मिस्ट्री प्लेसची मिस्टरी.........
अमेरिकेत आल्यावर प्रत्येक जण एकदा तरी मिस्ट्री स्पॉट ला जातोच. बर्याच राज्यात आपल्याला हे स्पॉटस दिसतात. बहुदा एखाद्या प्रेक्षणीय स्थळाच्या जवळ ते बनवले आहेत. आजूबाजूला झाडी, थोडीशी वरखाली जमीन व जुने बांधकाम दिसते. या जागेत ग्रॅव्हिटीचे नियम वेगळेच रूप दाखवतात असे आपल्याला सांगितले जाते आणि ते सिद्ध करण्यासाठी आपल्याला बर्याच गोष्टी दाखवतात. दोन लोकांना दोन भिंतींशी उभे करतात. आपल्याला ते एकदम वेगळ्याच ऍगल मध्ये उभे दिसतात. आपला विश्वास बसणे अवघड असते. नंतर दुसर्या खोलीत नेतात. आपल्याला माहित आहे की पाणी नेहेमी उताराच्या दिशेने वहाते पण या खॊलीत पाणी एका टयूबमधून चढावर वहाताना दिसते आणि आपण कुठेतरी विचित्र जागी आलो आहोत अशी आपली खात्री होते. अजूनही काही गोष्टी ते दाखवतात जसे बॉल चढावर जाताना दिसतो, पेंड्यूलम वेगळाच फ़िरतो.
अर्थात हा सगळा दृष्टीभ्रमाचा प्रकार आहे. हे बांधकाम करताना घर थोडे तिरके बांधतात. (साधारण २५ डिग्री) त्याच्या आजूबाजूची जागा अशी भरून काढतात की आपण तिथे गेल्यावर आपण एखाद्या नॉर्मल घरात शिरतो असेच वाटते. तुम्ही जर आत शिरताना व्हिडीओ शूटींग केले तर लक्षात येउ शकते. इथल्या लोकांची मार्केटींग ची कमाल आहे यात शंका नाही पण जर सगळ्या टूर च्या शेवटी ही गंमत का होते हे जर सांगितले तर जास्त चांगले वाटेल असे मला वाटते, त्यामुळे या गोष्टीतील गंमत नक्कीच कमी होणार नाही.
खालील दोन्ही चित्रे जर नीट पाहिली तर वरील गोष्टी का दिसतात हे लगेचच लक्षात येईल. दोन माणसे एकमेकंना समांतर उभी आहेत पण घर थोडे तिरके बांधल्याने आपल्याला ती वाकडी उभी आहेत असे वाट्ते. हे ऑप्टीकल इल्यूजन चे अतिशय उत्तम उदाहरण आहे. आता तुम्ही स्वतः पाणी का खालून वर जाते ते या चित्राप्रमाणे काढून पहा. पुढच्या वेळेस हे समजून तुम्ही मिस्ट्री स्पॉटला जाल तेव्हा अजून मजा येईल.

No comments:
Post a Comment