Friday, May 27, 2011

तो अर्धा तास

तो अर्धा तास,

अमेरिकेत जिथे बर्फ पडतो तिथे स्प्रिंगची सुरूवात होते तेव्हा झाडांना छान पालवी फुटते, सगळीकडे फुले दिसायला लागतात, जरा थंडीपासून सुटका होते. एकदम वातावरण प्रसन्न असते. सगळी मंडळी बागकामाला लागतात, नवीन झाडे लावणे, लांन ला खतपाणी, वगैरे. या सगळ्याबरोबर थंडरस्टांर्म्स व टोर्नंडो यांना पण सुरूवात होते. कडाडणारी वीज आणि मुसळधार पाउस लहान मोठ्यांना घाबरवतो. वारा इतक्या जोरात वहातो की बास, कौलावर त्याचा इतका आवाज येतो की काही वेळा झोप लागत नाही. ठी व्ही वर सतत माहिती देतात. रेडिओवर पण हवामान सतत सांगितले जाते...

यावर्षी मिडवेस्ट मध्ये खूप टोर्नंडो झाले. आता हे टोर्नंडो का होतात याबद्दल बरीत माहिती देतात पण अजून नक्की सांगता येत नाही. आणि त्याला थांबवता पण येत नाही. गेल्या महिन्यात जे २-३ टोर्नंडो झाले त्यात बरीच जिवित हानी झाली. सूचना मिळाली असताना काहीनी लक्ष दिले नाही तर काही ठिकाणी नशिबाने साथ दिली नाही असे म्हणावे लागेल. मिझोरी मध्ये १५० च्या वर माणसे मेली. टी व्ही लावला की सतत तेच चित्र .... घरांचे तुकडे झालेले, झाडे मूळापासून उखडलेली, रस्त्यावरचे ट्रक्स उलथून पडलेले. हे सगळे घडते १० मिनिटात.... या वादळात इतका जोर असतो की गाड्या,घराचे भाग उडून ३-४ मैल जाउन पडतात. माणसे,गाड्या,झाडे, जे त्याच्या मधे असेल ते सगळे नष्ट होते.

यानंतर जीवन थांबत नाही. लोक ेकमेकांना मदत करतात. घरे उभी रहातात आणि सगळे पुढे चालू होते. अशी वेळ सारखी येत नाही पण या सिझन मध्ये ३-४ वेळा तरी ही वेळ येतेच.

परवा आमच्या गावात पण ही परिस्थिती आली. आधी जोरदार वादळ, पाऊस आणि मग एकदम सगळे शांत.... वादळापूर्वीची शांतता म्हणजे काय याचा प्रत्यय आला. एकदम सगळे वातावरण सुन्न झाले होते. एकीकडे आम्ही रेडिओ ऎकत होतोच. फनेल क्लाउड दिसला होता. वेदर चंनेल वाले अगदी त्याचे वर्णन करत होते. आणि टचडाुन झाला, लगेच सायरन वाजला आणि आम्ही बेसमेंट मध्ये जाउन बसलो- तिथे धोका कमी. जवळ टांर्च, रेडिओ व फोन....पुढचा अर्धा तास तिथे बसलो होतो. मनात विचारांची गर्दी..ठी व्ही वर नुकतीच पाहिलेली वाताहात....आपलेही असेच होईल का.... हे सगळे लावलेले घर २ मिनिटात अस्ताव्यस्त होईल का....आपणच या अर्ध्या तासानंतर जिवंत असू का....पुढचे प्लंन्स, ठरवलेल्या गोष्टी सगळे धूसर दिसू लागले. यावर कुणाचा कंट्रोल नाही.....टी व्ही वर बघणे वेगळे आणि प्रत्यक्ष स्वतावर वेळ येणे यातला फरक चांगला कळतो अशावेळी. जीवन हे किती क्षणभंगूर आहे आणि आपल्या आयुष्याची दोरी या निसर्गाच्या कशी हातात आहे याचा पुरेपुर अनुभव घेतला या अर्ध्या तासात.....

