Thursday, October 7, 2010

काही वाचनीय .... इंडिया अनव्हेलड

काही वाचनीय .... इंडिया अनव्हेलड

काही वर्षापूर्वी हे पुस्तक बघितले होते. त्या वेळेस अमेरिकन लेखकाने लिहिलेले पुस्तक आहे, ठीक आहे असे म्हणून नीट लक्ष देउन बघितले नव्हते. परत ते २-३ दा पाहिले - पाहिले कारण यातले फोटो अतिशय छान आहेत. दर वेळेस अधिकाधिक आवडत गेले. साहजिकच मग ते वाचले गेले. आणि आता संग्रही पण आहे.

बाॆब अर्नेट नावाच्या लेखकाचे हे पुस्तक आहे. त्याच्या कामाच्या ठिकाणी एका भारतीय माणसाशी त्याची ओळख झाली. त्याच्याकडून योगा बद्दल माहिती घेतली. त्याने प्रभावित होउन भारताची वारी झाली. त्यानंतर ५-६ वेळा वेगवेगळ्या भागात फिरणे झाले आणि त्यातून हे पुस्तक तयार झाले. ५ भागात आपला देश विभागून त्याचा आढावा घेतला आहे.

आजकाल टूरिझम वाढला आहे तरीही आपण ठराविक भागातच फिरायला जातो. हा मनुष्य कुठे कुठे फिरला आहे. अगदी साघ्या लोकांच्या घरात राहून अतिथी देवो भव चा अनुभव घेतला आहे. आपल्या चालीरीती सण हे सगळे घरात राहून नीट बघितले आहेत. हिंदु फिलाॆसाॆफी सोप्या शब्दात लिहिली आहे. वेस्टर्नर्सना काय वाटते हे त्याला चांगले माहित आहे त्यांना आपल्या धर्माबद्दल पडणार्या प्रश्र्नांना छान उत्तरे दिली आहेत. आपले अनेक देव, आनेक भाषा, गुरूबद्दल आदर, अरेंज मॆरेज, एकत्र कुटुंब पद्धती, योगाचे महत्व , वसुधैव कुटुंबकम ची कल्पना, हिंदु धर्माची सहिष्णुता , देव सगळ्या गोष्टीत असण्याची कल्पना या सगळ्या गोष्टी अगदी सोपे पणाने सांगितल्या आहेत.

फोटो फार सुंदर आहेत. काही फुल पेज आहेत. राजस्थान, हिमालय व अजंता इथले विशेष उल्लेखनीय... आपल्याला एका ठिकाणी भारताचे कोलाज बघायचे असेल तर हे पुस्तक उत्तम आहे. यात काही ठिकाणी अपुरी माहिती वाटते( आपले गड, वारी इ) पण आपला देश एवढा मोठा आहे की सगळे एका ठिकाणी लिहिणे तसे अवघडच.

you can chk pictures here या लिंक वर या पुस्तकातील कंटेंट व फोटो बघता येतील. जरूर बघा.

दुसरा धर्म कसा आहे हे नीट समजावून घेउन, दुसरा देश कसा आहे हे लोकांपुढे मांडणे हे नक्कीच अवधड काम आहे जे या लेखकाने चांगले पार पाडले आहे.

खूप माहिती नसल्याने हे पुस्तक कंटाळवाणे होत नाही. प्रत्येक ठिकाणी धर्म कसा प्रभाव पाडत गेला, हे छान लिहिले आहे.
हे पुस्तक वाचल्यावर नक्कीच आपण काही ठिकाणांना भेटी द्यायचे ठरवतो. संग्रही ठेवावे असे हे पुस्तक नक्कीच आहे.

2 comments:

निखिल said...

पुस्तक परिचय आवडला..
पुस्तक वाचायला आवडेल..
आपल्याला http://www.pustakvishwa.com हे संकेतस्थळ सुचवत आहे. इथे पुस्तकआंची यादी जोडण्यात आलेली आहे. आणि प्रत्येक पुस्तकाच्या पानावर त्या पुस्तकाबद्दल लिहिलेले साहित्य दिसते. थोडक्यात पुस्तकाबद्दल जास्तितजास्त माहिती एकत्रित रित्या इंडेक्स करायचा प्रयत्न आहे. आपण या संकेतस्थळाला जरुर भेट द्यावी.

माधुरी said...

धन्यवाद निखिल. पुस्तक जरूर वाचा,

तुम्ही सांगितलेले संकेतस्थळ चांगले आहे. ओळखा पाहू हा प्रकार आवडला. आता जरा वेळ काढून वाचेन