खाणे त्यांच्या देशा........
आजकाल बरीच मुले शिकायला, नोकरीच्या निमित्ताने अमेरिकेत व इतर देशात जातात. काही मेस मध्ये जेवतात तर बरीच स्वतः स्वयंपाक करून जेवतात. भारतात स्वहस्ते करायची वेळ कमीच येते. बाहेर आल्यावर मात्र घरच्या खाण्याची आठवण नेहेमीच होते. एकतर व्हेजिटेरिअन खाणार्यांना चॉईस कमी व मसाले अगदीच न के बराबर. त्यामुळे पिझ्झा, पास्ता. टॅको बेल्स हे ऑप्शन्स बघितले जातात. अशा बाहेरून इतर देशात जाणार्यांकरता हे काही प्रकार. स्वस्त, सोपे व पटकन होणारे
इथे ग्रोसरी करताना दुकानात गेल्यावर सुरूवातीला गडबड होते. इतके प्रकार असतात त्यातले काय घ्यावे व काय नाही ते कळत नाही. पॆशाचा पण विचार करावा लागतो. आपल्याला रूपया व बाहेरच्या करन्सीत फ़ार फरक वाट्तो..साहजिकच आहे. या मोठ्या स्टोअर्स मधून शॉपिंग करण्यात फार वेळ जातो. सुरूवातीला एखादी चक्कर नुसतीच मारून अंदाज घ्यावा. शक्यतो लो फ़ॅट ऑप्शन चूज करावा. फ़ुल फ़ॅट, लो फ़ॅट व फ़ॅट फ़्री असे ऑप्शन्स असतात.
बेसिक फोडणी शिकून घेणे.
पोळीला पर्याय:
ब्रेड - नानाविध प्रकारचे ब्रेड मिळतात. त्यापॆकी व्हीट ब्रेड शक्यतो निवडावा. अगदीच आवडला नाही तर व्हाईट खा.
पीटा ब्रेड, पीटा पॉकेट्स - बेकरी सेक्शन मध्ये मिळतात. ते टोस्ट करून खाल्ले की चांगले लागतात.
टॉर्टीयाज - ह्या मेक्सिकन पोळ्या असतात. गहू किंवा कॉर्न पासून बनवलेल्या. चव सगळ्यांना आवडतेच असे नाही.
भाज्या व उसळी: फ्रोझन व्हेजिटेबल्स नेहेमी फ्रिज मध्ये ठेवाव्यात. त्यात
मटार, मिक्स व्हेज, कॉर्न, एड्मामे...शेंगा किंवा दाणे, फ़्रेन्च कट बिन्स ठेवावे.
टिन मध्ये चिक पीज(छोले), किडनी बीन्स(चवळी), ब्लॅक बीन्स व राजमा मिळतात.
बेकिंग : बेकिंग करणे खूप सोपे आहे कारण बहुतेक किचन्स मध्ये कुकिंग रेंज असते. बेकिंग ट्रे डिस्पोजेबल वापरले तर सोपे पडते. पॅम स्प्रे मिळतो तो वापरवा. बेकिंग सेक्शन मध्ये केक मिक्स, ब्राउनी मिक्स, कॉर्न ब्रेड, मफिन मिक्स मिळतात. त्यावर व्यवस्थित सूचना असतात. बहुधा एखादे अंडे व तेल मिक्स मध्ये घालावे लागते. दिलेले तपमान व वेळ याप्रमाणे बेक करावे. बिघडत नाही. स्नॅक्स म्हणून या गोष्टी उपयोगी पडतात.
जेलो पाकिटे, पुडींग पॅक्स मिळतात. अधून मधून खायला चांगले.
स्मूदी....फळे, दही व थोडेसे टोफू किंवा ड्राय फ्रूट व बर्फ़. आवडीप्रमाणे साखर अथवा मध. स्मूदी बनवताना फळे चिरून थोडा वेळ फ़्रीझर मध्ये ठेवावे. फ्रेश किंवा फ्रोझन फळे वापरता येतात. वेगवेगळ्या फळांची कॉम्बिनेशन्स करणे.
व्हेजिटेबल सेक्शन मध्ये सोयाचे चीज मिळते. चीज ला अल्टर्नेटिव्ह म्हणून वापरता येते.
एथनिक सेक्शन मध्ये काही डाळी, दाणे, कडधान्ये मिळतात.
आले, लसूण पेस्ट तयार मिळते. ती फ़्रीज मध्ये ठेवावी.