Wednesday, April 20, 2011

मेहिको - एक बघण्यासारखा देश


मेहिको - एक बघण्यासारखा देश

आपण प्रवासाला जाताना बरेच वेळा ऎकीव माहितीवर जात असतो. कुणीतरी बघून आले की त्यांच्या अनुभवावरून किंवा पुस्तके वाचून आपण आपले मत ठरवतो. अमेरिकेत आल्यापासून मेक्सिकन लोक आणि त्यांचा देश याबद्दल नेहेमी वाईट ऎकत आले. इथे मेक्सिकन लोक नेहेमी खालची कामे करताना दिसतात हे त्याचे कारण असू शकेल. गरिबी, चोरी, ड्रग्ज अशा संदर्भात सतत हा देश येतो. परत बेकायदेशीर इमिग्रेशन मध्ये हे अग्रेसर. कानकुन बद्दल मात्र चांगले ऎकलेले. आणि माया कालखंडातले काही जुने अवशेष आहेत हे ऎकले होते. त्यामुळे हे देश नाही बघितला तरी चालेल असे वाटत होते, तेेवढ्यात मेक्सिकोपर्व हे डाँ मीना प्रभूंचे पुस्तक वाचण्यात आले आणि माझे मत बदलले. मी त्यांची सगळी पुस्तके वाचली आहेत आणि बरीच ठिकाणे पाहिली आहेत. त्या खूप डिटेल मध्ये देश बघतात व छान माहिती देतात.


या देशावर स्पंनिशांनी आक्रमण करेपर्यंत खूप संस्क्रति नांदल्या. आपल्यासारखाच इथे १८०० ला स्वातंत्र्य लढा सुरू झाला. धर्माच्या नावावर लोकांना वाकवले, परकियांनी सत्ता व संपत्ती भरपूर उपभोगली. नंतर जेव्हा उत्खननात जुन्या गोष्टी सापडल्या त्या मात्र जतन केल्या आहेत व त्यावर टूरिझम चालतो आहे. गरिबी, बेकारी आहे पण झोपडपट्ट्ी बकालपणा कमी आहे. या देशाने मका, कोको, मिरची, तंबाकू,च्युइंग गम,रबर दिले. भाषा उच्चार अवघड- नऔवात्ल भाषेत त्ल हे अक्षर फार येते लेखिकेला भाषा येत नसताना ती एकटी फिरू शकली हे विषेश. इतिहास चांगल्या प्रकारे या लोकांनी जपलेला दिसतोय.

मला या देशात काही गोष्टी बघाव्याश्या नक्की वाटल्या.....नकाशातील नावावरून साधारण त्या कुठे आहेत याची कल्पना येईल.
कांपर कॅनिअन - ग्रॅंड कॅनिअन पेक्षा भव्य आणि हिरवळ , अतिशय संथ आगगाडीचा प्रवास, आदिवासीना जवळून पहाता येते
मेक्सिको सिटी - मुंबईपेक्षा बरीच मोठी,ट्रॅफिक वाईट, तिसरा मोठा स्क्वेअर -झोकालो, कोर्तेस चा राजवाडा,सन, मून पिरॅमिडस, रिव्हेराची भित्तीचित्रे ,
चांदीचे साठे - व्हानाव्होता येथील सोन्याने सजलेले चर्च - तास्को चांदीची कलाकुसर,
-लेडी ग्वादालूपे कॅथिड्ील, म्युझिअम
बुलफाईट,
पुएब्ला- येथील ४०० वर्षांचे ग्रंथालय, तालावेरा पाॅटरी,
समुद्र किनारे- कानकुन, तुलुम
अकापुल्को- १५० फुटावरून उड्या मारणारे धाडसी वीर, जाएँट हेड, व्हेलता १२ फुटी जायंट हेडस
पालेके- टेंपल आॅफ इनस्क्रीपशन्स,
चिचेन इत्झा- प्रसिद्ध माया कॅलेंडर दाखवणारा पिरॅमिड

बघुया यातले काय काय बघायचा योग आहे...

Sunday, April 10, 2011

खरेच की...

खरेच की...

अाज वाढदिवसानिमित्त खूप मेल आल्या. त्यातील या मेलने लक्श वेधून घेतले. ते तुमच्याशी शेअर करते आहे.

आजकाल आकडेवारी ठेवण्याचे प्रमाण वाढले आहे. क्रिकेट असो शेअर बाजार असो वा सचिनचे विक्रम असोत सतत लोक ही माहिती जमवत असतात. असेच काहीसे २०११ बद्दल.

या वर्षात औक्टोबर मध्ये ५सोमवार, ५ शनिवार व ५ रविवार आहेत आणि हे ८२३ वर्षात एकदा घडते.

या वर्षाना मनी वर्ष म्हणतात,

तुमचे वय व जन्म वर्ष मिळवा , बेरीज १११
मी लगेच करून पाहिले -- आणि बरोबर आले तुम्हीही करून पहा.

या वर्षात १-१-११, १-११-११, ११-१-११, व ११-११-११ अशा तारखा आहेत.

मग नेहेमी प्रमाणे - तुम्ही हे ८ लोकांना पाठवा तर तुम्हाला पैसा मिळेल - आता पाठवायचे का नाही ते तुम्ही ठरवा पण ही आकडेवारी आहे मात्र गमतीची.

Wednesday, January 12, 2011

साद देती सह्याद्रीचे कडे....




साद देती सह्याद्रीचे कडे....

भारतात महाराष्ट्रात औद्योगिक प्रगति बरीच झाली आहे. रस्त्यांनी शहरे जोडली गेलेली आहेत. झाडी, जंगल हा प्रकार अगदीच कमी. सह्.ाद्री चे किल्ले,गड मात्र ताठ मानेने उभे आहेत. आजकाल व्लाॆगवर, फेसबुकवर, वर्तमानपत्रात बरेच लोक यावर लिहितात. अनुभव, फोटो व इतर माहिती बरीच दिसते. आजकाल बरीच मंडळी या सहलींचे आयोजन करताना दिसतात. तरूणाई ट्रेक कडे परत वळत आहे हे पाहून छान वाटते.

हे सगळे वाचताना असे वाटले या सगळ्यांनी एकत्र येउन एका साईटवर सगळी माहिती एकत्रित ठेवली तर किती छान होईल. बरे हे सगळे स्वानुभवातुन आलेले असल्याने रंजक तसेच माहितीपूर्ण ही असेल. ३-४ लोकांनी एकत्र येउन थोडे थोडे काम वाटून घेतले तर हे काम सहज होण्यासारखे आहे. नवीन जाणारा माणूस या अनुभवातून बरेच काही शिकू शकतो. आणि एका प्रकारे माहिती असली की चांगले वाटते. गडावर जायचा नक्की रस्ता कुठला हे माहित असावा,,,तुम्ही म्हणाल की अशा चुकण्यात मजा असते ... मान्य आहे पण काहींना ती सजा वाटू शकते. गाईडनी पैसे खूप सांगणे यावर पण कंट्रोल राहू शकतो.

मी १०-१२ गडावर गेले आहे मग देशाबाहेर राहिल्याने तिथल्या गोष्टी जास्त बघितल्या गेल्या. अमेरिकेत हिंडताना एक गोष्ट जाणवते, कितीही बारीक गोष्ट असो त्याची माहिती व्यवस्थित लिहिलेली असते. (त्याबद्दल दुमत नसते) गेल्यावर व अजून २-३ ठिकाणी नकाशा लावलेले असतो. रेंजर लोक ३-४ वेळा माहितीपूर्ण प्रेझेंटेशन देतात. अघून मघून साघ्या लाकडाच्या खांबावर पाट्या लावून त्यावर थोडक्यात माहिती दिलेली असते. भौगोलिक ऐतिहासिक महत्व लिहिलेले असते. मी काही लोकांच्या ब्लाॆगवर वाचले की काही किल्ल्याबद्दल तिथल्या लोकांनाही माहिती नसते. सरकार या गोष्टीत लक्ष घालेल अशा वाट बघण्यापेक्षा काही लोकांनी एकत्रित येउन केले तर हे काम लवकर होईल. स्पांन्सर नक्की पुढे येतील आणि तसा फार खर्च येणार नाही.

आपण बाकी गोष्टी जितक्या पटकन काॆपी करतो तसे हे ही करायला हवे. गाईडच्या बाबतीत पण गावातल्या लोकांना एकत्र करून शिकवले तर मुले छान काम करू शकतात. आम्ही रायगडावर याचा अनुभव घेतला. तिथे बाबासाहेब पुरंदरे यांनी मुलांना शिकवून तयार केले आहे. ती मुले कविता म्हणून सगळी माहिती सांगत होती. ऐतिहासिक माहिती ज्याबद्दल दुमत आहे ती लिहिणे टाळावे. शिवाजी महाराजांनी केलेले काम मोठे आहे ते महत्वाचे. डिटेल्स मध्ये तफावत असू शकते. आपल्याकडे इतिहास नीट लिहिलेला नाही .. बखरकार पण वेगवेगळे इंटरप्रीटेशन करणार त्यामुळे वादाचे मुद्दे टाळून हे काम करावे लागेल. लिहिलेल्या पाट्या खराब न करणे, त्यावर काही न लिहिणे हे हळूहळू लोक शिकतील अशी आशा ठेवायला काहीच हरकत नाही. काही गडावर आत्ता असे नकाशे आहेत पण अगदीच कमी.

