सीमेपार बघताना ...
आता २६ जानेवारी जवळ आली. सगळीकडे देशभक्तीपर गाणी, सिनेमा, प्रदर्शने वगॆरे सुरू होतील. याच सुमारास मी जम्मूला गेले होते त्याची आठवण झाली.
आमचे एक नातेवाईक आर्मी मध्ये आहेत. त्यांचे पोस्टींग जम्मू येथे होते. मी माझ्या मामाच्या फॅमिली बरोबर तिथे सुट्टीत गेले होते. ही गोष्ट २५ एक वर्षापूर्वीची आहे. त्यावेळेस जम्मू भागात एवढी गडबड नव्हती. त्यांचे घर जम्मूपासून थोडेसे बाहेर होते. आतमध्ये आर्मी चा सगळा कारभार. कोण कुणाकडे आले याची व्यवस्थित नोद. गेल्यावर आम्ही जम्मू बघायला दुसर्या दिवशी गेलो. जाताना वन ट्न या ट्रक सारख्या गाडीने आम्हाला सोडले गावात. तिथे गेल्यावर कुणाशी जास्त बोलायचे नाही अशी सूचना होती. नाहीतर फळ वाले, दुकानदार सहज चॊकशी करतात आणि माहिती काढून घेतात. अशी बरीच हेरगिरी चालते. आम्हाला हे सांगितले नसते तर लक्षातही आले नसते. आम्ही जम्मूतील मंदिर व इतर ठिकाणे बघून रात्री परत आलो. वाटेत कोणी लोकल भेटले की विचारायचे, "आप बंबई से हो? फिर आपको फिल्म ऍक्टर्स मिलते / दिखते हॆ क्या?" मग आम्ही सांगायचो ते काही असे रस्त्यातून हिंडत नाहीत. गम्मत म्हणजे आम्हाला हे प्रश्न विचारणार्या मुली इतक्या दिसायला छान असायच्या कि त्यांच्यापुढे आपल्या नट्या ठीक ठाक वाटत. पण सिनेमाचे वेड सगळीकडे असतेच.
तिथे असताना थोडीफार आर्मीच्या जीवनाची कल्पना आली. एकंदर खूप साहसाचे आयुष्य असते त्यांचे. टेन्शन म्हणजे काय याचा पुरेपूर अनुभव येतो त्यांना रोजच्या जीवनात. या सगळ्याच्या मध्ये विरंगुळा म्हणून पिकनिक ठरवतात.
आम्ही तिथे असताना असेच एक पिकनिक होते. परत त्या मोठ्या ट्रक मधून आम्ही गेलो. अगदी सीमेजवळ जायला मिळणार म्हणून थ्रिल वाटत होते. जाताना अंताक्षरी सारखे खेळ चालले होते. यात भाग घेणारे काही नुकतेच धाडसी कामे करून परत आले होते किंवा तिकडे जाणार होते. वाटेत एका खेड्यात थांबून संध्याकाळच्या जेवणासाठी चिकन खरेदी झाली. अगदी फ्रेश ....त्यानंतर सगळे वॉच टॉवर पाशी गेलो. तिथून एका बाजूला आपला टॉवर व काही अंतरावर पलीकडे त्यांचा. अध्ये थोडे कुंपण होते. त्या टॉवर वर आम्ही अगदी वर पर्यंत चढून गेलो. तिथे बसून नेहेमी सॆनिक आसपास नजर थेवून असतात. बराच उंच टॉवर होता. वरून सीमेपलिकडचा भाग दिसत होता. मनात थोडी उत्सुकता, थोडी का भरपूर भिती आणि छातीत धडधड अशी परिस्थिती होती. तसे बघितले तर इकडे आणि तिकडे सारखीच जमीन तशीच झाडे पण तो भाग शत्रूचा हे ते मधले कुंपण सांगत होते त्यामुळे लगेच बघण्याचा अर्थ बदलत होता. ते आणि आपण अशी सीमा मध्ये होती. सीमेपार बघत्ताना कसे वाट्ते याचा अनुभव घेता आला.
हे चित्र नेट वरून घेतले आहे कारण तेव्हा कॅमेरा न्यायला बंदी होती. पण साधारण याच्या तिप्पट उंच टॉवर होता.
आपण घरी बसून शांतपणे आपले रोजचे व्यवहार या सॊनिकांच्या जीवावर करत असतो. त्यांना २६ जानेवारीच्या निमित्ताने धन्यवाद.

No comments:
Post a Comment