Friday, March 17, 2017

पुराणातील देव देवता ....एक सफर

मी काही फार देवदेव करणारी नाही पण त्या एका शक्तीवर विश्वास जरूर आहे. या साऱ्या विश्वाचा पसारा पाहिला की आपण त्या शक्तीला नक्कीच मानतो.

लहानपणापासून अनेक देव देवता आपल्याला भेटतात काही घरात, काही गावात तर काही पुस्तकात. आपण अनेक गोष्टी ऐकत आपली मते बनवतो.जसे आपण मोठे होतो तसे काय खरे काय खोटे याचा आपण विचार करायला लागतो. हल्लीच देवदत्त पटनाईक यांची काही पुस्तके आणि भाषणे ऐकली व काही गोष्टींचे संदर्भ लागत गेले.  सध्या त्यांच्या चालू असलेल्या फेसबुक वरच्या कार्यक्रमावर आधारित......

वेदात वर्णन केलेले देव हे जास्त निसर्गातले होते त्या नंतर सामान्य लोकांपर्यंत ज्ञान पोचवण्यासाठी पुराणे व इतर गोष्टींची निर्मिती झाली. तेव्हा अनेक प्रथा पद्धति व चिन्हे ...सिंबाॅल्स ची कल्पना उदयाला आली व या गोष्टी पिढी दर पिढी आजपर्यंत पोचल्या.वेदातले ज्ञान हे पाठांतराने एका पिढीतून दुसरीकडे जात होते. छंद मात्रा यात ते गायले जात असे. नंकर पुराणांचे लेखन झाले त्यानंतर काही वर्षांनी कॅलेंडर आर्ट निघाली. एक चित्र अनेक शब्दांचे प्रतिक असते आणि सामान्य माणसापर्यंत पोचते म्हणून भित्तीचित्रे देवळातील मूर्ती यांचा उदय झाला. नंतर कॅलेंडर व त्यावरील देवदेवतांची चित्रे सर्व जातीधर्मांच्या घरात पोचली.

हिंदू धर्मात एवढे देव आहेत.प्रत्येक देव हा एक विचार असतो. अनेक विचारांनी मिळून बनलेली ही समृद्ध परंपरा आहे. स्थल, कालानुसार यात बदल होतात. म्हणून एक देव विविध रूपात दिसत.

गाया मदर गाॅड मातृ देवता ही कल्पना सगळ्या कल्चर मध्ये आहे. आई ही जन्म देते म्हणून तिला जास्त महत्व दिले जाते. पृथ्वी ला माता म्हणून खूप संस्कृती मानतात. आकाश हे पिता स्वरूपात बधितले जाते. वेदात निसर्गाला खूप महत्व दिले आहे. सुरूवातीला भूमाता मग अनेक देवांची उत्पत्ती, त्यानंतर पुन्हा एक ईश्वर वाद असे साधारण चक्र आहे. इतर धर्मा मध्ये स्त्री देवता फार कमी दिसतात. हिंदू धर्मात बऱ्याच रूपात पूजल्या जातात. सप्तमातृका या पाषाणयुगाच्या आधीपासून सापडतात. पुराणात आणि वेगवेगळ्या काळात वेगळ्या आख्यायिका सापडतात. कधी त्या देवाचे शक्तीरूप म्हणून समोर येतात तर कधी देवांच्या मदतनीस म्हणून. नेहेमी समूहात असतात आणि रक्षणकर्त्या रूपात दिसतात. प्रत्येकीचे वाहन असते. गाया किंवा देवीरूपाबद्दल ही बरेच विचार आहेत. सुरूवातीला आदि मायेपासून सृष्टीची निर्मितीझाली असा एक विचार आहे. त्या नंतर जेव्हा मनुष्य कळप करून राहू लागला तेव्हा स्त्रीला जास्त महत्व देत असत कारण तिच्यात प्रजननाची क्षमता होती. नंतर हळूहळू हे महत्व कमी झाले.  स्वतंत्र व्यक्तिमत्व दाखवणाऱ्या या देवीची रूपे असतात. स्त्री व पुरूष यांना समान व मानाने वागवले जावे.