तूप आवडत असेल तर अनसॉल्टेड बटर घेउन गॅसवर कढवावे.
जवळपास इंडिअन स्टोअर असेल तर चिंचेची चटणी, गरम मसाला इ आणून ठेवावे.
सॅंड्विचेस: व्हिट ब्रेड / व्हाईट ब्रेड ....शक्यतो टोस्ट करावे. बटर, क्रीम चीज, सोया मेयोनीज, कीरी चीज, हम्मस या गोष्टी आलटून पालटून वापरा. या गोष्टी चीज सेक्शन व ड्रेसिंग सेक्शन मध्ये मिळतात. सोयाचे पॅटीस-बोका बर्गर मिळतात ते थोडेसे शॅलो फ़्राय करून वापरावे. बाकी लेट्यूस, टोमॅटो, कांदा टोमॅटो केचप वरून घालावे. रेलिश पण छान लागते.
ऑम्लेट मध्ये कांदा, टोमॅटॊ व मिक्स व्हेज घालून सॅंडविच बनवावे.
स्टर फ़्राय: कांदा, लसूण, थोडा बटाटा,टोमॅटो, ब्रोकोली, मशरूम्स, कॅप्सिकम,एडमामे दाणे, घालून परतावे. चिली सॉस, सोया सॉस घालावे. ५ ते १० मिनिटात डिश तयार. भात, टॉर्टीयात घालून अथवा नूडल्स जे आवडत असेल त्याबरोबर खावे.
पिटा पॉकेटस: पिटा टोस्ट करून त्यात लेट्यूस, टोमॅटो, उकडलेले अंडी / स्टर फ़्राय भाज्या / घालावे.
पास्ता: आपल्याला आवडेल त्या प्रकारचा पास्ता घ्यावा. ऒलिव्ह ऒईल वर कांदा, लसूण, टोमॅटो, ब्रोकोली, कॅपसिकम, मशरूम्स, थोडा स्पिनॅच घालावा. त्यात पास्ता सॉस (रगू चांगला आहे) मिक्स करून मग शिजवलेला पास्ता घालावा. नंतर ओरेगॅनो व गार्लिक सॉल्ट घालून मिक्स करावे. हे इटालिअन मसाले मसाले सेक्शन मध्ये मिळतात.
उसळी: कांदा, आले लसूण घालून परतावा. त्यावर टोमॅटो घालून परतावे. थोडासा गरम मसाला घालावा. छोले, चवळी, राजमा हे टिन्स मध्ये मिळतात. ते मिक्स करावे. उसळ तयार. भाताबरोबर अथवा ब्रेड बरोबर खावे.
चाट : टॉर्टीयाज कापून तळून ठेवाव्या त्यावर उकडलेला बटाटा, टोमॅटो, छोले(टिन मधले), हिरवी चट्णी, दही, व चिंचेची चटणी घालावी.
स्कूप्स : चिप्स सेक्शन मध्ये हे कॉर्न स्कूप्स मिळतात. त्यात भरण्यासाठी ब्लॅक बीन्स, कॉर्न, कांदा, कॅप्सिकम, टोमॅटो चिली सॉस व थोडी जिरा पाउडर मिक्स करावी. हे स्कूप्स मध्ये भरून खावे.
भाजी: मिक्स व्हेज चे पाकीट मिळते त्याची भाजी छान होते. प्रथम तेलावर कांदा, आले लसूण पेस्ट परतावे. त्यावर टोमॅटो घालून परतावे. त्यात फ़्लॉवर, कॅप्सिकम घालून परतावे. मग मिक्स व्हेज घालून थोडे पाणी घालून शिजवावे. नंतर थॊडेसे क्रीम, अथवा मिल्क पाउडर किंवा काजू पेस्ट यातील काही घालावे. नसल्यास हरकत नाही.
अशीच फ़्रेंच बीन्स ची भाजी करता येते. जिर्याच्या फोडणीवर थोडा लसूण घालावा. वर फ़्रेंच बीन्स घालाव्यात. झाकण ठेवून थोडा वेळ शिजवणे. नंतर थोडे मीठ, लिंबू घालावे. दाण्याचे कूट घालून ३-४ मिनिटे परतणे की भाजी तयार. दाणे रोस्टेड अनसॉल्टेड घेउन कूट करावे.
अजून काही पदार्थ थोड्या दिवसांनी.

No comments:
Post a Comment