Monday, December 21, 2009

अवतार-एक ३ डी फिल्म

लोकांना आकर्षित करायचे तर काहीतरी वेगळे हटके करण्याची या सिनेमावाल्यांची चढाऒढ लागलेली असते. कधी गोष्टीत नाविन्य, कधी नट नटी खास , कधी गाणी छान तर कधी लोकेशनच्या नावावर गर्दी खेचली जाते. फॅंटसी असलेले चित्रपट पण नेहेमी चांगले चालतात. मला नेहेमी वाटते जे सध्या शक्य नाही ते कल्पनेने उभे करण्यात माणसाला खूप मजा येते. बरे कुठेही कशीही भरारी मारा - एकदा फॅंटसी म्हणल्यावर लॉजिक वगॆरे दूर असते. सध्या असाच एक सिनेमा आला आहे आणि मंडळीनी त्याला, त्याच्या स्पेशल इफेक्ट्स ला पसंती दिली आहे. अवतार बद्द्ल तुम्ही नेट वर, पेपरात सगळीकडे वाचले असेलच. मला स्वतःला असे सिनेमे बघायला आवडत नाही पण त्यामागचे तंत्र मत्र नक्कीच आवडते.

काल माझ्या लेकिने हा सिनेमा पाहिला आणि तिला आवडला. स्पेशल इफेक्ट्स छान आहेत. निळा रंग खूप वापरला आहे (मला सावरिया आठवला). दुसर्‍या प्लॅनेट वर वस्ती, वेगळी माणसे आणि जाता जाता एखादा संदेश. बोलता बोलता ती म्हणाली, "आम्हाला गॉगल्स दिले होते". म्हणजे हा ३ डी वाला सिनेमा आहे तर! मला हे माहित नव्हते. मी आतापर्यंत २-३ वेळा असे छोटे सिनेमे किंवा डिस्ने मधल्या फिल्म्स बघितल्या आहेत. असे सिनेमे आपल्याला त्याचा एक भाग बनवून घे्तात. आपण ३ डी गोष्टी समोर पडद्यावर बघतो आणि नकळत त्याचा घटक बनतो. आणि हो गॉगल्स काढून पाहिले तर एकदम ब्लर पिक्चर दिसते. गॉगल घालून बघा असे सांगितले की माझ्यासारखे लोक नक्कीच काढून एकदा तरी बघणार. नको म्हटले कि ती गोष्ट का करावीशी वाटते माहित नाही. बरे वयानुसार ही गोष्ट काही कमी होत नाही बरका..

थोडीशी याबद्दल माहिती वाचली आणि अरे, इतके दिवस हे आपल्या लक्षात कसे आले नाही असे वाटले. आपले दोन्ही डोळॆ एकच गोष्ट वेगवेगळ्या ऍगल वरून, अंतरावरून बघतात. आपला मेंदू यातील अंतर ऍंगल यांचा अभ्यास करून आपल्याला व्यवस्थित ३ डायमेनशनल चित्र दाखवतो. आता या प्रकारच्या सिनेमात २ वेगवेगळे प्रोजेक्टर्स एकच चित्र थोड्या वेगळ्या ऍगलने दाखवतात. त्यामुळे नुसत्या डोळ्याने पाहिले तर ब्लर दिसते. गॉगल असे बनवलेले असतात की दोन्ही डोळॆ वेगवेगळ्या प्रतिमा बघत्तात आणि प्रत्येक डोळा एकच प्रतिमा कॅप्चर करू शकतो. म्हणजे मेंदूला नेहेमीप्रमाणे दोन प्रतिमा वेगवेगळ्या अंतरावरून मिळतात व त्याचे नेहेमीप्रमाणे काम चालते. आपल्याला ३ डायमेन्शनचा अनुभव येतो.

आता म्हणे पुढे जाउन अशी थिएटर्स बनवणार आहेत की ज्यात गॉगल्स घालावे लागणार नाहीत. थोड्याच दिवसात आपण घरबसल्या असे सिनेमे बघू शकू कारण सायंटिस्ट ऑलरेडी यावर काम करत आहेत.

गरज ही शोधाची जननी आहे असे म्हणतात...आजकालच्या नवीन नवीन गोष्टी पाहिल्या की मला वाटते हॊस ही शोधाची जननी आहे असा त्यात बदल करावा लागेल.कधी कधी वाटते माणसाला आहे त्यापेक्षा पुढचे मिळवण्याची हॊस नसती तर हे काही घडले नसते. आपण कदाचित अजून ब्लॅक ऍड व्हाइट पिक्चर्स बघत असतो.

10 comments:

Ajay Sonawane said...

मी परवा हा सिनेमा पहायला जाणारच आहे, बघु कसा आहे मोस्ट अवेटेड 'अवतार'. छान वाटल वाचुन.

-अजय

आनंद पत्रे said...

खुप छान माहीती आहे ही...मला आवडेल ३डी विदाउट गॉगल्स....
’अवतार’ ३डी आयमक्सचं तर तिकीट मिळत नाहीये सहजा सहजी...बघुया कधी चांस मिळतो ते...

MAdhuri said...

धन्यवाद Anand. तुम्हाला लवकर तिकिट मिळो.

MAdhuri said...

धन्यवाद अजय.
मोस्ट अवेटेड अवतार बहुदा आवडेलच

Kanchan Karai (Mogaraafulalaa) said...

एकदा तरी हा थ्री-डी सिनेमा पाहिनच. तुमचा ब्लॉग एकदम निटनेटका आहे. पु.ले.शु.

MAdhuri said...

धन्यवाद Kanchan
तुमचे ब्लॉग्ज पण छान आहेत.

माधुरी

Ajay Sonawane said...

अवतार सिनेमा पाहुन आलो. खुप आवडला, पुन्हा एकदा पहायची इच्छा आहे. सगळं काही खुपच भव्य दिव्य आणि अगदी अनोखं पहात होतं. म्हटल तुम्हाला इथे येऊन सिनेमा पाहिल्याबद्दल सांगावं.

-अजय

MAdhuri said...

mazya lekine pun khup warnan kelay tyamule me pun kevatari bagheen..specially tyatla nature and island

Madhuri

MAdhuri said...

Ajay Muddanhun sangitlyabaddal Dhanyawad

jyani pahila tya bahutekana awadla....baghu me keva jate baghayla.....

MAdhuri

Anonymous said...

व्हिडियोकॉनने ३डी टीव्ही बाजारात आणला होता