Monday, November 16, 2009

आमचा तिकीट प्रपंच...

आमचा तिकीट प्रपंच...

अमेरिकेत आल्यावर मराठी मंडळ, इंडिअन असोसिएशन किंवा काही म्युझिक इंटरेस्ट ग्रुप्स इथे आपण एकदा तरी डोकावतोच. हे आपल्या सगळ्याना जवळचे वाटते. अर्थात त्यापासून दूर रहाणारे पण बरेच. आमचा त्यात बर्‍यापॆकी सहभाग असतो. कधी नाटकाच्या निमित्ताने, कधी गाण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तर कधी नुसतेच प्रेक्षक म्हणून. माझा सह्भाग पडद्यामागे असतो. आता कार्यक्रम म्हटला की वर्गणी, हॉल बुकिंग, जेवण, कार्यक्रम ही कामे वेगळ्या वेगळ्या कमिटीत विभागली जातात आणि व्यवस्थित पारही पडतात. या सगळ्यात अजून एक काम असते म्हणजे तिकीट विक्री. आम्ही गेली काही वर्षे दर कार्यक्रमाची तिकीटे तयार करत असू. आता तुम्ही म्हणाल तिकीटे काय - इंटरनेट वर ऑर्डर दिली की रेडिमेड तिकीटे मिळतात किंवा डॉलर शॉप मध्ये टोकन्सचा रोल मिळतो पण नाही.....

साधारण कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार तिकिटाचे डिझाईन ठरवले जाई. इथे दर वर्षी ३ अंकी नाटक सादर होते. नाटकाच्या विषयानुसार चित्र निवडून आम्ही तिकिटावर वापरत असू. गणपति व संक्रांत यातल्या कार्यक्रमानुसार तिकीटाचे डिझाईन ठरवत असू. सुरूवातीला मराठी फॉन्ट चा प्रॉब्लेम होता. सॉफ्ट्वेअर वापरून त्याची जेपीजी फाईल तयार करून मग ती वापरावी लागे. तिकिटाचा साईज तसा लहान त्यामुळे त्यात सगळे बसवणे हि एक कसरत असे. सर्व डिझाईन तयार झाल्यावर जर त्यात बदल सुचवला तर परत बरेच मागे जाउन बदल करावा लागे. आता युनिकोड मुळे हे काम बरेच सोपे झाले आहे. म्युझिक प्रोग्रॅम्स साठी पण अशीच तिकीटे बनवली आहेत.

१. कार्यक्रमाच्या थीम प्रमाणे डिझाईन व मजकूर ठरवणे
२. मजकूर व डिझाईन छोट्या साइजमध्ये बसवणे (शक्यतो वॅलेट मध्ये तिकीट बसावे). वर्ड, पेंट ब्रश याचा वापर करून शेवटी जेपीजी फाइल बनवणे. डिझाईन फायनल झाल्यावर कनेक्ट करून एक पिक्चर बनवणे.
३. तिकीट नंबर सगळे घालत बसायला नको म्हणून एक एक्सेल शीट तयार करणे. त्यात फ़ॉर्म्युला घालणे. ऑटो नंबर जनरेटर वापरून तिकिट नंबर घालणे सोपे पडते. एका पानावर साधारण १० तिकिटे तयार होतात. याचा फायदा म्हणजे हवी तेवढीच तिकीटे छापता येतात.
४. प्रिंटींग
५. घरीच डॉटेड लाइन करून (परफ़ोरेशन्स) बुकलेट तयार करणे. विथ कव्हर

आता तुम्ही म्हणाल कशाला एवढी कटकट करायची? पण ही ज्याची त्याची हॊस असते. आपल्याला हवा तो लोगो त्यात घालता येतो. आणि हवे ते डिझाईन घालता येते. अर्थात या गोष्टी अगदीच कमी लोकांच्या लक्षात येतात पण....

काही नमुने देत आहे. करून बघा एखादा प्रयोग.........


























5 comments:

साधक said...

उत्तमच. २००६ व ०७ चे कार्यक्रम दिसत आहेत. मिस झाले. पुढच्या वेळी काही कार्यक्रम अस्ला की कळवा. ड्राईव्ह करुन येउ.

भानस said...

आम्ही या सगळ्या कार्यक्रमांचे सहभागी व साक्षीदारही.:)लगे रहो माधुरी...खरे आहे ज्याला हौस आहे त्याला सगळे साधते.तिकीटे छान होतात गं.एक वेगळा फील येतो त्याने.

Madhuri said...

Sadhak dhanyawad.
Amchya karyakramala jarur ya. ajun pudhchi tickets ahet ti pun taknar ahe.

Madhuri said...

Bhagyashree ho na ..ajunhi tumhi amchyabarobar programla asta asech watte.

Tuzya aajchya articlepramane urleli tkts takaychi ahet ti wyawasthit thevli ahet pun madhye laptop durustila gelyane u know....sapadli ki add karnar ahe

Anonymous said...

तुम्ही वेगवेगळे विषय हाताळता आणि त्यांवर विचारपूर्वक मजकूर सोप्या वाचनीय शैलीत देता.

लिहीत रहा.