Wednesday, May 30, 2018

जपान एक अनुभव


जपान एक  अनुभव

कराटे सुशी, ओरिगामी, सोनी, यामाहा व टोयोटा या गोष्टीतून आमची आतापर्यंत जपानची ओळख झाली होती. या सगळ्या गोष्टीत क्वालिटी हा समान धागा होता. तसेच माउंट फुजी बुलेट ट्रेन व हिरोशिमा बद्दल पण ऐकले होते.  साकुरा साठी जपानला जायचे असे मायदेशी  काही नातेवाईकांचे ठरले व आम्ही त्यात सामील झालो. सगळा कार्यक्रम बघता चेरी ब्लाॅसम, माउंट फुजी व जपान कल्चर जवळून पाहणे या इंटरेस्टींग गोष्टी होत्या. आजकाल नातेवाईकांबरोबर फक्त लग्नात भेटी होतात, या ट्रीपमुळे बराच वेळ बरोबर घालवता आला व जास्त ओळख झाली हे नक्की.

जपान हा देश लहान आहे.अंदाजासाठी कॅलिफोर्निया स्टेट पेक्षा लहान व जर्मनी पेक्षा मोठा. बरीच बेटे मिळून बनलेला. ६६ % झाडांनी व्यापलेला असल्याने हिरवा गार. आम्ही टोकियो, निक्को, फुजियामा, क्योटो, नारा, हिरोशिमा, मियाजिमा बेट व कवाने या गावांना भेट दिली. जपान मध्ये बरीच वर्षे राहिलेला आमचा गाईड होता त्यामुळे भाषा,जेवण आणि जपानींचे माणसे त्याला चांगले माहिती होते. इंग्लिश चा वापर अगदी कमी असल्याने त्याची ठिकठिकाणी मदत झाली.आम्ही जपान एअरवेज ने प्रवास केला.


 टोकियो जपानची राजधानी. जपानमध्ये बैठी घरे असतात, उंच इमारती कमी या ऐकीव गोष्टी इथे दिसत नाहीत. खूप उंच बिल्डींग्ज आहेत. टोकियो स्काय  ट्री  देखणी आहे. हा टाॅवर कसा बांधला याची फिल्म जाण्यापूर्वी बघितली होती.   वेळ असेल तर हा नक्की बघा. दुसरा आयफेल टाॅवर हून थोडा उंच असलेला टोकियो टाॅवरआहे. 

बऱ्याच ठिकाणी छोटे पुतळे ओळीने उभे केलेले दिसतात देवळांच्याजवळ. ही लहान मुलांशी स्मारके आहेत जी फार जगली नाहीत किंवा जन्मली नाहीत त्यांच्यासाठी. त्याना लाल स्वेटर्स व टोप्या काही वेळेस घातलेल्या दिसतात.



दुसरे दिवशी  पॅलेस, मेजी टेंपल व आसाकुसा मधील सेन्सोजी टेंपल पाहिले. या देशांत शिंटो व बुद्धिस्ट टेंपल्स ठिकठिकाणी दिसतात. शिंटो हे निसर्गातील अनेकगोष्टीना देव मानतात. मला आपल्या वैदिक काळाशी या धर्माचे साम्य वाटले. हे देउळ दयेच्या  कॅनन या बुद्धीस्ट देवतेचे आहे. दारात लाल रंगांचा मोठा कागदाचा कंदिल आहे ज्यावर थंडर गेट असे लिहिले आहे. इथले बरेच बांधकाम लाकडीअसल्याने त्याचे नूतनीकरण वेळोवेळी होते, हे देउळ ही त्याला अपवाद नाही. सोनेरी व लाल केशरी रंगांचा वापर खूप आहे. या देवळाच्या बाहेर दुतर्फा तुळशीबाग स्टाईल दुकाने आहेत. स्त्रीवर्ग तिथे रेंगाळला हे सांगायलाच नकोच. जपानी पंखे, बाहुल्या, स्टीकर्स, बुक मार्क्स, टी शर्ट्स आणि अजून बरेच काही. यानंतर राजाचा पॅलेस लांबून बघितला. इथेही राजाचे महत्व आहे. या रस्त्यावर काही फुललेली झाडे दिसली. नंतर मेजी टेंपल ला भेट दिली. खूप झाडी आहे इथे. यानंतर जेवढी ठिकाणी पाहिली ती सगळी निसर्गरम्य अशीच होती. मेजी राजवटीत आधुनिक आणि शक्तीशाली जपानची रचना झाली. अगदी गावात असूनही भरपूर झाडीत हे ठिकाण आहे. बांधकामाच्या वेळी जवळ जवळ लाखभर झाडे लावली होती. इथले दगडी कंदिल लक्ष वेधून घेतात. दारात तोरी गेट आहे. या गेट मधून जाताना तुम्ही स्पिरिट्युअल जगात प्रवेश करता असा समज आहे. आत राजाच्या वैयक्तिक गोष्टींचे संग्रहालय आहे. 


यानंतर एका टोकियो बे व्ह्यू असलेल्या ठिकाणी जेवण घेउन बोट राइड साठी गेलो. विंडी असल्याने बोट राईड झालीनाही पण तिथून व्ह्यू छान होता. नंतर अजून थोडे टोकियो दर्शन करून परतलो. वाटेत ठिकठिकाणी वेगवेगळे फुले चालण्याचा थकवा घालवत होती.

निक्कोम्हणजेसूर्य.... दुसऱ्या दिवशी निक्को ची डे ट्रीप केली. टोकियो पासून साधारण २ तासावर अतिशय निसर्गरम्य जागी अनेक देवळे आहेत शिंटो व बुद्धीस्ट. बरीच वर्ल्ड हेरिटेज साइटस् मधे मोडतात. जाताना बस च्या प्रवासात हवा मेहेरबान होती. थोडा पाउस, उन, थोड्या गारा असे सगळे आणि दुतर्फा साकुरा. 
 ठिकाणी थांबून सगळ्यांनी फोटोची हौस भागवली.वेगवेगळ्या प्रकारची झाडे दिसली.  इथे खूप उंच सेडार ची झाडे आहेत, थोडी कुमाऊ हिल्स ची आठवण आली. रिन्नोजी च्या देवळात रेस्टोरेशन चालू होते. ८ व्या शतकात या देवळांची स्थापना झाली. सुरूवातीला शिंक्यो ब्रिज लागला. त्यामागे देवाने नदी पार करण्यासाठी भक्ताला ब्रिज बांधून मदत केली अशी कथा आहे. तेव्हा दोन सापांचा ब्रिज केला असे सांगतात. सुरूवातीला घोड्यांचा तबेला लागतो. शिंटो देवळांना घोडे प्रिय होते. घोड्यांना आजार होउ नयेत म्हणून तिथे बरीच माकडे ठेवली होती.  नेहेमी जे बुरा मत देखो, बुरा मत सुनो हे तीन माकडांचे चित्र पहातो त्याचे उगमस्थान इथे आहे. लाकडी कलाकुसर खूप आहे,  छान त्रिमिती इफेक्ट दिला आहे. सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत तुम्ही इथली कलाकुसर पाहू शकता एवढे प्रकार करून ठेवले आहेत. भरपूर गोल्ड कलर चा व गोल्ड लिफ् चा वापर आहे. एका हत्ती न बघितलेल्या कलाकाराने काढलेले हत्तीचे चित्र आहे तर एका प्रसिद्ध शिल्पकाराने केलेले मांजराचे शिल्प आहे. त्यावरचे भाव खूप छान आहेत.यावरून पुढे पोर्सेलीन चे प्राणी बनवायला लागले असे म्हणतात. कोरीव काम बघून दमायला झाले.एका देवळात बराच वेळ जपानीमंत्रपठण चालले होते तिथल्या एका खोलीच्या छतावर गोल्डन ड्रॅगन चे पेंटिंग आहे त्याखाली उभे राहून दोन लाकडी पट्ट्या एकमेकांवर वाजवल्या की ड्रॅगन चा आवाज येतो हे तिथल्या पुजाऱ्याने करून दाखवले.  जपानी मंडळी खूप भक्तीभावाने सगळे बघत होती. देवळाच्या मागे१००-१२५ पायऱ्या चढून आमच्यातील काही चपळ मंडळी वरून व्ह्यू बघून आली. इथे खूप कलाकुसर व चित्रे यांची गर्दी झाली आहे असे वाटले. रंग पण खूप आहेत. या जागेला देवळापेक्षा प्रदर्शन म्हणावे असे वाटले. 

 इथला इंपिरिअल पॅलेस पाहिला. आपल्या पॅलेस च्या कल्पनेपेक्षा खूपच साधा वाटतो. तिथले ४०० वर्षापूर्वीचे साकुरा चे झाड पूर्ण फुललेले होते.  खोल्या, ततामी या जपानी चटया, सरकती दारे व अधूनमधून पेंटिग्ज होती.  ठिकाणीच कार्पेट व शॅंडेलिअर्स होती.  जपानी रहाणीतला साधेपणा दिसून आला. आपल्या मनातल्या पॅलेस या कल्पनेपेक्षा हा खूप वेगळा होता. यानंतर सुशी खायला आमच्या आजच्या गाईड च्या रेस्टाॅरंट मध्ये गेलो. अगत्यशीलतेचा अनुभव जिथे जेवलो तिथे सगळीकडे आला. इथल्या व्हेज सुशी मध्ये वेगळ्या भाज्या होत्या. 

बुलेट ट्रेनचा प्रवास हे पुढच्या प्रवासातला नवीन अनुभव होता. आम्ही ७ दिवसाचा पास काढला होता त्याचे पैसे पुरेपुर वसूल केले. जेवढे वर्णन ऐकले होते त्यापेक्षा बुलेट ट्रेनचा अनुभव छान होता. गाडी स्टेशनवर येताना कमी आवाज,अतिशय शिस्तीत चढणारे उतरणारे प्रवासी व धक्का न बसतां चालू होणारच गाडी यामुळे खूप सुखकर प्रवास झाला.सिंगापूर युरोप अमेरिका यापेक्षा ही बुलेट ट्रेन नक्कीच उजवी आहे. आता भारतात बुलेट ट्रेन येताना ही सगळी शिस्त त्याबरोबर आली तर मजा येईल. ट्रेन च्या सिट्स फिरवतां येतात. समोरच्याच सीटच्या पाठीवर  सगळी माहिती दिलेली होती. कुठून कुठे चालले, बाथरूम, कचरा डबा, धूम्रपान या सोई कुठे आहेत. याचावापर सगळी मंडळी करतात त्यामुळे सगळे स्वच्छ होते. लहान मुलांना घरी व शाळेत हे धडक दिले जातात त्यामुळे कचरा दिसत नाही. एक छोटासा हुक कडेला सामान ठरवण्यासाठी होता ज्यावर १किती वजन ठेवतां येईल ते दिले होते. ट्रेस केला तरच तो बाहेर येत होता. जेवढे तिकीट चेकपोस्ट कंडक्टर डब्यात येत ते डब्याच्या शेवटी वळून कंबरेत वाकून पुढे जात होते हे पाहून आपले टी सी आठवले व आजच्या जगातही अशी लोकं आहेत हे बघायला मिळाले. जवान मध्ये या ट्रेन्स ना शिंकानसेन म्हणतात. १९६४ च्या आॅलिंपिक्स पासून साचीपुरूवात झाली. लोकांना राजचा प्रवास सुखकर व कमी वेळात होउ लागला. सुरूवातीला टनेल मधून बाहेर पडताना मोठा बूम येत असे तो टाळण्यासाठी बराच रिसर्चर केला गेला. मेन इंजिनिअर ला पक्षी निरीक्षणाची आवड होती त्य अनुभवावरून इंजिनाचा 

 हा बराचसा किंग फिशर च्या चोचीप्रमाणे केलागेला कारण हा पक्षी हवेतून पाण्यात जाताना पाणी उडवत नाही वा आवाज करत नाही. दोन वेगळ्या मिडिअम मधून केल्याने ट्रेन जास्त आवाज करत होती. दुसरी सुधारणा पेंटोग्राफ च्या डिझाईन मधे केली. इथेही पक्षीनिरीक्षक मदतीला आले, गरूडाच्या सगळ्यात वरच्या पंखाला कात्रे असतात त्यामुळे हवेचा अावाज जास्त होत नाही. पंखाप्रमाणे पेंटोग्राफ च्या डिझाईन मधे सुधारणा केली व आवाज कमी झाला.
आपण जे म्हणतो निसर्ग हा मोठा गुरू आहे त्याची इथे प्रचिती येते.


माउंट फुजी आपल्याला जसा हिमालय तसा  जपानी लोकांचा माउंट फुजी. वर्ल्ड हेरिटेज सेंटर असलेल्या एका 

 ला आम्ही भेट दिली. माउंच फूजी उलटा केला तर जसा दिसेल तसे हे माॆडेल केले आहे. बाहेरून लाकूड बांबू चौकट वापरली आहे. बाहेर पाणी आहे त्यात छान प्रतिबिंब दिसते. हे पाणी याच पर्वताचे रिसायकल केलेले आहे. आपण आत मधे चढत वर जातो व जाताना मोठ्या स्क्रीन वर डोंगरावर दिसणारी सिनरी बघत जातो. खूप छान बनवले आहे. नेहेमीप्रमाणे एक फिल्म दाखवली जाते ज्यात सगळ्या सिझन्स चे फोटो दाखवले आहेत. शेवटी आपण एका टेरेस वर बाहेर पडतो आणि समोर पूर्ण डोंगर दिसतो हे इथले सुंदर सरप्राईज होते. हवेने साथ दिल्याने मजा आली. भरपूर फोटो काढले. परत खाली येताना अजून बरीच माहिती ४ भाषात पुरवली आहे. काही वर्षापूर्वी मनिषाताई साठे आल्या होत्या. त्यांनी माउंट फुजीच्या बॆकड्राॆप वर कथक केले होते त्याची आठवण झाली. फार सुंदर परफाॆर्मन्स होता तो.

चेरी ब्लाॅसम अर्थात साकुरा.....

जपानच्या ह्या ट्रीप मध्ये साकुरा हे मोठे आकर्षण 
होते. यंदा हा सिझन लवकर आल्याने कमी ब्लाॅसम्स बघायला मिळाले, पण जे पाहिले ते फार सुंदर होते. निळ्या आकाशाच्या बॅकड्राॅपवर पांढरी गुलाबी झाडे फार मस्त दिसली. चेरी ब्लाॅसम येणारी जवळ जवळ १०० वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहेत. काही लवकर येतात काही उशिरा. ५ पाकळ्यांपासून ते १०० पाकळ्यांपर्यंत फुलणार ही झाडे आहेत. आम्ही ५-६ प्रकार पाहिले. पांढरा, गुलाबी, वीपींग विलो प्रकारातले, काही ५ पाकळ्या तर काही गच्च पाकळ्या असलेली. मार्च एंड ते एप्रिल पहिला आठवडा हा सिझन मुख्यत्वे असतो. नंतर ही फुले दिसतात. शक्य तोवर मार्च एंड लाच ट्रीप प्लान करावी व थोडी फ्लेक्झिबल ठेवावी म्हणजे ब्लाॅसम्स नक्की बघायला मिळतील. या सिझनमधे सगळे जपानी सहभागी होतात. ही फुले सुंदर असतात व थोडे दिवस च रहातात या प्रमाणेआपले आयुष्य थोडे व सुंदर असते तेव्हा त्याचा चांगला आस्वाद घ्या, चांगले कारणी लावा असे तत्वज्ञान जपानी लोकांनी या फुलांमधे शोधले आहे. याच सुमारास नवीन वर्ष ही सुरू होते. वसंत ऋतू च्या सुरूवातीला नवीन फुले पाने येउन झाडांचेही एक प्रकार नवीन वर्ष सुरू होते. या फुलांचे डिझाईन्स बुक मार्क्स, रुमाल, वाॅल पेंटिंग्ज, कॅलेंडर किमोनो या सगळ्यावर आपले स्थान टिकवून आहे. आम्ही थोडी आर्टिफिशिअल फुले आठवण म्हणून आणली. आता पुढत्ा वेळी वाॆशिंग्टन डी सी ला जाउ साकुरा पहायला. जपानच्या राजाने दिलेली २५०० झाडे नदीकिनारी लावली आहेत. किती छान कल्पना आहे ना भेट देण्याची.

  क्योटो .... इथे बरीच ठिकाणे बघण्यासारखी आहेत. आम्ही फुशिमी इनारी श्राइन, किनकौजी टेंपल, कियोमिझू डेरा टेंपल व सिल्व्हर टेंपल बघितले. इनारी हे तांदुळ देणाऱ्या वा वाढवणाऱ्या देवासाठी आहे. इथल्या केशरी रंगांच्या तोरी लक्श वेधून घेतात. ही तोरणे लाकडातील असून देणगीदारांची नावे त्यांवर लिहिली आहेत. वाटेत कोल्हा व त्याच्या तोंडात कागदाची गुंडाळी असलेली अनेक दगडी शिल्पे दिसतात. कोल्हा हा त्या देवतेचा दूत मानला जातो. आजूबाजूचे डोंगर, झाडी व ताजी हवा यामुळे वरती जायला मजा आली. आपल्याकडेच तिरूपतिला जसे देवाला धंद्यात पार्टनर करून घेतात तसा थोडा प्रकार आहे. 

 किनकौजी या झेन देवळाला नंतर भेट दिली. नुकताच वसंत ऋतू आलाय हे इथल्या झाडाची पालवी दाखवत होती. हिरव्या रंगांच्या खूप छटा. प्रववेशापासून आत बरेच  अंतर या झाडीतून गेलो आणि अचानक समोर गोल्डन टेंपल दिसले व तोंडातून  पिक्चर परफेक्ट हे शब्द बाहेर पडले. वरचे दोन मजल्यासाठी गोल्ड लिफ् वापरले आहे. सोन्याची शुद्धता मत्यूबद्दलचे सगळे निगेटिव विचार काढून टाकते असा काहीसा विचार गोल्ड लिफ् वापरण्यामागे आहे. याच्या समोर तळे आहे उन्हात सुंदर प्रतिबिंब दिसते. इथे भरपूर फोटोग्राफी झाली. याला गोल्डन पॅव्हिलिअन म्हणतात. 


 देशी जेवणाचा आस्वाद घेउन कियोमिझू डेरा टेंपल पाहिले. हे देउळ शुद्ध पाण्यासाठी प्रसिद्ध आहे. देवळाकडे जाताना थोडा स्टीप रोड आहे. आजूबाजूस भरपूर दुकाने आहेत खाण्याची व सुवेनिअर्स ची. एका खडकावर ओटावा स्प्रिंग च्या वर हे देउळ आहे. या झऱ्यातले पाणी शुद्ध मानले जाते. इथे मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी मंडळी चिठ्ठ्या बांधून ठेवत होती. हे एक युनिव्हर्सल रिचुअल आहे.  देवळाच्या सुरूवातीला केवळ लाकडी खांबांच्या आधारावर मोठा वऱ्हांडा व स्टेज आहे. तिथून गाव व आजूबाजूलाच परिसर मस्त दिसतो. इथे बऱ्याच बायका किमोनो खालून आल्या होत्या. छोटी कंपनी विशेषत: या ट्रॅडिशनल पोषाखात गोड दिसत होती. ३-५-७ या वर्षी मुलांना देवाला नेत्यांची पद्धत आहे. तेव्हा त्यांचे भरपूर लाड केले जातात.  दया करणारी ११ डोकी असलेली देवता या देवळात प्रसिद्ध आहे. खरे सांगायचे तर कुठल्याही देवळात मूर्तिकडे फारच कमी लक्ष जात होते आजूबाजूलाच परिसर इतका नयनरम्य होता तोच बघण्यात माझा जास्त वेळ गेला. चेरी व इतर बरीच झाडे आहेत. बाजूला इतर छोटी देवळे तीन माजली पॅगोडा होते. चेरी ब्लाॅसम व फाॅल कलर्स मधे हे देउळ जास्त छान दिसते. 

यानंतर गिनकौजी सिल्व्हर पॅव्हिलिअन पाहिले ते एवढे छान वाटले नाही. तिथे वाळू गार्डन बघायला मिळाली

 आमचा पुढच्या मुक्काम नारा जवळच्याच डाॅर्म मध्ये होता. इथे तुम्ही रिझनेबल रेट् मधे राहू शकता. बुक करण्यापूर्वी काय सोयी आहेत याची चौकशी केलेली बरी. आमचा या जागेतला अनुभव विशेष चांगला नव्हता. इथे जपानी रहाणीची झलक मिळाली. ततामी या जपानी चटया वर खाली गादीवर झोपणे, सरकत्या दाराचे दरवाजे, जुने हीटर्स व काॅमन बाथ शी पहिली ओळख. एका मोठ्या हाॅल मध्ये १२-१५ बायकांची अंघोळीची सोय व तेही बर्थसूट सध्ये. आपल्याला अजिबात सवय नसलेली ही गोष्ट. काही नियम आम्ही धाब्यावर बसवले. नशिब इथे २-३ दिवसच राहिलो. 

नारा हे डिअर पार्क व तोडायजी टेंपल साठी प्रसिद्ध आहे. डिअर पार्क मधे हरिणे हिंडत होती, लोक त्यांना खायला घालत होते व अर्थात फोटो काढत होते. त्याच्या पुढे हिरवळ व छान फुले राखलेला परिसर व त्याच्या मागे भव्य असे देउळ. त्याला साजेसा भव्य दरवाजा. साधारण ८ व्या शतकात इथली बरीच देवळे बांधली गेली व नंतर अनेक वेळा पुनरूज्जीवन केले आहे.  

सर्वात मोठे लाकडी स्ट्रक्चर व सर्वात मोठी ब्राॅंझ ची बु्द्धाची मूर्ती असलेले हे देउळ आहे.१५ मी उंच कमळाच्या


पाकळ्यांवर बसलेली मूर्ति आहे. गोल्ड लिफ् चा पण वापर आहे. कमळाच्या पाकळ्यावर पण बरेच कोरीवकाम आहे. बाहेर एक बासरीवाला बुद्धकोरलेला होता तो पाहून कृष्णाची आठवण आली. बाजूला २-३ स्केल माॅडेल्स मांडली आहेत देवळाची फार सुंदर होती. या देवळात धूळ पहिल्यांदा दिसली. देवळाच्या बाहेर अशोकस्तंभ दिसला. भारताचा व राजा अशोकाचा उल्लेख पाहून छान वाटले. या स्तंभाच्या खाली ओपनिंग सेरिमनी च्या वेळी एक कागद ठेवला आहे तो २०३८ मध्ये उघडणार आहेत......टाइम कॅप्सुल . बाहेर चेरी ब्लाॅसम जवळ ग्रुप फोटो झालाच.आमच्या गाईड ने इथे सगळ्यांना गरम चहा देउन सरप्राइज दिले फार बरे वाटले कारण गार हवेत चालून सगळे दमले होते. जपान मधे बाहेर आपल्या स्टाईलचा चहा कमी मिळतो म्हणून जास्त महत्व.

पुढचा दिवस हिरोशिमा 
अणूस्फोटाला  सामोरी गेलेली ही जागा. कुणाच्या तरी अस्मितेसाठी झालेला लाखो लोकांचा संहार,  का व कशासाठी हे प्रश्न सुटत नाही. 
कशीबशी वाचलेली ही बिल्डिंग बऱ्याच आधारावर उभी आहे. पीस पार्क, म्युझिअम व फेमस डोम बिल्डिंग आहे. एका डोम च्या खाली गेलेल्या लोकांची नावे लिहिली आहेत. एक ज्योत सतत तेवत ठेवली आहे तिथे. अणू बाॅंब मुळे झालेले नुकसान व दूरगामी परिणाम म्युझिअम मधे मांडले आहेत. पुन्हा हे घडू नये हे व शांति प्रस्थापित व्हावी हे दाखवले आहे.  

दुपारीमियाजिमा म्हणजे श्राईन आयलंड. हिरोशिमा ला भेट दिल्यावर या आयलंड वर आम्ही गेलो. बोटीचा छोटासा प्रवास होता. आधी एका नदीतून मग समुद्रात शिरलो. बोटीच्या ओपन डेक वरून सुंदर सीनरी दिसत होती. 

 आयलंड चे नाव इत्सुकुशिमा असे आहे. त्याला फ्लोटिंग आयलंड असेही म्हणतात कारण भरतीच्या वेळेस देवळांच्या खालचा भाग पाण्याखाली जातो. पाण्यात एक तोरी गेट आहे. ते पण तरंगल्यासारखे वाटते. आम्ही भरतीच्या आधी गेलो होतो.  त्यावेळी गेट पर्यंत जाता येते. इथे चक्क सरस्वतीच मंदिर आहे. तिचा फोटो मात्र नीट घेतां आला नाही. इथे अनेक देवळे आहेत सगळे बघायचे तर २दिवस रहायला हवे. १०० एक पायऱ्या चढून एक पॅगोडा आहे. वाटेवर चेरी ब्लाॅसम्स असल्याने तो खूप मस्त दिसला. आजूबाजूला सुवेनिअर शाॅप्स बेकरीज होत्या. पण ते सगळे सोडून इथल्या देवळांच्या बाजूला नुसते बसून डोंगर झाडी तोरी गेट पाणी हे नुसते बघत बसावेसे वाटत होते. 












































मियाजिमा म्हणजे श्राईन आयलंड. हिरोशिमा ला भेट दिल्यावर या आयलंड वर आम्ही गेलो. बोटीचा छोटासा प्रवास होता. आधी एका नदीतून मग समुद्रात शिरलो. बोटीच्या ओपन डेक वरून सुंदर सीनरी दिसत होती. या आयलंड चे नाव इत्सुकुशिमा असे आहे.  फ्लोटिंग आयलंड असेही म्हणतात कारण भरतीच्या वेळेस देवळांच्या खालचा भाग पाण्याखाली जातो. पाण्यात एक तोरी गेट आहे. ते पण तरंगल्यासारखे वाटते. आम्ही भरतीच्या आधी गेलो होतो.  त्यावेळी गेट पर्यंत जाता येते. इथे चक्क सरस्वतीच मंदिर आहे. तिचा फोटो मात्र नीट घेतां आला नाही. इथे अनेक देवळे आहेत सगळे बघायचे तर २दिवस रहायला हवे. १०० एक पायऱ्या चढून एक पॅगोडा आहे.

त्याच्या आत एक पेंडुलम लटकवलेला असतो, जमिनीपीसुन थोडा वर. लाकडाचे आकुंचन प्रसरण व भूकंप या दोन्हीत तो मदतीला येतो. आजकाल आत जाउन पॅगोडा बघता येत नाही. 

पाच मजले पंचमहाभूते रिप्रेझेंट करतात.वाटेवर चेरी ब्लाॅसम्स असल्याने तो खूप मस्त दिसला. आजूबाजूला सुवेनिअर शाॅप्स बेकरीज होत्या. पण ते सगळे सोडून इथल्या देवळांच्या बाजूला नुसते बसून डोंगर झाडी तोरी गेट पाणी हे नुसते बघत बसावेसे वाटत होते. 

 शिझुओका भागातील कवाने इथे शेवटचा मुक्काम होता. आम्ही क्येाटो पासून बुलेट ट्रेन व नंतर बसने गेलो. हा रस्ता म्हणजे डोळ्यांसाठी मेजवानी होती. दुतर्फा हिरवेगार झाडीचे डोंगर.  बाजूला खाली तेवढीच छान नदी व अधून मधून चहाचे मळे. हिरव्या रंगाच्या अनेक छटा. या भागात समुद्र नद्या डोंगर  झाडी या सगळ्यांनी नटलेला निसर्ग आहे. आम्ही डोंगर असलेल्या भागात मुक्काम केला होता.  आमच्या टूर गाइडने इथे एका तरूण आजीशी ओळख करून दिली. ती वयाच्या मानाने खूप उत्साही होती. अवघे ८१ वयमान.अजूनही आर्ट क्लासेस घेते. तिने आम्हाला सगळ्यांना टी शर्ट दिले व त्यांवर पेंटिंग करून घेतले. फायनल इफेक्ट मात्र आजीचा. खूपच प्रेमळ 
बाई आहे. त्यांचे एक टेंपुरा रेस्टाॆरंट आहे तिथेही जेउन आलो. आपल्या भज्यांसारखा हा प्रकार.  



 
दुपारी बांबूच्या पन्हळी उतरत्या ठेवून त्यात पाणी सोडून  शिजवलेले नूडल्स, टोमॅटो, मुळा इ वरून सोडले आम्ही सगळ्यांनी साईडला बसून ते अडवून बरोबरच्या टेस्टी साॅस बरोबर खाल्ले हा एक सगळ्यांना भाग घेतां येईल असा वेगळाच अनुभव होता. या फॅमिलीबरोबर बराच वेळ घालवला. फळे सॅलडस व थोडे आपले जेवण त्यांनी बनवले होते. परत जाताना सगळ्यांना छोट्या गिफ्ट ही दिल्या अगदी आपण जसे पाहुण्यांचे आदरातिथ्य करतो तसे वाटले. अगदी छोट्या डब्यात संत्री घालून प्रवासात बरोबर डब्यात दिली होती.  तिथली मेयर आजीची मैत्रिण होती. ती आम्हाला भेटायला आली व चहा म्युझिअम ला भेट द्या असा आग्रह करून देली. दुपारी आम्ही ते म्युझिअम बघितले. चहाचे मोठे झाड असते हे तिथे कळले. जगभरातले चहाचेप्रकार तो बनतो कसा हे सगळे दाखवले आहे. हा प्रांत ग्रीन चहाचा मोठा प्रोड्यूसर आहे. थोडी चहाची चवही मिळाली. तिथे बाहेर सुंदर जपानीबाग होती. जपानी गार्डन मधे बुशेस, छोटी तळी

 चहा ची जागा, रंगीत मासे, काही जुन्या गोष्टी वापरलेल्या दिसतात. थोडक्यात निसर्गातील बरेच एलिमेंटस दिसतात. बांबू पण बराच वापरला जातो. चढ उतार दिसतात बागेत. शांत वाटते. 


या  ग्रीन चहा चे रिच्युअल झाले. विशिष्ट पद्धतिने गरम पाणी घालून चहा तयार केला गेला पण मला तो विशेष आवडला नाही. जपानी लोककलेचा एक नमुना आमच्या जपानी गाईडने व त्याच्या बायकोने दाखवला.





इथे राहिलेल्या जागी गरम पाण्याचे झरे Onsen होते. जपान मध्ये व्होल्कॅनिक ऎक्टीव्हिटी खूप असल्याने खूप ठिकाणी हे झरे आहेत. त्यातील काही मिनरल्स शरीरासाठी चांगली असल्याने जपानी माणूस त्याचा खूप वापर करतो. काही ठिकाणी गरम पाहण्याच्या शेजारी थंडगार पाणीही उपलब्ध असते. प्रायव्हेट अथवा पब्लिक दोन्ही ठिकाणी या सोयी असतात. काही वेळा यातले गरम पाणी नळातून फिरवतात व हाॅटेल्स मध्ये सोय करतात. निसर्गाच्या सानिध्यात असल्याने मस्त वाटते. पाणी मात्र बऱ्यापैकी गरम असते. पूर्वी या जागा पुरूष व स्त्रिया एकत्र वापरत पण गेल्या काही वर्षांत प्रवासी वाढल्यावर दोघांसाठी वेगळी सोय असते. या सगळ्या ठिकाणी आत उतरताना बर्थ सूट मधे जावे हा संकेत आहे. हा रूल नसतां तर जास्त मजा आली असती. आपल्याला अजून इतर लोकांबरोबर असे वावरण्यात नक्कीच संकोच वाटतो. आमच्या रहाण्याच्या जागेत ही सोय होती म्हणून बरे. प्रायव्हसी आवश्यक तेवढी मिळाली. पूर्वी रोम मधे ही पब्लिक बाथ होते असे युरोप टूर मध्ये बघितले होते. जिथे व्होल्कॅनो जास्त त्या भागात हा प्रकार दिसतो. परवा फ्रेडरिक फोरसिथ चे लेटेस्ट पुस्तक वाचले त्यातही त्याने या अनुभवाचे बरेच वर्णन केले आहे आणि पूर्वरंग मध्येही यांचे विनोदी वर्णन आहे.  हा एक अनुभव सगळ्यांना वेगळाच वाटतो.

जपान मधे व्हेज लोकांना खायला मिळेल की नाही असा प्रश्न मला बऱ्याच लोकांनी विचारला. काळजीचे कारण नाही खूप प्रकार मिळतात. पदार्थ कसा दिसेल हे असे करून वरेच ठिकाणी मांडलेले असते. जपानी फूड मधे सुशी, टेंपुरा व वेगवेगळे नुडल्स ट्राय केले. चाॅपस्टीकही वापरल्या. सुशी मधे अमेरिकेपेक्षा वेगळ्या भाज्या होत्या. या पदार्थात मसाले अगदी कमी पण बरोबरच्या साॅस ने छान लागतात. सॅलड्स भरपूर व छान करतात. ड्रेसिंग माइल्ड पण टेस्टी होते.  आश्चर्य म्हणजे खूप इंडियन्स रेस्टाॅरंटस् आहेत. जास्त करून नेपाळी कुक होते. त्यांच्या पदार्थात पण मसाले, क्रीम कमी वापरून चवदार जेवण होते आणि दर वेळेला आम्ही एवढे दमून जेवायला जात असू की समोर आलेले गरम जेवण छानच वाटायचे. फळे पण छान मिळतात. बाकी बीन्स पेस्ट व तांदुळाची पिठी वापरून बरीच स्वीट्स बनवतात पण ती फार आवडली नाहीत. ब्रेड चे बरेच चांगले प्रकार मिळतात जे आमच्या टूर गाईडने ब्रेकफास्ट ला दिले. एका बेकरी ला ही व्हिजिट दिली. आणि सांके आवडणाऱ्यांची चंगळ होती. बाकी बसमधे प्रत्येकाने बरोबर आणलेले खाणे होतेच मधे  तोंडात टाकायला. बरोबर घरातला ग्रुप असल्याने गप्पा गाणी व खाणी हे बसमध्ये चालू असे. जपानी लोक खूप शांत असतात बाहेर वावरताना पण आम्ही आमच्यावर काही परिणाम होउ दिला नाही. गप्पा चालूच.

जपान मधील लोक एकदम चपळ वाटतात. जाड माणसे खूप कमी. समोरच्याच माणसाच्या वयाचा अंदाज सहास चुकतोच इतकी ती तरूण वाटतात , तसे म्हटले तर भात राइस नूडल्स व व्हीट नूडल्स भरपूर खातात. त्यांचे जीन्स वजन कमी वाढवतात असे आम्ही समाधान करून घेतले.. ट्रेन मध्ये ही मंडळी कमी बोलताना दिसली. रेल्वे स्टेशन म्हटले की आपल्याला आधी सगळे आवाज आठवतात इथे शांतता. कामाला जाताना काळे सूट घातलेली खूप मंडळी दिसली.  विमानात एअर होस्टेस बोलत नाहीत कुजबुजतात. स्वच्छता व शिस्त सगळे पाळताना दिसले. रेल्वे स्टेशन, देवळे बागा सगळे स्वच्छ. सुवेनिअर्स च्या दुकानात वस्तूवर एक छोटा कागद लावून सुंदर पॅकिंग करत. त्या कागदावर त्या जागेची चित्रे काढलेली असत. यांना छोट्या छोट्या गोष्टी भेट देण्याची व घेण्याची आवड. आम्ही पण काही भेटवस्तू नेल्या होत्या.  माझा वाढदिवस तिथे होता. तर आमच्या बरोबरच्या जपानी गाईड ने एक छोटी भेटवस्तू छान पॅक करून बरोबर  एक ओरिगामी चा नमुना करून दिला होता. मी पण येताना काही ओरिगामी डिझाइन्स व पेपर्स आणले आहेत बघू किती जमतय... एकंदरीने साधे व सुंदर असे सगळे प्रकार वाटले मग ते जेवण असो कपडे असोत वा घरे असोत. माझ्या इतर मित्रांचाही फिरताना हाच अनुभव होता अगदी मनापासून मदत करतात. अजून तरी फसवाफसवीचे अनुभव कमी येतात. या सगळ्यात आजच्या तरूण पिढीचा काय सहभाग असतो, जुन्या गोष्टीत त्यांना रस आहे का नाही याचा अंदाज आला नाही. 

जपानी लोकांनी आधुनिकते बरोबर जुन्या गोष्टी पण खूप जपल्या आहेत. आणि टूरिझम वाढवला आहे. नेहेमीप्रमाणे मनात विचार आलाच की आपल्या देशात हे का नाही होउ शकत.... इतकी सुंदर देवळे, निसर्गसुंदर ठिकाणे आहेत त्याची जगात फारच थोड्या लोकांना माहिती आहे. जगात कशाला देशात ही परिस्थिती अशूच आहे. थोडी स्वच्छता वाढवली,  सोई उपलब्ध केल्या व फसवेगिरी कमी केले तर हे नक्की जमेल. 

एकंदरीने या ट्रीपमध्ये भरपूर जपान पाहिला तरी काही पहायचे गेले राहून असेही वाटले. टोयोटा शो रूम, कात्सुरा गार्डन, माउंट फुजी जवळून, ओसाका चा किल्ला इ... थोडे वेगळे प्लॅनिंग असते तर ते शक्यही होते. पण ग्रुप मध्ये आणि दुसऱ्याने प्लान केले की थोडे हे होणारच. जे पाहिले ते खूप होते. शांत स्वच्छ व नयनरम्य.......
आमच्या ट्रीप चे नाव सरप्राईजिंग जपान असे होते आणि ते नाव सार्थ ठरले. Green, Clean and Serene अशी नवीन ओळख जपानची झाली. 






Thursday, September 7, 2017

दोन दिवसात राॅकी माउंटन पार्क...



पूर्वी  असे टुरिझम च्या पुस्तकात वाचले की हसायला यायचे. पण खरेच जर नीट प्लान केले तर खूप गोष्टी तुम्ही दोन दिवसात करू शकता.  आमच्या बरोबर एक माहितगार  फॅमिली मेंबर असल्याने आमचा खूप फायदा झाला. त्याने खूप ट्रेक्स वेगवेगळ्या वेळी इथे केले आहेत. पार्क ची वेबसाईट खूप माहितीपूर्ण आहे.    त्या वरून आपल्याला काय बघायचे हे ठरवता येते.

आमची ही व्हिजिट हायकिंग साठी होती. यापूर्वी कोलोरॅडो स्प्रिंग्ज, अेअर फोर्स म्युझियम, गाॅर्ज, गार्डन आॅफ द गाॅड्स, पाईक्स पीक, डेन्व्हर सिटी हाॅल व अॅंम्फीथिएट , ट्रेल रीज रोड व ग्रॅंड लेक तसेच काॅन्टीनेंन्टल डिव्हाईड बघून झाले होते.

अमेरिकेतच नॅशनल पार्क्स ही सगळ्यांसाठी मोठी भेट आहे. हे




पार्क विमानतळापासून दीड एक तासावर आहे. सकाळी जर पोचलो तर पूर्ण दिवस मिळतो. रहायचे ठिकाण शक्यतोवर पार्क च्या अगदी जवळ शोधले तर खूप वेळ वाचेल. भरपूर आॅप्शन्स आहेत नेटवर. जाताना गाडीत पाणी व भरपूर स्नॅक्स ठेवा. सकाळी एक ट्रेक करून मग चेक इन करता येते साधारण ३ वाजता.

आम्ही पहिल्या दिवशी चार लेक्स चा लूप केला. बेअर लेक ट्रेल हेड शी शटल घेउन जाणे सोईच. पार्किंग लगेच भरते. साधारण ९४७५ फूट ते १०२४० फूटावर आपण जातो. साधारण १००० फूट उंची  ६ मैल अंतरात आपण जातो. लगेच मनातल्या मनात सिंहगड शी तुलना झाली. त्यापेक्षा आपण कमी चढतो फरक इतकाच की हा हाय अल्टिट्यूड ट्रेक आहे. वाटेत भरपूर झाडी व उत्साही हायकर्स दिसत होते. लहान मोठे सगळे एकदम टिपटाॅप वेषात चढत होते.
निंफ लेक ला पहिला स्टाॅप घेतला. यात पिवळ्या पाॅंड लिलीज दिसल्या. या फक्त हाय अल्टिट्यूड वरच येतात. वाटेत भरपूर झाडी,अधूनमधून वेगवेगळे डोंगरमाथे दिसत होते. अतिशय फ्रेश हवा, मजा आली.
साधारण अर्ध्या पाउंड तासावर एक लेक लागते.

त्यानंतर ड्रीमलेक ला थांबलो. वाटेत भरपूर वाइल्ड फ्लाॅवर्स डोळे खुश करत होती.

यानंतर एमराल्ड लेक हे सुंदर सबअल्पाईन लेक आहे. नावाप्रमाणेच याचा रंग आहे. काही लोकांना इथे हाईट चा त्रास होतो पण आम्हाला फार जाणवला नाही. याच्या बॅकग्राउंड ला मस्त डोंगर आहेत.

शेवटी बेअर लेक हे ट्रेत हेड जवळ आहे. अजून एक मैल गेले तर अल्व्रटा फाॆल आहे.

काही महत्त्वाच्या टिप्स ... माउंटन मध्ये गार व गरम दोन्ही हवा असते, त्यानुसार जॅकेट टोपी गाॅगल्स सन स्क्रीन , आणि हो जाड सोलचे शूज मस्ट. वाटेत बरेच दगड आहेत म्हणून चांगले शूज हवेत.  पाणी भरपूर प्यायचे आणि हाय कार्ब वाटले स्नॅक्स जवळ ठेवायचे. शक्यतोवर लवकर ट्रेक चालू करायचा , थोडे उन वाचते. वाटेत फोटो साठी खूप वेळा आपण थांबतो. एवढ्या तयारीनंतर आपण हाय अल्टिट्यूडवर आहोत हे विसरतो.

संध्याकाळी फ्रेश होउन रेंजर चा अॅस्ट्राॅनाॅमी इन द पार्क प्रोग्रॅम अटेंड केला. खूप उत्साही मंडळी कुडकुडत आली होती. खूप दुर्बिणी सेट केल्या होत्या. शनि व त्याची कडी, गुरू व त्याचे चार चंद्र मस्त दिसले. आकाशगंगेचे पण दर्शन झाले. थोडे आभाळ असल्याने आकाशभर चांदण्या मात्र दिसल्या नाहीत. लहान व मोठ्याना हा एक चांगला अनुभव होता.

जाता येतां वाटेत थोडे वाईल्ड लाईफ दिसले. त्यासाठी पहाटेची किंवा तिन्हीसांजेची वेळ योग्य. तुम्ही जर खूप दमला नसाल तर सनसेट बरोबर हे करता येते.

एस्टेस पार्क मधे खूप रेस्टॅरंटस आहेत. जेवून किंवा पार्सल घेउन हाॅटेलवर जाता येईल. केबिन मधे राहिल्या कुकिंग ची सगळी सोय आहे.

