इंटरनेट ने जसाजसा आपला पसारा वाढवला तसे तसे बरेच लोक ते वापरायला लागले. सुरूवातीला मेल, मग हळूहळू चॆट मग इंटरनेट वरून फोन असे स्टेप बाय स्टेप कम्युनिकेशनचे चॆनेल्स वाढत गेले.
याहू ची मक्तेदारी कमी झाली, गुगल ने पाय पसरायला सुरूवात केली. स्काईप वरून आॆनलाइन क्लासेस सुरू झाले. या सगळ्या स्पर्धेत आपले फावले. आपण जास्त श्रेष्ठ हे दाखवण्यासाठी या कंपन्या जास्त सुविधा देउ लागल्या. आॆरकुट, नेटलाॆग, लिंक्डइन असे वेगवेगळे प्लॆटफाॆर्म्स तयार होु लागले आणि अशातच फेसबुक चा चेहेरा नेट वर दिसायला लागला. काॆलेज मधल्या काही मुलांनी एकत्र येउन हे सुरू केले. तिथेही बरेच राजकारण होउन (चोराचोरी) हा प्रकार फेमस झाला. आपल्या ओळखीच्या मुलांची माहिती एका ठिकाणी मिळावी व एकमेकांशी कम्युनिकेट करता यावे हा हेतू. बघता बघता फेसबुक चे लोण इतके पसरले की तो एक डिक्शनरीतला शब्द झाला आहे. असे काय आहे यात की लोकांनी एवढे डोक्यावक घ्यावे..
माझ्या मते फेसबुक वापरायला अगदी सोपे आहे. अकाउंट काढणे सोपे आहे. आपल्याला हवे तेवढेच मित्र आपण ठेवू शकतो. एखादी गो।्ट अनेक लोकांना अगदी पटकन सांगता येते. फोटो पटकन दिसतात. कुणाची एंगेजमेंट, कुणाचे बारसे, असे फोटो अगदी लगेच दूरच्या लोकांना बघता येतात. आजकाल जगभर मंडळी फिरत असतात त्यांच्या नजरेतून त्या जागा बघता येतात. मंडळी भरपूर लिंक्स टाकतात त्या बहुदा मनोरंजक असतात. अजून मोठा फायदा म्हणजे जुने मित्र भेटतात. मुलींना य मुलांना माहिती काढता येते.
मला खूप लाक म्हणतात फार वेळ जातो बाबा यात ...मला असे अजिबात वाटत नाही...सगळी सेटिंग्ज माहित करून घेतली की चांगला कंट्रोल रहातो. काही फ्रेंड्सना हाईड करून अधून मधून चेक करू शकतो. माझ्या मते छान खजिना आहे हा माहितीचा. घरी रहाणारा ज्येष्ठ नागरिक सगळ्या नातवंडांशी कनेक्टेड राहू शकतात. आपले फोटो वेळोवेळी बदलता .ेतात आणि हे सगळे खूप सोपे आहे....मग काय उघडा या खजिन्याचे दार.....
या गोष्टीवर आता एक सिनेमा येउ घातलाय...नक्की बघणार आहे.
2 comments:
फेस बुक मुळे माझे जूने मित्र मैत्रीणीं ज्यांच्याशी संबंध तुटले होते, ते पुन्हा सापडले. हा एक मोठा फायदा...
मला पण बरेच जुने लोक भेटले. एकदम मधले अंतर संपल्यासारखे वाटते. आत्ताच्या ट्रीप चे फोटो पाहून बरेच लोक जायचा प्लॆन करत आहेत.
Post a Comment