Wednesday, September 8, 2010

मन हे लाल रंगी रंगले...(Zion Bryce Lake Powell)


गेल्या आठवड्यात ३ दिवसांची सुट्टी होती तेव्हा ब्राईस व झायाॆन कॆनियन्स ही युटातील दोन स्टेट पार्क्स पाहिली व त्याबरोबर लेक पोॆवेल आणि अॆंटेलोप कॆनियन्स ही अरिझोनातील ठिकाणेही पाहिली. या सर्व जागा फार सुंदर आहेत. वारा आणि पाणी यांचा सॆंडस्टोन वर परिणाम होउन सुंदर फोॆरमेशन्स तयार झाली आहेत. बरेच डोंगर लाल केशरी दिसतात. सूर्याप्रकाशानुसार ते रंग बदलतात. साहजिकच परतीच्या प्रवासात डोळ्यासमोर हेच रंग दिसत होते आणि मन हे लाल रंगी रंगले..अशी अवस्था झाली

फोटो मोठे बघण्यासाठी त्यावर क्लिक करा....
.
आमच्याकडे ३ दिवस होते तेवढ्यात ही ३ पार्कस करायचे ठरवले. एल ए, aagate इलिनाॆय अशा तीन ठिकाणाहून आम्ही लास वेगास ला पोचलो. सुटी असल्याने उशीरा पोचलो. गाडी रेंट करून रात्री निघालो. लास वेगास मघ्ये उतरताना व रस्त्यावर लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया दिसत होती. ३ तासाने झायाॆन पार्क जवळ पोचलो. मग जी पी एस च्या सौजन्याने रस्ता
चुकला
.
१२
-१३ yaa yekethatyaa रस्त्याने गेल्यावर परत फिरलो कारण एकदम एकाकी भाग होता. मग मागे येउन विचारले आणि शेवटी २ ३० ला पोचलो. तशी थोडी भिती वाटत होती कारण रस्ता एकदम सुनसान. या सगळ्या प्रकारात बाहेर चांदणे फार छान दिसत होते. आकाशातून चांदण्या आपल्या अंगावर झेपावत आहेत असे वाटत होते. आकाशात इतके ग्रह तारे दिसत होते की बस. चांदण्यांनी इतके भरलेले आकाश पहिल्यांदाच पाहिले...थॆंकस टू चुकीचा नकाशा...वाईटातून चांगले निघते ते असे. मग ३-४ तास झोप काढली व उठलो. आमच्या बरोबर कोलोरॆडोहून आलेले अजून एक जण होते. थोड्या गप्पा, खाणे करून निघालो.

आमचा झायाॆन नॆरोज चा ट्रेक करायचा ठरले. पूर्व तयारी म्हणून स्पेशल शूज, मोजे काठी घेतले. तिथे एक माहितीपटही दाखवला. तोवर सगळे भुकेजले होते मग ब्रंच करून निघालो. स्प्रिंगडेल या गावात छान छोटी दुकाने आहेत. या पार्क मध्ये आत शटल ठेवली आहे. गाड्यांना बंदी आहे. त्यामुळे पोल्युशन कमी. शटल ने जाताना मस्त डोंगर दोन्ही बाजूंना दिसतात...बरेच लाल रंगाचे आहेत. १००० ते २००० फूटा पर्यंत आहेत. पूर्वी इथे नेटिव्ह इंडियन्स रहात त्यांच्या बर्याच गोष्टी गाईड सांगत होता. शेवटच्या स्टांप पासून १ मैलावर हा ट्रेक सुरू होतो. इथले क्लिफ्स - डोंगर पाण्यामुळे कापले गेले . दोन्ही बाजूला उंच कपारी व मध्ये पाणी. खाली गोटे..माती...पाण्याला ओढ बरीच ..त्यामुळे बरीच कसरत करत जावे लागते. काठीचा खूप उपयोग होतो. प्रत्येक वळणावर वेगळे रंग दिसतात . उन्हामुळे क्लिफ्स चे रंग सुंदर दिसतात. ७५ टक्के पाण्यात व थोडे कडेने चालता येते. २ एक मैल गेल्यावर हे कडे एकदम जवळ .ेतात. फक्त २० फूट अंतर रहाते. गर्दी भरपूर पण मंडळी मजेत जातात. लहान मुले खूप भरभर जातात. कुठेही धक्काबुक्की नाही लहान (४
) मोठे सगळे चालत होते. मला वारीची आठवण झाली. आम्ही २ तासानी परत फिरलो. खूप दमलो पण मजा आली. एक वेगळा अनुभव मिळाला.


सतरंगी
लखलख चंदेरी

मधे असे छान स्टाॆप्स











याच पार्क मध्ये अजून बरेच ट्रेकस आहेत. त्यातील ऎंजल्स लॆंडिंग हा प्रसिद्ध आहे. १००० - १२०० फूट कडा चढायचे आव्हान आहे. अगदी शेवटी चेन्स लावल्या आहेत. खूप मंडळी वरपर्यंत जातात. याच्या वाटेत झाडी, सावली अजिबात नाही. काही ठिकाणी अगदी चढी चढण आहे पण मला वाटते मनुष्याला चॆलेंज ची आवड असतेच. वाॆल्टर नावाच्या इंजिनिअरने २१ स्विचबॆक्स बांधले आहेत. त्या वेळेस धोड्यांना चढायला सोपे पडावे म्हणून हे बांधले. वरून मस्त व्ह्यू दिसतो. हा ट्रेक पुढच्या वेळेस करायचे ठरले.













उभा कडा व त्यावर जातानाचा काही भाग....



यानंतर नेक्स्ट प्लान होता पेज या गावाला जायचा. जाताना बराच धाट लागतो. रस्त्याचे काम चालू होते त्यमुळे थांबत थांबत जावे लागत होते त्याचा एक फायदा झाला वाटेत मस्त सिनरी होती ती बघत बघत पुढे जाता आले. वारा पाणी आणि ग्रॆव्हिटी यामुळे झालेले इरोजन बघता ये होते. दिशा व फोर्स यानुसार डोंगरावर वेगवेगळे पॆटर्न्स तयार झाले आहेत. काही गुळगुळात, काहीवर चौकोन काहीवर रेघा तर काही वर लेअर्स. एकंदरीत डोळ्यांना मेजवानी होती.

पेज हे गाव साधारण १९५७ च्या सुमारास अस्तित्वात आले. इथे लेक पोॆवेल आहे त्याच्यावर एक धरण आहे. जवळच ५-६ मैलावर एॆंटेलोप कॆनिअन्स आहेत. त्याचे अप्पर व लोअर असे दोन प्रकार आहेत. आम्ही लोअर मध्ये गेलो. ही जागा इंडिअन रिझर्व्हेशन वर आहे त्यामुळे त्यांचा गाईड घ्यावा लागतो. जमिनीलापावसानंतर इथे उ्लॆशफ्लड हा प्रकार होतो . जमिनीला एके ठिकाणी मोठी भेग पडली आहे. त्यातून पावसाचे पाणी वेगाने आत घुसते. ते गोल गोल फिरत पुढे जाते आणि त्यामुळे आत स्वर्ल्स तयार झाले आहेत, कुंभार जसे लाल माठ बनवतो तसा हा रंग दिसतो. आतला रस्ता आगदी अरूंद आहे. काही ठिकाणी शिड्या लावल्या आहेत पण एकंदर कसरत करावी लागते. अप्पर कॆनिअन्स एवढे अवघड नाहीत. इथे भरपूर फोटोग्राफर्स होते. वरून येणारा प्रकाश परिवर्तन होउन वेगवेगळे रंग दिसतात. डोळ्यांना वेगळे रंग दिसतात आणि फोटो फार वेगळे दिसतात.




आत जायचा रस्ता














दिसणारा रंग

















कॆमेरा दाखवतो ते रंग





त्या नंतर लेक पोॆवेल वर बोट राईड घेतली. पाण्याचा रंग एकदस निळाशार होता. बोट बरीच आत घेउन जातात. अगदी कडेच्या क्लिफ्स ना लागेल असे वाटते. ह्या लेकची लांबी वेस्ट कोस्ट लांबीहून जास्त आहे म्हणे. आयजेनहोवर च्या काळात ते बांधले. या लेकमुळे एल ए यांना पाणी मिळते



















संध्याकाळी वाटेवर साउथ ८९ होॆर्स शू बेंड बघायला गेलो. थोडा उशीर झाला होता त्यामुळे जरा पळापळ झाली पण इट वोॆज अमेझिंग. कोलोरॆडो नदी वहाताना बाजूचे इरोजन जोस्त झाले त्यामुळेअसा शेप तयार होतो. ही बेट तयार होण्यापूर्वीची स्थिती. अजून काही वर्षांनी इथे बेट तयार होईल.इथे पूर्ण फोटो काढायला वाईड अॆंगल लेन्स लागते.







शेवटच्ा दिवस होता ब्राईस कॆनियन चा. इथे बरेच गार होते. शटलची सोय इथेही होतीच. सुरूवातीला आम्ही रिम वरून चक्कर मारली. वरून मस्त नजारा दिसत होता. इथे गुलाबी, केशरी रंग जास्त होता. आपल्याला क्लिफ्स जवळून बघण्यासाठी खाली उतरावे लागते. फार पूर्वी इथे पाणी होते. त्यानंतर अनेको (मिलिअन्स) वर्षानी बदल होत होत हे खडकांचे पुतळ्यासारखे गिसणारे आकार तयार झाले. गुलाबी, केशरी, पांढरा, काळा हे रंग दिसतात. सूर्य प्रकाश जसा बदलेल तसे हे रंग छटा बदलतात.
आपण जसे बघू तसे आकार शोधत बसतो. या आकारांना हुडुज म्हणतात. पाणी पावसाचे आणि बर्फाचे या खडकात फटीत साठते. टेम्परेचर डिफरन्स खूप असल्याने रात्री बर्फ व दिवसा पाणी आसे चक्र चालू असते. त्यामुळे इरोजन होते. वरचा थर कडक असतो तो तसाच रहातो व शेवटी खालचा भाग कमकुवत झाल्यावर पडतो. मघूनच रंगीत वाळूचे लेअर्स खूप छान दिसतात.













तिथे एक रेंजर चे प्रेझेंटेशन ऐकले. खूप छान माहिती सांगितली. ग्रॆंड कॆनिअन पासून ब्राईस पर्यंत ५ भाग पडताच. चाॆकलेटी,व्हर्मिलिओॆन,पांढरा,राखी,व गुलाबी असे वेगवेगळे रंग दिसतात. प्रत्येक भागातले खडक वेगळे, इरोजन चा रेट वेगळा, त्यात सापडणारे प्राणी वेगळे...हा साधारण ६००० फूटाचा भाग ५ स्टेप्स सध्ये डिव्हाईडेड आहे. याला ग्रॆंड स्टेअरकेस म्हणतात. यावर बराच अभ्यास केलेला आहे लोकांनी.

एकंदर हे २-३ दिवस डोळे भरून निसर्ग बघितला, लाल रंगाच्या मोहात पडलो. मनसोक्त चांदणे पाहिले. काही ठिकाणी परत जायचे ठरले.

मन हे लाल रंगी रंगले..........


2 comments:

भानस said...

माधुरी, सगळे फोटो मस्तच आलेत आणि वर्णनही. लगेच मार्कींग करून ठेवलेय. जायलाच हवे नं आता. :)

माधुरी said...

हो जायलाच हवे. निदान ८-१० लोकांनी तरी जाणार असे सांगितले आहे. खूप कलरफूल आहे. अमेझिंग. फेसबुक वर अमोल च्या लिंक्य आहेत..जमल्यास पहा..प्रोफेशनल पिक्स आहेत.