यांनी जे देवळे सजवण्याचे काम केले आहे त्यामुळे आपण भूतकाळात डोकावून बघू शकतो आणि आपल्या पूर्वजांच्या रहाणी विषयी काही आडाखे बांधू शकतो.

एखादी लढाई जिंकली की त्या विजयाचे प्रतिक म्हणून विजयस्तंभ अथवा मंदिर बांधलेले दिसून येते.  १०००-१२०० वर्षापूर्वीची मंदिरे आजही चांगल्या स्थितीत पहायला मिळतात. चंडेल राजांच्या कारकिर्दीत खजुराहोची मंदिरे बांधली गेली. खजुराहो म्हणजे मिथुन शिल्पे असा आपला एक समज असतो. पण प्रत्यक्षात १० % शिल्पे अशा प्रकारची आहेत. रात्री  लाइट साउंड शो होता. साधारण पार्श्वभूमी कळण्यास उपयोग होतो.
   चांदण्या  रात्री  कार्यक्रम पाहिल्यास देवळे फार सुंदर दिसतात. 
 असे म्हणतात की खजुराहोत ८५ देवळे बांधली  होती त्यातील २०-२२ आता दिसतात. ही देवळे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज च्या  अधिकारात असल्याने चांगल्या स्थितीत रहातील अशी आशा. तीन भागात ही देवळे विभागली आहेत. आर्किलाॅजिकल सर्व्हे तर्फे गाईडस् मिळतात अथवा आॅडिओ गाईड बुक्स आहेत. आम्ही गाईड घेतला....प्रश्न विचारता येतात.सर्वात प्रथम लक्ष्मण मंदिर पाहिले....इथे लक्ष्मणाचे देउळ कसे असे वाटत होते तेव्हा कळले की ते लक्ष्मण वर्मन याने बांधले आहे. हे देउळ बरेच सुस्थितीत आहे . सगळी देवळे मोठ्या चौथऱ्यावर आहेत. इथली देवळे नागर शैलीतली आहेत. पंचायतन पद्धतीने मेन देव मधे व बाजूला चार दिशाला चार छोटी देवळे आहेत. 
मंदिराच्या बाहेरच्या बाजूला भरपूर शिल्पे आहेत. बाहेर युद्धातील देखावे, लग्नाचा देखावा, वाद्यवृंद इत्यादी शिल्पे आहेत. देवळाच्या बाहेरच्या भिंतीवर चार प्रकारची शिल्पे आढळतात. सुरसुंदरी .. कुणी पायातला काटा काढते, कुणी सिंदूर लावते तर कुणी आरशात पहाते. त्रिभंग प्रकारातील बरीच शिल्पे आहेत. चेहऱ्यावर हावभाव सुंदर. मूर्तीना बाक दिल्याने सैंदर्यात भर पडली आहे. या शिल्पामध्ये एक प्रकारची लय आहे असे 
Laxman Temple
वाटते.  मदतनीस छोट्या आकारात दिसतात. तो त्यांचे स्टेटस दाखवण्यासाठी म्हणे...... केशरचनेचे वेषभूषेचे अनेक प्रकार दिसतात. साध्या दगडातून इतकी सुंदर शिल्पे वेगवेगळे भाव दाखवतात. त्या शिल्पकारांचे कौतुक करावे तेवढे थोड...नाव मात्र राजाचे होते . नाही म्हणायला शिल्पकारांसाठी म्हणून एक शिल्प इथे केले आहे.देवदेवतांची अनेक शिल्पे आहेत.  एका विचित्र प्राण्याचे शिल्प सगळीकडे दिसते"..आपल्या मनातले चांगले व वाईट याचे द्वंद्व दाखवले आहे. या सगळ्याबरोबर सेक्स दाखवणारी बरीच शिल्पे आहेत. तांत्रिक विद्या मानणाऱ्या लोकांचा प्रभाव या मंदिरांवर आहे असे म्हणतात तर काही लोकांच्या मते धर्म अर्थ काम मोक्ष अशा चार पायऱ्या ही शिल्पे दाखवतात. पूर्वी माझा असा समज होता की अशी शिल्पे फक्त खजुराहोतच आहेत पण ती अनेक मंदिरात दिसतात इतकी चांगल्या स्थितित नसली तरी...मग खजुराहो एवढ्या चर्चेत का?
या मंदिरात कुठेही सिमेंट वापरलेले नाही जोड काम इंटरलाॅक पद्धतीने सगळे दगड बसवले आहेत.हे अतिशय कौशल्याचे काम आहे. इथून जवळच असलेल्या पन्ना मधील खाणीतून सगळा सॅंडस्टोन वापरला आहे. आजही तिथे उत्तम प्रतीचा दगड मिळतो आहे. काही ठिकाणी रिलीफ शिल्पे दिसतात, म्हणजे दगडाना उउठावदेउन काम केले आहे. 

