Monday, December 16, 2019

आॅस्ट्रेलिया... आयलंड काॅंटिनेंट ची सफर ( सिडने व मेलबोर्न)


आॅस्ट्रेलिया... आयलंड काॅंटिनेंट ची सफर (सिडने व मेलबोर्न)

जपान या आयलंड देशाला आणि हवाई या आयलंड स्टेट ला भेट देउन झाल्यावर आता आॅस्ट्रेलिया या आयलंड काॅंटिनेंट ला या वर्षी भेट देण्याचा योग आला. ईंडिअन ओशन, पॅसिफिक ओशन, साउथ सी, तास्मानिया, असे अनेक समुद्र इथे भेटू शकतात. मनात विचार येतो, ही एकाच पाण्याची वेगवेगळे रूपे आहत, नावे फक्त वेगळी, एरिया नुसार. आमची सुटी व बघण्याच्या गोष्टी यांचा विचार करता, सिडने १० दिवस, मेलबोर्न ५ दिवस व न्यूझीलॅड चे साउथ आयलंड ५-६ दिवस असा प्रोग्रॅम ठरला.

आॅस्ट्रेलिया चा फ्लॅग जर बघितला तर त्यांवर काही स्टार्स दिसतात. हे स्टार्र्स सदर्न क्राॅस दाखवतात. आपण नेहेमी दिशादर्शक म्हटले की नाॅर्थ स्टार कडे बघतो. पण सदर्न हेमिस्पिअर मधे सदर्न क्राॅस व इतर तारे मिळून दक्षिण दिशा दखवायचे काम करतात. पहिल्यांदा हे ऐकल्यावर गंमत वाटली. पूर्वी सनुद्री मार्गाने आलेल्या लोकांनी दिशादर्शक तारा शोधण्यासाठी नक्कीच खूप कष्ट घेतले असतील. इथल्या मुक्कामात पौर्णिमा होती. त्या दिवशी चंद्र वेगळा दिसत होता कारण तिथून अपसाईड डाउन चंद्र दिसतो. घरी आल्यावर पृथ्वीच गोल घेउन पाहिले तेव्हा या गोष्टी जास्त क्लिअर झाल्या. इतर वेळी या गोष्टी लक्षात पण येत नाहीत.

सिडने मधे बघण्यासारखे विशेष काही नाही असे बरेच लोकांकडून ऐकले होते. आम्ही मात्र सिडने डाउन टाउन व आजूबाजूला बरेच हिंडलो. इथे पब्लिक ट्रान्सपोर्ट फिरायला सोपा आहे. ट्रेन्स छान आहेत. प्रीपेड कार्ड काढतां येत असल्याने तिकीट काढण्यासाठी थांबावे लागत नाही. खाण्यात चाॅइस खूप आहे अगदी व्हेज लोकांना पण.


