अमेरिकेत आल्यावर जास्त काळ रहायचे असल्यास वर्क व्हिसा, रेसिडँट कार्ड सिटीझनशिप या चक्रातून सगळे जात असतात. हे केले म्हणजे व्हिसा ची कटकट रहात नाही. जगात फिरताना बरेच ठिकाणी व्हिसा घ्यावा लागत नाही हा दुसरा मोठा फायदा. काही नोकरीच्या ठिकाणी जरूरी असते सिटीझनशिपची.
नुकतीच अमेरिकन सिटीझनशिप साठी परिक्षा दिली. या लोकांनी सगळे पद्धतशीर करून ठेवले आहे. कागदपत्र खूप मागतात. कंटाळा .ेईपर्यंत. त्यानंतर फिंगरप्रिंट घेतात...९ प्रकारचे फिंगरप्रिंटस स्टॆडर्ड मानले जातात. आमचे घोडे तिथेच अडले. २ वेळा त्यांनी प्रयत्न केला मग बहुदा आहे त्यावर समाधान मानले. मागच्या वेळेस पोलिस स्टेशन वरून पत्र आणायला लागले होते ( काय काय करावे लागते...) आशा केसेस मध्ये प्रिंटस बघायला लागले तर काय करतात कोणास ठाउक... हाताला जास्त क्रिम लावले तर, जास्त साबण लावला तर असे होते आशा अनेक अफवा आहेत. यानंतर १०० प्रश्न आभ्यासाला देतात आणि त्यातले १० प्रश्नांची उत्तरे अपेक्षित असतात. १-२ अगदी सोपी वाक्ये लिहायला देतात. एक मात्र नक्की या देशाबद्दल, तिथला बेसिक इतिहास भूगोल व गव्हर्नमेंट याची माहिती होते - माझ्यासारख्या इतिहास न आवडणारे असताताच ना...
ही सगळी तयारी चालू असताना सहज मनात विचार आला की भारतात कशी असते ही प्रक्रिया. ही परिक्षा घेतात का... तिथे काय परिस्थिती आहे...तसेही भारतात घुसखोर खूप आहेत. व्हिसा सारखे कागदपत्र कितपत तपासले जातात माहित नाही. आजकाल आयडेंटिटी कार्ड सारखे कार्ड देणार आहेत असे वाचनात आले होते. यांच्याप्रमाणे भारताहद्दल जर टेस्ट तयार केली तर कशी असेल असा बसल्या बसल्या विचार करत होते... त्यातून हे प्रश्न डोक्यात आले....
१. भारताची घटना कधी लिहिली
२. सर्वात लांब नदी कोणती
३. कारगिल युद्धाच्या वेळी कोण पंतप्रधान होते
४. भारतात किती राज्ये आहेत
५. टॆक्स भरण्याची शेवटची तारीख काय
६. पाकिस्तान बरोबर किती युद्ध झाली
७. मुक्तिविहिनी ची स्थापना कोणी केली
८. पंतप्रघान व उप पंतप्रधान यांची नावे सांगा
९. आपले राष्ट्रपिता कोण
१०. लोकसभेत किती जागा असतात
११. तुमच्या गव्हर्नर चे नाव
१२. २ क्रांतिकारकांची नावे
१३. आपली आॆफिशिअल भाषा कुठली आहे
१४. राष्ट्रपतींचे नाव
१५. भारतावर आक्रमण केलेल्या दोन सत्ता
१६. पद्मविभूषण मिळालेल्या २ व्यक्ति
१७. सर्वात उंच शिखर
१८. सह्याद्रीतले २ किल्ले
१९. भारतात नांदणारे २ धर्म
२०. आदिवासींच्या २ जाति
२१. राज्यसभेत किती मेंबर्स असतात
२२. आपले राष्ट्रगीत व त्याचे लेखक
२३. झेंड्यावर चे ३ रंग काय सांगतात
२४. २ थंड हवेची ठिकाणे
२५. राजकारणातील २ प्रमुख पार्टीज
२६. पश्चिमेकडे असलेला समुद्र
२७. पूर्वेकडे असलेला समुद्र
२८. २ सार्वजनिक सुट्ट्या
२९. २ प्रेक्षणिय स्थळे
३०. मुख्यमंत्रयांचे नाव
३१. ब्रिटीश भारतात येण्याचे कारण
३२. लोकमान्य टिळकांचे कार्य
३३. भारताचे घटनाकार
३४. ताजमहाल कुठे आहे
३५. मतदान करण्यासाठी कगती वय लागते
३६. २ भारतरत्न
३७. पहिले पंतप्रधान कोण
३८. २ क्रिकेट खेळाडूंची नावे
साधारण अशा प्रकारचे प्रश्न विचारतात .....

4 comments:
माधुरी, भारतात सिटीझनशीप मिळवण्यासाठी, कुठूनतरी बोगस रेशनकार्ड ची व्यवस्था केली, कुठलीतरी भारतीय भाषा बोलताना आली (मग ती तोडकीमोडकी का असेना) की बस झाले, झालात तुम्ही भारतीय :(
प्रश्न क्र. १३ मधे ’राष्ट्रभाषा’ शब्द वापरलाय, त्या ऐवजी ’कुठलीही एक कार्यालयीन भाषा’ वापरावा.
यावरुनच कळतं की राष्ट्रभाषेविषयी आपल्याकडे किती गैरसमज आहे.
प्रशांत यांच्याशी सहमत. आपल्या देशाला कुठलीही राष्ट्रभाषा नाही. आहेत त्या सगळ्या अधिकृत भाषा.
http://en.wikipedia.org/wiki/Languages_of_India
बदल केला आहे. मी शाळेत असताना हिंद्ी च्या परिक्षा मात्र राश्ट्रभाषा १-२-३ अशा दिल्या आहेत. असो. हे वाक्य घालताना अशा प्रतिक्रिया अपेक्षित होल्या.
Post a Comment