Saturday, October 24, 2009

मरण इतके सुंदर असू शकते........



आजकाल अमेरिकेत सगळीकडे फ़ॉल कलर्स दिसत आहेत. आपण सगळेच नेहेमी ही रंगांची उधळण बघतो. एका लेखकाने हे सुंदर रंग बघून म्ह्टले आहे "मरणही इतके सुंदर असू शकते". हे वाचल्यापासून दर फॉल सिझनला मला हे त्यांचे वाक्य आठवते. किती नेमके वर्णन त्यांनी केले आहे.

अमेरिकेत आल्यापासून गेली ८-१० वर्षे मी हे झाडांनी केलेली रंगांची उधळण बघत असते. दर वर्षी तीच झाडे, पण वेगळी वाटतात. अस्पेन, बीच, मेपल, बर्च, गम ट्रीज. ऒक ही त्यातली काही झाडे ऒळखीची झाली आहेत. बर्निंग बुश ही खूप छान दिसतात एकदम लाल भडक. नेहेमी हिरव्या रंगांची कुठलीतरी छटा दाखवणारी ही झाडे आत्ता मात्र कधी पूर्ण पिवळे , कधी एकाच झाडावर हिरवी पिवळी व केशरी पाने, कधी पूर्ण झाड केशरी अशी वेगवेगळी दिसतात. एव्हरग्रीन सारखी झाडे मात्र हटवादीपणाने आपला हिरवा रंग सोडायला तयार नसतात ऑक्टोबर दुसर्‍या आठवड्यापासून हे रंग दिसायला लागतात. साधारण २ आठवडे ही रंगांची उधळण आपल्याला दिसते. हे दिवस थोडेफार इकडे तिकडेही होतात. त्यानंतर या झाडांचे एकदम खराटे होतात आणि थंडी आली असे जाणवायला लागते.
स्प्रिंग मध्ये झाडांना पालवी आल्यापासून ते उन्हाळा संपेपर्यंत या झाडांची पाने हिरवीगार असतात. तेव्हा पानांचे क्लोरोफिल, सूर्यप्रकाश व पाणी यांच्या सहाय्याने जोमाने अन्न बनविण्याचे काम चालू असते. या वेळेस सुद्धा पानात इतर रंग असतात पण ते क्लोरोफिल च्या मुळे लक्षात येत नाहीत. हिरवा रंग प्रॉमिनंट असतो. उन्हाळा संपला की दिवसाची लांबी कमी होते, सूर्यप्रकाश कमी होतो व हळूहळू फोटो सिंथेसिस पण कमी होते. मग हिरवा रंग मागे पडतो व इतर रंग डोकावतात व शेवटी आपले अस्तित्व दाखवतात. गाजर, केळी, बीट यांचे रंग जसे काही रंगद्रव्यांमुळे बनतात तसेच हे. हे रंग कधी कमी तर कधी जास्त दिसतात. २ आठवड्यात सगळी पाने गळून जातात. मला नेहेमी वाटते हा रंगांचा सिझन चांगला १-२ महिने चालावा. पाउस, उन्हाचे प्रमाण या दोन्हींचा रंगांवर परिणाम होतो. या खाली पडलेल्या पानंचे चांगले खत तयार होते.

इथले टूरिझम डिपार्ट्मेंट या रंगपंचमीचा फायदा घेतल्याशिवाय कसे रहाणार? नॉर्थ ला आधी फॉल येतो. ठिकठिकाणच्या फॉल कलर्स च्या जाहिराती येतात व टूर्स निघतात. कलर्स किती आले आहेत याचे अपडेट इंटरनेट वर उपलब्ध असतात. स्टेट पार्क्स, नॅशनल पार्क्स व काही सिनिक रूटस खरोखर सुंदर आहेत.

स्मोकी माउंटन एरिया मस्त दिसतो या दिवसात. डोंगरावर तिथे भरपूर झाडी आहे. त्यात वेगवेगळ्या रंगांचे
मिश्रण मस्त दिसते. मेन मध्ये अकेडिया नॅशनल पार्क पण या सिझनसाठी प्रसिद्ध आहे.





काही पार्क मध्ये अगदी स्लो स्पीड चा एखादा रोड बनवतात ज्यात दोन्ही बाजूला कलर फुल झाडे असतात. पिवळ्या रंगाचा प्रकाश पडला आहे असे वाटते. मंडळी आपली फोटोग्राफीची हॊस भागवून घेतात. अर्थात फोटॊ काही प्रत्यक्ष दृष्याला न्याय देउ शकत नाहीत. लेकच्या बाजूला प्रतिबिंबामुळे मस्त व्ह्यू दिसतो. आम्ही बर्‍याच ठिकाणी जातो कलर्स बघायला. घराच्या आसपास पण खूप छान रंग दिसतात.

भारतात हिमाचल प्रदेशात थोडेफार रंग दिसतात. बाकी पानगळ म्हणजे पाने वाळतात आणि पडतात कारण आपल्याकडे तापमानात खूप फरक नसतो. यु के मध्ये पिवळा रंग जास्त दिसतो. आजकाल हिंदी सिनेमात बर्‍याच वेळा फॉल कलर ची बॅकग्राउंड वापरतात. त्यामुळे बर्‍याच लोकांना ते माहित झाले आहेत. इथली काही छोटी मुले या पानांमध्ये मनसोक्त खेळताना दिसतात. काही मंडळी पाने वाळवून वॉल हॅंगिंग बनवतात.

अशा या ’जाता जाता’ आपल्याला ’रंगांचा नजराणा’ देणार्‍या झाडांचे मनापासून धन्यवाद.

6 comments:

Rahul Revale said...

very interesting! thanks for sharing it with us.

Madhuri said...

Thanks for the feedback. will put some more pictures.

Mahendra said...

सुंदर.. ते कॅनडाच्या फ्लॅगवरच्या सारखं पान आहे ते चिनारचं कां?

MAdhuri said...

Thanks for the feedback.
Flag war maple leaf ahe, tasach prakar

mannab said...

हा नयनरम्य फॉल सीजन मी डेट्रोईट मध्ये असतांना "याची देही याची डोळा" पाहिला होता. आपण जे लिहिले त्यावरून विख्यात कवी कै. वसंत बापट यांनी यावर असेच सुंदर साधना साप्ताहिकात लिहिले होते त्याची आठवण आली. धन्यवाद.
मंगेश नाबर

Madhuri said...

Mangesh thanks for the feedback.

ata parat ya seasonchi waat pahatoy. dar varshi navyane baghavasa watto