 आॆपेरा हाउस व हार्बर ब्रिज ही दोन्ही सिडनीची मेन अॅट्रॅक्शन्स बघायला पहिल्या दिवशीच बाहेर पडलो. या दोन्ही गोष्टी बऱ्याच सिनेमात बघितलेल्या असतात. आॅपेरा हाउस हे वर्ल्ड हेरिटेज मधले सगळ्यात तरूण मेंबर आहे. नाहीतर हेरिटेज साइटस् म्हटल्या की जुन्या इमारती देवळे डोळ्यापुढे येतात. आॅपेरा हाउस व त्याची शेल्स म्हणजे छप्पर आयकाॅनिक आहेत मला मात्र ती फारशी वोटीची शिडे म्हणून अपिल झाली नाहीत. या बिल्डिंग मधे बरीच थिएटर्स, आॅपेरा हाउस हे थिएटर आहे हे प्रथमदर्शनी खरे वाटत नाही. आम्ही तिथे दीड तासाची गाइडेड टूर घेतली. एका डॅनिश आर्किटेक्चर चे हे काम. काॅम्पिेटिशन मधे त्याची एन्ट्री सिलेक्ट झाली.
निसर्ग हेच या माणसाचे प्रेरणास्थान होते. सोललेल्या संत्र्यावरून हे डिझाईन सु"चले असे म्हणतात. वारा, पाउस, वजन व नैसर्गिक आपत्ती या सगळ्यांचा किती फोर्स याा डिझाइन वर पडेल हे समजणे आवश्यक होते. तसेच त्याला आधार देण्यासाठी वापरण्यात येणारे आधार हे एका प्रकारचे असणे आवश्यक होते. त्यासाठी त्यांना डिझाईन मधे बेसिक भूमितीचा वापर आवश्यक होता तेव्हा एका गोलाच्या वरच्या भागातून वेगवेगळे तुकडे काढून हे डिझाईन तयार झाले. स्फेरिकल जाॅमेट्री चा वापर केला आहे.
खर्च व इतर गोष्टीमुळे बांधकामाला बरीच वर्षे लागली पण त्यानंतर सिडने म्हणजे आॅपेरा हाउस हे समीकरण तयार झाले. यातले प्रत्येक शेल अनेक छोट्या टाईल्स चे बनले आहे. जसासूर्यप्रकाश बदलतो तसा याचा रंगही वेगळा वाटतो. टूर संपेपर्यंत भरपूर पायपीट झाली. यातल्या थिएटर्स मधे लिफ्ट एवढ्या मोठ्या आहेत की अख्ख सेट वरखाली करता येतो. आॅपेरा हाउस खूप भव्य आहे. तिथले अॅकाॅस्टीक चांगले ठेवण्यासाठी वरेच वेगवेगळे प्रयोग केले आहेत. तिथला ग्रॅंड आॅर्गन बघण्यासारखा. आश्चर्य म्हणजे या आर्किटेक्ट ने पूर्ण झालेले डिझाईन सिडने ला येउन कधीच बघितले नाही.

आॅपेरा हाउस च्या शेल्स किंवा छपरावर रोज सनसेट नंतर ७-८ मि ची फिल्म दाखवतात. फिल्मसाठी चांगला कॅनव्हास या टाईल्स नी पुरवला आहे. इथले ओरिजिनल अबोरिजिनल लोकांचे जीवन हा विषय ही बरेच दा असतो.

आॅपेरा कडे जातानाच हार्बर ब्रिज दिसतो. याच्या आकारावरून याला कोट हॅंगर असेही नाव पडले आहे. बोटॅनिकल गार्डन मधून लेडी मॅक्वायर चेअर वरून ब्रिज व आॅपेरा हाउस यांचा छान व्ह्यू दिसतो.
बोटॅनिक गार्डन पण बरीच मोठी आहे. नेटीव्ह झाडे जोपासली आहेत. फुलांपेक्षा मोठे वृक्ष जास्त दिसले. या गार्डन मधून आॅपेरा हाउस व हार्बर ब्रिज चे अनेक वेगवेगळे व्ह्यूज दिसतात.

https://artsandculture.google.com/exhibit/sQLihA_whFJ_KgT


Blue Mountains... Three Sisters

सिडने पासून साधारण दोन तासावर हे युनेस्को हेरिटेज लिस्ट मधे जागा पटकावलेले नॅशनल पार्क आहे. युकॅलिप्टस च्या अनेक जातींची झाडे इथे पहायला मिळतात. त्यांनी हवेत टाकलेले आॅइल ड्राॅप्स पाणी व धूलीकण हे सूर्यकिरणातला निळा रंग जास्त स्प्रेड करतात त्यामुळे डोंगर निळसर दिसतात असे म्हणतात. हायकिंग किंवा स्काय वे नी धबधबे बघतां येतात. बरेच हायकिंग ट्रेन्ल्स या पार्क मध्ये आहेत.