काय बाहेर राहून इथल्या उचापति कशाला अशा खूप लोकाॆच्या प्रतिक्रिया होतील पण मला हे मनापासून वाटते हे खरे.

Sunday, January 2, 2011

शिक्षण असेही

शिक्षण असेही...

गेल्या दशकात भारताचे नाव आउटसोर्सिंगच्या क्षेत्रात चमकते आहे. साॆफ्टवेअर मध्ये तर भरपूर मागणी आहे. आणि त्यात आपली मंडळी ठसा उमटवत आहेत. मेडिकल, सेवा, अभियांत्रिकी या क्षेत्रातही भरपूर वाव आहे. हळूहळू त्यातही लोकांना कामाच्या संघी मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर परवा एक लेक्चर ऐकले आणि वाटले की आपण (भारतीय) लोकांना इतके काम करून देतोय आणि आपल्याकडे मात्र शिक्षणाचे आउटसोर्सिंग चालू होते का काय....

अमेरिकेत आल्यावर सुरूवातीला व्हाॆलेंटिअरिंग, फंड रेझिंग बघून मी जाम इंप्रेस झाले होते. गिव्हींग बॆक हा कन्सेप्ट खूप दिसतो. शाळेत, ओल्ड पिपल होम, बेवारशी प्राणी सांभाळणे, त्यांचे संवर्धन करणे खूप दिसते. अगदी लहान पणापासून हे शाळेत शिकवले जाते. अशातच काही सेवाभावी संस्था भारतातील शाळांसाठी मदत करताना दिसून आल्या. अगदी खेड्यापाड्यात जाउन तरूण मुले ही कामे करतात ते पाहुन कौतुक वाटते. आणि - आम्हाला काही गरज नाही, उगाच येउन कामे करतात, आजकाल कुणालाही गरज नाही, भारतात पैशाची कमी नाही... हे वर ऐकावेही लागते. अमेरिकेतून आलेल्या मदती बद्दल मी हेच जास्त ऐकले आहे. एकल विदयालय अगदी खेड्यात ३६००० एक शिक्षकी शाळा चालवते.

टीच फाॆर अमेरिका या धरतीवर टीच फाॆर इंडिया हा असाच एक उपक्रम पण त्यात वेगळेपण आहे. याची मुख्य भारतीयच आहे. पुणे व मुंबई मिळून ६५ शाळात हे लोक काम करतात. ज्या मुलीने अनुभव सांगितले ती अमेरिकन आहे. ती तिथे नोकरी करते. सरकारी शाळेत - इंग्लीश मिडिअम त्यांचा प्रयोग चालतो. प्रथम तिने सांगितले की ह्या लो इन्कम ग्रुप च्या शाळा असल्याने पालक मुलांच्या अडचणी सोडवू शकत नाहीत. तिथल्या शिक्षकांना २००० रू पगार मिळतो. बरीच मुले पाठांतर करतात व समजून न घेता शिकतात - मार्क कमी पडतात मग त्यांना शिकवणी ला पाठवतात... त्यामुळे शाळेत यायला नाखूष असतात. काही मुले यातूनही व्यवस्थित शिकतात. अशा शाळात २री ते ४ थी मध्ये १ वर्ग सिलेकट करून तिथे अमेरिकन पद्धतिने हे लोक शिकवतात नीट समजावतात, जास्त वेळ मुलांना देतात. साहजिकच मुले शाळेत जायची वाट बघतात, शाळा आवडायला लागते. २-३ महिन्यात त्यांना मुलांच्यात फरक दिसला. आत्मविश्वास वाढलेला दिसला, वाचन सुधारले.

सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे शिक्षक म्हणजे नुकतीच ग्रॆज्युॆेट झालेली भारतातील मुले आहेत. हुशार मुले आहेत. २ वर्षाची कमिटमेंट देउन ही मुले काम करतात. अगदी चांगल्या प्रकारच्या नोकरीचा मोह सोडुन २ वर्षे आपल्या देशाला द्यायची यांची तयारी आहे. वेळप्रसंगी पालकांशी भांडुन या कामासाठी मुले तयार होतात कारण त्यांना देशासाठी काहीतरी करायचे आहे. ही गोष्ट त्या मुलीला खूप इन्स्पायर करून गेली. तरूण मुलांच्यात ही शिक्षणाची ओढ बघून छान वाटले. त्यासाठी त्यांना थोडा जास्त पगार दिला जातो व हे पैसे ट्रस्ट कडून फंड जमा करून मिळवले जातात. हा भार सरकारवर पडत नाही.
आता मद्रास, हैद्राबाद व दिल्ली इथेही या शाळा चालू होणार आहेत. इंग्लिश मिडिअम असले की बरेच जण भाग घेउ शकतात . खेड्यात पुढे जायचा या लोकांचा विचार आहे पण त्यासाठी लोकल भाषेचे शिक्षक घ्यावे लागतील.