देवी  देवी म्हणजे प्रकृती निसर्ग.  निसर्गातून सगळ्याची निर्मिती होते.  निसर्गावर आपले नियंत्रण नसते. पुरूष रूपी मन असते आणि देवी म्हणजे निसर्ग. पुराणात त्याला स्त्री रूपात दाखवले आहे.  आदि शक्ती म्हणजे निसर्ग म्हणजेच देवी. भाग्य आणि ईच्छा किंवा काम आणि कर्म या दोन गोष्टीवर आपली समाजरचना झाली आहे. काही गोष्टी आपल्या हातात नसतात आपण त्या बदलू शकत नाही ते भाग्य किंवा कर्म आणि आपल्या मनाप्रमाणे जे करतो ते काम. विष्णू रूप हे प्रवृत्ती दाखवते तर शिव रूप हे निवृत्ती दाखवते. मनुष्याच्या आधी व नंतर निसर्ग असतो आपण त्याला आपल्या इच्छेने बदलू शकत नाही. त्यामुळे देवीला महत्व आहे.

सरस्वती ..  ही देवी शाळेत सगळ्यांना भेटतेच. पाटीपूजन करून या विद्येच्या देवीला आपण पूजतो.  या कुंदे.....या
श्लोकात सुंदर वर्णन केले आहे. ही विद्येची देवता मानली जाते. शुभ्र वस्त्र तिचे बाकी मोहमायेतले वैराग्य दाखवते. ती हंसावर बसलेली असते. हंस हा नीर क्षीर विवेकासाठी प्रसिद्ध आहे. त्याच्या पंखाला पाणी चिकटत नाही. अलिप्तता यातून दिसते.तिच्या हातात वीणा आहे. कवि लोक जे कल्पनेच्या साम्राज्यात वावरतात त्यांची ही देवी आहे. सृजनशीलता , ज्ञान हे सगळे बुद्धी व कल्पनेच्या जोरावर मिळते म्हणून या देवीचे महत्व.

दुर्गा  ही देवी सांगते सर्व भितीच्या अमलाखाली असतात. दुर्ग म्हणजे किल्ला जो रक्षण करतो. महिषासुर राक्षसाला या देवीने मारले. हा राक्षस सर्व देवांना त्रास देत होता तेव्हा देवांच्या आंतरिक शक्तीतून जे तेज एकवटले त्यातून या देवीचा जन्म झला. सगऴेराजा या देवीची पूजा करतात. वेगवेगळी वाहने दिसतात. कधी वाघ तर कधीसिंह. कधी व्हेज तरकधी बळी दिला जातो. माणसाला एक आंतरिक शक्ती व एक बाह्य शक्ती मदत करतात.  बाह्य शक्ती ही शस्त्रे सत्ता यातून मिळते.

काली  कालीचे रूप भयंकर असते. काळा रंग, वस्त्रे नाहीत, गऴ्यात रूंड माळा रक्त पिणारी. काली ही मातेच्या रूपात पूजली जाते. मनुष्य जेव्ह पशूसारखा व्यवहार करतो तेव्हा काली जन्म घेते. संहार होतो. सीता द्रौपदीवर अन्याय झाला तेव्हा त्या पण आपले रूप बदलतात.  निसर्गावर कोणी सत्ता गाजबू शकत नाही हे काली सांगते.

गौरी  सस्कृती माणसाच्या दृष्टीकोनावर अवलंबून असते.  प्रकृतीत कमतरता आहे म्हणून मनुष्य नीती नियम बनवतो. गौरी श्वेतवर्ण फुलांनी सजलेली, दागिने घातलेली असते. गौरी ही कन्येच्या रूपात पूजली जाते. देवी पूजनात नेहमी कन्या पूजन केले जाते. सभ्यता असेल तेथे गौरी वास करते व असभ्यता आली की कालीचा प्रभाव येतो.

गणपति ही महाराष्ट्राची ईष्टदेवता. सुखकर्ता दुखहर्ता अशी याची महती. लंबउदर हे संपन्नतेचे लक्षण मानतात. पूर्वी
धान्याची कमतरता होती तेव्हा भूक मिटवणे यासाठी पूजन केले जाते. वाहन उंदीर आणि कमरेला साप हे परस्यर विरोधी आहेत. ते एकत्र नांदतात जेव्हा भूक हा प्रश्न नाही.  हत्तीचे मुख सामर्थ्य दाखवते, या सगळ्या गोष्टींची कामना आपण गणपती पूजनात करतो. प्रत्येक चित्रातून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

मुरूगन
 हा गणपतिचा भाउ. हातात शस्त्र आणि तेजस्वी. भिती चा सामना करा असे तो सुचवतो.  हा उत्तरेत वेगळ्या रूपात तर दक्षिणेत वेगळ्या रूपात दिसतो. अनेक लोककथा व पुराणातील कथा त्याची महती सांगतात. दक्षिणेत त्याला दोन बायका तर उत्तरेत अविवाहित. त्याच्यासाठी हिमालय व गंगा काही प्रमाणात दक्षिणेत आणली म्हणून दक्षिण काशी व दक्षिण गंगा अशी नावे पडली असे सांगतात. देव हे वेग ळ्या काळात वेगळ्या रूपात बघितले जातात. सहा आया त्यालाआहेत ज्यात अग्नि व वायू यांचाही सामावेश आहे. देवांचा सेनापती मानला जातो. बायकांना या देवळात जाण्याचीबहुतेक ठिकाणी बंदी असते.


