Wednesday, January 12, 2011

साद देती सह्याद्रीचे कडे....




साद देती सह्याद्रीचे कडे....

भारतात महाराष्ट्रात औद्योगिक प्रगति बरीच झाली आहे. रस्त्यांनी शहरे जोडली गेलेली आहेत. झाडी, जंगल हा प्रकार अगदीच कमी. सह्.ाद्री चे किल्ले,गड मात्र ताठ मानेने उभे आहेत. आजकाल व्लाॆगवर, फेसबुकवर, वर्तमानपत्रात बरेच लोक यावर लिहितात. अनुभव, फोटो व इतर माहिती बरीच दिसते. आजकाल बरीच मंडळी या सहलींचे आयोजन करताना दिसतात. तरूणाई ट्रेक कडे परत वळत आहे हे पाहून छान वाटते.

हे सगळे वाचताना असे वाटले या सगळ्यांनी एकत्र येउन एका साईटवर सगळी माहिती एकत्रित ठेवली तर किती छान होईल. बरे हे सगळे स्वानुभवातुन आलेले असल्याने रंजक तसेच माहितीपूर्ण ही असेल. ३-४ लोकांनी एकत्र येउन थोडे थोडे काम वाटून घेतले तर हे काम सहज होण्यासारखे आहे. नवीन जाणारा माणूस या अनुभवातून बरेच काही शिकू शकतो. आणि एका प्रकारे माहिती असली की चांगले वाटते. गडावर जायचा नक्की रस्ता कुठला हे माहित असावा,,,तुम्ही म्हणाल की अशा चुकण्यात मजा असते ... मान्य आहे पण काहींना ती सजा वाटू शकते. गाईडनी पैसे खूप सांगणे यावर पण कंट्रोल राहू शकतो.

मी १०-१२ गडावर गेले आहे मग देशाबाहेर राहिल्याने तिथल्या गोष्टी जास्त बघितल्या गेल्या. अमेरिकेत हिंडताना एक गोष्ट जाणवते, कितीही बारीक गोष्ट असो त्याची माहिती व्यवस्थित लिहिलेली असते. (त्याबद्दल दुमत नसते) गेल्यावर व अजून २-३ ठिकाणी नकाशा लावलेले असतो. रेंजर लोक ३-४ वेळा माहितीपूर्ण प्रेझेंटेशन देतात. अघून मघून साघ्या लाकडाच्या खांबावर पाट्या लावून त्यावर थोडक्यात माहिती दिलेली असते. भौगोलिक ऐतिहासिक महत्व लिहिलेले असते. मी काही लोकांच्या ब्लाॆगवर वाचले की काही किल्ल्याबद्दल तिथल्या लोकांनाही माहिती नसते. सरकार या गोष्टीत लक्ष घालेल अशा वाट बघण्यापेक्षा काही लोकांनी एकत्रित येउन केले तर हे काम लवकर होईल. स्पांन्सर नक्की पुढे येतील आणि तसा फार खर्च येणार नाही.

आपण बाकी गोष्टी जितक्या पटकन काॆपी करतो तसे हे ही करायला हवे. गाईडच्या बाबतीत पण गावातल्या लोकांना एकत्र करून शिकवले तर मुले छान काम करू शकतात. आम्ही रायगडावर याचा अनुभव घेतला. तिथे बाबासाहेब पुरंदरे यांनी मुलांना शिकवून तयार केले आहे. ती मुले कविता म्हणून सगळी माहिती सांगत होती. ऐतिहासिक माहिती ज्याबद्दल दुमत आहे ती लिहिणे टाळावे. शिवाजी महाराजांनी केलेले काम मोठे आहे ते महत्वाचे. डिटेल्स मध्ये तफावत असू शकते. आपल्याकडे इतिहास नीट लिहिलेला नाही .. बखरकार पण वेगवेगळे इंटरप्रीटेशन करणार त्यामुळे वादाचे मुद्दे टाळून हे काम करावे लागेल. लिहिलेल्या पाट्या खराब न करणे, त्यावर काही न लिहिणे हे हळूहळू लोक शिकतील अशी आशा ठेवायला काहीच हरकत नाही. काही गडावर आत्ता असे नकाशे आहेत पण अगदीच कमी.

