राग रंग
आपल्या जीवनात हिंदी, मराठी गाणी सतत आपली सोबत करत असतात. प्रवासात, घरी एकटेपणा घालवताना आपण बरीच गाणी गुणणतो. काही गाणी आपल्या नकळत आपण बर्याच वेळेला पुन्हा पुन्हा ऎकतो. काही गाण्यांशी आपल्या आठवणी निगडीत असतात. जुनी गाणी अर्थातच जास्त मनात घर करून रहातात. (काही नवीन गाणीही छान आहेत ). अमेरिकेत आल्यापासून बरेच शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम ऎकून आजकाल बंदिश हा प्रकार एकदम आवडायला लागला आहे. साहजिकच मग त्याचा रिसर्च आणि ऎकणे चालू होते. बरे मी काही शास्त्रीय संगीत शिकलेली नाही त्यामुळॆ सुरांशी फार परिचय नाही, पण ऎकायला छान वाटते हे नक्की. ह्या सूरांच्या रचनेत काही मॆथेमॆटिकल पॆटर्न्स असावेत असे वाटल्याने मी थोडा रिसर्चही करत आहे.
आपल्या संगीतकारांनी ३-४ मिनिटाच्या गाण्यात अशी अनेक गाणी अजरामर करून ठेवली आहेत. आपण गाणी ऎकताना हे गाणे अमूक रागातले किंवा रागावर आधारित आहे असे ऎकतो. बर्याच वेळा नकळत तो राग गुणगुणत असतो पण त्यावेळेस आपल्याला तो राग माहित असतोच असे नाही. प्रत्येक राग हा काही विशिष्ट भाव प्रकट करतो( भक्ति, शृंगार, करूण, विरह वगॆरे). राग हे ठराविक वेळेला गायले जातात, काही वेळा दोन वेगळ्याच भावांची गाणीही एकाच रागात असतात. काही राग एकापेक्षा जास्त भाव प्रकट करतात. असे सगळे असताना एखादे गाणे कुठल्या रागात आहे हे ऒळखणे जरा कॉम्प्लिकेटेड असते.
नुसत्या भावावरून गाण्याचा राग ऒळखणे अवघड असते. जर आपल्याला गाण्याचे सूर कळत असतील तर साधारण रागाची कल्पना येऊ शकते. पण सगळ्यांना सूर माहित नसतात. प्रत्येक राग कसा म्हणायचा याचे काही नियम असतात. ठराविक स्वर ठराविक पद्धतिनेच म्हणावे लागतात. त्या रागाचे स्वर आणि त्या रागाचा ठराविक भाव हे दोन्हीही त्यातून प्रकट व्हावे लागते. याला रागाचे चलन ( मी त्याला सोप्या भाषेत रागाची चाल म्हणते) म्हणतात. आता हे चलन किंवा या फ्रेझेस आपल्याला हिंदि मराठी गाण्यात सतत दिसत असतात. आपण जर एकाच रागावर आधारित गाणी एका पाठोपाठ ऎकली तर हळूहळू या फ्रेझेस आपल्याला कळू शकतात आणि त्या गाण्याचा राग लक्षात येऊ शकतो. यासाठी आधी त्या रागाचे चलन ही ऎकले पाहिजे. मुख्यांगाचे स्वर ही ऎकले पाहिजेत.
उदा. राग भूप ....आता पुढील गाणी ऎकलीत तर तुम्हाल ही गोष्ट स्पष्ट होईल....प्रत्येक गाण्यात काहीतरी साम्य आहे हे जाणवेल. हे साम्य म्हणजे या फ्रेझेस ......कदाचित एकदा ऎकून भागणार नाही पुन्हा पुन्हा ऎकावे लागेल.
chk the following two links and then listen the songs.
link shws raag bhoop
chk this link
१. ज्योति कलश झलके
२. नील गगन की छाऒमे
३. सायोनारा सायोनारा
४. पंछी बनू उडती फिरू
५. गीतरामायण - शरयू तीरावरी
६. इन आंखोकी मस्ती....
अशीच इतर रागांवरही गाणी ऎकता येतील पण त्यासाठी निदान रागाचे चलन माहित करून घ्यायला हवे.
नेहेमी रागावर आधारित हे शब्द आपण ऎकतो कारण बरेच वेळा संगीतकारांना थोडेसे बदल करावे लागतात. म्हणून आधारित चा आधार घेतला जातो. काही गाण्यात आपण सरगम ऎकत त्यावरून त्या रागाची कल्पना येते. उदा. निगाहे मिलाने को जी चाहता हॆ मधील सरगम किंवा ए आर रेहमान बर्याच गाण्यात २-३ ऒळी सरगम घालून त्यातून गाणे चालू करतो त्यावरून त्याच्या स्वरांची कल्पना येते.(गुरू मधील गाणी) मला वाटते दर सिनेमात एक तरी गाणे असे सरगम व शब्द असे मिश्र गाणे असावे म्हणजे लोकांना आपोआप तसे ऎकायची सवय होईल व कानसेन तयार होतील. सिनेमातील गाणी जेवढ्या आवडीने ऎकली जातात व फॉलो होतात तेवढे दुसरे काही होत नाही. अशा गाण्यांवर आधारित पुढचे पोस्ट लिहायचा विचार आहे.
कधी कधी वाट्ते सिनेमातील गाणी छान वाटली की ती एनजॉय करावीत ...कुठल्या का रागावर आधारित असेनात............

4 comments:
सोप्या शब्दात माहिती दिलीत. नवीन लोकांना परिचय तरी झाला.
>>कधी कधी वाट्ते सिनेमातील गाणी छान वाटली की ती एनजॉय करावीत ...कुठल्या का रागावर आधारित असेनात
हम्म ते बरोबर आहे एन्जॉय तर केलाच पाहिजे पण शेवटचं वाक्य जरा विरोधाभासी वाटतं.
चित्रपटांच्या गाण्यात शास्त्रीय गाणं शोधणं म्हणजे बॅक वॉटर मध्ये होडी चालवण्या सारखं आहे. शास्त्रीय गाण्याचा खूप मोठा समुद्र आहे त्यात उडी घ्याच.
Thanks for feedback.
I have added ne vide link n raag bhoop that will explain the concept more
Last line ...thats what I used to think first now changing slowly
कधी कधी वाट्ते सिनेमातील गाणी छान वाटली की ती एनजॉय करावीत ...कुठल्या का रागावर आधारित असेनात
होय, असेच वाटते.
पण सारख्या रागांची गाणी ऐकल्यावर नक्कीच मदत होईल याबद्दल माहिती होण्यासाठी...
कधी कधी वाट्ते सिनेमातील गाणी छान वाटली की ती एनजॉय करावीत ...कुठल्या का रागावर आधारित असेनात............ अगदी अगदी. मात्र एक एक राग घेऊन जेव्हां एखादा तयारीचा कलाकार एकातून दुसरे, दुस~यातून तिसरे... अशी अगदी सहजपणे गाणी गुंफत जातो नं तेव्हां फार फार आनंद होतो. नुकताच अनुभव घेतलाय. :)
Post a Comment