दुसरे दिवशी लवकर वाॅटरफाॅल हाइक साठी निघालो. हे ट्रेल हे दूर असल्याने लवकर निघालेले चांगले. सुरूवातीला थोडी थंडी वाजली पण नंतर फारच छान झाडीतला रस्ता होता. एकदम रेिफ्रेशिंग. या ट्रेल वर सतत एका बाजूला पाणी असल्याने मजा येते. ५.४ मंगलाचा आमचा पल्ला होता.
Calypso Cascade .. उंची फार नाही पण भरपूर पाणी. बाजूला सतत अस्पेन ची सळसळ व पाईन्स साथीदार. वाईल्ड फ्लाॅवर्स भरपूर.

copeland falls upper ani lower. हा एकदम जोरदार धबधबा होता. आॅगस्ट सप्टेंबर वाईल्ड मशरूम्स खूप दिसले. ते विषारी असतात पण रंग फार सुंदर. लाल पिवळा तपकिरी केशरी राखी खूप मस्त होते.. टराविक गारवा न मिळाल्यानंे बरीच वाईन ची झाडे जुळली होती. किती गोष्टी हवेवर अवलंबून असतात. 

मध्येच एक निनावी धबधबा लागला....मला हा जास्त आवडला. सगळ्यात शेवटी ओझूल फाॆल लागतो. त्यापूर्वी जरा चढण आहे दमवणारी, पण नंतरचे रूप ते विसरायला लावत होते. अजून थोडे वर गेल्य़ास जास्त चांगला व्ह्यू दिसतो.ओझूल हे राखी रंगाचे पक्षी असतात.

संध्याकाळी व्हिजिटर सेंटर ला फिल्म बघून पुढे ट्रेल रोज रोड, बरेच व्ह्यू पाॅईंटस बघितले. अल्पाईन व्हिजिटर सेंटर  हून परंतु फिरलो. काॅंटिनेंटल डिव्हाईड कॅनडा ते मेक्सिको जातो तोंही पाहिला. य़ा डोगराची रचना कौलासारखी असते.एका बाजूचे पाणी पॆसिफिक सागरात तर दुसरीकडते अॆटलांटिक मध्य़े जाते. सॆध्य़ाकाळी येताना थोडे वाईल्ड लाईफ दिसले. या सगळ्या ट्रीप मध्ये सतत माहिती आमच्या भाच्याने पुरवली म्हणूनच आम्ही एवढ्या गोष्टी पाहू शकलो. रेंजर प्रोग्रॅम ची माहिती व्हिजिटर  सेंटर वर मिळते.









निसर्ग हा मोठा गुरू आहे हे पुन्हा एकदा अनुभवले.  धबधबे, लेक्स, फुले, टॆड्रा वनस्पती, वाइल्ड लाईफ, सूर्यास्त, रात्रीचे आकाश, आकाशगॆगा, उॆच शिखरे ..... अनॆत हस्ते कमलावराने ..... खरेच आहे



Friday, March 17, 2017

पुराणातील देव देवता ....एक सफर

मी काही फार देवदेव करणारी नाही पण त्या एका शक्तीवर विश्वास जरूर आहे. या साऱ्या विश्वाचा पसारा पाहिला की आपण त्या शक्तीला नक्कीच मानतो.

लहानपणापासून अनेक देव देवता आपल्याला भेटतात काही घरात, काही गावात तर काही पुस्तकात. आपण अनेक गोष्टी ऐकत आपली मते बनवतो.जसे आपण मोठे होतो तसे काय खरे काय खोटे याचा आपण विचार करायला लागतो. हल्लीच देवदत्त पटनाईक यांची काही पुस्तके आणि भाषणे ऐकली व काही गोष्टींचे संदर्भ लागत गेले.  सध्या त्यांच्या चालू असलेल्या फेसबुक वरच्या कार्यक्रमावर आधारित......

वेदात वर्णन केलेले देव हे जास्त निसर्गातले होते त्या नंतर सामान्य लोकांपर्यंत ज्ञान पोचवण्यासाठी पुराणे व इतर गोष्टींची निर्मिती झाली. तेव्हा अनेक प्रथा पद्धति व चिन्हे ...सिंबाॅल्स ची कल्पना उदयाला आली व या गोष्टी पिढी दर पिढी आजपर्यंत पोचल्या.वेदातले ज्ञान हे पाठांतराने एका पिढीतून दुसरीकडे जात होते. छंद मात्रा यात ते गायले जात असे. नंकर पुराणांचे लेखन झाले त्यानंतर काही वर्षांनी कॅलेंडर आर्ट निघाली. एक चित्र अनेक शब्दांचे प्रतिक असते आणि सामान्य माणसापर्यंत पोचते म्हणून भित्तीचित्रे देवळातील मूर्ती यांचा उदय झाला. नंतर कॅलेंडर व त्यावरील देवदेवतांची चित्रे सर्व जातीधर्मांच्या घरात पोचली.

हिंदू धर्मात एवढे देव आहेत.प्रत्येक देव हा एक विचार असतो. अनेक विचारांनी मिळून बनलेली ही समृद्ध परंपरा आहे. स्थल, कालानुसार यात बदल होतात. म्हणून एक देव विविध रूपात दिसत.

गाया मदर गाॅड मातृ देवता ही कल्पना सगळ्या कल्चर मध्ये आहे. आई ही जन्म देते म्हणून तिला जास्त महत्व दिले जाते. पृथ्वी ला माता म्हणून खूप संस्कृती मानतात. आकाश हे पिता स्वरूपात बधितले जाते. वेदात निसर्गाला खूप महत्व दिले आहे. सुरूवातीला भूमाता मग अनेक देवांची उत्पत्ती, त्यानंतर पुन्हा एक ईश्वर वाद असे साधारण चक्र आहे. इतर धर्मा मध्ये स्त्री देवता फार कमी दिसतात. हिंदू धर्मात बऱ्याच रूपात पूजल्या जातात. सप्तमातृका या पाषाणयुगाच्या आधीपासून सापडतात. पुराणात आणि वेगवेगळ्या काळात वेगळ्या आख्यायिका सापडतात. कधी त्या देवाचे शक्तीरूप म्हणून समोर येतात तर कधी देवांच्या मदतनीस म्हणून. नेहेमी समूहात असतात आणि रक्षणकर्त्या रूपात दिसतात. प्रत्येकीचे वाहन असते. गाया किंवा देवीरूपाबद्दल ही बरेच विचार आहेत. सुरूवातीला आदि मायेपासून सृष्टीची निर्मितीझाली असा एक विचार आहे. त्या नंतर जेव्हा मनुष्य कळप करून राहू लागला तेव्हा स्त्रीला जास्त महत्व देत असत कारण तिच्यात प्रजननाची क्षमता होती. नंतर हळूहळू हे महत्व कमी झाले.  स्वतंत्र व्यक्तिमत्व दाखवणाऱ्या या देवीची रूपे असतात. स्त्री व पुरूष यांना समान व मानाने वागवले जावे.

देवी  देवी म्हणजे प्रकृती निसर्ग.  निसर्गातून सगळ्याची निर्मिती होते.  निसर्गावर आपले नियंत्रण नसते. पुरूष रूपी मन असते आणि देवी म्हणजे निसर्ग. पुराणात त्याला स्त्री रूपात दाखवले आहे.  आदि शक्ती म्हणजे निसर्ग म्हणजेच देवी. भाग्य आणि ईच्छा किंवा काम आणि कर्म या दोन गोष्टीवर आपली समाजरचना झाली आहे. काही गोष्टी आपल्या हातात नसतात आपण त्या बदलू शकत नाही ते भाग्य किंवा कर्म आणि आपल्या मनाप्रमाणे जे करतो ते काम. विष्णू रूप हे प्रवृत्ती दाखवते तर शिव रूप हे निवृत्ती दाखवते. मनुष्याच्या आधी व नंतर निसर्ग असतो आपण त्याला आपल्या इच्छेने बदलू शकत नाही. त्यामुळे देवीला महत्व आहे.

सरस्वती ..  ही देवी शाळेत सगळ्यांना भेटतेच. पाटीपूजन करून या विद्येच्या देवीला आपण पूजतो.  या कुंदे.....या
श्लोकात सुंदर वर्णन केले आहे. ही विद्येची देवता मानली जाते. शुभ्र वस्त्र तिचे बाकी मोहमायेतले वैराग्य दाखवते. ती हंसावर बसलेली असते. हंस हा नीर क्षीर विवेकासाठी प्रसिद्ध आहे. त्याच्या पंखाला पाणी चिकटत नाही. अलिप्तता यातून दिसते.तिच्या हातात वीणा आहे. कवि लोक जे कल्पनेच्या साम्राज्यात वावरतात त्यांची ही देवी आहे. सृजनशीलता , ज्ञान हे सगळे बुद्धी व कल्पनेच्या जोरावर मिळते म्हणून या देवीचे महत्व.

दुर्गा  ही देवी सांगते सर्व भितीच्या अमलाखाली असतात. दुर्ग म्हणजे किल्ला जो रक्षण करतो. महिषासुर राक्षसाला या देवीने मारले. हा राक्षस सर्व देवांना त्रास देत होता तेव्हा देवांच्या आंतरिक शक्तीतून जे तेज एकवटले त्यातून या देवीचा जन्म झला. सगऴेराजा या देवीची पूजा करतात. वेगवेगळी वाहने दिसतात. कधी वाघ तर कधीसिंह. कधी व्हेज तरकधी बळी दिला जातो. माणसाला एक आंतरिक शक्ती व एक बाह्य शक्ती मदत करतात.  बाह्य शक्ती ही शस्त्रे सत्ता यातून मिळते.

काली  कालीचे रूप भयंकर असते. काळा रंग, वस्त्रे नाहीत, गऴ्यात रूंड माळा रक्त पिणारी. काली ही मातेच्या रूपात पूजली जाते. मनुष्य जेव्ह पशूसारखा व्यवहार करतो तेव्हा काली जन्म घेते. संहार होतो. सीता द्रौपदीवर अन्याय झाला तेव्हा त्या पण आपले रूप बदलतात.  निसर्गावर कोणी सत्ता गाजबू शकत नाही हे काली सांगते.

गौरी  सस्कृती माणसाच्या दृष्टीकोनावर अवलंबून असते.  प्रकृतीत कमतरता आहे म्हणून मनुष्य नीती नियम बनवतो. गौरी श्वेतवर्ण फुलांनी सजलेली, दागिने घातलेली असते. गौरी ही कन्येच्या रूपात पूजली जाते. देवी पूजनात नेहमी कन्या पूजन केले जाते. सभ्यता असेल तेथे गौरी वास करते व असभ्यता आली की कालीचा प्रभाव येतो.

