सिनेमा बघताना......
काल नेटफ्लिक्स कडून आलेला सिनेमा बघत होते. नंतर सहज मनात विचार आला, किती सोपे झाले आहे आता सिनेमा बघणे. पूर्वी महिन्यातून एखादा सिनेमा (बर्याच वेळेला गरी कुणीतरी बघून मग परवानगी दिलेली असे) बघत असू. त्यावेळेस ३ रू वगॆरे बाल्कनीचे तिकीट असे. आधी ऍडव्हान्स बुकींग करून बहुतेक वेळेला सिनेमा बघितला जाई. ब्लॅक तिकीट वाले बाहेर ऒरडताना दिसत (तो सुद्धा रेट फार नसे) त्यावेळेस त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टीने बघितले जाई. नंतर हळुहळु तिकीटचे भाव वाढत गेले. आणि सिनेमाचे प्रकार पण वाढत गेले.
नंतर दूरदर्शन वर सिनेमा बघायला सुरूवात झाली. त्यावेळेस मजा वाटायची, छोट्या पडद्यावर का होईना पण घरी बसून सिनेमे बघता येऊ लागले. हळूहळू ब्लॅक ऍन्ड व्हाईट वरून रंगीत चित्रपट बघायची सोय झाली. नंतर व्हिडिऒ कॅसेट चा जमाना आला. आता तर वेळे चेही बंधन राहिले नाही. आपल्या सवडीनुसार सिनेमे बघता येऊ लागले. यापाठोपाठ डी व्हि डी चे पदार्पण झाले. चांगल्या प्रतीचे सिनेमे दिसू लागले पण यामुळे पायरसी चा प्रॉब्लेम सुरू झाला जो अजूनही चालू आहे. अमेरिकेत ६ महिने पर्यंत कुठलाही नवीन अमेरिकन सिनेमा बघता येत नाही ( सापडल्यास जबर शिक्षा असते). इंडियन स्टोअर मध्ये मात्र लगेच पायरेटेड डि व्हि डी बघता येते.
मधल्या काळात मल्टीप्लेक्स मुळे लोक परत थोडे थिएटर मध्ये जाऊन सिनेमे बघू लागले. पण त्यासाठी पॆसे जास्त लागतात. यानंतर लॅपटॉप वर सिनेमे डाऊनलोड करून बघणे सुरू झाले. यात अनलिमिटेड सिनेमे बघू शकत्तो. विमानातून निघालो की थोड्याच वेळात पटापट लॅपटॉप्स उअघडून सगळी युवा जनता आपले आवडते सिनेमे बघताना दिसतात. आजकाल विमानात पण पर्सनल टी व्ही असतात. टि व्ही चे पण स्क्रीन साईज वाढले, क्वालिटी सुधारली. होम थिएटरचा जमाना आला. घरी सिनेमा बघत्ताना थिएटर इफेक्ट मिळू लागले. टी व्ही वर स्पर्धा वाढल्याने सिनेमांमध्ये चॉईस करता येउ लागला. डि व्हि डि प्लेअर चे अनेक प्रकार आले त्यात सोनी ब्लू रे वर तर इंटरनेट वरून यू ट्यूब वरचे सिनेमे बघता येऊ लागले. त्यावरून नेटफ्लिक्स पण बघता येते. नेटफ्लिक्स वाले आपल्याकडे घरी पोस्टाने सिनेमे पाठवतात आपला बघून झाला की पोस्ट बॉक्स मध्ये ठेवा काम खतम....बाहेर जायला नकॊ याशिवाय डायरेक्ट डाउनलोड करून ही सिनेमे बघता येतात. अजून काय पाहिजे..........
हे सगळे पाहिले की वाटते की आता पुढे काय? पूर्वॊ आपण ३ रू त महिन्यातून एखादा सिनेमा बघत असू. आता इतके ऑपशन्स झाले आहेत ....कुठलीही भाषा, नट, देश या सगळ्या सीमा पार करून सिनेमा आपल्यापर्यंत पोचतो आहे. आता यानंतर नवीन काय सुविधा काढ्तील? माणसाची भूक खरेच मोठी आहे.

4 comments:
नेटफ्लिस्क हे एक सुख आहे.
त्यांच्या ऑनलाईन कलेक्शनमधेही भरपूर चित्रपट आणि मालिका आहेत. जुने, आवडणारे आणि वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट अगदी सहज, हवे तेव्हा बघता येतात.
True. You can watch anytime. They have good collection
अगं, आता 3D आले की घरात. पाहिलेस का? अभी हम लोग देखेंगेच...पुढे काय येतेय आणिक ते... :D
Bhanas,
I hpe it stps after 3D
Post a Comment