हे सगळे अनुभव ऐकल्यावर एवढेच वाटले हे सगळे शिक्षण खात्याला दिसत नाही का...आपल्या देशात नक्कीच चांगले लोक आहेत जे शिक्षणात बदल आणू शकतात मग ते का होत नाही.... त्यासाठी असा घास का घ्यावा लागतो....

Friday, December 31, 2010

शुभेच्छा....


न्यू ईयरचं एखादं तरी, केलं असेलंच रेझोल्यूशन् ।
वर वर नाही म्हटलं तरी, ठरवला असेल हेल्दी ऑप्शन् ।।
शुगर, फॅट् कमी करावी, कोलेस्टेरॉलचे रेग्यूलेशन् ।
वेट्, टेन्शन् कमी करायला योगासनं अॅन्ड मेडिटेशन्।।
आपल्या विशेस सफल होवोत, सर्वांचं मिळो कोऑपरेशन् ।
नवं वर्ष सुखाचे जावो, खूप मिळो सॅटीस्फॅक्शन् ।।

Tuesday, December 7, 2010

काही चांगल्या साईटस

काही चांगल्या साईटस...

इंटरनेट वर सतत नवीन नवीन साईटस् येत असतात. काही साईटस आपण एक दोनदा बघतो व सोडून देतो, काही मात्र परत परत बघितल्या जातात. मनोरंजन किंवा माहितीपूर्ण साईटस नेहेमीच छान वाटतात. नवीन काहीतरी बघायला मिळाले की छान वाटते. तुम्ही पण भेट देउन बघा नक्की आवडतील.

एखादी गोष्ट कशी काम करते यासाठी ही साईट बघा. आपल्या आजूबाजूच्या गोष्टी कशा काम करतात यात छान समजावून सांगितले आहे. सायन्स, आर्ट, मनोरंजन, आरोग्य, प्राणीजीवन असे अनेक भाग आहेत. मी नेहेमी ठरवते की दर आठवड्याला एक गोष्ट बघायची पण तसे होत नाही. आपण खूप गोश्टी वापरतो पण त्या कशा चालतात याचा विचार करत नाही या साईट मुळे खूप माहिती झाली. इथे याच नावाचा एक चॆनेल पण आहे . चांगल्या फिल्म्स बनवतात हे लोक.

मला आवडणारी दुसरी साईट म्हणजे आपली मराठी . अमेरिकेत राहून मराठी कार्यक्रम बघायला ही साईट छान आहे. मराठी सिनेमे. नाटके, सा रे गा मा , फू बाई फू यावर बघता येते. राजा शिवछत्रपति पूर्ण यावर पाहिली. उत्तम क्वालिटी. आता हळुहळु सगळ्या ची क्वालिटी सुधारेल. बरेच वेळा भारतात आमच्या कडे पिक्चर बघायच्या आधी इथे बघितला जातो. या साईटच्या कार्यक्कर्त्यांना धन्यवाद.

आजकाल आॆनलाइन सिनेमे बघायचे दिवस आहेत. कोॆलेज मध्ये तर खूपच बघतात. पायरसी थांबवण्यासाठी एक उपाय म्हणून या साईटवर चांगले सिनेमे बघता येतात. ईथे तसे नियम कडक आहेत त्यामुळे ही साईट खूप लोकप्रिय आहे. टी व्ही चे एपिसोडस आपल्या सवडीने बघता येतात. या साईटवर हवे ते सिनेमे बघायला मिळाल्यामुळे आणि कडक नियमांमुळे पायरसीला बराच आळा बसतो.

टेड.कोॆम साईट पण खूप छान आहे. विविध विषयातील भाषणे यावर बघता येतात. वेगवेगळ्या देशातील लोकांचे विचार, शोधांची माहिती यावर बघता येते.

आशा आहे की या साईटस तुम्हाला नक्कीच आवडतील.