Wednesday, September 7, 2011

डोअर काउंटी - डेथ डोअर

डोअर काउंटी - डेथ डोअर



या लेबर डे ला विस्कांन्सिन मध्ये डोअर काउंटी ला गेलो होतो. विस्कांन्सिन मध्ये ग्रीन बे पासून एक बोटासारखा फाटा लेक मिशिगन मध्ये गेला आहे, डावीकडे ग्रीन बे, स्टर्जन बे असे २-४ बे आहेत. वाँशिंग्टन आयलंड पाशी हे सगळे लेक मिशिगन ला मिळतात. इथे पाण्याचा करंट जास्त असल्याने पूर्वी इथे जहाजे बुडत व या ठिकाणाला डेथ डोअर असे म्हणत.  यावर उपाय म्हणून बरीच लाईट हाउसेस बांधली गेली व हा प्रकार थांबला.

या एरिआत खूप प्रायव्हेट प्रीँपर्टीज आहेत. बरीच घरे रहाण्यासाठी भाड्याने देतात.  दरवर्षी येणारे लोक खूप आहेत. अगदी पाण्याच्या जवळ घरे आहेत. बोटी, कयाक, मोटरबोट, सेल बोट, फिशिंग बोट भरपूर दिसतात. ५-६ स्टेट पार्कस असल्याने हायकिंग, बायकिंग याचे बरेच ट्रेल्स आहेत. झाडी अगदी पाण्यापर्यंत आहे त्यामुळे निळा व हिरवा या रंगांच्या खूप छटा दिसतात. हायकिंग करताना बरेचदा एकीकडे पाणी व एकीकडे झाडी त्यामुळे मस्त वाटते.  पेनिन्सुला स्टेटपार्क मध्ये आम्ही २ तास हायकिंग केले.  यात एका बाजुला पाणी व एका बाजूला हिल आहे. हवा पण मस्त होती. भरपूर हिरवी झाडी व निळेशार पाणी .. डोळे एकदम तृप्त होतात. वाटेत उंच क्लिफ्स लागतात. यातूनच
क्लिफ्स
पूर्वी एक दगडाची खाण काढली होती पण ती आता बंद केली आहे.


हे क्लिफ्स Niagara escarpment चा भाग आहेत. (साधारण  नायागारा पासून इलिनांय पर्यंत हे खडक पसरलेले आहेत). त्याचे फार इरोजन होत नाही. त्यामुळे बरीच झाडे व इको सिस्टीम जपली गेली आहे.  या खडकांचा काही भाग पाण्याखाली पण आहे.  या खडकामुळे या एरिआत बरेच धबधबे दिसतात.  या सगळ्या गोष्टी पुस्तकात वाचण्यापेक्षा अशा प्रत्यक्ष पाहून छान वाटतात.
फिश बाँईल - ही जागा लेक च्या काठी असल्याने फिश भरपूर.  पूर्वापार चालत आलेली यांची ही एक खाण्याची परंपरा आज बिझिनेस मध्ये बदलली आहे. कांदे बटाटे व व्हाईट फिश एका मागोमाग मोठ्या भांड्यात उकळतात. १० मि त फिश तयार होतो व त्यातील चरबी बाहेर यायला लागते. या नंतर केरोसिन जाळात ओततात, त्यामुळे एकदम टेंपरेचर वाढते व सगळी फँट बाहेर येते. या साठी व्हाईट फिश वापरला जातो. हा ४० डिग्री तापमान आवडणारा फिश आहे त्यामुळे तो उन्हाळ्यात खूप खोल पाण्यात जातो. काटेही भरपूर असतात. ही जी काही फँट निघून जाते त्याची भरपाई वरून भरपूर बटर घालून करतात.  नंतर चेरी पाय ची स्वीट डिश असतेच.

सेल बोट - इथे सेल बोटी खूप दिसतात. बरेच लोक हा धंदा करतात. सुरूवातीला मोटर वर पाण्याच्या आत साधारण १५-२० मिनिटे घेउन जातात. मग मोटर बंद करून शिडे उभारतात. वारा जसा असेल त्याप्रमाणे शीड हलवतात. हा अनुभव खूप छान होता. नुसता वारा किती जोरात बोट नेउ शकतो याचा अनुभव घेता आला. कँप्टन पण छान होता. हे सगळे प्रकरण एरो डायनँमिक्स च्या तत्वावर चालते. शिडाचा वापर विमानाच्या पंख्यासारखा होतो. खूप वारा असला तर त्या नुसार शिड खाली वर करता येते.  काही वेळा बोट इतकी तिरकी होते की भिती वाटते पण खाली ८००० पाउंडाचे किल लावलेले असल्याने बोट उलटायचा चान्स कमी असतो. मला त्या कँप्टन ने सांगेपर्यंत कल्पनाही नव्हती की खाली एवढे वजन लावले आहे.  हा सगळा अनुभव घेतल्यावर पुन्हा एकदा आपल्या पूर्वजांचे कौतुक वाटल्याशिवाय रहात नाही. त्याकाळी विशेष साधने नसताना लोक किती धाडसाने समुद्र सफरी करायचे.

चेरी स्पेशल - डोअर काउंटी मध्ये चेरी भरपूर होतात. त्याचे सगळे प्रकार पाय, जँम, सालसा व वाईन बनवतात. त्या नंतर सफरतंदाचा सिझन असतो. या प्रदेशात चीजही भरपूर बनते.  या सगळ्या बागांच्या टूर्स अरेंज करतात व तुम्हाला जवळून सगळ्या गोष्टी बघता येतात.  सगळाकडे लोकल बिझनेसेस ला वाव दिला आहे त्यामुळे नेहमीच्या चेन्स दिसत नाहीत.  लोक छान फ्रेंडली होते इथले.

डोअर काउंटी ला झाडी भरपूर असल्याने फांल कलर्स अर्थातच सुंदर असतात. पाणी, कडेने झाडी व थोडेसे डोंगर यामुळे फाँल ला इथे गर्दी असते. वाँशिंग्टन आयलंडला फेरी ने जाता येते. ते एकदम टोकाला आहे. तिथून ३६० व्ह्यू मस्त दिसतो. ३-४ ठिकाणी रात्री  नाटकांचे शो होतात.

एकंदरीत डोअर काउंटी चा अनुभव छान होता....

No comments: