Friday, June 12, 2020

करोना. एक चिंतन

करोना .. एक चिंतन

      गेल्या वर्षी अाॆस्ट्रेलिया न्यूझीलंड ची ट्रीप करून आलो. निसर्गसौंदर्य व मानव निर्मित सौंदर्य या दोन्हीचा अनुभव घेतला. तिथे असताना एक दोन िठकाणी ट्रेन ने जाता आले नाही कारण आगी लागल्या होत्या. त्या मंडळींना हे नेहेमीचेच होते जसे कॆलिफोर्निआत वार्षिक आगी लागतात तसे.परत आल्यावर या आगी एवढ्या वाढल्या की कंट्रोल करणे अवघड झाले. बरीच जंगले जळाली. कांगारू व क्वाआलांना वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. शेवटी या गोष्टी इतक्या वाढल्या की लोकांना स्थलांतर करावे लागेल असे वाटत होते. पूर्वीच्या काळी जसे इजिप्त, हरप्पा, मेसोपोटेमिया या संस्क्रुति लयाला कशा गेल्या अचानक ह्या नेहेमी पडणाऱ्या प्रश्नाचे थोडेसे उत्तर मिळाले. निसर्गातील पंचमहाभूतापैकी एखादे जरी कोपले तर ते मानवाला नेस्तनाबूत करू शकेल हे पटले.
      तिथून परत आल्यावर एखाद महिन्यात वुहान च्या बातम्या आल्या. सुरूवातीला चीन पर्यंतच गोष्ट आहे असे वाटत असतामाच सारे जग एका विषाणूच्या विळख्यात बघता बघता अडकले. विमानसेवा, क्रूझेस, रेल्वे सगळे ठप्प. आपल्या आधीच्या पिढीने प्लेग, फ्लू च्या आठवणी जागवल्या. तेव्हा नव्हते बाई असे घरात बसणे व सारखे हात धुणे असे त्यांचे म्हणणे. हा व्हायरस एवढा भयंकर निघाला की त्याचे रोजचे वाढते आकडे ठी व्ही वर पाहून डिप्रेशन यायला लागले. प्रत्येक बाबतीत उलट सुलट मते, आपण करतो ते बरोबर का चूक असे सारखे वाटत राही. हा व्हायरस नवीन असल्याने कोण बरोबर कोण चूक हे ठरवणे पण कठिण. 
    या अशा परिस्थितित सोशल मिडिया लोकांच्या मदतीला धावला.  थोडा विरंगुळा टेन्शनमधे हवासा वाटु लागला. आम्ही नाही त्यातले असे म्हणणारे झूम वर दिसू लागले. झूम चे शेअर्स वधारले. वाॆटसअप जोक्स मधे प्रचंड क्रिएटिव्हिटी आली. थोड्याच दिवसात सिरीअस पोस्टवर सगळ्यांनी बंदी घातली. अशातच फेसबुक लाइव्ह व झूम वर अनेक कलाकार आपली कला दाखवू लागले. बरेच जण आपल्या खांद्यावर ही जबाबदारी आहे असे समजून रोजचे कार्यक्रम करू लागले. शेवटी काय बघावे व काय नाही असा प्रश्न पडू लागला. शेवटी आपली आवड व क्वालिटी हेच निकष कामी आले. गाणी, गोष्टी, काव्यवाचन, स्वरचित स्वलिखित गप्पा,एक ना दोन. सनुष्य प्राण्याला संवाद हा फार महत्वाचा हेच खरे. गाण्याच्या कार्यक्रमात येणारा लँग व अकंपनीमेंट चा अभाव यावर आता बरेच लोक उपाय शोधायला लागले असतील. 
    आता आपण पुढच्या टप्प्यावर आलो आहोत. काम सुरू करावे का घरात बसावे हे धर्मसंकट आहे
फ्री मधे असलेले लाईव्ह कार्यक्रम आता पैसे घेउ लागलेत. सगळीकडे थोडा अनलाँक सुरू झालाय. जरा साथीचा रेट कमी होतोय म्हणतोय तोवर प्रोटेस्ट सुरू आहेत. हजारोंनी माणसे एकत्र जमत आहेत. याचा परिणाम १५ दिवसात कळेलच. सगळी ट्रायल व एरर चालू आहे. सर्वात आधी लस वा औषध बनवून कोण गब्बर होते ते बघायचे. लस तयार झाली तर नक्की साशंक वाटणार आहे. सरकारने काहीही केले तरी दोन्ही बाजूने लोक बोलणारच आहेत. अमेरिकेची यात कशी जास्त वाट लागली आहे याबाबत वरीच मंडळी समाधानीही आहेत. मला अमेरिकेला नावे ठेवणारी एवढी माणसे भेटतात तरी इथली व्हिसाची लाइन संपत नाही याचे आश्चर्य वाटते.

या सगळ्यातून काही फायदेही झाले आहेत. व्यायामाचे प्रकार, डाएट चे सल्ले, योगा व्हिडिओ यांच्या माऱ्याने लोकांचा थोडातरी फायदा नक्कीच झाला आहे. घरकाम व घरचे खाणे यामुळेही वजन खरेच कमी होउ शकते हे दिसून आले आहे. वर्क फ्रांम होम मुळे चक्क जास्त काम होतय असे लक्षात आलय. प्रदूषण कमी झालय. आणि हो अमेरिकेत सगळे काम घरी कसे करावे लागते याचा थोडाफार अनुभव सगळ्यांनी घेतला आहे. क्रेडिट कार्ड हल्ली फार स्वाइप होत नाही म्हणून काही बायका नाराज आहेत म्हणे. आपण आहार व्यायाम नीट ठेवणे व इतर काळजी घेणे हे करू शकतो, दुसरा ते करेल याची खात्री नाही. कर्मण्येवाधिकारस्ते … लक्षात असू द्या. 

या काळात पाहिलेले चांगले कार्यक्रम.....

यू ट्यूबवर
 खजिना स्पहा जोशी ने साधलेले संवाद य़ात चांगल्या कविता ऐकायला मिळतील.
रंगपंढरी नाटकासंबंधी मुलाखती

फेसबुक लाईव्ह
इंडॆालाँजी त आवड असेल तर खूप व्हिडिओज आहेत.
वीरगळ म्हणजे गावातल्या हिरोंचा सन्मान करण्यासाठी केलेल्या शिळा, सतीचे वाण म्हणजे काय प्रत्येक गावाचा तो मला मेमोरिअल डे वाटला.
कार्बन डेटिंग
देवळांची माहिती
बुद्धीस्ट व इतर केव्हज
टिळकांच्या आर्क्टिक होम इन वेदाज पुस्तकाबद्दल
के मुहाम्मद यांची आर्किआँलाँजी  लेक्चर्स
पूर्वीच्या पुस्तकातील फिजिक्स स्तोत्र रूपात लिहिलेले

ब्रम्हांडाची रचना वेदिक पुस्तकातील

1 comment:

PATIL said...

नमस्कार,
तुमचे काम नक्कीच मराठी भाषा प्रसार मध्ये चांगला हातभार लावत आहे. आम्ही सुद्धा या दृष्टीने प्रयत्न करत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाईट वर तुमचं लिखाण किंवा कविता पोस्ट करायची असेल तर खाली दिलेल्या लिंक वर आम्हाला कळवा .कोणत्या post वर कमेंट करुन तुम्ही आमाला कळउ शकता.
JIo Marathi