काय बाहेर राहून इथल्या उचापति कशाला अशा खूप लोकाॆच्या प्रतिक्रिया होतील पण मला हे मनापासून वाटते हे खरे.

Sunday, January 2, 2011

शिक्षण असेही

शिक्षण असेही...

गेल्या दशकात भारताचे नाव आउटसोर्सिंगच्या क्षेत्रात चमकते आहे. साॆफ्टवेअर मध्ये तर भरपूर मागणी आहे. आणि त्यात आपली मंडळी ठसा उमटवत आहेत. मेडिकल, सेवा, अभियांत्रिकी या क्षेत्रातही भरपूर वाव आहे. हळूहळू त्यातही लोकांना कामाच्या संघी मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर परवा एक लेक्चर ऐकले आणि वाटले की आपण (भारतीय) लोकांना इतके काम करून देतोय आणि आपल्याकडे मात्र शिक्षणाचे आउटसोर्सिंग चालू होते का काय....

अमेरिकेत आल्यावर सुरूवातीला व्हाॆलेंटिअरिंग, फंड रेझिंग बघून मी जाम इंप्रेस झाले होते. गिव्हींग बॆक हा कन्सेप्ट खूप दिसतो. शाळेत, ओल्ड पिपल होम, बेवारशी प्राणी सांभाळणे, त्यांचे संवर्धन करणे खूप दिसते. अगदी लहान पणापासून हे शाळेत शिकवले जाते. अशातच काही सेवाभावी संस्था भारतातील शाळांसाठी मदत करताना दिसून आल्या. अगदी खेड्यापाड्यात जाउन तरूण मुले ही कामे करतात ते पाहुन कौतुक वाटते. आणि - आम्हाला काही गरज नाही, उगाच येउन कामे करतात, आजकाल कुणालाही गरज नाही, भारतात पैशाची कमी नाही... हे वर ऐकावेही लागते. अमेरिकेतून आलेल्या मदती बद्दल मी हेच जास्त ऐकले आहे. एकल विदयालय अगदी खेड्यात ३६००० एक शिक्षकी शाळा चालवते.

टीच फाॆर अमेरिका या धरतीवर टीच फाॆर इंडिया हा असाच एक उपक्रम पण त्यात वेगळेपण आहे. याची मुख्य भारतीयच आहे. पुणे व मुंबई मिळून ६५ शाळात हे लोक काम करतात. ज्या मुलीने अनुभव सांगितले ती अमेरिकन आहे. ती तिथे नोकरी करते. सरकारी शाळेत - इंग्लीश मिडिअम त्यांचा प्रयोग चालतो. प्रथम तिने सांगितले की ह्या लो इन्कम ग्रुप च्या शाळा असल्याने पालक मुलांच्या अडचणी सोडवू शकत नाहीत. तिथल्या शिक्षकांना २००० रू पगार मिळतो. बरीच मुले पाठांतर करतात व समजून न घेता शिकतात - मार्क कमी पडतात मग त्यांना शिकवणी ला पाठवतात... त्यामुळे शाळेत यायला नाखूष असतात. काही मुले यातूनही व्यवस्थित शिकतात. अशा शाळात २री ते ४ थी मध्ये १ वर्ग सिलेकट करून तिथे अमेरिकन पद्धतिने हे लोक शिकवतात नीट समजावतात, जास्त वेळ मुलांना देतात. साहजिकच मुले शाळेत जायची वाट बघतात, शाळा आवडायला लागते. २-३ महिन्यात त्यांना मुलांच्यात फरक दिसला. आत्मविश्वास वाढलेला दिसला, वाचन सुधारले.

सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे शिक्षक म्हणजे नुकतीच ग्रॆज्युॆेट झालेली भारतातील मुले आहेत. हुशार मुले आहेत. २ वर्षाची कमिटमेंट देउन ही मुले काम करतात. अगदी चांगल्या प्रकारच्या नोकरीचा मोह सोडुन २ वर्षे आपल्या देशाला द्यायची यांची तयारी आहे. वेळप्रसंगी पालकांशी भांडुन या कामासाठी मुले तयार होतात कारण त्यांना देशासाठी काहीतरी करायचे आहे. ही गोष्ट त्या मुलीला खूप इन्स्पायर करून गेली. तरूण मुलांच्यात ही शिक्षणाची ओढ बघून छान वाटले. त्यासाठी त्यांना थोडा जास्त पगार दिला जातो व हे पैसे ट्रस्ट कडून फंड जमा करून मिळवले जातात. हा भार सरकारवर पडत नाही.
आता मद्रास, हैद्राबाद व दिल्ली इथेही या शाळा चालू होणार आहेत. इंग्लिश मिडिअम असले की बरेच जण भाग घेउ शकतात . खेड्यात पुढे जायचा या लोकांचा विचार आहे पण त्यासाठी लोकल भाषेचे शिक्षक घ्यावे लागतील.

हे सगळे अनुभव ऐकल्यावर एवढेच वाटले हे सगळे शिक्षण खात्याला दिसत नाही का...आपल्या देशात नक्कीच चांगले लोक आहेत जे शिक्षणात बदल आणू शकतात मग ते का होत नाही.... त्यासाठी असा घास का घ्यावा लागतो....

Friday, December 31, 2010

शुभेच्छा....


न्यू ईयरचं एखादं तरी, केलं असेलंच रेझोल्यूशन् ।
वर वर नाही म्हटलं तरी, ठरवला असेल हेल्दी ऑप्शन् ।।
शुगर, फॅट् कमी करावी, कोलेस्टेरॉलचे रेग्यूलेशन् ।
वेट्, टेन्शन् कमी करायला योगासनं अॅन्ड मेडिटेशन्।।
आपल्या विशेस सफल होवोत, सर्वांचं मिळो कोऑपरेशन् ।
नवं वर्ष सुखाचे जावो, खूप मिळो सॅटीस्फॅक्शन् ।।

Tuesday, December 7, 2010

काही चांगल्या साईटस

काही चांगल्या साईटस...

इंटरनेट वर सतत नवीन नवीन साईटस् येत असतात. काही साईटस आपण एक दोनदा बघतो व सोडून देतो, काही मात्र परत परत बघितल्या जातात. मनोरंजन किंवा माहितीपूर्ण साईटस नेहेमीच छान वाटतात. नवीन काहीतरी बघायला मिळाले की छान वाटते. तुम्ही पण भेट देउन बघा नक्की आवडतील.

एखादी गोष्ट कशी काम करते यासाठी ही साईट बघा. आपल्या आजूबाजूच्या गोष्टी कशा काम करतात यात छान समजावून सांगितले आहे. सायन्स, आर्ट, मनोरंजन, आरोग्य, प्राणीजीवन असे अनेक भाग आहेत. मी नेहेमी ठरवते की दर आठवड्याला एक गोष्ट बघायची पण तसे होत नाही. आपण खूप गोश्टी वापरतो पण त्या कशा चालतात याचा विचार करत नाही या साईट मुळे खूप माहिती झाली. इथे याच नावाचा एक चॆनेल पण आहे . चांगल्या फिल्म्स बनवतात हे लोक.

मला आवडणारी दुसरी साईट म्हणजे आपली मराठी . अमेरिकेत राहून मराठी कार्यक्रम बघायला ही साईट छान आहे. मराठी सिनेमे. नाटके, सा रे गा मा , फू बाई फू यावर बघता येते. राजा शिवछत्रपति पूर्ण यावर पाहिली. उत्तम क्वालिटी. आता हळुहळु सगळ्या ची क्वालिटी सुधारेल. बरेच वेळा भारतात आमच्या कडे पिक्चर बघायच्या आधी इथे बघितला जातो. या साईटच्या कार्यक्कर्त्यांना धन्यवाद.

आजकाल आॆनलाइन सिनेमे बघायचे दिवस आहेत. कोॆलेज मध्ये तर खूपच बघतात. पायरसी थांबवण्यासाठी एक उपाय म्हणून या साईटवर चांगले सिनेमे बघता येतात. ईथे तसे नियम कडक आहेत त्यामुळे ही साईट खूप लोकप्रिय आहे. टी व्ही चे एपिसोडस आपल्या सवडीने बघता येतात. या साईटवर हवे ते सिनेमे बघायला मिळाल्यामुळे आणि कडक नियमांमुळे पायरसीला बराच आळा बसतो.

टेड.कोॆम साईट पण खूप छान आहे. विविध विषयातील भाषणे यावर बघता येतात. वेगवेगळ्या देशातील लोकांचे विचार, शोधांची माहिती यावर बघता येते.

आशा आहे की या साईटस तुम्हाला नक्कीच आवडतील.

Tuesday, November 23, 2010

समर्पण

समर्पण ...

अमेरिकेत आम्ही एका अगदी छोट्या गावात रहातो. सुदैवाने इथे मराठी आणि भारतीयांची संख्या खूप आहे. ड्रायव्हिंग डिस्टन्स कमी असल्याने लोक आपल्या कला गुणांना वाव देउ शकतात. दर वीक एंड ला काहीतरी कार्यक्रम असतोच. गेल्या आठवड्यात तेलगु, क्लासिकल, बांलिवूड अशा तीन कांन्सर्टस झाल्या. शिवाय बोलक्या बाहुल्या चा प्रयोग ही झाला. पुण्यात असल्यासारखे वाटत होते. दर वर्षी नाटक ही असतेच. बरे हे सगळे मंडळी आपली कामे संभाळून करतात. आशा आहे की हे असेच चालू राहील.

गेल्या आठवड्यात असाच एक कार्यक्रम झाला. कार्यक्रमाची थीम होती भजन, अभंग ई. तेलगु, कानडी , मराठी अशा सगळ्या भजनांचा समावेश होता. माझा सहभाग पडद्यामागे असतो. अर्थात त्यातूनही खूप शिकायला मिळते. तुम्ही पण आनंद घ्या या कार्यक्रमाचा......
एक सूर चराचर छायो निर्गुणि भजन
हरि सुंदर नंद मुकुंदा हे भजन दोन स्पीड मद्ध्ये आहे. पुण्यात अंतर्नाद मध्ये ते सादर झाले होते.
राम का गुणगान करिये
चदरिया झिनी रे झिनी निर्गुणि भजन - संत कबीर
जोहार मायहाप जोहार संत चोखा मेळा
सुनता है गुरू ग्यानी
निर्गुणि भजन - संत कबीर
जो भजे हरि को सदा भैरवी
क्रिष्णाने भेगणे.. याचे हिंदी व्हर्जन कलोनियल कझिन्स च्या अल्बम मध्ये होते
सामगान - कर्नाटकी स्टाईल (आपला मालकंस)
ओंकार प्रधान रूप गणेशाचे संत तुकाराम
पायोजी मैने व ठुमक चलत

Thursday, November 4, 2010

दिवाळी - आठवण

आमची शुभेच्छापत्रे या लिंक वर आलेला प्रतिसाद पाहून खूप छान वाटले. परत परत या साईटला लोक जातात - काही जणांनी तरी या वर्षी स्वलिखित कार्ड्स नक्कीच बनवली असतील. असा प्रतिसाद दिल्याबद्दल वाचकांचे मनापासून धन्यवाद.

या वर्षी गेल्याच महिन्यात सासूबाई गेल्याने आमच्याकडे दिवाळी नाही. त्यांच्या आठवणीत लिहिलेल्या या चार ओळी...





इतर कार्डे या लिंक वर आहेत.

Wednesday, November 3, 2010

मिशन मिशनरींचे...

मिशन मिशनरींचे...

अमेरिकेत आजकाल भारतीय खूप आहेत. आपले खाणे, कपडे व क्रिकेट याबद्दल खूप आकर्षण असते. आपले कल्चर दाखवण्यासाठी अघूनमघून भारतीय गोश्टी डिस्प्ले करतात. असाच काल एका चर्च मध्ये इंडिया डे होता. तिथे आजकाल बरेच भारतीय जातात म्हणून त्यांनी कल्चरल एक्स्चेंज नावाखाली हा कार्यक्रम ठेवला होता. ९-१० स्टेट्स चे स्टाॆल्स मांडले होते. वेगवेगळ्या भाषा , भांडी, किराणासामान, आणि दागिने हेही होतेच. एका ठिकाणी क्रिकेट बद्दल माहिती सांगणारा विभागही होता. साडी नेसवण्याचीही सोय होती. मी म्युझिक स्टाॆलबरोबर गेले होते. लोकांना तबला, पेटी व वीणा यांचे प्रात्यक्षिक होते. खाण्याच्या विभागात चहा समोसा ठेवला होता. आपल्या वेगवेगळ्या भाषा - लिपी, खाणे व क्रिकेट याबद्दल अमेरिकेत खूप आकर्षण आहे.

त्यानंतर एका मिशनरी बाईचे भाषण होते. मी नेहेमी मिशनरींबद्दल लोकांकडून ऐकलेले म्हणून म्हटले बघू तरी काय म्हणते ते.... त्या बाईंनी ५० वर्षे कलकत्त्याला राहून काम केले आहे. सुरूवातीला टेंट मध्ये राहून लोकांना ंमदत केली. भारताच्या प्रगतीबद्दल सुरूवातीला ती बोलली. नंतर मात्र उपासमार, बेकारी, शिक्षणा ला वंचित मुले, याची भरपूर आकडेवारी दिली. अर्थात त्यात खोटे काही नव्हते. अगदी सुरूवातीला अापल्या धर्मातील जातिवाद, अंघश्रद्धा व अडाणिपणा याचा पुरेपूर फायदा या मिशनरींनी घेतला. खालच्या जातीतिल लोकाॆना शिक्षणापासून दूर ठेवले होते त्यांना जवळ केले. एखाद्या घरात आंधळे, डिफाॆर्म मूल जन्मले तर गेल्या जन्मीचे पाप समजून त्यावर उपचार करत नसत. औषधाला पैसेही नसत अशांना या लोकांनी जवळ केले .. साहजिकच ही मुले त्या धर्मात ओढली गेली. अगदी कचराकुंडीतील मुले आणून ती वाढवली. शाळा काढल्या , दवाखाने काढले व दोन वेळचे जेवण पुरवले. अन्न, वस्त्र व निवारा या तिन्ही गरजा भागतात म्हटल्यावर लोक तिथे जायला लागले. हा सगळा खर्च इथल्या चर्चच्या पैशावर चालतो.

हे सगळे ऐकल्यावर वाटले की खरेच भारतात आज बाहेरून एवढी मदत घेण्याची गरज आहे का....जगातील श्रीमंत लोकात आज काहींचा नंबर लागतो. आपल्याकडेही अनाथआश्रम धर्मशाळा आहेत मग या लोकांचे का फावते....आपण म्हणतो की ही मंडळी धर्मप्रसार करतात पण एक नक्की की त्यासाठी कष्ट व सेवा ही करतात. काही लोकांचे म्हणणे असे असते की कोणाला आजकाल खायची भ्रांत नाही पण परिस्थिती अशी आहे की अशा गरजू लोकांपर्यंत आपण पोचत नाही आपला परिघ खूप छोटा असतो. त्यापलिकडे बघायला हवे. खेड्यात रहातात त्यांना वेगळा अभ्यासक्रम केला पाहिजे. आपली मंदिरे दानी व्यक्ति यांचे पैसे योग्य तर्हेने वापरले गेले पाहिजेत. नियोजन केल्यास आणि यात कोणितरी लक्ष घातल्यास अन्न वस्त्र निवारा पुरवायची क्षमता आपल्यात नक्की आहे. शिक्षण देणारी भरपूर मंडळई आहेत या सगळ्या गोष्टींचा विचार करून आलेली मदत योग्य ठिकाणी वापरण्याचे भान असणारा नेते आता यायला हवा.