Tuesday, January 26, 2010

बळी तो कान पिळी

बळी तो कान पिळी

आजकाल खूप वेगळ्या विषयावर सिनेमा निघत आहेत. पूर्वीच्या प्रेमाच्या त्रिकोणातून बाहेर पडत आहे. काही हलके फुलके तर काही विनोदी तर काही गंभीर सगळे विषय हाताळले जात आहेत. मराठी सिनेमाही याला अपवाद नाही. प्रत्येकाला आपल्या आवडीचे काहीतरी बघायला मिळते आहे. काही चित्रपट मात्र ’आय ऒपनिंग’ या विभागात मोडतात. कालपरवाच ’जोगवा’ या सिनेमाला ५ राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचे वाचले. सर्व कलाकारांचे आणि दिग्दर्शकाचे अभिनंदन. विशेष म्हणजे अमराठी गायकांना बक्षिस मिळाले आहे.

या सिनेमातल्या काम अरणार्‍यांना घरे द्या, जोगत्यांना काम द्या वगॆरे गोष्टी पेपर मध्ये येत होत्या. कर्नाटकात अजूनही ही प्रथा चालू आहे हे पाहून फार विचित्र वाटते. आज आपण एकीकडे महासत्ता होण्याचे स्वप्न बघत आहोत आणि अजूनही अशा प्रथा चालू आहेत हा केवढा विरोधाभास आहे. पूर्वी काही कारणाने ही प्रथा सुरू झाली असेल पण आपण जसे आपल्या इतर परंपरात बदल करत गेलो तशा या गोष्टींना थांबवू नाही शकलो. माझे थोडे शिक्षण कोल्हापूर इथे झाले. तिथे अधून मधून यल्लमाची जत्रा बघायला मिळॆ. माझ्या वर्गात ही एक मुलगी होती ८ वी -९ वी त. तिला जट आली म्हणून थोडे दिवस वर्गात चर्चा चाले पण थोड्या दिवसात ते थांबले. त्या वेळेस एवढे काही कळत नव्हते पण त्या मुलीची मनःस्थिती अजूनही आठवते. ती खूप अस्वस्थ असे.

आता जोगवा ची खूप चर्चा होईल. असला विषय म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर नक्कीच चर्चा होणार कारण या भारताबहे्रच्या लोकांना असल्या विषयात भारी इंटरेस्ट. भारतात पण एका ठराविक वर्गात हा सिनेमा बघितला जाईल. पण प्रत्यक्ष जे लोक यातून जात आहेत त्यांच्यापर्यंत हा सिनेमा पोचवायचे काम कोण करणार? आजकाल टीव्ही तर सगळीकडे पोचले आहेत. सरकारने हे काम केले पाहिजे आणि त्यांना रोजगाराच्या दुसर्‍या संधी दाखवल्या पाहिजेत तरच या सिनेमाला मिळालेल्या राष्ट्रीय पारितोषकाला काही अर्थ आहे असे मला वाटते. हे काम सोपे नाही कारण नवीन प्रथा सुरू करणे सोपे आहे पण जुन्या प्रथा मोडणे अवघड असते. आपल्या अनट्चेबल बद्द्ल पण बाहेर खूप आकर्षण असते.

असेच काही सिनेमे जे मला खूप प्रभावी वाटले ते म्हणजे --




अर्धसत्य - पोलिस जीवनावर-ऒम पुरी,
देव - हिंदॊ मुसलमान वादावर..प्रत्येकाने एकदा तरी जरूर पहावा-ओम पुरी व बच्चन जबरदस्त अभिनय
वॉटर - बनारस मधील विधवांच्या जीवनावर ..याचे चित्रीकरण सुद्धा बनारस मध्ये न करता श्रीलंकेत करावे लागले
स्लमडॉग मिलिनेअर - भरपूर चर्चा होऊन पुढे काही फरक नाही
नटरंग - तमाशावाल्यांचे जीवन
कुर्बान - थोड्या फार प्रमाणात

हे सगळे सिनेमे खूप चांगले बनवले आहेत पण ते ज्या लोकांनी बघायला पाहिजेत तिथे पोचवले तर ते बनवणार्‍यांचे श्रम कारणी लागतील असे वाटते. थोडी लोक जरी बदलली, त्यांचे विचार बदलले तरच या सिनेमांचा काही उपयोग झाला असे वाटते. मी तर हे सगळे सिनेमा पाहून एवढेच म्हणीन ...बळी तो कान पिळी

4 comments:

HAREKRISHNAJI said...

आपण खुप छान लिहिले आहेत. पण या चित्रपटांमुळे ज्या लेव्हलला समाजप्रबोधन व्हायला हवे ते दुर्दैवाने होत नाही. जोगवा मी प्रदर्शित होण्यापुर्वी पाहिला व त्यावर माझ्या ब्लॊगवर लिहिलेले.

MAdhuri said...

Dhanyawaad.

Tumchya blogwarche thoughts hi wachle. khare ahe ..jast karun entertainment value mhanun baghitle jate ya pictures kade.

भानस said...

माधुरी, खरेच आहे ग. चित्रपटातून यासारख्या अनिष्ट प्रथा, रूढींना वाचा फोडून जनजागृती व जे लोक याचे बळी आहे त्यांच्या परिस्थितीत जर काही सुधारणा झाली तर हे सारे श्रम किंचितसे तरी कारणी लागले असे म्हणता येईल. प्रत्यक्षात मात्र असे क्वचितच घडते. ’जोगवा ’ अतिशय प्रभावी व प्रवाही झाला आहे. मांडणी, पकड चांगली वाटली. त्याच पंथातील काही लोकांच्या स्वार्थासाठी कसे हे लोक नवनवीन लोकांना आपल्या मेळ्यात-पंथात सामील करून घेतात... अन हे दुष्टचक्र संपतच नाही याचे यथार्थ चित्रण. केवळ वेगळा विषय-तात्पुरते भारलेपण अन मग पुरस्कार...की सारे संपले.
चांगले लिहीले आहेस. अर्धसत्यची आठवण आली तरी अंगावर काटा येतो अजूनही.

Madhuri said...

Bhagyashree kharech ahe he ek dushtachakra ahe ani tya lokana potapanyacha dusra marg aslyashiway he thambnar nahi