थ्री सिस्टर्स हे फाॅर्मेशन बघण्यासारखे आहे. पायऱ्या वरून बरेच खाली जाता येते. मधेच हॅंगिंग ब्रिज आहे, खाली खोल दरी...थ्रिलिंग आहे. भरपूर झाडी आहे. क्वाआला हे प्राणी भरपूर आहेत कारण त्यांची गुजराण मेनली युकॅलिप्टस च्या पानावर होते भरपूर झाडांमुळे आगी लागण्याचाही धोका असतो. इथे आता मोठे अॅम्पिथिएटर बांधण्यात काम चालू आहे. एकंदर प्रेक्षणीय जागा आहे. हिल स्टेशन सारखे छोटेसे टुमदार गाव व भरपूर फुललेली झाडे बघण्यासारखी. नेहेमीप्रमाणे सनसेट पाॅईंट आहे तो आम्ही भर उन्हात पाहिला. बरेच बाजूने पाॅइंट्स आहेत तिथून वेगवेगळे व्ह्यूज दिसतात. सगळेच प्रेक्षणीय होते. वेळ असेल तर हायकिंग साठी उत्तम ठिकाण.






बाॅंडाय बीच... हा सिडनेतला प्रसिद्ध बीच आहे. स्वीमिंग, सर्फिंग, विंड सर्फिंग या साठी प्रसिद्ध. आजूबाजूला बार, रेस्टाॅरंटस, म्युझिक हे सगळे आहेच. एका बाजूला घरे व समोर अथांग समुद्र. व्हाईटसॅंड बीच आणि गावापासून जवळ म्हणून भरपूर गर्दी असते.आम्ही गेलो तेव्हा तिथे स्कल्पचर्स बाय द सी हे प्रदर्शन चालू होते. आर्टिस्ट ना चान्स देण्यासाठी दरवर्षी हे भरवले जाते. समुद्राच्या बॅकग्राउंडवर काही छान दिसत होती. स्कल्पचर पेक्षा कडेचा बीच, खळाळणारे पाणी लाटा व एका बाजूला डोंगर हेच जास्त प्रेक्षणीय होते. वारा भरपूर असल्याने चालताना बरीच कसरत झाली.




















सिडने टाॅवर आय हा टाॅवरअगदी गावात सगळ्या बिल्डिंग च्या मधेच आहे. चक्क शाॅपिंग सेंट्रल मधून आत जायला एन्ट्री आहे वरून सिटी चे सगळ्या बाजूने व्ह्यू मस्त दिसले. माहिती सांगणाराही चांगला होता. एका बाजूला हाईड पार्क मधील फाउंटन चा टाॅप व्ह्यू मस्त दिसतो. त्याचा षटकोन आकार वरून पाहिल्यावर लक्षात आला. दिवाळी नुकतीच झाल्याने वरती पणत्यांचे स्टीकर्स लावले होते. इंडियन्स ची संख्या जास्त असल्याचे परिणाम. वरून पुन्ह एकदा आॅपेरा हाउस चे दर्शन झ

हाइड पार्क टाॅवर जवळच आहे. इंग्लंडचा प्रभाव इथे सगळ्या गोष्टीवर आहेत.






दुकानाची
 नावे , बिल्डिंग अगदी भाजी मार्केट वर पण व्हिक्टोरिया बाईं ठाणं मांडून आहेत. तसेच हाईड पार्क हे लंडन च्या पार्क वरून घेतलेले नाव. जॅकारंडा ची मस्त झाडे फुललेली होती. त्याचा निळा जांभळा रंग मस्त दिसला. पार्कमधेह इतर फुले बरीच दिसली. सेंटर ला छान फाउंटन आहे. अगदी गावात हे पार्क असल्याने छान वाटते.

या पार्क च्या पलीकडेच सेंट मेरीज चे भव्य चर्च आहे. १८५० च्या सुमारास बांधलेले. यांतील खिडक्यांवर खूप सुंदर
स्टेशन ग्लास पेंटिग्ज आहेत. ही पेंटिंग्ज पाहिली की वाटते की आजकालच्या घरात पण एखादा कोपरा वा झरोका असा बांधावा. जुनी कला टिकेल व सौंदर्य ही वाढेल. आतमध्ये अगदी शांततेत मास चालू होता. हे लोक इतक्या शांततेत बसतात ते पाहून आश्चर्य वाटते. आपल्या देवळात केवढा आवाज असतो. मेरी चा एक सुंदर स्टॅच्यू आत आहे. ईमारत खूप उंच असल्याने भव्य वाटते. बाहेर भरपूर फुले लावून छान मेंटेन केले आहे.

