अमेरिकेत आल्यावर इथले रहाणे, खाणे याची सवय व्हायला फार वेळ लागला नाही. मुलीची शाळा पण चांगली होती. सॊदी अरेबिया सारख्या ठिकाणाहून येउनही ती पटकन रूळली.( दोन्ही कल्चर मध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे) मित्र मंडळ, फिरणे, वगॆरे व्यवस्थित चालले होते. एकंदर इथला फ्रीडम बघून छान वाटत होते.
अशात एकदा शाळेत बॉंब ठेवल्याची बातमी आली. शाळेला अशा गोष्टींची सवय असावॊ पण आम्ही फुल टेन्शन मध्ये. त्यांनी व्यवस्थित परिस्थिती हाताळली व एका मुलाला पकडले. नंतर शाळॆमध्ये एखाद्या मुलाने गोळीबार करणे, एखाद्या ऑफिसमध्ये लोकांना ऒलिस ठेवणे अशा बर्याच बातम्या वाचनात येत असत. आणि शेवटी एक ऒळ असे... मारेकर्याने स्वतःला मारून घेतले. दोन मॊठ्या युनिव्हर्सिटीत हा प्रकार घडला आणि नाहक अनेक निरपराध मुलांचा जीव गेला. इथल्या लोकल मुलांबरोबर अगदी बाहेर देशातून इथे शिकायला आलेली अनेक मुले यात बळी गेली. इथे बंदूक मिळवणे हा फार अवघड प्रकार नसल्याने अशी मुले हे प्रकार करू शकतात.
बरे त्यातून त्याना काही मिळते असेही नाही कारण शेवटी ती स्वतःला पण गोळी घालून घेतात. अर्थात त्यांची मानसिक अवस्था त्याला कारणीभूत असते बर्याच वेळेला.
इथल्या शाळेमध्ये मुलांची संपूर्ण माहिती ठेवलेली असते. अगदी लहानपणापासून त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे चेकिंग होते. स्किल्स डेव्हलप मेंट, स्पीच डेव्हलपमेंट वगॆरे आणि ठराविक लेव्हल च्या खाली असलेल्या मुलांसाठी वेगळ्या शाळॆची सोय असते याला स्पेशल एड स्कूल्स असे म्हणतात. भारतात मतिमंद, गतिमंद यांच्या शाळा पाहिल्या होत्या. ब्लाइंड स्कूल्स, अपंग मुलांसाठी शाळाही बहितल्या. इथे ज्या मुलांना नेहेमीच्या सूचना समजत नाहीत त्यांना अशा स्पेशल एड शाळेत घालतात. त्यात ऑटिस्टिक मुले असतात, काही बायपोलर असतात ज्यांना मूड स्विंग्ज खूप असतात तर काही स्लो लर्नर असतात. लहान पणी हा फरक तसा खूप धूसर असते. बरीच मुले मेडिसिन वर असतात. ही मुले कधीतरी खूप चिडतात आणि कंट्रोल जातो. त्यांना साभाळण्याचे ट्रेनिंग शिक्षकांना दिलेले असते. ह्या शाळांसाठी सरकार कडून मदत ही होते. त्यांना शक्य तितके नॉर्मल मुलांसारखे ठेवायचा प्रयत्न करतात.
हे सगळे ठराविक वयापर्यंत चालते. त्यानंतर ही मुले स्वतंत्र असतात. ज्यांच्या मागे कुणी काळजी करायला असेल त्यांची काळजी घेतली जाते,, बाकीची मात्र स्वतंत्र रहात असतात. कधी त्यांचे मानसिक संतुलन ढळले की ती चिडतात आणि अशा बातम्या वाचायला मिळतात. अर्थात प्रत्येक घटनेमागे अशीच मुले असतात असे नाही. हे सगळे प्रकार कशाने होतात यावर संशोधन चालू आहे. घटस्फॊट, दारू अशी बरीच कारणे असू शकतात या मेंदूतल्या गडबडीला. नक्की काहीच सांगता येत नाही. भारतात पण अशा प्रकारची मुले असत्तातच ती पण असे काही प्रकार करत असतातच. खून, मारामर्या यांच्या बर्याच बातम्या येतात. हे सगळे पाहून मला मात्र काही दिवस प्रत्येक मुलाकडे पाहिले की वाटायचे, हा काही मेडिसिन वर तर नसेल, बाय पोलर तर नसेल कारण दिसायला इतर मुलांसारखीच दिसतात. आता हळूहळू सवय झाली आणि आपण काही करू शकत नाही हेही लक्षात आले.
डॉक्टर लोकांना यामागची कारणे शोधण्यात लवकर यश यावे एवढेच आपण म्हणू शकतो.

No comments:
Post a Comment