Tuesday, August 24, 2010

काही वाचनीय .... मेनी मास्टर्स मेनी लाइव्हस

परवा एक पुस्तक वाचनात आले. नुकतेच एका मैत्रिणीने सुचवले होते आणि लायब्ररीत समोरच दिसले. वाचनाचा योग दिसत होता. अनुवादित होते तरी पटकन उचलले. (आजकाल अनुवाद चांगले करतात).

डाँ ब्रायन वेस याने लिहिलेले व सुवर्णा बेडेकर यांनी अनुवादित केलेले हे पुस्तक. (मेनी मास्टर्स मेनी लाईन्हस) मूळ लेखक पेशंटवर उपचार म्हणून संमोहन विद्या वापरतो. (गरज पडली तर). अशाच एका पेशंटवर उपचार करताना - तिच्या लहानपणीच्या आठवणी जाणून घेताना ती पूर्वजन्मात ल्या आठवणी सांगू लागते. एक नाही दोन नाही ८६ जन्मातल्या आठवणी ती सांगते. इजिप्त, ग्रीस, रोम इ देशात तिचे जन्म आहेत. तिथल्या भौगोलिक परिस्थितीवरून हे अंदाज काढले आहेत. कधी पुरूष कधी बाई, कधी गरीब कधी श्रीमंत. काही जन्मात चालू जन्मातील माणसे तिला दिसतात.

हळूहळू हा डाँ तिला दर जन्मातल्या मृत्युच्या वेळेपर्यंत घेउन जातो आणि मृत्यूनंतर काय - या गूढ प्रश्नाकडे घेउन जातो. त्यानंतर ती मुलगी दर वेळास
मृत्यूनंतर वर जाउन तरंगते आणि एका प्रकाशाची वाट बघते असे सांगते. प्रकाश दिसला की तिला उर्जा मिळते व मास्टर्स नी आज्ञा केली की तिचा पुनर्जन्म होतो. कधी कधी वाट बघावी लागते. आत्ताच्या जन्मातील काही माणसे परत तिच्या बरोबर असतात (वेगवेगळ्या रूपात )कारण ती त्यांचे काही देणे लागत असते. ती बोलताना तिचा व मास्टर्सचा आवाज वेगळा येतो.

हे सगळे वाचून आपल्याकडे मृत्यूनंतरची जी कल्पना आहे तेच सगळे लिहिले आहे असे वाटते. हिंदू फिलाँसाँफी इन अमेरिकन कँपसूल असेच वाचताना वाटते. एकदा वाटले या माणसाने आधी आपल्या तत्वज्ञानाचा अभ्यास करून मग फिक्शन लिहिले आहे. पण या डाँ ने सर्व टेप केले आहे व जरूर तिथे नावे बदलली आहेत. हिंदू तत्वज्ञानाचा उल्लेखही केला आहे. या उपचारानंतर ती तरूणी बरी झाली व काम करत आहे. तिचे भास स्वप्ने भिती गेले आहे. या डाँ ला काही स्वप्ने पडतात व तो या मास्टर्स शी संवाद करू शकतो. अगदी मनुष्य यंत्रांच्या आहारी जाणार व शेवटी आजून काही वर्षात तो सर्वनाश ओढवून धेणार ...

हे पुस्तक वाचल्यावर एक गूढ वातावरण नक्कीच तयार होते. ही पेशंट दुसरीकडे जाउन भविष्य बघून आली आबे. त्या बाईने भूतकाळात डोकावून याच गोष्टी क्राँसचेक केल्या आहेत. या नंतर अजून १२-१५ पेशंटवर हा प्रयोग केले त्या पैकी २-३ जणांना गेल्या जन्मातले आठवले.

प्रत्येक धर्मात एक श्रद्धा आसते त्यानुसार मी या गोष्टीकडे बघते. पण कुठेतरी या गोष्टीचे प्रूफ असावे असे नक्की वाटते. स्वमी विवेकेनंदांनी जेव्हा अमेरिकेत लेक्चर्स दिली तेव्हा टेसला नावाचा एक शास्रज्ञ ऐकायला येत असे. त्याच्याकरवी (फिजिक्स व गणित वापरून) अात्मा व पुनर्जन्म यांचे आस्तित्व पटवून द्यायचा त्यांनी प्रयत्न केला होता असे एका ठिकाणी वाचले होते. पण ते जमले नाही. आता आपलेच तत्वज्ञान वेस्ट च्या लोकांनी प्रूव्ह करून दाखवले तर............ हरकत नाही पण छान नाही वाटणार हे नक्की.

