Wednesday, August 12, 2009

गाणे ऎकताना.........

गाणे ऎकताना.........

गाणे कसे ऎकावे किंवा कुठले ऎकावे याबद्दल हे पोस्ट नाही. आजकाल गाण्याचे अनेक प्रोग्रॅम्स आपण ऎकतो. कार्यक्रम बर्‍याच वेळा वेळेवर सुरू होत नाही. मग आज नीट ऎकू आले नाही किंवा तबलाच फार जोरात होता अशा काहीतरी कॉमेंटस होतात. जो माणूस पॆसे खर्च करून कार्यक्रम बघायला जातो तो काही अपेक्षेने जातो. आणि ते बरोबरही आहे. आमच्या घरी हॊशी कार्यक्रमांच्या बर्‍याच प्रॅक्टीस होतात. माझा सहभाग अर्थात पडद्यामागचा असतो. ते कार्यक्रम बसवताना माझ्या माहितीत थोडीफार भर पडली ती तुमच्याशी शेअर करत आहे.

गाणे ऎकताना काही मंडळी शब्द ऎकतात काही तालाला महत्व देतात तर काही सूरांवर प्रेम करतात. या तिन्ही गोष्टी प्रेक्षकांपर्यंत व्यवस्थित पोचण्याची आवश्यकता असते तेव्हाच कार्यक्रम यशस्वी होतो. यासाठी माइक्स, स्पिकर्स, ऍम्प्लिफायर व फीडबॅक स्पीकर्स ची गरज असते. आणि हे सगळे मॅनेज करण्यासाठी ज्याला चांगला ’कान’ आहे असा साउंड टेक्निशिअन आवश्यक असतो. नेहेमी प्रोग्रॅम बसवताना गायक, वादक भरपूर असतात पण साउंड टेक्निशिअनचे काम करायला फार कमी मंडळी पुढे येतात. तसे बघितले तर ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे.

माइक हे गायक, वादक याच्यासाठी वापरतात. ते बरोबर अंतरावर लावले नाहीत तर नीट आवाज येत नाही. स्पिकर्स हे प्रेक्षकांसाठी असतात. हॉलच्या कपॅसिटीच्या प्रमाणे स्पिकर्स लावावे लागतात. कमी किंवा जास्त कपॅसिटीचे लावले तर व्यवस्थित ऎकू येत नाही. फीडबॅक स्पीकर्स हे गायक व वादकांसाठी असतात. मोठ्या हॉलमध्ये स्पीकर्स मधून प्रेक्षकांना आवाज पोचतो पण तो परत गायकाकडे पोचेपर्यंत मधे थोडा वेळ जातो आणि लॅग - विलंब येतो हे टाळण्यासाठी फीड्बॅक स्पीकर्स वापरत्तात. माइक चे बरेच प्रकार असतात. त्यात रिमोट व रेग्युलर मायक्रोफोन्स जास्त वापरले जातात. रेग्युलर मायक्रोफोन्सच्या वायर्स जनरली रंगीत किंवा नंबर लिहिलेल्या असतात. साउंड टेक्निशिअन रंगांवरून अथवा नंबरवरून कुठला माइक कुणाचा हे लक्षात ठेवतो आणि त्याच्या सहाय्याने आवाज कमी जास्त करतो. जेवढे माइक जास्त तेवढे जास्त लक्ष द्यावे लागते. या सगळ्या माइक्स च्या वायर्स एका ऍम्प्लिफायर ला जोडतात. त्याचे एक आउट्पुट स्पीकर्स ला व दुसरे फीडबॅक मॉनिटर ला देतात.

खाली एक बेसिक सिस्टीम दाखवली आहे.




एकामागोमाग दोन प्रोग्रॅम्स असतील तर मधे सेटींग ला वेळ कमी मिळतो. सिस्टीम सेट झाली की आवाजाचे टेस्टींग करावे लागते आणि त्यानंतर कार्यक्रम सुरू होतो. या सगळ्या गोष्टी करताना शक्यतो सभागृह रिकामे असावे लागते. या सगळ्या गोष्टींना वेळ लागला की प्रेक्षकांना जास्त वाट बघायला लागते. कधी कधी नवीनच काहीतरी प्रश्न निर्माण होतात. वायर्स कुणी हलवल्या किंवा त्या एकमेकात अडकल्या तर स्पिकर्स मधून जोरात आवाज येतो. फीडबॅक च्या समोरून माइक नेला तर जोरात आवाज येतो की लोकांना कानावर हात ठेवावे लागतात. आता पुढचा कार्यक्रम बघताना, ऎकताना हे सगळे फॅक्टर्स तुम्ही नक्कीच लक्षात घ्याल आणि कार्यक्रमाची मजा घ्याल असे वाटते.

4 comments:

साधक said...

धन्यवाद. खूप महत्त्वाची माहिती होती. फीडबॅक स्पीकर्स कसे लावतात? त्यांचा व्हॉल्यूम पुन्हा माईकमधून जाउ नये म्हणून काय करायचे? आणखी सविस्तर सांगितलंत तर मजा येईल.

भानस said...

माधुरी, दहा वर्षाचा अनुभव.:D. बाकी वेळेवर सुरू न होणे व नेहमीचे घोळ काही थांबत नाहीत. चालायचेच.
साउंड जेव्हा कर्कश फाटतो अन तो लवकर बंद करता येत नाही ना तेव्हा भयानक त्रास होतो, त्यावर काहीतरी नक्कीच करायला हवेय.
काय विशेष? कॊलूयात की.

Madhuri said...

Sadhak, Bhanasa thnks for the feedback.

feedback speakers stagewar lawtat with low volume. MIxer madhun ek output speakers la va dusre feedback monitorla lawun shakta. main speakers khup mothe aslyane feedbackcha volume tyat aiku yet nahi. ani direction pun ulti aste.

kadhihi mic spekerchya samor ala ki khup awaz hoto mhanun stagewar yenarya pratyekala he mahit pahije ki mic nehemi speakerchya mage hawet. tasech wires hi halwu nayet

how stuff works madhye yawar chan mahiti ahe

Unknown said...

Khupach chhan mahiti