यानंतर क्विन व्हिक्टोरिया बिल्डिंग बघायला गेलो. ही पण खूप भव्य आहे. जवळ जवळ दोन ब्लाॅक्स लांब. इथला स्पेशल सॅंडस्टोन लवकर खराब होत नाही त्यामुळे बांधकाम छान आहे. आत शिरताना एक स्टेन ग्लास ची मोठी विंडो आहे त्यांवर इथल्या महत्त्वाच्या गोष्टी दाखवल्या आहेत. कोट हॅंगर, सेल बोटस् डाॅल्फिन्स, हार्बर इ. आत बरीच विंडो शाॅपिंग वाली दुकाने आहेत. जगातल्या महत्त्वाच्या शहरातल्या वेळा दाखवणारे एक घड्याळ आहे. ख्रिसमस सिझन जवळ आल्याने तीन माजली उंच झाड डेकोरेट केले होते. इथे बसून इंग्लिश टी चा आस्वाद घेतला एकदम इंग्लिश स्टाईल मधे व त्यानंतर घरी परतलो. या बिल्डिंग च्या खालीच ट्रेन स्टेशन असल्याने लगेच ट्रेन पकडतां आली. ही बिल्डिंग रिलेशन च्या काळात बांधली गेली. त्यामुळे बरेच कारागिर आपली कला दाखवू शकले. बिल्डिंगचा डोम बाहेरून कालपर्यंत व आतून ग्लास चा आहे.

शेवटच्या दिवशी वाॅटसन बे ला गेलो. या जागी कॅ फिलिप पहिल्या.दा आला असे म्हणतात. मेन स्टेशन पासून बोटीने ३० मिनिटात जाता येते. पोचताच तिथल्या डाॅइल्स या फिश न चिप्स ची गर्दी लक्ष वेधून घेते. हे हाॅटेल १८५० च्या आधीपासून आहे.पाण्षाच्या अगदी जवळ बसून आम्ही इथे जेवण केले. समोर शांत बे पसरलेले होता दूरवर सिडनेची स्काय लाईन दिसत होती मधे बोटी तरंगत होत्या. आमच्यासारख्या व्हेज लोकांनी खाण्यापेक्षा वातावरणच जास्त एनजाॅय केले. पुढे फिरण्यास एक ट्रेल आहे. एका बाजूला पाणी सेल बोटस् असे सुंदर व्ह्यू बघत लाइट हाउस पर्यंत चालत जाता येते. लाइट हाउस पासूनसमुद्राचा व्ह्यू सुंदर दिसतो. तळाशी खळखळणाऱ्या लाटा त्याचा फेस, त्यातून तयार होणारे पॅटर्न्स आणि थंड हवा तिथे शांत बसून अनुभवण्यासारख्या गोष्टी. समोर साउथ पॅसिफिक / तास्मान समुद्र भेटतो. समुद्राचा क्षितिजापर्यंतचा व्ह्यू दिसतो एका बाजूला. वाटेत येताना एक न्यूड बीचही लागला. मंडळी बिनधास्त पोहत होती तिथे.

या वाॅटसन बे वर नेव्हीचा तळ काही काळ होता. अजूनही वसाहत आहे. वाटेत तोफा पण दिसल्या.

इकडे एक गॅप म्हणून जागा प्रसिद्ध आहे, तिथून समुद्राचा सुंदर व्ह्यू दिसतो. एका बाजूला स्काय लाईन व एकीकडे हार्बर. ही जागा फेमस झाली कारण बरेच लोक तिथून आत्महत्त्या करायचे म्हणून. कशासाठी प्रसिद्धी मिळेल सांगतां येत नाही.



सिडने मधे पुतण्याकडे राहिल्याने खूप आरामात हिंडू शकलो हे नक्की. रहाणे, जेवण याचा विचार करायचा नसल्याने भरपूर फिरता आले व त्यांच्या लोकल टिप्स सतत मिळत असल्याने खूप फायदा झाला.