एक गोष्ट मात्र नक्की - आपल्याकडे ही गोष्ट खूप अवघड करून सांगतात. ध्यानानंतर काय वाटते ते सांगता येत नाही - तुम्ही करून पहा मग कळेल - या पुस्तकात या मुलीच्या निवेदनातून अगदी सोप्या भाषेत सगळे सांगितले आहे.

सध्या माझ्या एका मित्राने डां ची अपाँईंटमेंट धेतली आहे त्याला जर मागील काही घटना आठवल्या तर बघायचे आहे. त्याचा अनुभव टेप करून तो शेअर ही करणार आहे. आता उत्सुकता आहे त्याची टेप काय म्हणते याची.

Sunday, August 15, 2010

नाच पाहुनी अति मी रमले....१

नाच पाहुनी अति मी रमले....

आजपर्यंत आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरलो. तिथला प्रदेश, प्रेक्षणीय स्थळे बघताना त्या त्या प्रदेशातली कला ही बघायला मिळाली. नृत्याचे अनेक प्रकार बघितले. हे नाच त्यांच्या मूळ ठिकाणी जाउन बघायला मिळाले ही गोष्ट महत्वाची. साहजिकच त्या नृत्य प्रकाराची माहिती पण मिळत गेली. त्या नाचातून कपडे दागिने दिसतात व त्या देशाचे संगीतही ऐकता येते. असेच काही नृत्य प्रकार
हुला डान्स- हवाई
हवाई आणि हुला हे समीकरण डोक्यात पक्के बसलेले होते. हुला मध्ये पेले या देवतेचे स्मरण करतात. निसर्गाला धन्यवाद देतात. इथे बऱ्याच ठिकाणी जेवण व डान्स असा कार्यक्रम असतो. त्यात हुला व इतर आयलंडचे डान्स मिक्स केलेले असतात. सुरूवातीला लोकांना स्टेप्स शिकवतात. असे डान्स कमर्शिअल टाईपचे असतात. इथल्या राजाने हा डान्स टिकावा म्हणून बरीच मदत केली आहे. मार्केट मध्ये छोटे शोज होतात ते लोकांना फ्री असतात. या कलाकारांचा खर्च सरकार देते. त्यामुळे ही कला टिकून राहिली आहे. खूप स्पर्धा होतात. अगदी लहान मुलांपासून ते म्हातार्यांपर्यंत लोक हा नाच शिकताना दिसतात. नाचामधून एखादी गोष्ट सांगितलेली असते. प्रत्येक मुव्हमेंटला अर्थ असतो. (पाणी, हवा, समुद्र ई) गाण्यावर पोर्तुगीज छाप वाटते. नेहेमी लाईव्ह बँड बाजूला असतो. काही हालचाली इतक्या फास्ट असतात की बस......हात व हिप्स ्यांच्या हालचाली खूप असतात. गळ्यात पानाफुलांच्या माळा , कपडे अगदीच कमी...हा सगळा आजकालचा बाजारी पणा वाटला पण सगळी मंडळी अगदी मनमोकळी नाचत असतात. सुरूवातीला अगदी डिसेंट कपडे घालुन नाचत असत.
basic steps
traditional hula
commercial Hula

बेली डान्स - आम्ही सौदी अरेबियात काही वर्षे राहिलो होतो. तिथे असताना बेली डान्स बद्दल ऐकले होते. सौदीत अशा गोष्टीवर बंदी आहे. तिथून आम्ही इजिप्त ला गेलो तेव्हा क्रूज वर हा डान्स बघितला. मुस्लीम धर्मात इतकी बंधने असताना असा डान्स कसा हा प्रश्न मला अजून आहे. अरेबिक टोळ्यांमध्ये केव्हातरी याचा उगम झाला असावा. तुर्की, इजिप्त, इराण, लिबिया एकंदरीत मिडल इस्ट मध्ये हा प्रकार बघायला मिळतो. बेली, हिप्स आणि अपर पार्टस च्या मसल्स ची मूव्हमेंट यात दाखवतात. पहिल्यांदा पाहिल्यावर हा कसला डान्स असे वाटते पण करायला अवघड आणि स्किलवाला आहे हा प्रकार. अरेबिक म्युझिक व हा प्रकार टूरिस्टचे एक आकर्षण असते.
Belly dance

स्विस डान्स-
युरोप च्या ट्रीप वर असताना स्वित्झर्लंड मध्ये हा डान्स बघितला. मोठ्या पाईप्स वर प्रथम त्यांनी म्युझिक वाजवले. तिथे गाईंच्या गळ्यात अजूनही मोठ्या घंटा बांधतात त्या वापरून छान ट्यून्स ऐकवल्या. नंतर त्यांचा टिपीकल चेक्स चा ड्रेस घातलेले डान्सर आले व डान्स केला. या सगळ्या ठिकाणी दर्शकांना नेहेमी सहभागी करून घेत असत. चिकन डान्स ही झाला.
swiss dance
pipe n bells