कलकी  आता कलियुग चालू आहे व कली अवतार घेउन जग नष्ट करणार अशी कल्पना आपण ऐकतो. हा घोड्यावर
पांढरे कपडे घालून येतो. आपल्या धर्मात प्रत्येक गोष्ट जन्माला येते व अंत पावते व परत जन्माला येते ही कत्पना आहे.
भैरव हा शब्द भय या पासून आलेला आहे. भैरव  कायम कुत्र्याबरोबर असतो.  माणसाला भय व भूक असते.
जगात जे करप्शन आहे ते भितीमुळे आहे.


लिंगराज अमूर्ततेला रूप देताना याची निर्मिती झाली अशी एक कथा आहे. भारतात याचे अनेक प्रकार दिसतात व अनेक आख्यायिका आहेत. कधी नुसता दगड कधी बर्फाचा सुळका कधी नर्मदा नदीतले गोल गोटे काही ठिकाणी पिंडीवर दिसतात तर काही ठिकाणी चार बाजूला चार मुखवटे लावलेले असतात. काही प्रांतात पत्र्याचा मुखवटा दिसतो.

शिव लहानपणापासून संहारक अशी प्रतिमा आपल्या मनावर असते. विरक्ती मुळे संहार नाश होतो. शिव हा सगळ्यातून आपले मन काढून कैलास पर्वतावर बसतो आणि शैलपुत्री पार्वती त्याला संसारात भाग घेण्यासाठी काशीला घेउन येते . अशी कथा आहे. संसारात राहून वैरागी  मोहाचा त्याग करून जीवन जगण्याचा यात संदेश दिला आहे.मरण स्मृती भूक भय याचा तो संहार करतो.

नटराज  नटराजाची मूर्ती शंकराचे नर्तन दाखवते.  उत्तरेत ही मूर्ती दिसत नाही. तिथे तो भोला शंकर म्हणूल भेटतो.
दक्शिणेत ही मूर्ती खूप दिसते. एका हातात डमरू, डोळे मिटलेले, एका पा.ावर उभी अशी ही मूर्ती असते. नाचात स्थल ेव काल या दोन्हीची गरज असते व नाच संपल्यावर दोन्ही रहात नाही.  मुद्रा अभिनय यातून न बोलता  ज्ञान दिले आहे. शब्द तोडून त्याच्या आतला भाव जाणून ध्या. विचार काम वासना तोडून त्याचा अर््थ काढला जातो. मग्न होउन एकांत नाच आहे  भोवतीने वलय असते अग्निचे.  विनाशातून पुन्हा सुरूवात होत असते. एका हाताची अभय मुद्रा आहे. न घाबरता उत्पत्ती व लय या चक्राला समोर जावे असे सांगते ही मुद्रा. माणसांनी आपल्या विचारांचे खंडन करून त्यातून अर्थ व भाव शोधावा असाही एक अर्थ सांगतात.  जग बदलते. नित्य अनित्य जग असते. दुसर्यांच्या बद्दल विचार करा.

भोलेनाथ  संस्कृती म्हणजे एक दिखावा आहे. शंकर हा बैरागी आहे. प्रकृती ही सगऴ्यांची आहे. त्यात जेव्हा संस्कृती निर्माण केली जाते तोव्हा मी माझे असे विचार चालू होतात. शिवाला म्हणून भोळा सांब म्हणतात कारण त्याला व्यावहारिक जीवनात काही रस नाही. देवी त्याला व्यवहारीक जीवनात घेउन येते.

विष्णू ... हिंदू तत्वज्ञानाचा मूलमंत्र फळाची इच्छा न करता काम करत रहा हा विचार आहे. जसे की बी लावल्यावर त्याला फळे फुले येईपरेयंत अनेक घटकांचा परिणाम त्यावर होतो जो आपण कंट्रोल करू शकत नाही. त्यामुळे आपण बागकामाचा आनंद घ्यावा . यामुळे अपेक्षाभंग होत नाहीत.