गणपति ही महाराष्ट्राची ईष्टदेवता. सुखकर्ता दुखहर्ता अशी याची महती. लंबउदर हे संपन्नतेचे लक्षण मानतात. पूर्वी
धान्याची कमतरता होती तेव्हा भूक मिटवणे यासाठी पूजन केले जाते. वाहन उंदीर आणि कमरेला साप हे परस्यर विरोधी आहेत. ते एकत्र नांदतात जेव्हा भूक हा प्रश्न नाही.  हत्तीचे मुख सामर्थ्य दाखवते, या सगळ्या गोष्टींची कामना आपण गणपती पूजनात करतो. प्रत्येक चित्रातून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

मुरूगन
 हा गणपतिचा भाउ. हातात शस्त्र आणि तेजस्वी. भिती चा सामना करा असे तो सुचवतो.  हा उत्तरेत वेगळ्या रूपात तर दक्षिणेत वेगळ्या रूपात दिसतो. अनेक लोककथा व पुराणातील कथा त्याची महती सांगतात. दक्षिणेत त्याला दोन बायका तर उत्तरेत अविवाहित. त्याच्यासाठी हिमालय व गंगा काही प्रमाणात दक्षिणेत आणली म्हणून दक्षिण काशी व दक्षिण गंगा अशी नावे पडली असे सांगतात. देव हे वेग ळ्या काळात वेगळ्या रूपात बघितले जातात. सहा आया त्यालाआहेत ज्यात अग्नि व वायू यांचाही सामावेश आहे. देवांचा सेनापती मानला जातो. बायकांना या देवळात जाण्याचीबहुतेक ठिकाणी बंदी असते.


कलकी  आता कलियुग चालू आहे व कली अवतार घेउन जग नष्ट करणार अशी कल्पना आपण ऐकतो. हा घोड्यावर
पांढरे कपडे घालून येतो. आपल्या धर्मात प्रत्येक गोष्ट जन्माला येते व अंत पावते व परत जन्माला येते ही कत्पना आहे.


Saturday, January 28, 2017

खजुराहो एक शिल्पप्रवास

emblem

     





या वर्षी मध्यप्रदेशातील कान्हा, जबलपूर व खजुराहो या ठिकाणांना भेट दिली.

कान्हा... जंगल सुरेख. स्वच्छता वाखाणण्याजोगी.. गाईड उत्तम.. वाघाचे दर्शन झाले. सकाळच्या वेळचे जंगल फार सुंदर दिसले.जबलपूर ला धुवांधार धबधबा, ६४ योगिनी देउळ व भेडा घाट ला भेट दिली. भेडा घाट ला नर्मदेचे दर्शन झाले. दोन्ही बाजूला संगमरवरी कपारीतून बोट राईड घेतली.



म प्रदेशात रस्ते अतिशय खराब. तेवढीच माणसे बोलायला छान. आदरातिथ्य उत्तम. अधेमधे फार कमी गावे लागतात. माणसे जरा मागास वाटली. हाॅटेल बुकिंग करताना शक्यतो मध्य प्रदेश टूरीझम ची करावीत.

खजुराहो थोडेसे बाजूला आहे. आम्ही जबलपूरहून गेलो. शेवटचे ५० मैल खड्डयांचाच रस्ता आहे. इथे एवढा टूरिझम आहे तर सरकारने लक्ष घालून रस्ते सुधारायला हवेत. खजुराहोला १० व्या शतकातील २०-२२ देवळे आहेत. बरीच सुस्थितीत आहेत. चंडेल राजांच्या राजवटीत ही देवळे बांधली गेली. जवळच पन्ना येथील खाणीतला दगड वापरला आहे. साधारणपणे लढाईत विजय मिळाला की नवीन देउळ बांधले गेले. अशी ८५ देवळे होती असे म्हणतात. कालांतराने ही देवळे झाडीत झाकली गेली व नजरेआड गेली. या भागात विशेष काही पिकत नाही म्हणून पण शत्रू फार फिरकला नाही.तो जमाना डिजिटल नव्हता. टी व्ही सेल फोन सिनेमा अजून अस्तित्वात नव्हते. अशा वेळेस आपल्या राजेरजवाड्यांनी कलाकारांना आसरा देउन संस्कृती संवर्धनाचे मोठे काम केले आहे. यात शिल्पकारांचे योगदान फार मोठे आहे. त्यांनी जे देवळे सजवण्याचे काम केले आहे त्यामुळे आपण भूतकाळात डोकावून बघू शकतो आणि आपल्या पूर्वजांच्या रहाणी विषयी काही आडाखे बांधू शकतो.

एखादी लढाई जिंकली की त्या विजयाचे प्रतिक म्हणून विजयस्तंभ अथवा मंदिर बांधलेले दिसून येते.  १०००-१२०० वर्षापूर्वीची मंदिरे आजही चांगल्या स्थितीत पहायला मिळतात. चंडेल राजांच्या कारकिर्दीत खजुराहोची मंदिरे बांधली गेली. खजुराहो म्हणजे मिथुन शिल्पे असा आपला एक समज असतो. पण प्रत्यक्षात १० % शिल्पे अशा प्रकारची आहेत. रात्री  लाइट साउंड शो होता. साधारण पार्श्वभूमी कळण्यास उपयोग होतो.
   चांदण्या  रात्री  कार्यक्रम पाहिल्यास देवळे फार सुंदर दिसतात. 
 असे म्हणतात की खजुराहोत ८५ देवळे बांधली  होती त्यातील २०-२२ आता दिसतात. ही देवळे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज च्या  अधिकारात असल्याने चांगल्या स्थितीत रहातील अशी आशा. तीन भागात ही देवळे विभागली आहेत. आर्किलाॅजिकल सर्व्हे तर्फे गाईडस् मिळतात अथवा आॅडिओ गाईड बुक्स आहेत. आम्ही गाईड घेतला....प्रश्न विचारता येतात.सर्वात प्रथम लक्ष्मण मंदिर पाहिले....इथे लक्ष्मणाचे देउळ कसे असे वाटत होते तेव्हा कळले की ते लक्ष्मण वर्मन याने बांधले आहे. हे देउळ बरेच सुस्थितीत आहे . सगळी देवळे मोठ्या चौथऱ्यावर आहेत. इथली देवळे नागर शैलीतली आहेत. पंचायतन पद्धतीने मेन देव मधे व बाजूला चार दिशाला चार छोटी देवळे आहेत. 
मंदिराच्या बाहेरच्या बाजूला भरपूर शिल्पे आहेत. बाहेर युद्धातील देखावे, लग्नाचा देखावा, वाद्यवृंद इत्यादी शिल्पे आहेत. देवळाच्या बाहेरच्या भिंतीवर चार प्रकारची शिल्पे आढळतात. सुरसुंदरी .. कुणी पायातला काटा काढते, कुणी सिंदूर लावते तर कुणी आरशात पहाते. त्रिभंग प्रकारातील बरीच शिल्पे आहेत. चेहऱ्यावर हावभाव सुंदर. मूर्तीना बाक दिल्याने सैंदर्यात भर पडली आहे. या शिल्पामध्ये एक प्रकारची लय आहे असे 
Laxman Temple
वाटते.  मदतनीस छोट्या आकारात दिसतात. तो त्यांचे स्टेटस दाखवण्यासाठी म्हणे...... केशरचनेचे वेषभूषेचे अनेक प्रकार दिसतात. साध्या दगडातून इतकी सुंदर शिल्पे वेगवेगळे भाव दाखवतात. त्या शिल्पकारांचे कौतुक करावे तेवढे थोड...नाव मात्र राजाचे होते . नाही म्हणायला शिल्पकारांसाठी म्हणून एक शिल्प इथे केले आहे.देवदेवतांची अनेक शिल्पे आहेत.  एका विचित्र प्राण्याचे शिल्प सगळीकडे दिसते"..आपल्या मनातले चांगले व वाईट याचे द्वंद्व दाखवले आहे. या सगळ्याबरोबर सेक्स दाखवणारी बरीच शिल्पे आहेत. तांत्रिक विद्या मानणाऱ्या लोकांचा प्रभाव या मंदिरांवर आहे असे म्हणतात तर काही लोकांच्या मते धर्म अर्थ काम मोक्ष अशा चार पायऱ्या ही शिल्पे दाखवतात. पूर्वी माझा असा समज होता की अशी शिल्पे फक्त खजुराहोतच आहेत पण ती अनेक मंदिरात दिसतात इतकी चांगल्या स्थितित नसली तरी...मग खजुराहो एवढ्या चर्चेत का?
या मंदिरात कुठेही सिमेंट वापरलेले नाही जोड काम इंटरलाॅक पद्धतीने सगळे दगड बसवले आहेत.हे अतिशय कौशल्याचे काम आहे. इथून जवळच असलेल्या पन्ना मधील खाणीतून सगळा सॅंडस्टोन वापरला आहे. आजही तिथे उत्तम प्रतीचा दगड मिळतो आहे. काही ठिकाणी रिलीफ शिल्पे दिसतात, म्हणजे दगडाना उउठावदेउन काम केले आहे. 

Kandaria Mahadeo front view
या नंतर कंडारिया महादेव हे सर्वात मोठे मंदिर आहे. या च्या प्रवेशद्वारावर सुंदर तोरण कोरलेले आहे ज्यावर यक्ष किन्नर व गांधर्व दिसतात. ते नेहमी अधांतरी दाखवतात. कंडारिआ म्हणजे गुहेत रहाणारा .या मंदिरावर पुन्हा तोच पॅटर्न दिसतो मूर्तींचा पण जास्त सुबक व मोठा आकार आहे. ८०० च्या हून जास्त शिल्पे या एका मंदिरात आहेत. ती बनवायला किती दिवस व कष्ट लागले असतील .आधी सगळे कोरीव काम होउन मग तेमंदिर नकाशाबरहुकुम बांधले गेले असे गाईड ने सांगितले. महादेव मंदिर पुढुन बघितले तर एकावर एक सात शिखरे दिसतात. हे सर्वात भव्य मंदिर विद्याधर राजाने बांधले आहे. महंमद गझनी ला हरवून आणि शेवटी तह करून ही जागा वाचवली होती. त्या विजया नंतर या देवळाची निर्मिती झाली. याच्या शिखरावर ८४ छोटी शिखरे दिसतात. ८४ लक्ष योनी नंतर मोक्ष प्राप्त होतो ही कल्पना मांडली आहे. कैलास पर्वत डोळ्यापुढे ठेवून ही रचना केली आहे. हळू हळू चढत जाणारी रचना देवळाला भव्यता प्राप्त करून देते.


बाहेरील भागात सप्तमात्रृका वाहनाबरोबर दिसतात. अग्नि व स्वाहा हे ही बघायला मिळतात. अग्नि ला अर्पण करताना जे स्वाहा म्हणतो तीच ही देवता. 

त्या नंतर जगदंबी , चित्रगुप्त व विश्वनाथ मंदिरे पाहून बाहेर असलेले ११ फुट शिवलिंगाचे मंदिर पाहिले. हे सर्वासाठी खुले आहे व पूजा होते. बाकी आतील मंदिरात गाभाऱ्यात मूर्ती आहेत पण पूजा होत नाही. 
काही अंतरावर असलेले चतुर्भुज मंदिर दुसऱ्या दिवशी सकाळी बघितले. शिवाचा मुकुट, बु्द्धाचा चेहरा, विष्णूचे अंग व कृष्णाची बासरी ची पोज असे या मूर्तीचे वर्णन करतात. या मंदिरावर मिथुन शिल्पे नाहीत. कुठे न दिसणारे नरसिंहीणी चे शिल्प आहे. गंगा यमुना हे शिल्प ही दिसते.