मेलबोर्न ला आमच्या भाचीने फिलिप आयलंड ला नेले. तिच्याबरोबर गेल्याने तिथली माहिती व जाणे येणे सुखाचे झाले. तसेच डॅंडेलाॅंग हिल्स मधे छान फेरफटका मारता आला.हि जागा पाहून आपल्या हिलस्टेशन ची आठवण झाली. पाउस थोडे धुके व घाटाचे रस्ता अशी मस्त रेसिपी होती



पेंग्विन परेड ......... मेलबोर्न मधले हे ठिकाण आमच्या लिस्ट वर होते. फिलिप आयलंड वर यांची परेड संध्याकाळी बघायला मिळते. हे लिटल पेंग्विन्स किंवा ब्लू पेंग्विन्स म्हणून ओळखले जातात. आकार व पंखाच्या रंगावरून ही नावे पडली असावीत. या ठिकाणी रोज संध्याकाळी समुद्रातून पेंग्विन्स बाहेर पडतात. अगदी अंधार पडायला लागल्यावर ते बाहेर येतात. रोजची संख्या वेगळी असते. बाहेर येईन ग्रुप्स मधे बाहेर पडतात व आजूबाजूला असलेल्या बरोज मधे असलेल्या पिलांना खायला घालतात. तुम्ही म्हणाल आपली पिले ते कशी ओळखतात तर फक्त आवाजावरून ..... समुद्रात मासे हे त्यांचे मेन खाद्य.
कधी कधी त्यांची जुनी पिसे झडून नवी पिसे येण्याच्या काळात पण हे पेंग्विन बाहेर रहातात. तेव्हा खाणे बंद असते. आधीच जास्त खाऊन ते आपली सोय करतात. ही Moulting phase असते. समुद्रात पोह्ताना थंडीपासून नंरक्षण म्हणून वरती पिसे चक्क वाॅटरप्रुफ असतात. त्यासाठी एक ग्लॅंड तेलकट थर पंखावर पसरवते. समुद्रात बरेच दिवस हे पोहतात तेव्हा पाणी मिळावे म्हणून त्यांच्या डोळ्याजवळ ग्लॅंड असतात ज्या समुद्राच्या पाण्यातले मीठ शोषून घेतातव त्यांना चांगले पाणी मिळते. हे सगळे पाहून थक्क व्हायला होते. गरजे नुसार शरीरात कशी आवश्यक ती यंत्रणा असते ते पाहून. बाहेर पडताना एक छोटे म्युझिअम व आर्ट इफेक्टस आपल्याला माहिती पुरवतात. इथे आपल्याला साउथ सी भेटतो.

ग्रेट ओशन रोड हे नॅशनल हेरिटेज मधले ठिकाणही आमच्या लिस्टवर होते. वर्ल्ड वाॅर माॅन्युमेंट म्हणून हा रोड बांधला आहे. अशा प्रकारचे एवढे मोठे माॅन्युमेंट दुसरे नसेल. वाॅर मधून परत आलेल्या लोकांनी, न आलेल्या लोकांसाठीबांधलेले. जाताना डावीकडे समुद्र उजवीकडे डोंगर व त्यांवर छोटी सुबक घरे. समुद्रात निळ्या रंगाच्या अनेक छटा. मधे एक दोन ठिकाणी बीचेस वर उतरलो. लाटा, वाळू, पसरललेला बीच आणि क्लिअर हवा सगळे प्रसन्न वातावरण होते. तिथे बरीच फोटोकग्राफी झाली. पुढे जेवणाचा स्टाॅप घेउन एका रेनफाॅरेस्ट चा फेरफटका झाला. इथे बरेच चढ उतार असल्याने हेवी जेवणाचे गिल्ट थोडे कमी झाले. जास्त करून युकॅलिप्टस व भरपूर फर्न ची झाडे होती. काॅलेज च्या बाॅटनी ची आठवण झाली. पुढे एका ठिकाणी रंगीत पक्षी बघायला थांबलो. सवयी मुळे व खाण्याच्या लोभाने ते बिनधास्त अंगावर येउन बसत होते. झाडावर कोआला बघतां आले पण ते खूप उंचावर होते. हा प्राणी २२ तास झोपतो म्हणे.