मोहिनी ... मोहिनी हा विष्णूचा ११ वा अवतार मानला जातो हा दशावतारात नसतो आणि हिचे कार्य थोडे वेगळे
आहे.विष्णूने स्त्री रूपात हा अवतार घेतला. भगवान शंकरांना सांसारिक बनवण्यासाठी हिने भुलवले. त्या दोघांना जो पुत्र झाला हरी हर सुत, तो शबरीमलाई च्या डोंगरावर अय्यप्पा नावाने प्रसिदध आहे. शबरीमलाईला बरेच लोक जातात हे ऐकले होते पण त्यामागची कथा आत्ता कळली. विष्णू म्हणजे अनंत अशी कल्पना आहे. त्यातील काही अंश रूप लोकांसाठी जेव्हा अवतरते त्याला अवतार म्हटले जाते. लोकांना मदत करायला हे अवतार घेतले जातात. लहान मुलाशी खेळताना जशी आई छोटी होउन खेळते तसा हा प्रकार. पुरूष व स्त्री हे नेहमी एक असतात. मोहिनी ने भस्मासुराला ठार केले , तो ज्याला हात लावेल त्या वस्तूचे भस्म होत असे. ह्याच मोहिनी ने सागर मंथनाच्या वेळेस  देवांना अमृत दिले होते. त्यामुळे सतत देव व दैत्या मध्ये भांडण असे. थोडक्यात आपल्या मनात आपण किती धन पाहिजे व किती ज्ञान पाहिजे याचा समतोल ठेवला पाहिजे. मोहिनी ही सगळ्यांच्या मनात असते. संपत्तीचा मोह व ज्ञान यात यातले काय हवे हे मंथन मनात सतत चालू असते. होसायळेश्वर येथील मंदिरात खूप छान मूर्ति आहेत. तसेच जेजुरी ला ती म्हाळसेच्या रूपात दिसते.

कूर्म  हा विष्णूचा एक अवतार मानला जातो,  माणसाकडे कितीही संपत्ती असली तरी तुम्हाला ममाधान मिळेल अशी खात्री नमते. कासव हे शांत स्वभाव दाखवते. आत्मद्यान मिळाले की माणसाला सुख मिळते. ब्रम्हा निर्मिती करतो. भिती पण. विष्णू व्यवहारीक जीवनात वेगवेगळे अवतार घेतो. देव व असुर यांच्यात मंथन झाले. सगळ्या जगातून आपण संपत्ती काढत असतो. यातून जे विष ..निगेटीव्ह गोष्टी येतात त्या शंकर घेतो.  देवांना सगळे मिळते सक्सेस संपत्ती पण तरी ते नेहमी इनसिक्यूर असतात. तुम्ही स्रद्धा पेशन्स ठेवला पाहिजे.  देव दैत्य यांच्याकडे आत्मद्यान नाही. म्हणीन ते अस्थिर असतात.

त्रिविक्रम ... हा विष्णूचा वामन अवतार आहे. बळी राजा हा मोठा दानशूर होता. त्याची सत्ता आणि हाव वाढत होती. बाकीच्यांना तो शूद्र लेखत असे. तो पुण्य करत असल्याने त्ाला ठार कसे करावे हा विचार चालू होता तेव्हा विष्णू एका बटू वामनाचे रूप घेउन जातात व दानात तीन पावले जमीन मागतात. बळी लगेच ती देउ करतो. पहिल्या दोन्ही पावलात त्रिलोक पादाक्रांत करून बटू विचारतो की तिसरे पाउल कुठे ठेउ तेव्हा राजाला आपली चूक कळते आणि तो आपले मस्तक पुढे करतो आण शेवटी पाताळात जातो. दुसरा कमी ल इथे युक्ि चा वापर केलेला आहे. दुसऱ््याला कमी लेखू नये आणि कोणाला अति महत्व देउ नये. असुरक्षितता नाशाला कारणीभूत होते.


विठाई 
देव भक्तासाठी कुठलेही रूप घ्यायला तय़ार असतो.  महाराष्ट्राचे  हे दैवत आहे. काही लोक विठोबा रखुमाई पासून विठाई हे नाव आले असे म्हणतात. आपल्याकडे अनंत ही महत्वाची कल्पना आहे. या विश्वाला क्शिरमागर म्हणले जाते ज्याला बंधन नाही बाउंडरी लेस. संतांनी देवाचा धावा करताना त्याला माउली च्या रूपात पाहिले. ही अनंताची कत्पना आपल्या धर्मातली महत्वाची आहे.  भक्तासाठी देव स्त्री पुरूष अथवा ईतर कुठलेही रूप घेतो. विष्णू मोहिनीचे रूप घेतो, वृंदावन मधे तर भगवान शंकरानी गोमतेश्वराचे रूप घेतले आहे व त्याला चक्क नथ घातली जाते.No comments: