सात कप वड्या-
या वीक एण्ड ला प्रवासाला जायचे म्हणून वड्या केल्या. प्रवासात तसेही सारखे चरणे चालूच असते. या वड्या लागतात छान म्हणून तुमच्या बरोबर शेअर करते. आणि हो करायलाही सोप्या.
साहित्य-
१ कप - बेसन
१ कप - नारळ (ओला - खवलेला)
१ कप - तूप (मी अर्धा च घेते)
१ कप - दूध
३ कप - साखर ( मी अडीच घेते)
क्रृति -
सर्व साहित्य एका नाँन स्टीक भांड्यात एकत्र करावे.
मिडिअम आचेवर २५ ते ३० मि ढवळावे.
साधारण गोळा होत आला की आच बारीक करावी.
सर्व बाजूने सुटायला लागल्यावर गँस बंद करावा.
५-१० मि थांबावे
अँल्युमिनिअम फाँईल वर तुपाचा हात लावून थापावे.
वड्या कापाव्यात.
साधारण ३०-३५ वड्या होतात.
तूप व साखर थोडी कमी घेते - तेवढेच मनाचे समाधान
बेसन वड्या करतानाच भाजले जाते. खाताना कघी त्या बेसनाच्या वाटतात तर कघी नारळाच्या.
8 comments:
farach chan padarth .Aavadla
diabatic patient sathi sugar free vadi pan sanga ho!
Shreenaba...sakhareeiwajee Splenda wapra -- Diabatic patient khau shaktat aramat
Anonymous ka?
नारळीपाक देखील असाच करतात ना?? पण त्यात बेसन नाही घालत.
या सात कप वड्या जाम फेमस झालेल्या नं... :) मस्तच होतात आणि लागतातही.
Bhagyashree wadya prawasat upyogi padtat....atta barobar nelya hotya mhanun taklya blogwar
At least mention the source you found the recipe from!!
Post a Comment