Thursday, March 6, 2014

खजिना मनोरंजनाचा ...

खजिना मनोरंजनाचा ..

आजकाल जमाना आहे इंटरनेटचा. जगातल्या घडामोडी तुम्ही घरबसल्या बघू शकता. टी व्ही वरून पण आपण अनेक गोष्टी बघत असतो. रोजच्या सिरीअल्स, बातम्या, सिनेमे आणि गाणी.  आता यू ट्यूब मुळे टी व्ही शिवाय अनेक गोष्टींची मजा घेता येते. यातील महत्वाचा फायदा म्हणजे हव्या त्या वेळी कार्यक्रम बघता येतो आणि हो जाहिराती शिवाय... अजून काय पाहिजे...

भारताबाहेर रहाणारे लोक याचा मला वाटते जास्त फायदा घेतात कारण इंटरनेट सुविधा चांगली असते आणि टी व्ही चेनेल्स घेण्याची गरज पडत नाही. माझ्या आवडीच्या अशा काही साईटस् देत आहे बघा तुम्हालाही आवडतील.

आय बी एन लोकमत लाइव्ह बघता येतो. या वरील ग्रेट भेट हा कार्यक्रम खरोखर ग्रेट आहे. अनेक कलाकार, शास्त्रज्ञ, राजकारणी यांच्या जीवनाबद्दल माहिती मिळते. यू ट्यूब वर नंतरही बघता येते.

  apalimarathi.com वर मराठी सिनेमे, नाटक, सिरीअल्स बघू शकतो. सध्या अग्निहोत्र ही जुनी सिरीअल मस्त आहे. कलाकार, कथा सगळे पाहून आजकालच्या सिरीअल्स मधील सासू सुना या विषयातून कधी आपण बाहेर येउ असे वाटते. अशीच अजून एक साइट आहे rajashri.com.

rajyasabha tv.com या साइट वर जुन्या कवी, लेखक यांच्याबद्दल गुफ्तगु, एक शाम .साहिर के नाम असे सुंदर कार्यक्रम आहेत. जरूर पहा. या कार्यक्रमातील मला सगळ्यात आवडते ते शुद्ध हिंदी भाषा. खूप छान वाटते ऐकायला. सध्या शाम बेनेगल यांची संविधान दर रविवारी सुरू झाली आहे. आपली घटना कशी तयार झाली यावर.

Satyamev Jayte - गेल्या वर्षीपासून आमिर खान ने चालू केलेली मालिका. चांगला रिसर्च आणि सडेतोड विचार. अशा किती गोष्टींपासून आपण अनभिज्ञ असतो ज्या आपन्या आजूबाजूला घडत असतात.

Pradhanmantri ABP News हा पण एक चांगला प्रयत्न आहे. आजपर्यंतच्या सगळ्या प्रधानमंत्रींच्या कारकिर्दीत काय घडले. बरेच खरे फूटेज वापरल्याने बघताना छान वाटते.

TED.com यावर बरेच माहिती पूर्ण  १०-१५ मि चे व्हिडीओ असतात. अनेक विषय हाताळने जातात.
einthusian.com यावर चांगल्या क्वालिटीचे सिनेमा बघता येतात. थोडे थांबावे मात्र लागते.
Desirulez.net या साइट वर मला वाचते टी व्ही जगतातले सगळे काही असते... कसे जमवतात देव जाणे.

असो तुम्ही पण जाउन बघा या साइट्स वर.