या सगळ्या नाचात हाताच्या हालचालींना खूप महत्व आहे. त्या त्या देशातला निसर्ग, देव देवता यांचे वर्णन या नाचातून दिसते. नाच कुठलाही असो भाव प्रकट होणे महत्वाचे. आपल्याकडे जरा अंगभर कपडे घालून नाच केलेले दिसतात. पण अजून ठिकठिकाणी असे लावणी, कोळी डान्स किंवा इतर जुन्या प्रकारांचे प्रदर्शन दिसत नाही. ठराविक फेस्टीव्हल व गणपति यात दिसतात.
माझ्याकडे सगळे व्हिडिओज नाहीत त्यामुळे यू ट्यूब झिंदाबाद

आता पुढील भागात भारतातले काही नृत्यप्रकार....

Tuesday, August 10, 2010

वेदाबद्दल -- असाही एक वक्ता

परवा एके ठिकाणी वेद आणि हिंदू धर्म यावर एका अमेरिकन माणसाचे लेक्चर ऐकले. मी सहसा अशी भाषणे ऐकायला जात नाही कारण तिथे नवीन काही ऐकायला मिळत नाही. इथे बोलणारा अमेरिकन होता त्बामुळे विचार केला, बघू या, या लोकांचा व्ह्यू काय आहे ते. त्याची वेब साइट ही चांगली वाटली.

स्टीफन नप ( आता त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला आहे. ख्रिश्चन व इतर अनेक धर्मांचा त्यांनी अभ्यास केला, हिंदू धर्मात खूप नाँलेज आहे असे वाटल्याने त्यानी हा धर्म स्वीकारला. आपल्या अनेक ग्रंथांचे वाचन केले. १७ पुस्तकांचे लेखन केले. हिंदू धर्म कमी करण्यासाठी कसे प्रयत्न चालू आहेत यावर ही त्यांनी एक पुस्तक लिहिले आहे. बेसिक गोष्टी ज्या मुलांना माहित हव्या त्यासाठी एक वेगळी लिंक वेबसाईट वर आहे. मी खूप साईटस बघते हिंदुइझम वर पण ही सगळ्यात चांगली वाटली. बेसिक गोष्टी यात चांगल्या लिहिल्या आहेत. त्यांच्या लिखाणात जागोजागी पुस्तकांचे संदर्भ दिले आहेत. भारतात २० वेळा लेक्चर साठी त्यांना बोलावले आहे. दुसरा धर्म स्वीकारून त्यांच्या समुदायापुढे माहितीपूर्ण भाषण करणे हे कौतुकास्पद वाटले.

अमेरिकेत वाढणारी आजकालची जी तरूण पिढी आहे त्याना बर्याच प्रश्नांना तोंड द्यावे लागते. आजकाल घरातून मुलांना संस्कार कमी मिळतात कारण तरूण पालकांना माहिती असतेच असे नाही. कारण कळल्याशिवाय तरूण मुले काही मान्य करत नाहीत (ही अतिशय चांगली गोष्ट आहे माझ्या मते). भारताबाहेर रहाताना आपल्या घर्माबद्दल बेसिक माहिती असणे आवश्.क आहे. यात पालकांची जबाबगारी जास्त आहे असे मला वाटते.कोणी तुम्हाला प्रश्न विचारला तर उत्तर देता आले पाहिजे. आणि हे उत्तर एकसारखे असले पाहिजे आपल्याकडे प्रत्येकाते मत वेगळे. भारतात मुलांची काय परिस्थिती आहे माहित नाही.

त्यांनी लिहिलेले क्राइम अगेन्स्ट इंडिया हे पुस्तक चांगले वाटले. वरवर बघता आपल्याला जाणवत नाही पण धर्म बुडवण्याचे पद्धतशीर प्रयत्न चालू आहेत. लोक बाटत आहेत. आता एकीकडे म्हणतात की भारतात खाण्याची कमतरता नाही पण याच कारणासाठी लोकांना बाटवले जात आहे. सरकार लक्ष घालेल तर काही होउ शकते. आपल्या धर्मात स्वातंत्र्य खूप असल्याने अनेक पंथ आणि विचार धारा निर्माण झाल्या आहेत त्यामुळे लोकांचे एकत्रिकरण अवघड झाले आहे.

आपल्या रोजच्या जीवनात फारसा फरक पडत नसल्याने धर्म या गोष्टीकडे फारसे लक्ष दिले जात नाही असे वाटते.