मी आणि माझा देश(मला माहित नसलेला)
आपल्यापॆकी प्रत्येकाने लहानपणी काचेचे रंगीत तुकडे गॊळा करून कलायडोस्कोप मधून त्याची वेगवेगळी डिझाईन्स बघितली असतीलच. दर डिझाईन वेगळे, त्याचे रंग वेगळे. प्रत्येकाला ते वेगळे भासते. आपला भारत देश पण तसाच आहे, इतकी विविधता मला वाटते इतर कुठल्या देशात नसेल. अनेक धर्म, भाषा, चालीरीती, खाणॆ इथे नांदत आहेत. प्रत्येक आणि बाहेरचा माणूस त्याकडे जसा बघेल तसा त्याला तो दिसतो. बाहेरच्या देशात रहाताना बरेच वेळेला लोक प्रश्न विचारतात आपल्या देशातील या विविधतेबद्द्ल आणि बर्याच वेळेला आपल्याकडे खात्रीलायक उत्तर नसते. भारताबाहेर रहाताना मला नेहेमी हे वाटते (मिडल इस्ट व अमेरिका) की याबाबतीत शिक्षण खाते काहीतरी करू शकेल. भारताबाहेर कशाला, भारतात रहाणार्यांनाही याचा खूप उपयोग होईल.
तुम्ही म्हणाल आजकाल इंटरनेट वर सगळे मिळते पण सगळ्यांकडे ती सोय असेलच असे नाही. आपल्या देशाची ही विविधता जर शाळेपासून शिकवले गेली तर फार चांगले कारण तॊ वर्षे फार महत्वाची असतात. आणि पुस्तक वाचण्यापेक्षा डिव्हीडी बघितली तर मुलांच्या चांगले लक्षात रहाते. शाळेचे ऑफ पिरीयड त्यासाठी वापरायला हरकत नाही. प्रत्येक प्रांताची एक आणि पूर्ण भारताची एक अशा दोन डिव्हीडीज बनवाव्यात. त्यामध्ये त्या प्रांताचे सण वार, खाणे , कला,पर्यटनाची ठिकाणे, थोडा इतिहास, कपडे यांचे फोटो , जमल्यास व्हिडिऒ टाकावे. अगदी डिटेल् नाही बनवले तरी हरकत नाही पण साधारण कल्पना आली पाहिजे. महाराष्ट्र असेल तर त्यावर किल्ल्यांची लिक असावी. यामध्ये वेगवेगळ्या धर्मांबद्दल पण माहिती दिली पाहिजे म्हणजे लहान पणापासून दुसर्यांच्या धर्मात काय असते हे कळेल व कदाचित एकमेकांच्या धर्मांबद्द्ल आदर वाढेल(?)
आपण लहानपणापासून आपल्या भोवतीची माणसे बघत बरेच काही शिकतो. आपल्याला जर पर प्रांतीय परधर्मीय मित्र असतील तर थोडी त्यांच्या रीतींची माहिती होते. पण प्रत्येकाला हा चान्स असतोच असे नाही. बाहेरच्या देशात गेलो की आपल्याला बरीच माहिती कळते. मला तर किती दिवस साउथ इंडियन सगळे सारखे वाटायचे जेव्हा त्यांच्यात मिसळले तेव्हा त्यांची माहिती कळली. आता तुम्ही म्हणाल इतिहास भूगोलात हे सगळे असतेच ..पण अभ्यास म्हणून पाठ करण्याऎवजी मुलांना डिव्हीडी वर बघितले की पटकन लक्षात रहाते.
आपल्याकडे टॅलटची कमी नाही, टेक्नीकल नॉलेज खूप जणांना असते. अशा डिव्हिडीज बनवणे सहज शक्य आहे. मझाही प्रयत्न चालू आहे. बघू केव्हा प्रत्यक्षात येते ते.

2 comments:
छान लिहिलस... keep it up...
Welcome on the blog.
Thanks
Post a Comment