यापुढील स्टाॅप होता शिपरेक पाॅईंटचा. या ठिकाणी धुक्यामुळे एक जहाज बुडले होते. त्यातील दोनच माणसे वाचली. त्यांची नावे या पाॅईंटला दिली आहेत. सॅंडस्टोनचे खडक त्यात वाऱ्यामुळे
तयार झालेल्या कमानी व त्यात फेसाळणारे पाणी कितीही वेळ पाहिले तरी कमीच वाटत होते. निसर्गसौंदर्य कसे आपल्याला एका जागी खिळवून ठेवते त्याचा प्रत्यय आला. या नंतर शेवटचा स्टाॅप होता कॅंपबेल नॅशनल पार्क चा. हे १२ अॅपाॅस्टल्स साठी प्रसिद्ध आहे. लाइट स्टोनचे वेगवेगळे स्टॅक्स समुद्रात अनेक वर्षे उभे आहेत. इथे पोचताना पावसाने हजेरी लावल्याने सूर्यप्रकाशात वेगवेगळे दिसणारे रूप बघतां आले नाही पण पावसाळी वातावरणातही छान दिसले. परतीचा प्रवास हायवे वरून झाला आणि बसमधे वायफाय असल्याने लोक त्याच्या किंवा झोपेच्या आधीच झाले.
इकडे सगळ्या टूर्स १०० डाॅ च्या आसपास पैसे घेतात ते सुरूवातीला जास्त वाटले होते पण प्रत्येक ठिकाण हे बरेच लांब होते. वाटेतले पाॅइंट्स काॅमेंटरी व निसर्गाची रूपे बघून पैसे वसूल झाले असे नक्कीच वाटले

मेलबोर्न क्रिकेट ग्राउंड... या वर्षीच्या वर्ल्ड कप क्रिकेट मधे न्यूझीलंड च्या केन विल्यम्यसन चा खेळ पाहून या ट्रीपमधे क्रिकेट ग्राउंड ला भेट द्यायचे ठरवले. SCG in Sydney MCG in Melbourne ani Hagley oval in CHCH NZ या पाकी एका ग्राउंडला भेट द्यायचे ठरले.
पैकी मेलबोर्न च्या MCG ची आम्ही टूर घेतली. CBD पासून इथे यायला फ्री ट्राम ने येतां येते त्याचा आम्ही फायदा घेतला. छोटी पण छान ट्राम होती.
आमची टूर लीडर ७० हून जास्त वयाची अतिशय उत्साही म्हातारी होती. तिने भरपूर फिरवले. आता यापुढे मॅच बघताना खेळाडूंच्या जागा, थर्ड अंपायरच्या कॅमेरा कुठे असतो, बाकीचे महत्त्वाचे लोक कुठे बसतात, हे सगळे डोळ्यापुढे येइल. या ग्राउंडचा उपयोग क्रिकेट सोडून फूटबाॅल साठी पण होतो. इतरही मॅचेस व गेम्स इथे होतात.पूर्वीच्या काळी लाकडी बेंचेस असे बसवले होते की त्याची दिशा बदलतां येत असे. एका बाजूने क्रिकेट तर दुसरीकडे फूटबाॅल बघतां येत असे. मॅच प्रमाणे दिशा बदलत.







आता जेव्हा क्रिकेट चा सिझन नसतो तेव्हा मोठ्या ट्रकने क्रिकेट पिच उचलून घेतात व त्या जागी लाॅन लावतात व फूटबाॅल ची मॅच होते. हवे तेव्हा पुन्हा क्रिकेट चे पिंच तयार करतात. तळमजल्यावर लाॅकर रूम्स व सगळी रेकाॅर्डस वर्षानुसार लावली आहेत. या शिवाय एक मोठे म्युझिअम ही आहे. डाॅन ब्रॅडमन व लिटल् मास्टर चा फोटो भारतीयांची मान उंचावतो. टूर संपेपर्यंत भूक लागली होतीच तेव्हा मेंबर्स कॅंटीन मधे जेवलो. या बिल्डिंग च्या बाहेर इतरही अनेक खेळातल्या दिग्गजांचे पुतळे दिसतात. टूर ला येणारे भारतीय बरेच दिसत होते.


आता या ग्राउंडवर टीम इंडिया जेव्हा त्यांना हरवेल ते बघायला खरी मजा येईल.

वाॅकिंग टूर मेलबोर्न....



