Thursday, September 16, 2010

गणपति बाप्पा मोरया....






गणपति बाप्पा मोरया....

काल इ सकाळ वर गणपति ची आरास, फोटो बघत होते. सगळीकडे गर्दी, उत्साह दिसत होता. खरेच या १० दिवसात सगळे वातावरण कसे मंगलमय होउन जाते ना...

लोकमान्यांनी रूजवलेली ही प्रथा आज तयाचा वेलू गेला गगनावरी अशा अवस्थेला येउन पोचली आहे. त्या काळात सर्व जातिच्या लोकांनी एकत्र येउन, भेदभाव विसरावेत हा मुख्य हेतू होता. त्याला विविध गुणदर्शनाची जोड दिली त्यामुळे लोकांना कला प्रदर्शनाला चांगले व्यासपीठ मिळाले. ही प्रथा सगळ्यांना नक्कीच भावली आणि त्यामुळे इतकी वर्षे ती चालू आहे ,,,दरवर्षी नव्या उत्साहाने चालू आहे.

सार्वजनिक मंडळे वेगवेगळे देखावे करतात हा प्रकार छान वाटतो. हलते देखावे लहान मुलांच्या छान लक्षात रहातात आणि नकळत मुलांवर संसकार घडत असतात. पुराणातल्या कथा टी व्ही वर बघण्यापेक्षा अशा छान लक्षात रहातात. चालू घडामोडींवर पण भर असतो त्यामुळे त्यावरही आपोआप चर्चा होते. ठिकठिकाणी गाणे, नाच, वादन यांचे कार्यक्रम होतात व त्यामुळे बरेच उभरते कलाकार लोकांसमोर येतात. वेगवेगळ्या मंडळांची देखावे करण्यात स्पर्धा होते. एकत्र येउन काम करायचा अनुभव मिळतो. मूर्ति कारागीर, डेकोरेशन वाले, फूलवाले, प्रसाद बनवणारे, भाजीवाले या सगळ्यांना यातून धंदा मिळतो. गणपति अथर्वशीर्ष व इतर मंत्र पठणाचे एकत्रित कार्यक्रम होतात. देखावे हघण्यातील मजा घेता येते.

आता जग जवळ आले आहे. बाहेरच्या देशात ही मंडळी मोठ्या उत्साहाने गणपति बसवतात. आणि या सणाला सर्व नुसतेच मराठी नाही तर सर्व भारतीयांना हजेरी लावायची असते हे विशेष... अगदी विद्यार्थी सुद्धा यात मागे नाहीत. सजावट, आरत्या, प्रसाद, कार्यक्रम सगळे लहान प्रमाणात का होईना साजरे होते.

आजकाल १० नंतर ध्वनिप्रक्षेपक बंद करतात हे चांगले पाउल आहे. वाहतुकीची गैरसोय, आवाजाचे प्रदुषण, वर्गणी साठी केलेली जबरदस्ती, गर्दीचा फायदा घेउन केलेली छेडछाड , मंडळातील हेवेदावे हे चॆलेंजेस आहेत पण ते यापुढील पिढ्यांनी सोडवून गणेशउत्सवाचा मूळ हेतू टिकवून हा ठेवा पुढे न्यावा ........

1 comment:

mynac said...

माधुरी ताई,
सप्रेम नमस्कार.
आमच्या पुण्यातील दगडूशेठचा फोटो(इथ असंच म्हणायची प्रथा असल्याने मी तसच्या तस्स लिहील आहे,मला माफ करा)आपल्या ब्लॉगवर बघून आनंद झाला.मुळात लो.टिळकांनी सुरु केलेल्या गणेश उत्सवाचे स्वरूप काळाच्या ओघात बदलत गेले नि ते मग कुणालाही मान्य असो वा नसो पण वस्तुस्थिती हि आहे.असो.फक्त गेल्या काही वर्षां पासून रात्री १० नंतर स्पीकर बंद करावयाच्या नियमा मुळे आम्हा मध्यवस्तीत राहणाऱ्या पुणेकरांची मात्र खूपच सोय झाली हे मान्य करावे लागेल.बाकी काहीही असो ह्या १० दिवसांच्या उत्सवा मुळे आर्थिक उलाढालीस प्रचंड चालना मिळते.आठवा २-३ वर्षापूर्वी मंदी सदृश परिस्थितीतील साउथ आफ्रिके मधील आय.पी.एल.चा उत्सव.त्याच्या मुळे त्या देशाच्या अर्थव्यवस्थेस चालना मिळावयास खूप मदत झाली होती.असो.
आपणास ह्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा.धन्यवाद.