Monday, September 20, 2010

वेळेचे गणित...


वेळेचे गणित...

अमेरिकेत आल्यावर सुरूवातीला भारतातील वेळ व इथली वेळ यांचा हिशोब करायची सवय केली. इथे जेव्हा रात्र तेव्हा तिथे सकाळ असे साधारण गणित मनाशी पक्के झाले. नंतर जेव्हा इथेच काही फोन करायची वेळ आली तेव्हा काही जागा आमच्या पुढे तर काही मागे आहेत वेळेच्या बाबतीत असे लक्षात आले.

click for enlargement..



सुरूवातीला विमान प्रवास करताना पण वेळेचा हिशोब चुकतोय असेच वाटायचे. शिकागोहून १२ वाजता निघालो आणि ४ तासाचा प्रवास करून एल ए ला गेलो तर घड्याळात २ वाजलेले दिसायचे. आता हळूहळू इथल्या टाईम झोन ची सवय झाली. अमेरिकेत पॆसिफिक टाईम, माउंटन टाईम,सेंट्रल टाईम आणि इस्टरन टाईम असे टाईम झोन्स आहेत. हवाई आणि अलास्का टाईम आहेतच. शिवाय काही ठिकाणी वेळ बदलत नाहीत. मला सुरूवातीला वाटायचे कशाला हा खटाटोप...सगळीकडे एक वेळ असली तर किती सोपे पडते...

ब्रिटीश लोकांनी या गोष्टीची सुरूवात केली. पूर्वी दर गावाचे घड्याळ तिथल्या लोकल टाईम प्रमाणे असे. हे टाईमिंग ग्रीनविच मीन टाईम वर अवलंबून आहे. दर १५ डिग्री वर एक असे २४ भाग केले आहेत प्रथ्वीवर. दर लोॆंजिट्युड वर एक वेळ असते. १९ व्या शतकाच्या मध्य काळात एका रेल्वे एंजिनिअरने स्टॆंडर्ड टाईम ची मागणी केली. तो कॆनडा व अमेरिका अशा रूटवर काम करत होता. काही ठिकाणी ५-६ वेगळे रेल मार्ग एकत्र येत व वेळेचा गोंधळ उडत असे. अमेरिका हा देश बराच आडवा पसरलेला आहे त्यामुळे तिथे वेगवेगळे टाईम झोन दिसतात. सगळीकडे कोॆम्प्युटर सिस्टीम असल्याने हे वेळेचे गणित बरोबर साधते. भारत व चीन या देशात सगळीकडे एकच वेळ पाळली जाते. लॆपटाॆप्स, सेल फोन या सगळ्या गोष्टी आपोआप जागेप्रमाणे वेळा बदलतात हे महत्वाचे. मला विमानांच्या वेळापत्रकाचे कौतुक वाटते तिथे एका मिनिटाची चूक झाली तर केवढे महागात पडेल...

हा टाईम वर्षभर असा रहात नाही फाॆल बॆक आणि स्प्रिंग फोॆरवर्ड असा अजून एक बदल असतो. म्हणजे स्प्रिंग ला घड्याळ एक तास पुढे आणि फाॆलला एक तास मागे. कारण सनलाईट कमी जास्त होतो. या सगळ्या प्रकारामुळे फोन करताना आधी विचार करावा लागतो आत्ता तिथे किती वाजले असतील.... प्रवासात तर नेहेमीच वेळ लक्षात घ्यावी लागते. गेल्या महिन्यात आम्ही शिकागो हून यूटात गेला. शिकागो - लास व्हेगास- यूटा --म्हणजे आधी २ तास मागे मग १ तास पुढे.... हो आणि हवाई व अलास्का चा टाईम झोन अजून वेगळा.....आणि काही जागा अशा आहेत की ते आपली वेळ बदलत नाहीत.

आमच्याकडे (ब्लूमिंग्टन) --- सकाळचे ८
भारतात - संध्याकाळचे ६ ३०
एल ए -- सकाळचे ६
यूटा --- सकाळचे ७
न्यूयाॆर्क --- सकाळचे ९

आता तुम्ही जेव्हा हे वाचाल तेव्हा तुमचा टाईम कॆलक्युलेट करा. (फाॆल मध्ये इथला बदलेल परत..)

No comments: