Tuesday, November 23, 2010

समर्पण

समर्पण ...

अमेरिकेत आम्ही एका अगदी छोट्या गावात रहातो. सुदैवाने इथे मराठी आणि भारतीयांची संख्या खूप आहे. ड्रायव्हिंग डिस्टन्स कमी असल्याने लोक आपल्या कला गुणांना वाव देउ शकतात. दर वीक एंड ला काहीतरी कार्यक्रम असतोच. गेल्या आठवड्यात तेलगु, क्लासिकल, बांलिवूड अशा तीन कांन्सर्टस झाल्या. शिवाय बोलक्या बाहुल्या चा प्रयोग ही झाला. पुण्यात असल्यासारखे वाटत होते. दर वर्षी नाटक ही असतेच. बरे हे सगळे मंडळी आपली कामे संभाळून करतात. आशा आहे की हे असेच चालू राहील.

गेल्या आठवड्यात असाच एक कार्यक्रम झाला. कार्यक्रमाची थीम होती भजन, अभंग ई. तेलगु, कानडी , मराठी अशा सगळ्या भजनांचा समावेश होता. माझा सहभाग पडद्यामागे असतो. अर्थात त्यातूनही खूप शिकायला मिळते. तुम्ही पण आनंद घ्या या कार्यक्रमाचा......
एक सूर चराचर छायो निर्गुणि भजन
हरि सुंदर नंद मुकुंदा हे भजन दोन स्पीड मद्ध्ये आहे. पुण्यात अंतर्नाद मध्ये ते सादर झाले होते.
राम का गुणगान करिये
चदरिया झिनी रे झिनी निर्गुणि भजन - संत कबीर
जोहार मायहाप जोहार संत चोखा मेळा
सुनता है गुरू ग्यानी
निर्गुणि भजन - संत कबीर
जो भजे हरि को सदा भैरवी
क्रिष्णाने भेगणे.. याचे हिंदी व्हर्जन कलोनियल कझिन्स च्या अल्बम मध्ये होते
सामगान - कर्नाटकी स्टाईल (आपला मालकंस)
ओंकार प्रधान रूप गणेशाचे संत तुकाराम
पायोजी मैने व ठुमक चलत

Thursday, November 4, 2010

दिवाळी - आठवण

आमची शुभेच्छापत्रे या लिंक वर आलेला प्रतिसाद पाहून खूप छान वाटले. परत परत या साईटला लोक जातात - काही जणांनी तरी या वर्षी स्वलिखित कार्ड्स नक्कीच बनवली असतील. असा प्रतिसाद दिल्याबद्दल वाचकांचे मनापासून धन्यवाद.

या वर्षी गेल्याच महिन्यात सासूबाई गेल्याने आमच्याकडे दिवाळी नाही. त्यांच्या आठवणीत लिहिलेल्या या चार ओळी...





इतर कार्डे या लिंक वर आहेत.

Wednesday, November 3, 2010

मिशन मिशनरींचे...

मिशन मिशनरींचे...

अमेरिकेत आजकाल भारतीय खूप आहेत. आपले खाणे, कपडे व क्रिकेट याबद्दल खूप आकर्षण असते. आपले कल्चर दाखवण्यासाठी अघूनमघून भारतीय गोश्टी डिस्प्ले करतात. असाच काल एका चर्च मध्ये इंडिया डे होता. तिथे आजकाल बरेच भारतीय जातात म्हणून त्यांनी कल्चरल एक्स्चेंज नावाखाली हा कार्यक्रम ठेवला होता. ९-१० स्टेट्स चे स्टाॆल्स मांडले होते. वेगवेगळ्या भाषा , भांडी, किराणासामान, आणि दागिने हेही होतेच. एका ठिकाणी क्रिकेट बद्दल माहिती सांगणारा विभागही होता. साडी नेसवण्याचीही सोय होती. मी म्युझिक स्टाॆलबरोबर गेले होते. लोकांना तबला, पेटी व वीणा यांचे प्रात्यक्षिक होते. खाण्याच्या विभागात चहा समोसा ठेवला होता. आपल्या वेगवेगळ्या भाषा - लिपी, खाणे व क्रिकेट याबद्दल अमेरिकेत खूप आकर्षण आहे.

त्यानंतर एका मिशनरी बाईचे भाषण होते. मी नेहेमी मिशनरींबद्दल लोकांकडून ऐकलेले म्हणून म्हटले बघू तरी काय म्हणते ते.... त्या बाईंनी ५० वर्षे कलकत्त्याला राहून काम केले आहे. सुरूवातीला टेंट मध्ये राहून लोकांना ंमदत केली. भारताच्या प्रगतीबद्दल सुरूवातीला ती बोलली. नंतर मात्र उपासमार, बेकारी, शिक्षणा ला वंचित मुले, याची भरपूर आकडेवारी दिली. अर्थात त्यात खोटे काही नव्हते. अगदी सुरूवातीला अापल्या धर्मातील जातिवाद, अंघश्रद्धा व अडाणिपणा याचा पुरेपूर फायदा या मिशनरींनी घेतला. खालच्या जातीतिल लोकाॆना शिक्षणापासून दूर ठेवले होते त्यांना जवळ केले. एखाद्या घरात आंधळे, डिफाॆर्म मूल जन्मले तर गेल्या जन्मीचे पाप समजून त्यावर उपचार करत नसत. औषधाला पैसेही नसत अशांना या लोकांनी जवळ केले .. साहजिकच ही मुले त्या धर्मात ओढली गेली. अगदी कचराकुंडीतील मुले आणून ती वाढवली. शाळा काढल्या , दवाखाने काढले व दोन वेळचे जेवण पुरवले. अन्न, वस्त्र व निवारा या तिन्ही गरजा भागतात म्हटल्यावर लोक तिथे जायला लागले. हा सगळा खर्च इथल्या चर्चच्या पैशावर चालतो.

हे सगळे ऐकल्यावर वाटले की खरेच भारतात आज बाहेरून एवढी मदत घेण्याची गरज आहे का....जगातील श्रीमंत लोकात आज काहींचा नंबर लागतो. आपल्याकडेही अनाथआश्रम धर्मशाळा आहेत मग या लोकांचे का फावते....आपण म्हणतो की ही मंडळी धर्मप्रसार करतात पण एक नक्की की त्यासाठी कष्ट व सेवा ही करतात. काही लोकांचे म्हणणे असे असते की कोणाला आजकाल खायची भ्रांत नाही पण परिस्थिती अशी आहे की अशा गरजू लोकांपर्यंत आपण पोचत नाही आपला परिघ खूप छोटा असतो. त्यापलिकडे बघायला हवे. खेड्यात रहातात त्यांना वेगळा अभ्यासक्रम केला पाहिजे. आपली मंदिरे दानी व्यक्ति यांचे पैसे योग्य तर्हेने वापरले गेले पाहिजेत. नियोजन केल्यास आणि यात कोणितरी लक्ष घातल्यास अन्न वस्त्र निवारा पुरवायची क्षमता आपल्यात नक्की आहे. शिक्षण देणारी भरपूर मंडळई आहेत या सगळ्या गोष्टींचा विचार करून आलेली मदत योग्य ठिकाणी वापरण्याचे भान असणारा नेते आता यायला हवा.