आप,, तेज, वायू, पृथ्वी, आकाश ही पाच तत्वे आपले जीवन समृद्ध करतात. आपले जीवन त्यातल्या सर्व तत्वांवर अवलंबून आहे. जोपर्यंत ही सगळी तत्वे प्रमाणात असतात आपले जीवन ती सुखकारक करतात. पण जेव्हा त्यांचे रॊद्र रूप पहायला मिळते तेव्हा मात्र भिती वाटल्याशिवाय रहात नाही. आपण त्यांच्यापुढे काही करू शकत नाही. कितीही पॆसा असो, सामर्थ्य असो तुमच्या हातात काहीच नसते. निसर्गावर आपण मात करू शकत नाही.
गेली ८-१० वर्षे अमेरिकेत रहात आहे. येताना फक्त इथली थंडी, बर्फ, काही ठिकाणचे वाळवंट याबद्दलच माहिती होती. हळूहळू इथल्या हवामानाची माहिती होत गेली. अमेरिकेच्या काही भागात टोर्नॅडो, किनार्यावर धडकणारी हरिकेन, एल ए मध्ये लागणार्या आगी, बर्फाची वादळे, भूकंप ही सगळी रूपे बघायला मिळाली. भारतामध्ये हवामान बर्यापॊकी चांगले असते. काही ठिकाणी खूप गरम, काही ठिकाणी पाण्याचा दुष्काळ असतो पण हवामान स्थिर असते. चक्री वादळे, बर्फाची वादळे, पूर कधी कधी येतात पण सतत धोका नसतो.
वार्याचे रॊद्र रूप टोर्नॅडोज च्या रूपात बघायला मिळते. अमेरिकेच्या मध्य भागात टोर्नॅडोज बघायला मिळतात. कॅनडाकडून येणारी थंड हवा व मेन लॅंड वरची गरम हवा यांच्या मुळे टोर्नॅडोज तयार होतात. या मधल्या भागाला टोर्नॅडो अली असे म्हणतात. स्प्रिंग सिझन ची सुरूवात, फॉल ची सुरूवात.. जेव्हा हवेत एकदम गार व गरम असा बदल होतो तेव्हा बरेच फनेल क्लाउड तयार होतात.(फनेलच्या आकाराचे ढग) ह्याचे खालचे टोक जमिनीला लागले की टोर्नॅडो टच झाला असे म्हणतात. त्यामुळे भरपूर नुकसान होते कारण यावेळेस वार्याचा स्पीड खूप असतो आणि ते वारे चक्राकार फ़िरत असते. त्याच्या मार्गात येणारी घरे पडतात, झाडे पडतात. फनेल क्लाउड मध्ये भरपूर डेबरी असते. आधी वातावरण एकदम शांत होते. ’वादळापूर्वीची शांतता’ म्हणजे काय ते कळते. नंतर भरपूर पाउस पडतो- वीजा, कधी कधी गाराही अनुभवायला मिळतात. हे कधी व कसे थांबते याबद्द्ल अजून रिसर्च चालू आहे. हा धोका टाळण्यासाठी भरपूर काळजी घेतली जाते. रेडिऒ, टिव्ही वरून सतत माहिती दिली जाते. जिथे जास्त शक्यता असेल तिथे वॉर्निंग्ज, वॉच पोस्ट करतात. लोकांना प्रॉपर शेल्टर घ्यायला सांगतात. घरेही लाकडाची असतात. लहान मुलांना शाळॆत ही ड्रील मधून ट्रेनिंग देतात. मनुष्यहानि कमी होईल याकडे लक्ष दिले जाते. एकंदरीने टोर्नॅडो वॉच लागला की तो संपेपर्यंत चांगलेच टेन्शन देतो.
सध्या लॉस एंजल्स मध्ये एका भागात आग लागलेली आहे. या भागात झाडी भरपूर आहे, वाळवंट ही भरपूर आहे. उन्हाळ्यात इथे वणवे, आगी खूप लागतात. हवा ड्राय असल्याने त्या पटकन पसरतात. ह्या आगी विझवण्यासाठी हेलिकॉप्टर्स, फायर फायटर्स यांची कसरत चालू असते. पाण्याचा मारा ही करतात. वार्याचा वेग जास्त असला तर आग आटोक्यात आणणॆ फार अवघड जाते. मनुष्य हानी न व्हावी यासाठी खूप कष्ट घेतात. घरे खाली करण्यासाठी लोकांना सूचना देतात पण तरी काही महाभाग तसेच हट्टाने राहून स्वतःचे नुकसान करून घेतात. या आगी थांबण्यासाठी वारा कधी कमी होईल अशी वाट बघावी लागते. दर उन्हाळ्यात या आगीचा सामना करावा लागतो.
