Monday, April 26, 2010

काही वाचनीय...(१-किमयागार)

काही वाचनीय...(१-किमयागार)

काही पुस्तके वाचली की ती आपल्याला आवडतात. कधी त्यातल्या साहित्यामुळे, कधी पुनःप्रत्ययामुळे, कधी त्यातल्या व्यक्तिरेखेमुळे तर कधी आपले व लेखकाचे विचार कुठेतरी जुळतात म्हणून. एकाच पुस्तकातले प्रत्येकाला वेगळेच काहीतरी भावते. सध्य़ा मराठी पुस्तकांना चांगले दिवस आले आहेत. पूर्वी अनुवादित पुस्तकांची क्वालिटी इतकी चांगली नव्हती हल्ली ती खूपच सुधारली आहे. मी जास्त करून मराठीच वाचते. माझे स्वतःचे कलेक्शन ही बर्‍यापॆकी झाले आहे. अगदी विमानात प्रवास करताना पण मी साप्ताहिक सकाळ, त्यातले शब्द्कॊडे पसंत करते. इंग्लीश पुस्तकांकडे हात जरा कमीच जातो. याला कारण माझा आळस असेल किंवा सध्य़ा सोपेपणाने मिळणारी मराठी पुस्तके असतील. अमेरिकेत आल्यापासून तर लायब्ररीमध्ये मनसोक्त पुस्तके मिळतात पण मी मात्र मराठीला चिकटून आहे. इथे आमच्या छोट्या गावात आता मराठी पुस्तकांची लायब्ररी पण सुरू केली आहे त्यामुळे अजून वाचनाची चंगळ. अशीच काही आवडलेली पुस्तके तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न. बघा कदाचित तुम्हालाही ती आवडतील.

या वर्षी भारतात सुट्टीवर आले असताना नेहेमीप्रमाणे पुस्तक खरेदी झाली स्वतःसाठी आणि लायब्ररीसाठी. त्यातच ’किमयागार’ हे अच्युत गोडबोले यांचे पुस्तक आणले. या पुस्तकाची प्रस्तावना आणि पहिला भाग वाचतानाच, ’अरे मला हेच म्हणायचे होते’ असे बरेच वेळा झाले आणि भराभर पुढचे वाचत गेले. विशेष करून देवळे आणि त्यातील राजकारण, भारतीय लोकांचे आमच्या वेदात सगळे आहे म्हणून बढाया मारणे याचा इथे सतत अनुभव येतो. लोकसंख्या व गरिबी ही कारणे सतत पुढे करणे भारतात चालू असते पण साधारण त्याच परिस्थितीत युरोप मध्ये नोबल लॉरेटस होऊ शकले हे कसे? आपल्या देशात हुशारीला कमी नाही. इथे ही नोबेल प्राइज विनर तयार व्हावेत.

हे पुस्तक संशोधकांवर लिहिले आहे.कुणीतरी शास्त्रज्ञांवर पुस्तक लिहिले आहे हे पाहून फार बरे वाट्ले. आपण शाळॆत असताना काही नावे वाचतो, त्यांच्या शोधांबद्दल अभ्यास करतो व नंतर त्यावर काही करत नाही. बरे अभ्यासाच्या पुस्तकात फारच थोडी नावे असतात (सिग्नेचर). या पुस्तकात या संशोधकांबद्दल बरीच माहिती आहे. त्यांनी घे्तलेले कष्ट, त्या वेळचे सामाजिक जीवन, धार्मिक आडकाठ्या , लोकांचे स्वभाव या सगळ्याचे छान वर्णन आहे. आपण सायन्स परत शिकतो आहोत असे अधून मधून वाटते. लेखकाने बर्‍याच पुस्तकांचे दाखले दिले आहेत. त्यांनी वाचलेले सोप्या भाषेत आपल्यापर्यंत पोचवले आहे. प्रत्येक संशोधकाचा शोध व त्याविषयी माहिती सांगितली आहे. हे पुस्तक वाचताना जाणवते की मनुष्य स्वभाव हा सगळीकडे सारखा असतो. कुठल्याही देशात धर्म हा आडकाठी बनतो या ना त्या रूपाने. (एंजल ऍंड डेमन्स पाहिला असेलच.)

किमयागार या पुस्तकात भॊतिक शास्त्र, खगोलशास्त्र, गणित, जीवशास्त्र या सगळ्या क्षेत्रातल्या काम केलेल्या लोकांबद्दल माहिती मिळेल. प्रश्न निर्माण होणे आणि ते सोडवणे हे काम त्या मानाने सोपे होते पण ते लोकांना समजावून सांगणे फार अवघड होते या लोकांना . विचार करा सुरूवातीला ’पृथ्वी स्वतःभोवती फिरते’ हे मान्य करायला लोकांना किती कठिण गेले असेल. कारण ते धर्माच्या विरूद्ध होते. शास्त्रज्ञांनी केलेली मेहेनत, प्रयोगांसाठी केलेले कष्ट, यांचे या पुस्तकात चांगले वर्णन केले आहे. वर फेकलेला दगड खाली येणे आणि चंद्राने पृथ्वीभोवती फिरणे हे गुरूत्वाकर्षण या एकाच नियमांचे अविष्कार आहेत हे न्यूटन ने लोकांना कसे पटवले असेल याची कल्पना येते. स्टीफन हॉकिंग ने स्वतःच्या व्याधीवर मात करून केलेले संशोधन याबद्दलही छान माहिती आहे.