 शिल्पकडेदोनवेगळ्या  पाहिल्यास वेगळे भाव दिसतात. 
  केस पुसत आहे आणि तिच्या केसातले पाण्याचे थेंब पाहून एक हंस फसला आहे व मोती म्हणून त्याकडे बघत आहे. असे अनेक बारकावे या शिल्पात आहेत व गाईडस ते सगळे दाखवतात. 

अजून एक गंमत म्हणजे गाईड आरशाचा तुकडा घेउन उन्हाचा फायदा घेउन कवडसे पाडून बारकावे दाखवतात.
देवळाच्या अलिकडे वराह टेंपल आहे. एका दगडातून कोरलेले वराह अवताराचे शिल्प आहे. हात लावून लावून दगड गुळगुळीत होऊन मेटल चा वाटतो. त्याच्या मुखात वीणावादन करणारी सरस्वती तर दोन्हीबाजूला मिळून नवग्रहांच्या प्रतिमा आहेत. ३३ कोटी देवांचे प्रतिनिधी म्हणून ३३३ छोट्या सुबक प्रतिमा काढल्या आहेत. अगदी छोटे असले तरी शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे हे देउळ म्हणजे.या सगळ्या मंदिरात दशावतार भेटत रहातात.



















चित्रगुप्त मंदिरात सूर्याचे रथामधले शिल्प तसेच १० मुखी विष्णू चे चित्र आहे. ही विशेष कुठे न दिसणारी शिल्पे आहेत.

या मंदिराची कामसूत्र टेंपल अशी जाहिरात न करता जास्त लोकांनी भेट दिली पाहिजे.

या देवळांनी बरीच माहिती पुराणतील गोष्टी व अप्रतिम कारागिरी दाखवली हे नक्की.






war scene


vadyavrunda



Sundar toran eka dagdatun 


sanskrut shilalekh


Chaturbhuj Mandir

chaturbhuj Mandir Murti
sculptures in three layers

Outer side carvings
Shilpkaransathi shilp

temple recently found in outskirts







Tuesday, August 4, 2015

ओरेगॉन एक सुंदर प्रवास



या वर्षी समर मधे ओरेगॉन  या राज्यात प्रवासाला जायचे ठरवले. स्प्रिंग मध्ये तिथे थोडे थंड व पाऊस असतो. ओरेगॉन  राज्यात क्रेटर लेक, माउंट हूड, धबधबे, लेक्स, समुद्र किनारे, वालुकामय प्रदेश अशी निसर्गाची भरपूर रूपे बघता येतात. हा भाग हायकर्स व फोटोग्राफर्स यांच्यात जास्त प्रसिद्ध आहे.

आम्ही ६ दिवसात ९०० मैलाचा एक राउंड केला व बरीच ठिकाणे पाहिली. रस्ते अतिशय सुंदर, एकही पॉटहोल लागले नाही. अगदी छोट्या गावात वा रिमोट जागेतही सुंदर रस्ते आहेत. पोर्टलॅंड हून अनेक डे ट्रीप्स करता येतात.  आपल्या आवडीप्रमाणे ठिकाणे निवडू शकतो. क्रेटर लेक अगदी साउथ ला व जरा रीमोट आहे.




दिवस१ - पोर्टलँड सिटी -- विमानातून माउंट हूड चे मस्त दर्शन झाले. हा माउंटन पहिले २-३ दिवस बाहेर पडले की सतत दिसत हेता. पहिल्या दिवशी वॉशिंग्टन गार्डन पाहिली. खूप मोठी आहे. आम्ही फक्त जापनीज गार्डन व रोज गार्डन पाहिली. गाईड बरोबर एक टूर केली.  इथली ट्रिम केलेली झाडे जनरली असिमेट्रिक असतात. पूल, छोटा तलाव, मासे, धबधबा.  झेन गार्डन(वाळू चा वापर) व टी हाउसेस ही एलिमेंटस जापानीज गार्डन मध्ये दिसतात. रिसायकल मटेरिअल जसे जुन्या फरशा विटा ही वापरण्याची पद्धत आहे. इथे एक जपान मधे बनवलले टी हाउस आहे.  बागेबाहेर अशुभ गोष्टी दूर रहाव्या म्हणून एक चिन्ह लावलेले असते.  एका दगडावर हायकू कोरलेले आहे. स्प्रिंग मध्ये गेलात तर चेरी ब्लाँसम बघता येतो.


















रोज गार्डन ही छान होती. अनेक गुलाबाच्या जाती लावून  इथेत्याचे टेस्टींग केले जाते. जुन जुलै मध्ये जास्त फुले बघायला मिळतात.
रात्री ४ जुलै चे फायरवर्कस रिव्हर फ्रंट वर पाहिले. खूप लोक जमून मजा करत होते, एक प्रकारची जत्राच होती. लहान बाळांपासून ते आजी आजोबांपर्यंत सगळे पार्टी मूड मध्ये होते.

दिवस - २ - पोर्टलँड ते हूड रिव्हर ...  अतिशय सिनिक रस्ता आहे. जाताना हायवे घेतला व परत येताना जुना कोलंबिया हाय वे घेतला. साधारण ६५ मैल वन वे. वाटेत मल्टनोमा वॉटरफॉल पाहिला. हा टिअर टाईप आहे. म्हणजे टप्पे घेत खाली येतो. ६५० फूट आहे. या हाय वे वर ७०-८० मैलात ९० च्या आसपास धबधबे आहेत. रस्त्यावरून दिसणारे थोडेच, बाकी बघायला १-६ मैल हायकिंग करावे लागते.  हाईक्स छान आहेत, वाटेत भरपूर झाडी असल्याने बाहेर ९० टेंपरेचर असले तरी आत गारवा होता. आम्ही हॉर्स टेल, पोनी टेल, वकीनाका इथे मस्त हायकिंग ची मजा घेत धबधबे पाहिले.





 पोनीटेल किंवा अप्पर फॉल ला तुम्ही फॉल च्या मागे जाउ शकता.  हा प्रकार फार मस्त आहे. मल्टनोमाला पण वर जाता येते. पोनी टेल हा प्लंज टाइप वाॅटरफाॅल आहे, म्हणजे डायरेक्ट उडी घेउन खाली येतो. आपल्या खंडाळ्याच्या घाटाची आठवण झाली, फरक एवढाच की ते धबधबे फक्त पावसाळ्यात दिसतात तर हे बारमाही.  सगळीकडे भरपूर गर्दी होती. अगदी म्हातारे पण तरूणांना लाजवतील असे डोंगर चढत होते.



जाताना मेन हाय वे वर बोनव्हील धरण आहे. कोलंविया रिव्हर ला काबूत ठेवण्यासाठी अनेक धरणे बांधली आहेत.
त्यापैकी हे एक. तेथे फिश हॅचरी व फिश लॅडर पाहिले. सालमन व इतर मासे पाण्याच्या प्रवाहा च्या उलट दिशेने येतात ते बघायला गंमत वाटते. त्यासाठी पाण्यखाली शिड्या केल्या आहेत. इथे या माशांची मोठ्या प्रमाणावर पैदास होते.व त्याचा
जगभर व्यापार होतो.  सालमन जातीचे मासे इथून थेट अलास्का पर्यंत जातात व परत येतात, कसा काय रस्ता लक्षात ठेवतात देव जाणे. माशांचा उपयोगात नसलेला भाग कापून त्यांना सोडतात, असे मासे सापडले तर ते हॅचरी चे आहेत असे समजतात . या माशांचे वय ३ वर्षे असते. अंडी घातली की ते मरतात. ही माहिती देण्यास तिथे बरीच लोक होती. एकंदरीत बराच अभ्यास व रिसर्च करून हा सगळा बिझिनेस केला जातो. तास दीड तासाचा हा स्टॉप नक्कीच घेण्यामारखा.

नंतर हूड रिव्हर हे छोटे पण टुमदार गाव लागले. नदीवर काईटफ्लाईंग व इतर वॉटर गेम्स फेमस. आम्हाला फ्रूट लूप मधे इंटरेस्ट होता. थोडी शोधाशोध करावी लागली. आधीच नकाशा बरोबर ठेवला तर सोपे जाते. गावाबाहेर अनेक एकरात फ्रूटस ची प्रचंड लागवड आहे. सिझन प्रमाणे चेरी, सफरचंद, पेअर, पीच,स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, ब्लेकबेरी यांची लागवड होते. झाडे फळांनी एवढी लगडलेली होती की बस... इथली हवा व माती या फळझाडांना पोषक आहे. पीचेस, व चेरीज खरेदी करून निघालो फ्रेश फ्रॉम द फार्म..
परत पोर्टलेंडला जाताना २ वॉटरफॉल्स पाहून हॉटेलवर गेलो. वाटेत व्हिस्टा पॉईंटवरचा सूर्यास्त बघण्यासारखा.
दिवस २ - पोर्टलँड ते माउंट हूड ते बेंड -  सकाळी लवकर निघालो. माऊंट हूड ला जाण्यासाठी २६ ईस्ट हा सिनिक रूट घेतला. दोन्ही बाजूला हिरव्या ऊंच झाडांच्या भिंती सोबतीला होत्या. सुरूवातीला माऊंट हूड अधून मधून दर्शन देत होता.  वाटेत रॉक्स व हरणापासून सावध अशा पाट्या होत्या तसेच स्नो पार्क व चेन अपलोड असेही बोर्ड दिसले. रस्ते इतके स्मूथ आहेत की थंडीत टायर वर चेन कव्हर लावून जावे लागते हे नव्याने कळले तसेच स्नो मधे घाटात गाडी पार्क करण्यासाठी स्नो पार्क ही पाटी सारखी दिसत होती. या स्टेट मध्ये आपण आपल्या गाडीत गॅस भरू शकत नाही, त्यांची माणसे येउन भरतात, भारताची आठवण झाली.
आजचा पहिला टप्पा मिरर लेक चा हेता, याचे बरेच फोटो पाहिले होते व वाचले होते. रस्त्यात एक छोटीशी पाटी आहे, लक्ष ठेवावे लागते. पार्किंग लिमिटेड. आमच्या लवकर निघण्याचा फायदा म्हणून पार्किंग मिळाले. आत जाताना अगदी छोटा पूल आहे, आत एकदम गर्द झाडी व सावली आहे. इतक्या दाट झाडीतून ट्रेक चा माझा पहिलाच अनुभव. हा ट्रेक १.५ मैल वन वे आहे, वाटेत एक देन ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या, कधी खाली कधी वर असे बरेच चाललो. सगळ्या प्रवासात माऊंट हूड दिसत नाही त्यामुळे शेवटी नक्की काय दिसणार असे वाटत होते, शेवटी लेक दिसला पण प्रतिबिंब कुठे दिसेना, मग लेकच्या बाजूने अजून एक मैल फेरी मारली व समोर सुंदर दष्य दिसले. माऊंट हूड च्या डोक्यावर ढगांचे हूड तयार झाले होते, मस्त फोटो मिळाला. नंतर टिंबरलाईन लॉज, माऊंट हूड वर गेलो. हवा स्वच्छ होती त्यामुळे डोंगर मस्त दिसला. इथे १२ महिने स्कीईंग चालते. सुटी असल्याने छोट्यांची पण गर्दी होती, अगदी सराईतासारखी मुले स्की करत होती. हे लॉज लोकल लाकूड वापरून बांधले आहे. एका बाजूला  माऊंट हूड व एकीकडे डोंगर रांगा बघत मस्त लंच केले व पुढचा टप्पा गाठला.