पाण्याचे रॊद्र रूप बघायला मिळते हरिकेन सिझन मध्ये. तुम्ही कतरिना बद्द्ल वाचले असेलच. अमेरिकेला पॅसिफिक व ऍटलांटिक दोन्ही किनारे लाभले आहेत. उन्हाळा सुरू झाला की या हरिकेन च्या बातम्या टी व्ही वर दिसू लागतात. याला ए टू झी नावे देतात. पाण्याच्या पृष्ठभागावर खूप दमट हवा तयार झाली आणि वार्यांचा वेग वाढला की पाण्याचा भोवरा तयार होतो. वार्याच्या दिशेप्रमाणे तो दिशा घेतो व वरती वाढत जातो. शेवटी किनार्यावर येउन आदळतो. (लॅंड फॉल). सॅटेलाइट वरून सतत याची पिक्चर्स घेउन त्याची दिशा व वेग दाखवले जाते. पूर्व तयारी म्हणून मंडळी घराला लाकडी पट्ट्या ठोकतात, अन्न, पाणी साठवतात. गरज असेल तर घर सोडून दुसरीकडे जातात. बर्याच वेळा किनार्याला पोचेपर्यंत याचा स्पीड कमी होतो पण दर सीझन ला एक तरी मोठे वादळ होतेच. लॅंडफॉल नंतर भरपूर पाउस, वादळ हे ठरलेले. सगळे स्थिरस्थावर व्हायला १ आठवडा लागतो. नेहेमी त्याच भागात रहाणारी लोक या सगळ्याला सरावलेली असतात.
’रिंग ऑफ फायर’ मध्ये अमेरिकेचा वेस्ट साईडचा भाग येतो. या भागात भूकंप व व्होलकॅनिक ऍक्टिव्हिटी सतत चालू असते. म्हणूनच यलो स्टोन नॅशनल पार्क, हवाई, अलास्का व कॅलिफोर्निया भागात हे प्रकार जास्त दिसतात. आपण खूप उंच इमारती अमेरिकेत बघतो. त्यांना भूकंपाला तोंड देण्यासाठी प्रिव्हेन्शन मेजर्स घेतलेली असतात. सतत सेस्मीक इफेक्ट्स चा अभ्यास केला जातो. हवाईला तर इतक्या जवळून लाव्हा बघता येतो. मानले इथल्या लोकांच्या प्रोसीजर्सना. शील्ड व्होल्कॅनो पण बरेच दिसतात. यलो स्टोनमध्ये काय किंवा हवाई व्होल्कॅनो पार्क मध्ये काय आपल्या खाली एवढी ऍक्टीव्हिटी चाललेली असते खरे वाटत नाही. त्याचा विचार बाजूला ठेवला तरच तुम्ही या जागा नीट बघू शकता.
अमेरिकेत बर्याच भागात बर्फ पड्तो. अगदी उन्हाळ्यात कडक उन्हाळा व थंडीत भरपूर बर्फ दिसते. स्नो फ्लेक्स पडताना खूप छान दिसते. चांदण्यात बर्फ़च्छादित घरे जमीन छान चमकतात. स्किईंग करायला मजा येते. स्नो मॅन्स बनवायला छान वाट्ते पण जेव्हा हिमवादळे होतात तेव्हा आपण निसर्गापुढे अगदी हतबल होतो. सगळीकडे पांढरे, ग्रे दिसते. भरपूर बर्फ रस्त्यावर साठतो. तो साफ करावा लागतो. लाईट्स जातात. लाईट दुरूस्त करणे खूप अवघड होते कारण बर्फ वीजेच्या खांबावर साठून त्यावर काम करणे अवघड होते. स्नो पडायला लागल्यावर लगेच रस्त्यावर मिठाचे ट्रक्स फिरायला लागतात व रस्ते साफ होतात (मेन रोडस तरी). पण वादळानंतर जेव्हा बर्फ साठतो व सगळी कडे आइस तयार होतो तेव्हा लोकांची कसरत सुरू होते कारण खूप घसरडे होते.
अमेरिकेत राहिल्यामुळे निसर्गाची ही बरीच रूपे जवळून बघायला मिळाली. या सगळ्या निसर्गाच्या चमत्कारांसकट रोजचे जीवन अगदी व्यवस्थित चालू असते. जीवनाचा तो एक अविभाज्य भाग असल्याने त्याची काळजी सरकार व जनता घेत असते. विमा कंपन्याची इथे त्यामुळे फार गरज असते व चलती ही असते. सॅटेलाइट चा उपयोग अगदी व्यवस्थित करून घेतला आहे या लोकांनी. या सगळ्या प्रकारात फ्लाईट्स कॅन्सल होतात. नुकसान होते. अर्थात या काही रोज घडणार्या घटना नाहीत पण दरवर्षी एकतरी अनुभव येतोच. काही जास्त नुकसान झाले तर एकच वाक्य मंडळी म्हणतात ..इट्स मदर नेचर.......आणि आपले रोजचे व्यवहार चालू ठेवतात. खरोखर कॊतुकास्पद आहे.

No comments:
Post a Comment