Tuesday, February 9, 2010

कलियुगच ना हे..........

कलियुगच ना हे..........

भारतात निघण्यापूर्वी नेहेमीची कामे आटपत होते. टॅक्स भरणे, बिले भरणे ट्रॅव्हलर्स चेक्स काढणे वगॆरे वगॆरे.

भरीत भर म्हणून संप पंप मोडला(बेसमेंट मधले पाणी बाहेर टाकण्यासाठी हा वपरला जातो.) पंप गेल्याच वर्षी बदलला होता. लगेच नादुरूस्त झाला म्हणून फोन केला. थंडीच्या दिवसातच तो कसा बिघडतो माहित नाही. सकाळी माणूस आला त्याने सांगितले की त्यावर जो लेअर साठलाय(क्षारांचा) तो काढला पाहिजे ५-६ महिने झाले की. तो आल्यावर ५ मि त पंप चालू. म्हटले बिल किती तर म्हणाला व्हिझिट फी ९० डॉलर्स. मग माझ्या चेहेर्‍याकडे बघत म्हणाला आज मी काही पॆसे घेणार नाही कारण मी पंप बसवताना तुम्हाला हे सांगितले नव्हते. म्हट्ले अरे वा..९० डॉलर्स वाचले.

नंतर बॅंकेत गेले. ट्रॅव्हलर्स चेक्स घेताना चुकुन १२०० ऎवजी २२०० डॉलर्स दिले. काहीतरी गडबडीत १२०० डॉलर्स असे डोक्यात होते. तिला शिवाय वर ८०० डॉलर्स चा चेक देउन २००० चे ट्रॅव्हलर्स चेक्स मागितले. त्या मुलीने आत जाउन शांतपणे पॆसे मोजले आणि सांगितले तुम्ही १००० डॉलर्स जास्त दिलेत. नक्की कितीचे चेक्स देउ? तिला धन्यवाद देउन बाहेर पडले.(आजपर्यंत कधीही बॅंकेत पॆसे मोजले नाहीत )

कॉम्कास्ट च्या बिलात जास्त अमाउंट दिसली म्हणून चॊकशी केली तर कळले की एक स्कीम ३ म होती त्याची मुदत संपली म्हणून बिल जास्त आले आहे. त्याना सांगितले आम्हाला ही सेवा नको. तर चक्क वाढवलेले पॆसे ३ महिन्यानंतर कमी केले. हे म्हणजे टू मच झाले.

दुसर्‍या एका बिलात माझे पुढचे बिल त्यांना थोडे लवकर पोचले आणि ते माझ्या मंथली बिलात इफेक्ट दिसत नव्हता. मी त्यांना फोन करून विचारले आता किती बॅलन्स आहे? तर गोड आवाजात सॉरी म्हणून उरलेले ३-४ डॉलर्स माफ केले.

गेल्या २४ तासात या गोष्टी बघून वाटायला लागले का एकदम सगळे चांगले वागायला लागले? कलियुग संपले का?

4 comments:

Anonymous said...

भारतात कलियुगच आहे हो कायम. अमेरिकेत कधी कधी प्रामाणिकपणा दाखवतात लोक.

हेरंब said...

अरे वा. फारच लकी दिसताय तुम्ही.. :-)

भानस said...

माधुरी, कॊमकास्टने पैसे परत दिले म्हणजे टू मचच झाले गं.लक जोरदार होते म्हणायचे. तू कधी जाते आहेस पुण्याला?

MAdhuri said...

Bhagyashree,

I am in Pune enjoying nice weather. Tu pan yenar hotis na......

Comcastne dile mhanje kharech jorat luck hote.