साधारण ४-५ कि मी चालायचा तयारी असेल तर सिटी बघण्याचे हा उत्तम मार्ग आहे, सकाळी १० च्या सुमारास दिलेल्या स्पाॅटला बरीच मंडळी हजर होती. संख्या बरीच होती त्यामुळे दोन ग्रुप्स मधे विभागणी झाली. आमचा गाईड एक काॅलेज स्टुडन्ट होता. सुरूवातीला मेलबोर्न हे नाव कसे एका माणसाच्या नावावरून पडले ते सांगितले. साधारण १४-१५ ठिकाणी थांबून त्या ठिकाणाची माहिती दिली. गोल्ड रश च्या काळात मेलबोर्न हे जंगलातले श्रीमंत शहर होते हे नव्याने कळले. त्याचे प्रतिक म्हणून बांधलेला युरेका टाॅवर पाहिला, त्याचा वरच्या भाग गोल्डन आहे जो गोल्ड रश साठी आहे आणि त्यांवर असलेली लाल रेघ हा नंतर झालेला संहार दाखवतो. ट्रेजरी मधे याबद्दलचे चांगले म्युझिअम आहे. ८ तासांचे वर्क डे सुरू झाले त्याचे एक माॅन्युमेंट पाहिले. तिथल्या राॅबिन हूड नेट केली त्याची जेलमधली जागा पाहिली. मेलबोर्नमधे ग्राफिटी वाॅल्स फेमस आहेत पूर्ण भिंतीवर चित्रे काढलेली आहेत. त्यातील काही फारच छान होती. चक्क प्रॅक्टिस करण्यासाठी पण एक गल्लीतील होती.
गाईड ने बार, रेस्टाॅरंट कल्चर बद्दल पण बरेच सांगितले. एका हाॅटेल मधून दुसऱ्या त जायचा जिना असू शकतो. रस्त्यावर टेबल्स टाकून खाण्याची ेस्टाइल आहे. मौझेक टाइल्स नी गालिचा सारखी डिझाईन्स खूप दुकानांच्या दारात दिसली. ब्लाॅक आर्केड मधे. जुने प्रिन्स थिएटर पाहिले. तिथे हॅरी पाॅटर चा ब्राॅडवे स्टाईल शो बरेच दिवस चालू आहे. चायना टाउन ने इथेही बस्तान बसवले आहे .फेडरेशन स्क्वेअरचे एक्झिबिशन बिल्डिंगचे डिझाइन मात्र जरा विचित्र वाटले. फ्लिंडर्स स्टेशन आपल्या व्हिक्टोरिया टर्मिनल सारखे वाटले. यारा रिव्हर च्या इथे टूर चा शेवट झाला. फ्री टूर म्हटली तरी प्रत्येकाने पैसे दिले आपापल्या मर्जीनुसार. इथल्या बिल्डिंग्ज व आर्किटेक्चर छान आहे.

या वेळेस खरेदी विशेष करायची नाही असे ठरवले होते. पण सिडनेची तुळशीबाग पॅडीज मार्केट ला गेल्यावर हा निश्चय मोडला. बूमरॅंग पासून कांगारु सारखे स्टफ टाॅय, आणि नेमीचे स्टीकर्स टी शर्ट अशी मुबलक सुवेनिअर्स ची खरेदी झाली. राॅक्स वाशी पण चांगली दुकाने होती. पण जरा महाग वाटले तो बाजारसिडनेला व्हिक्ट्राॅनिक्स ची कटलरी चांगली मिळते. सुऱ्यांची बरीच खरेदी झाली. सोलणी, व इतर गोष्टींही भरपूर घेतल्या. अगदी कडक भोपळा, गाजर किंवा टोमॅटो दोन्हीही सहज कापले जाते. यासाठी व्हिक्टोरियाज बेसमेंट नावाचे दुकान प्रसिद्ध आहे. शेवटी बॅगा फार भरल्या खरेदीने. तसे आजकाल सगळीकडे सगळे मिळते म्हटले तरी त्या जागी मिळणाऱ्या गोष्टी वेगळ्याच. चाॅकलेट ची पण भरपूर खरेदी झाली.