आपल्याकडे एखाद्या छोट्या मुलाला शाहरूख खान किंवा सचिन ही नावे पटकन येतील पण त्याच्या या हिरोंना जो टी व्ही त्यांच्यापर्यंत पोचवतो त्या माणसाचे नाव माहित असतेच असे नाही. याच टी व्ही वर जर एखादा प्रोग्रॅम शोधांबद्दल दाखवला तर कितीतरी सोपे पणाने ही नावे सगळ्यांपर्यंत पोचतील. मिडिया हा आजकालचा सर्वात महत्वाचा घटक आहे. बी बी सी वर अशा खूप डॉक्युमेंटरीज असतात ज्यात या लोकांच्या शोधांबद्द्ल माहिती दिलेली असते. या जर शाळेत दाखवल्या तर नक्कीच फायदा होईल. अनुवंशिकतेसाठी मेंडेलने केलेले वाटाण्यावरचे प्रयोग, डी एन ए चे मॉडेल मुलांकडून करवून घेउन त्याच्यावर बी बी सी ने केलेली फ़िल्म अशा अनेक गोष्टी यात आहेत. वर्गात नुसती थिअरी शिकवताना जोडीने अशा फ़िल्म्स दाखवल्या तर ते मुलांच्या मनावर पटकन ठसते. बी बी सी किंवा हिस्टरी चॅनेल्स यावर अशा छान फिल्म्स असतात त्या शाळेत दाखवल्या गेल्या पाहिजेत काही नाही तर फ्री पिरियड मध्ये.

गंमत म्हणजे किमयागार या नावाची ७-८ पुस्तके इंटरनेट वर दिसली. हे नाव लेखकाना फार आवडते असे दिसते.

8 comments:

आनंद पत्रे said...

किमयागार माझ्याही आवडत्या पुस्तकांपैकी आहे... संग्रही आहेच.

Anonymous said...

"कुठल्याही देशात धर्म हा आडकाठी बनतो या ना त्या रूपाने." -- युरोप-अमेरिकेत सार्वजनिक जीवनात धर्माची गेली १५०-२०० वर्षं पीछेहाट होते आहे. धर्माच्या नावानी बोटं मोडायची फॅशन आलेली आहे. पण धर्म बदलत नाही किंवा धर्मात नवीन गोष्टी सामावल्या ज़ात नाहीत, असा भाग नाही. शिवाय श्रद्‌धेच्या रुपाने धर्म जे बळ देतो ते विज्ञान कधीच देऊ शकणार नाही.

वैज्ञानिकांनी मानवज़ातीच्या उत्कर्षाप्रत केलेलं योगदान कोणी नाकारणार नाही. पण स्वत:ची टिमकी मिरवायची, खोट्या घोषणा करून सरकारकडून पैसा उकळायचा यात वैज्ञानिकही पुढे असतात. काही आठवड्यांपूर्वी एका वैज्ञानिकानी लंडन टाइम्समधे लिहिले होते की ज़बाबदारीने वागून लोकांचा विश्वास पुन्हा मिळवण्याची गरज़ विज्ञानशाखांना भासते आहे. इंग्लंडमधे संशोधकांची दिवाळखोरी ज़ाहीर करणार्‍या सर्व घटनांची मला माहिती नाही, पण उदाहरण म्हणून सायमन जेंकिन्स यांचा हा लेख पहा :

http://www.guardian.co.uk/commentisfree/2009/apr/30/swine-flu-media

- नानिवडेकर

MAdhuri said...

Naniwadekar,

Shraddha hi saglyat shreshtha ahe pun tyasathi dharmachi garaj lagtech ase nahi mala watat. pratyekachi kuthetari shraddha astech.

tumchya dusrya muddyabaddal ya pustakat barich udaharne ahet. Europatli tar jast. rajkaran he saglikade pochlele ahe mag te scientist asot, ki dewle asot.

Apyakade ajun sanshodhan whayla hawe ani jast lokani research karayla hawa

MAdhuri

MAdhuri said...

Anand,

changli pustake sangrahi asli ki punha punha wachta yete ..awadlele

MAdhuri

Naniwadekar said...

Madhuri-bai : How can you do away with religion if it is practically a necessity of human mind? Religions evolved because human temperament is religious, and vulgarity flourishes because human temperament is vulgar. You cannot abolish religiosity, with all its pros and cons, any more than you can abolish vulgarity. You are making your case against 'dharma' rather half-heartedly. Religion has flourished even in places like Communist Russia and Communist China where very powerful governments have been very hostile to it. Indeed, religion has played a stellar role in opposing these totalitarian regimes. I am aware that religion itself can be domineering and restricting. But a blanket case against its existence is very hard to make.

I find it very difficult to read Marathi in Roman, so I would request you to avoid that combo if you choose to issue any response to my latest comment.

- dn

MAdhuri said...

Naniwadekar,
Sorry about writing minglish....will keep in mind to write marathi or english.

I am not against religion but I have some issues .. we can discuss it sometime.

MAdhuri

भानस said...

माधुरी,संग्रही ठेवण्यासारखेच आहे गं हे पुस्तक. आढावा छान.

MAdhuri said...

bhanasa

’लूज युवर वेट डॊंट लूज युवर माईंड’ वाचलेस का? अग काय पॆसे कमावतात हे डाएटिशिअन्स........

आता पुढच्या सुट्टीत अजून १-२ पुस्तके येणार गॊडबॊलेंची.