आत्ताच टी व्ही वर एक बातमी बघितली..२ सप्टे इंटरनेट ला चाळिस वर्षे पूर्ण झाली. काही लोकांच्या मते ही तारीख वेगळी आहे. आजकालच्या ग्लोबलायझेशनच्या जगतातला सर्वात महत्वाचा घटक ४० वर्षाचा झाला. आधी अमेरिकेत युद्ध नीती साठी याची सुरूवात झाली. मग हळूहळू इतर देशात प्रसार झाला. .कॉम साईट्स आल्या, वेब ऍड्रेसेस आले आणि गुगल सारखे पॉवरफ़ुल सर्च इंजिन आले. आणि हे ’येणे’ कधी थांबत नाही. सतत नवीन गोष्टी येत असतात. आणि आपल्याला त्या शिकाव्याही लागतात. नाहीतर तुम्ही ’बॅकवर्ड’ समजले जाता.
हे सगळे गेल्या १०-१२ वर्षात फास्ट स्पीड ने वाढले आहे. पूर्वी भारतात इंटरनेट महाग होते, सहज मिळत नसे. आता स्पीड वाढला आहे. इंटरनेट मुळे खूप गॊष्टी सोप्या झाल्या. इ मेल मुळे कम्युनिकेशन सोपे झाले. आता तर हव्या त्या भाषेत इ मेल लिहिता येउ लागली. फोटो पाठवणे सोपे झाले. बॅंकेचे व्यवहार, रिझर्वेशन्स बसल्या जागी करता येउ लागले. दूर रहाणारे आजी आजोबा नातवंडांशी ट्च मध्ये राहू लागले आणि वेब कॅम वर त्यांना बघूही लागले. बसल्या जागी जगभरातले पेपर्स वाचता येउ लागले. स्काइप सारख्या टूल वरून लोकांना गाणे, नाच याच्या ऑनलाईन ट्यूशन्स घेता येउ लागल्या. ड्रायव्हिंग चा वेळ वाचून त्या वेळात काही शिकता येउ लागले. अंतर कमी झाले. शाळेत मुलांना होमवर्क सुद्धा ऒनलाइन मिळू लागले. ब्लॉग्ज ची सुविधा उत्पन्न झाली त्यामुळे लोकांना आपले विचार मांडता येउ लागले. आपण रेकॉर्ड केलेल्या गोष्टींचे मूव्ही बनवता येउ लागले. इंटरनेट शिवाय आपण कसे रहाणार असे वाटते आता.
सुरूवातीला एक दोन लोकांची यात मक्तेदारी होती. हळूहळू बर्याच कंपन्या या बिझनेस मध्ये उतरल्या. त्यामुळे झाले काय की स्पर्धा वाढली आणि आपला फायदा झाला. साध्या मेलला सुद्धा खूप ऒप्शन्स ऒपन झाले. प्रत्येक जण दुसर्यापेक्षा काहीतरी जास्त देउ लागला आणि आपण फायदा घेउ लागलो.
अर्थात या सगळ्या नवीन गोष्टी आल्या तसे लोकांना नवीन गोष्टी शिकायला पण लागल्या. मराठी टायपिंग आले नाही तर काय त्या एडिटर चा उपयोग? इ मेल चे सगळे उपयोग करून घेता नाही आले तर नवीन नवीन येणार्या गोष्टींचा कहीच उपयोग नाही. वेब कॅम वापरता आला पाहिजे तर तुम्ही दुसर्याला बघू शकता. त्यामुळे या इंटरनेट ने लोकांना शिकते ठेवले आहे हे नक्की.
लहान मुले नवीन गोष्टी पटकन शिकतात. मध्यम वयातल्या लोकांना सतत नवीन गोष्टी आल्या की त्रासदायक वाटतात. सारखा बदल नको वाटतो. आणि इथे तर सतत नवीन गोष्टींची भर....
या सगळ्या लोकांमध्ये एक ग्रुप असा आहे की त्यांना हा वेग ’झेपत’ नाही. आजी आजोबांचा हा ग्रुप आहे. एक साधी इ मेल लिहिता यावी ही त्यांची इच्छा असते पण गोंधळायला होते. टाइप करायला खूप वेळ लागतो. मग ऑफलाईन टायपिंग होते आणि नातू किंवा इतर कोणी त्याच्या वेळेनुसार आजी आजोबांची मेल पाठवतात. काही जणांना अक्षर सापडत नाहीत, काहींना फाईल सेव्ह करता येत नाही आणि हे कमी म्हणून का काय सारखे अपडेटस येत असतात. काहींना भिती वाटते की काही तरी चुकले तर. पण या गोष्टी शिकाव्या तर वाटतात. सगळ्या गोष्टींशी जमवून घेउन वाटचाल करणारे पण खूप सिनिअर सिटीझन आहेत. मुख्य भिती वाटते आपल्याकडून काही डिलीट तर नाही ना होणार? एकदा ही भिती मनातून गेली की हा ग्रुप पटकन गोष्टी शिकू शकेल.
जसजसे इंटरनेट चे वय वाढेल तसे आपले सिनिअर सिटीझन पण त्याचा वेग आत्मसात करू शकतील अशी इच्छा करू या.

1 comment:
सर 'टीम-बर्नर ली' (ज्यांनी HTML आणि BROWSER ह्या संकल्पना मांडल्या आणि प्रत्यक्षात आणल्या.) यांचे आपल्यावर न-फिटनारे उपकार आहेत.
Post a Comment