ला पाईन ला पोचेपर्यंत  हिरवी झाडी ते रखरखीत वाळवंट व ९७ डि ते ६० असा फरक अनुभवला. शिवाय १५ मिनिटांचे वादळ जोरदार पाऊस व मोठ्या गारा हे सग़ळे निसर्गाचे रौद्र रूप दाखवून गेले. बेंडपासून अजून एक सिनिक रूट आहे त्याला लेक हायवे म्हणतात, त्यावर थ्री सिस्टर्स हे स्नो कॅप्ड ३ डोंगर दिसतात.

दिवस - ३ - ला पाइन ते चेमूल्ट ते क्रेटर लेक -
चेमूल्ट हे अतिशय छोटे गाव आहे. लोकवस्ती ६००. इथे १९२९ मध्ये बांधलेल्या एका हॉटेलात राहिलो. रेल्वे कामगारांसाठी त्या सुमारास बांधलेले. मनात जरा धाकधूक होती पण क्रेटर लेक पासून फार दूर नाही. क्रेटर लेक ला नॉर्थ  एंट्रन्स ने पोचलो.  हा रस्ता बराच एकाकी आहे.

 लेकच्या रिम रोड वरून ३५-४० मैलाची प्रदक्षिणा आहे. अनेक ठिकाणी लेक बघण्यासाठी लुक आउट्स आहेत.
लगेच क्लीटवूड ट्रेल ने खाली लेकपर्यंत गेलो. खूप सुंदर ट्रेल आहे. साधारण एका मैलात ७०० फूट चढ असल्याने वर येताना दमछाक होते. वाटेत झाडे व बसायला बाके आहेत. मागे बघताना पाण्याचा सुंदर रंग दिसतो. प्रत्येक फोटो हा पिक्चर परफेक्ट वाटतो.  लेक मधे बोट टूर आहे पण पावसाची शक्यता असल्याने आम्ही घेतली नाही. उन्हामध्ये पाण्याचा रंग मस्त दिसतो.  निळ्या रंगाच्या खूप छटा दिसतात.६ मैल रूंद व १९०० फूट खोल असलेले हे व्होल्कॅनोने बनलेले क्रेटर आहे. फक्त पावसाचे व बर्फाचे पाणी यात येते म्हणून खूप शुद्ध पाणी आहे.  लेक मधे १२४-१४० फूट पर्यंत खाली डिस्क सोडून दाखवतात.  आपण ती नीट बघू शकतो, इतके पाणी शुद्ध आहे. खरे वाटत नाही ना..

निसर्गाचा हा चमत्कार सगळ्यांना बघता यावा हे एका लहान  मुलाच्या हट्टाने घडले आहे.. मि स्टील ग्लॅडस्टोन याच्यामुळे आपण हा चमत्कार आज पार्क रूपात बघू शकतो. हा क्रेटर लेक सगळ्या लोकांपर्यंत पोचावा यासाठी त्यानी १७ वर्ष काँग्रेस चा पाठपुरावा केला.  रेंजर टाॅक मध्ये ही माहिती कळली. इथला सूर्यास्त व सूर्योदय बघण्यासारखा. आणि हो रात्रीचे आकाश व तारे केवळ अप्रतिम. लेकच्या कडेने ऊंच कडे आहेत,  डोंगरांची धूप खूप झाली आहे. हा खडक व्होल्कॅनिक असल्याने त्याची धूप वेगळी जाणवते. बर्फात याचे एक वेगळे सौंदर्य दिसते.
दिवस - ४ - चेमूल्ट ते सेलम - हायवे १३८ हा सिनीक राउट घेतला. ९० माइल्स चा सुंदर नागमोडी रस्ता आहे. दोन्ही बाजूला उंच गर्द झाडी व वाटेत अनेक धबधबे. याला हायवे ऑफ  वॉटरफॉल असेही म्हणतात. फ्लायफिशिंग हा इथला फेमस गेम आहे. कडेने उम्पका रिव्हर, बाजूला उंच झाडी व घाटाचा नागमेडी रस्ता सतत आपल्याला फिरवत असतो. ७०००फूटापासून सपाटीवर आणून सोडतो.
आम्ही वाटेत २-३ धबधबे पाहिले. त्यातला टोकेटी फॉल्स हा पंचबोल टाईप होता. १ ते २ मैलाच्या हायकिंग नंतर पाणी इतक्या सुंदर रूपात समोर येते की बस् .. टोकेटी फॉल्स आधी एका गोल जागेत पडून तिथे चक्क पाण्याचा भोवरातयार होतो व मग हा फाॅल खाली उडी घेतो.  या ट्रेल वर जिने भरपूर होते.  वॉटसन फॉल चा हाईक पण मस्त होता. सगळीकडे डिफिकल्टी लेव्हल, अंतर, व इतर माहिती थोडक्यात लिहिलेली आहे.

या रस्त्यावर लेक्स व धबधबे भरपूर. डास मात्र आहेत तेव्हा रिपेलंट नेलेले बरे. या नंतर सेलम येथे मुक्ाम केला. ही ओरेगॉन ची राजधानी पण शहर खूप मोठे नाही.

दिवस - ५ - सेलम ते सी साईड


सेलम हून सकाळी निघून कॅनन बीचला गेलो. हा रस्ता पण अतिशय सुंदर आहे, वळणे जरा जास्त आहेत. बीचवर लो टाईडला पोहोचू असे प्लॅन केले होते. या बीचवर एक २७३ फूट ऊंच मोनोलिथ आहे. बाजूलाही छोटे खडक आहेत.


ओहोटी च्या वेळेस हे खडक उघडे पडतात व त्या खालचे टायडल पूल्स आपण बघू शकतो.  त्यात सी वीडस, सीॉनिमॉन,स्टार फिश, मसल्स व क्रॅब दिसतात. हे टायडल पूल्स काही तास पूर्ण पाण्याखाली व काही तास उन्हाला एक्स्पोज असतात. गार गरम वारे, लाटांचे तडाखे, कधी पाण्याखाली तर कधी पाण्याशिवाय अशा सगळ्या परिस्थितीत हे प्राणी जगतात हेपाहून खूप आश्चर्य वाटते. सृष्टीतली ही विविधता बघण्यासारखी.
याच बीचवर जो मोठा खडक आहे त्याला हेस्टेक म्हणतात, त्यावर ३-४ महिने सी गल्स येऊन अंडी घालतात व आपल्या पिलांना वाढवतात. इथे २-३ दुर्बिणी लावून ठेवल्या होत्या व त्यातून पक्षी छान दिसत होते घरट्यातले. व्हॉलेंटिअर्स मुळे हे शक्य झाले. पिले घरट्यातून बाहेर पडली की पक्षी दुसरीकडे जातात व पुढच्या वर्षी परत येतात, त्यांच्या जी पी एस सिस्टीमला मानले पाहिजे,  कशा जागा लक्षात ठेवतात देव जाणे.
यानंतर अॅस्टोरिया येथे गेलो ३० मैलावर आहे कॅनन बीच पासून. या भागातून खूप मोठ्या प्रमाणात व्यापारी जहाजांची ये जा चालते. ज्या ठिकाणी कोलंबिया नदी पॉसिफिक ला मिळते, त्या जागेला कोलंबिया बार म्हणतात. नदी समुद्राला मिळालेली बघण्याचा माझा पहिलाच अनुभव. ही नदी प्रचंड मोठी आहे, गंगेची आठवण आली. जिथे नदी व समुद्र मिळतात तेथे प्रचंड लाटा व खूप फोर्स असतो.  १७०० ते २०० या दरम्यान इथे २००० बोटी बुडल्या म्हणून या जागेला ग्रेव्हयार्ड ऑफ पॉसिफिक म्हणत. हळूहळू इथे प्रशिक्षित बार पायलटस् तयार झाले, आजही त्यांच्या उपस्थितीशिवाय एकही बोट पुढे जाउ देत नाहीत. ही सर्व माहिती देणारे मारटाईम म्युझिअम आहे,  प्रत्यक्ष वापरली गेलेली बोट आपण आतून बघू शकतो. ही नदी ६ तास एका दिशेने व ६ तास दुसरीकडे  वहाते. भरती ओहोटी नुसार. जवच्या एका गावापर्यंत पाणी खारट असते व परत गोडे असते. या नदीवर ४ मैल लांबीचा पूल आहे जो वॉशिंग्टन स्टेट ला जातो. अॅस्टोरियाला बोटींच्या व्यापारामुळे महत्व अजूनही आहे. इथे एका टेकडीवर टॉवर आहे ज्यावर ही सगळी डेव्हलपमेंट चित्ररूपात काढली आहे.  पूर्वी इथे फरचा व्यापार मोठ्या प्रमाणावर चाले. लुईस व क्लार्क  त्यांच्या प्रवासात या रस्त्याने पॅसिफिक समुद्रापर्यंत गेले, त्यावेळी हा प्रवास किती खडतर असेल याची कल्पना येते पण त्यांच्यासारख्या धाडसी लेकांमुळे  हे मार्ग आपल्याला खुले झाले.
यानंतर सीसाईड येथे मुक्काम केला हॉटेलमागेच बीच होता. वाटेत पार्क आहे तिथून समुद्र सुंदर दिसतो.

दिवस - ६ - सी साईड ते पोर्टलँड ृ शेवटच्या दिवशी पुन्हा एकदा बीचवर जाउन आलो.  परत घाटाच्या सुंदर रस्तयाने पोर्टलँडला आलो व घराच्या दिशेने निघालो. या ६ दिवसात जवळजवळ ८००-९०० मैल फिरलो.  पाण्याची अनेक रूपे पाहिली. कधी माउंट हूड चा बर्फ, कधी समुद्र किनारे, कधी क्रेटर लेक सारखे लेक तर कधी कोलंबिया अथवा इतर नद्यांवरचे धबधबे. निसर्गाच्या जवळ गेल्यासारखे वाटले.    सुंदर रस्ते व घाट, चविष्ट सी फूड  जोडीला होतेच. एकंदरीत ही ट्रीप बरेच काही शिकवून गेली.