Kandaria Mahadeo front view
या नंतर कंडारिया महादेव हे सर्वात मोठे मंदिर आहे. या च्या प्रवेशद्वारावर सुंदर तोरण कोरलेले आहे ज्यावर यक्ष किन्नर व गांधर्व दिसतात. ते नेहमी अधांतरी दाखवतात. कंडारिआ म्हणजे गुहेत रहाणारा .या मंदिरावर पुन्हा तोच पॅटर्न दिसतो मूर्तींचा पण जास्त सुबक व मोठा आकार आहे. ८०० च्या हून जास्त शिल्पे या एका मंदिरात आहेत. ती बनवायला किती दिवस व कष्ट लागले असतील .आधी सगळे कोरीव काम होउन मग तेमंदिर नकाशाबरहुकुम बांधले गेले असे गाईड ने सांगितले. महादेव मंदिर पुढुन बघितले तर एकावर एक सात शिखरे दिसतात. हे सर्वात भव्य मंदिर विद्याधर राजाने बांधले आहे. महंमद गझनी ला हरवून आणि शेवटी तह करून ही जागा वाचवली होती. त्या विजया नंतर या देवळाची निर्मिती झाली. याच्या शिखरावर ८४ छोटी शिखरे दिसतात. ८४ लक्ष योनी नंतर मोक्ष प्राप्त होतो ही कल्पना मांडली आहे. कैलास पर्वत डोळ्यापुढे ठेवून ही रचना केली आहे. हळू हळू चढत जाणारी रचना देवळाला भव्यता प्राप्त करून देते.


बाहेरील भागात सप्तमात्रृका वाहनाबरोबर दिसतात. अग्नि व स्वाहा हे ही बघायला मिळतात. अग्नि ला अर्पण करताना जे स्वाहा म्हणतो तीच ही देवता. 

त्या नंतर जगदंबी , चित्रगुप्त व विश्वनाथ मंदिरे पाहून बाहेर असलेले ११ फुट शिवलिंगाचे मंदिर पाहिले. हे सर्वासाठी खुले आहे व पूजा होते. बाकी आतील मंदिरात गाभाऱ्यात मूर्ती आहेत पण पूजा होत नाही. 
काही अंतरावर असलेले चतुर्भुज मंदिर दुसऱ्या दिवशी सकाळी बघितले. शिवाचा मुकुट, बु्द्धाचा चेहरा, विष्णूचे अंग व कृष्णाची बासरी ची पोज असे या मूर्तीचे वर्णन करतात. या मंदिरावर मिथुन शिल्पे नाहीत. कुठे न दिसणारे नरसिंहीणी चे शिल्प आहे. गंगा यमुना हे शिल्प ही दिसते.

 शिल्पकडेदोनवेगळ्या  पाहिल्यास वेगळे भाव दिसतात. 
  केस पुसत आहे आणि तिच्या केसातले पाण्याचे थेंब पाहून एक हंस फसला आहे व मोती म्हणून त्याकडे बघत आहे. असे अनेक बारकावे या शिल्पात आहेत व गाईडस ते सगळे दाखवतात. 

अजून एक गंमत म्हणजे गाईड आरशाचा तुकडा घेउन उन्हाचा फायदा घेउन कवडसे पाडून बारकावे दाखवतात.
देवळाच्या अलिकडे वराह टेंपल आहे. एका दगडातून कोरलेले वराह अवताराचे शिल्प आहे. हात लावून लावून दगड गुळगुळीत होऊन मेटल चा वाटतो. त्याच्या मुखात वीणावादन करणारी सरस्वती तर दोन्हीबाजूला मिळून नवग्रहांच्या प्रतिमा आहेत. ३३ कोटी देवांचे प्रतिनिधी म्हणून ३३३ छोट्या सुबक प्रतिमा काढल्या आहेत. अगदी छोटे असले तरी शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे हे देउळ म्हणजे.या सगळ्या मंदिरात दशावतार भेटत रहातात.चित्रगुप्त मंदिरात सूर्याचे रथामधले शिल्प तसेच १० मुखी विष्णू चे चित्र आहे. ही विशेष कुठे न दिसणारी शिल्पे आहेत.

या मंदिराची कामसूत्र टेंपल अशी जाहिरात न करता जास्त लोकांनी भेट दिली पाहिजे.

या देवळांनी बरीच माहिती पुराणतील गोष्टी व अप्रतिम कारागिरी दाखवली हे नक्की.


war scene


vadyavrundaSundar toran eka dagdatun 


sanskrut shilalekh


Chaturbhuj Mandir

chaturbhuj Mandir Murti
sculptures in three layers

Outer side carvings
Shilpkaransathi shilp

temple recently found in outskirts