Friday, December 18, 2009

जजमेंट....
गेल्या रोड ट्रीप मध्ये मॆत्रिणिकडे राहिलो होतो तिने एक पत्त्याचा डाव शिकवला. मजा आली खेळायला. आता ख्रिसमस व विंटर हॉलिडेज आहेत. सगळे जमले की खेळता येईल असा हा खेळ आहे. सुरूवातीला वाचून वाटेल की, अरे यात काहीच स्किल नाही पण खेळून पहा मजा येईल.

खेळाडू ४ हून जास्त असतील तर २ डाव घ्या. जोकर काढून टाका.
१. प्रत्येकी १० पाने वाटा.
२. हुकुम इस्पिक ठरवा.
३. ज्याने वाटले असेल त्याच्या पुढच्या माणसाने सांगायचे की तो किती हात करणार. (१० पेक्षा कमी)
४. त्यानंतर प्रत्येकाने किती हात करणार ते सांगायचे. शेवटच्या माणसाने आतापर्यंतच्या हातांची बेरीज करून स्वतःचे हात सांगायचे. त्याला एकच बंधन आहे की त्याचे हात मिळून संख्या १० पेक्षा कमी अथवा जास्त झाली पाहिजे.
५. त्यानंतर नेहेमी प्रमाणे खेळून प्रत्येकाने आपण सांगितले तेवढेच हात करायचे (हे फार अवघड आहे)
६. ज्यांनी सांगितले तेवढेच हात केले त्यांना + मार्क व ज्यांचे कमी जास्त होतील त्याना - मार्क.

उदाहरणार्थ: ६ खेळाडू --- पाने प्रत्येकी १० -- हुकुम इस्पिक
हात
१ ला खेळाडू - ३
२ रा खेळाडू - २-
३ रा खेळाडू - २-
४ था खेळाडू - १
५ वा खेळाडू - १
आता ६ वा खेळाडू १ सोडून कितीही हात सांगू शकेल ( ३+२+२+१+१+ १ सोडून काहीही) म्हणजे टोटल संख्या १० पेक्षा कमी अथवा जास्ती होते आणि कोणीतरी हरतेच.

वाटून उरलेली पाने दाखवू नयेत. दोन डाव असतील तर २ एक्क्यापॆकी १ला मोठा समजावा.

पुढ्च्या डावात ११ पाने प्रत्येकी वाटावी. हुकुम बदाम ठेवावा व हात बोलावेत
नंतर १२ पाने - चॊकट (हातांची बेरीज १२ पेक्षा कमी वा जास्त)
१३ पाने - किलवर(हातांची बेरीज १३ पेक्षा कमी वा जास्त)
व १४ पाने - नोट्रम्स असे खॆळावे.(हातांची बेरीज १४ पेक्षा कमी वा जास्त)

मार्क लिहून शेवटी ज्याला जास्त + मिळतील तो जिंकला.

4 comments:

Anonymous said...

हा खेळ ४ ते ६ लोक ५२ पत्त्यांच्या एका डावावरच खेळू शकतात. ५ ज़ण असतील तर प्रत्येकी दहा पत्ते येणार, पहिल्या डावात. नंतर पहिला डाव तुम्ही सांगितलेल्या नियमानुसार. ज़र तीन हात सांगितले आणि तितकेच केलेत तर ते हात + १० गुण (एकूण १३ गुण). किंवा नुसतेच तीन गुण. दोन हात सांगून शून्य झाले (दोनाचा फरक) किंवा पाच झाले (तिनाचा फरक) तर -२ किंवा -३ गुण.

पुढची पायरी आमच्या पद्‌धतीत वेगळी आहे. आधीचा डाव प्रत्येकी दहा पानांचा असेल, तर पुढल्यात एक कमी, म्हणजे प्रत्येकी ९ पाने. असे प्रत्येकाला एकच पान मिळेपर्यंत खेळावे. हुकूम डावागणिक बदलतो : इस्पिक-बदाम-वगैरे. बिनहुकुमाचा डावही (नो ट्‌रम्प) खेळता येतो.

नियम जास्त कठीण करायचे असतील तर पहिले हुकुम ठरवू नये. नुसतेच हात सांगावेत. नंतर ज़ो सगळ्यात ज़ास्त हात सांगेल, तो हुकुम ठरवेल. चारांनी ८ पानांच्या डावात ३-३-२-१ हात सांगितल्यास दोघांपैकी ज्यानी तीन हात आधी सांगितले तो हुकुम ठरवणार. यात छान गोंधळाला वाव आहे.

आणि खरं म्हणजे पत्ते हातात घेतल्यावर फक्त ब्रिज खेळावं.

MAdhuri said...

सगळ्यांना खेळता येईल असा हा सोपा डाव आहे. लहान मोठे एकत्र असले तरी पटकन जमेल. बाकी नियम व मार्क आपण हवे तसे द्यावे. सांगितलेले हात करता येत नाहीत बर्‍याच वेळेला हा मजेचा भाग.

हातात पत्ते आले की ब्रिज खेळावे हे तर खरेच पण जेव्हा सुटीत मजेसाठी खेळायचे तेव्हा असले साधेच डाव बरे.

महेंद्र said...

आम्ही पण लहानपणी खेळायचॊ हा खेळ. मग एकदा लक्षात आलं की आपण हारतोय, तर मग इतरांना पण हरवायचा प्रयत्न करायचा.. मजा यायची.. आठवण करुन दिल्या बद्दल धन्यवाद..
आम्ही पण ऍनोनिमसने सांगितलेल्या पध्दतिनेच खेळायचो.. या सोबतच ३०४ आणि नॉट ऍट होम हा पण आवडीचा खेळ होता.

मोठा झाल्यावर फक्त रमी खेळायचॊ. हल्ली सगळं बंद.. :)

MAdhuri said...

kharay Mahendra, lokana harawtana jast maja yete ...specially jeva apan halele asto teva.uncheri