Monday, July 26, 2010

नातीसाठी ...आजोबांकडून

माझा आणि संस्क्रतचा संबंध १० वी नंतर संपला. तेव्हा तो विषय आवडायचा कारण मार्क्स चांगले पडायचे. वाचताना एक प्रकारचा ठेका जाणवायचा. शब्द चालवणे ह्या गोष्टीशी पहिल्यांदा संबंध आला. पाठांतर पटकन होत असे. माझ्या वडिलांना बोलताना मधून मधून संस्क्त श्लोक म्हणण्याची मवय आहे. एखादे उदाहरण देताना पटकन श्लोक म्हणतात. एकदा मी त्यांना म्हटले की नातीसाठी तुमच्या आवडीचे काही लिहून द्या तेव्हा त्यांनी दिलेले हे श्लोक. ते वाचून तिला भाषेची मजा कळेल हे नककी.

उद्यम प्रशंसा - सूत्र - माणसानी प्रयत्नशील राहिले पाहिजे. प्रयत्नात खंड पडल्यास प्रगति थांबते.

उद्यमेन हि सिध्यंति कार्याणि मनोरथैहीनहि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगः ।।

अर्थ - प्रयत्नांनीच सर्व कार्य आकार घेते. निव्वळ मनोराज्यांनी नाही. महापराक्रमी सिंह सुद्धा, निव्वळ आळसाने झोपून राहिला तर त्याच्या तोंडात भक्श्य आपणहून जात नाही.

शाखायाम् सुखआसीनः सलील विध्यते खगः
उत्पतनस्तु अनपायः स्यात अनुद्योगो भयावहा ।।

अर्थ - झाडाच्या फांदीवर मजेत निर्धास्तपणे बसलेला पक्शी शिकारी सहज मारू शकतो. आकाशात उडणारा पक्षी मात्र सुरक्षित रहातो.

योजनानाम सहस्त्रम् तु शनैगच्छेत पिपिलिकाअगच्छन वैनतेयोपि पदमेकम गच्छति ।।

अर्थ - हळूबळू जाणारी प्रयत्नशील मुंगीसुद्धा हजारो योजने (मोठे अंतर) काही काळात पार करते. गरूड अतिशय वेगवान म्हणून प्रसिद्ध आहे, पण तो सुद्धा हललाच नाही, क्रीयाशील झाला नाही तर एक पाउल ही जाउ शकत नाही

२ नेहेमी चांगल्या संगतीत रहावे चांगला वेळ घालवावा

काव्य शास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमताम्मुर्खाणाम् तु निद्रया कलहेन वा ।।

अर्थ - सूज्ञ माणसाचा वेळ काव्य शास्त्रीय वाचन कला धर्मग्रंथ वाचन यात जातो. अद्न्य लोकांचा वेळ झोपा, भांडऩे, वाद विवाद यात निष्फळ वाया जातो. या यादीत टी व्ही ची पण नोंद करावी लागेल.

तोयाचे नावही नुरते संतप्त लोहावरी
ते भासे नलिनीदलावरी सन्मौक्तिकापरी ।
ते स्वाति अब्धि पुटकी मोती धडे नेटके ।
जाणा उत्तम मध्यमाधम दशा संसर्ग योगे टिके ।।


अर्थ - गरम लोखंडावर पडलेले पाणी टिकत नाही, तेच जर कमळावर पडले तर मोत्याप्रमाणे भासते. शिंपल्यात पडले तर मोती तयार होतो. चांगले वातावरण, चांगली संगत मिळाली तर खूप लाभ होतो. वाईट संगत असेल तर वाईट वळण लागते व ती नाशास कारणीभूत होते.
नुकतीच उमललेली फुले जमिनीवर पडल्यास मातीलापण सुवास देतात. सज्जन माणसांचा सहवास नेहेमी फलदायी ठरतो. एकाच कुटुंबातील मुले वेगवेगळ्या वस्तीत वाढली तर त्यांचे आयुष्य बदलते.

३. देवाबद्दल
आकाशात पतितं तोयम् यथा गच्छति सागरम ।
सर्व देव नमस्कारः केशवं प्रति गच्छति ।।


अर्थ - आकाशातून पडणारे पाणी जसे शेवटी नगी नाल्या मार्फत सागराला मिळते तसेच कोणत्याही देवाला केलेला नमस्कार विष्णूला पोहोचतो. शेवटी सर्वांचा देव एकच असतो.

आजच्या जगात निरनिराळ्या धर्मपंथांच्या उपासनेत कमी अधिक भाव असण्याचे कारण नाही.

कारे नाठविशी कृपाळु देवासी ।
पोशितो जगाशी एकलाची ।।


सर्व जगाचे व्यवहार नियंत्रित करणार्या शक्तिला, परमेश्वराला न स्मरणे म्हणजे कृतघ्नताच होय

रामो राजमणि सदा विजयते । --- प्रभु रामांचा विजय असो.
रामं रमेशं भजे । ----------------- प्रभु रामांना माझे नमन असो.
रामेणाभिहतं निशारचमू। ------- रामाने राक्षस सैन्याचा नाश केला.
रामाय तस्मै नमः -------------- त्या पराक्रमी रामचंग्रास नमन असो.
रामान्नास्ति परायणम् परतरं । ----- रामापेक्षा मोठे काही नाही.
रामस्य दासोस्महं । रामे चित्तलय भवतुमे रामाय तस्मै नमः। -- अशा रामाचा दास होणे, नतमस्तक होणे आवडेल.

या श्लोकात राम या शब्दाची प्रथमापासून सप्तमी प्रर्यंत रूपे असून रामरक्षेतील साधारण सारांश आहे.

४. लोकोत्तर व्यक्ति आपले चांगले गुण कायम ठेवतात

घृष्टम् घृष्टम् पुनरपि पुनः चंदनम् चारूगंधम् ।
छिन्नम छिनऩम् पुनरपि पुनः स्वादु इक्ष्वाकुदंडंम् ।
दग्धम् दग्धम् पुनरपिपुनतः कांचनम् कांतवर्णम् ।
प्राणांतेपिः प्रकृतिविकृति राज्यते श्रश्रश्रश्रश्र(())

पुनः पुनः तापवून सोने परत तेजस्नी होते, पुनः पुनः उस तोडला तरी ऊसाची गोडी कायम रहाते. अडचणी वाईट प्रसंग आले तरी सज्जन व्यक्तिंचे गुण कायम रहातात.

सोन्याचा कस सोने तापल्यावर कळतो. अनेक अडचणी आल्या तरी खचून न जाता त्यातून बाहेर बडण्यासाठी केलेले प्रयत्न यात मनुष्याचा कस लागतो.

No comments: