Thursday, June 23, 2011

चौथा कोपरा....

चौथा कोपरा..

अमेरिकेत आल्यापासून निसर्गाची वेगवेगळी रूपे बघितली. गेल्या आठवड्यात ् व्हरमोँंट ला मुलीच्या ग्रँज्युएशन
ला गेलो होतो. तिथून yetana अकेडिया पार्क ला भेट दिली. हे पार्क मेन मध्ये आहे. तिथे गेल्यावर लक्षात आले की याआधी तीन कोपरे बघितले आणि आता हा चौथा कोपरा. अलास्काचे ग्लेशिअर्स, हवाई चा ज्वालामुखी आणि प्रशांत महासागर, वेस्ट चे सुंदर निळे पाणी आणि गल्फ आंफ मेक्सिको शेवटी आता बार हार्बर वरून एटलांटिक चे ँ. प्रत्येक ठिकाणचे सौंदर्य वेगळे निसर्ग वेगळा - अर्थात चारीही कोपरे आपल्या जागी सुंदर

बार हार्बर मध्ये अकेडिया पार्क आहे. ही जागा खूप मोठी नाही पण छान आहे. भरपूर हायकिंग ट्रेल्स, लूप रोड, कँडिलँक माउंटन आणि फिश ईंडस्ट्री ही इथली वैशिष्ट्ये. पूर्वी याला माउंट डेझर्ट म्हणत कारण पहिल्यांदा जे लोक आले त्यांना एकदम ओसाड भाग वाटला, झाडे दिसली नाहीत. सुरूवातीला फ्रेंच लोक इथे जास्त आले. त्यातील एकाने आपले नाव या डोंगराला दिले. या भागात रांकफेलर, जे पी मांर्गन यांची भरपूर इस्टेट आहे. मोठे मँन्शन्स आहेत.







जाताना मस्त झाडीने भरलेला रस्ता आहे. दोन्ही बाजूना झाडांच्या भिंती उभ्या आहेत असे वाटते.









इथला पिंक ग्रँनाइट प्रसिद्ध आहे. सुरूवातीला आर्टिस्ट या जागेच्या प्रेमात पडले..त्यांनी इथली चित्रे काढून लोकांना दाखवली व हळूहळू लोक इकडे येउ लागले - साघारण १८०० चा सुमार. हे क्लिफ्स मस्त दिसतात. सन सेट च्या वाळेस रंग अजून सुंदर दिसतात. हा फोटो थंडर होल चा आहे. इथे पाणी खडकात बरेच आत घुसते व पूर्ण भरल्यावर जोरात बाहेर येते. ४० फूचापर्यंत वर पाणी उडते. इथे धुके, मिस्ट व थोडा पाउस अधून मधून आसतोच. नसेल तेव्हा पाणी मस्त निळे दिसते.




कँडिलँक माउंटन १५०० फूट उंच आहे. त्यावर हाइक करता येते किंवा वरपर्यंत गाडीने जाता येते. व्हिजिबिलिटी नसेल तर वर जाण्यात अर्थ नाही..वरून काही दिसणार नाही. वर्षातले काही दिवस इथे सूर्यकिरणे सगळ्यात आधी पडतात म्हणून सनराइज बघण्याचे महत्व. खालती बेटे,अथांग समुद्र व छोटी बेटे छान दिसतात. रस्ता छान आहे. वरती एक छोटा ट्रेल आहे. वाटेत १-२ लेक्स दिसतात. पूर्वी जे फ्रेंच सेटलर्स आले त्यातल्या एकाने आपले नाव या डोंगराला दिले. कँडिलँक गाडीच्या एम्ब्लेम मद्ये जे शिल्ड दिसते ता या फ्रेंच लोकांच्या लढाईचा आठवण म्हणून आहे.




इथे लोँबस्टरचा मोठा व्यवसाय चालतो. लोकांना कोटा दिलेला असतो. त्यावर भांडणेही होतात. पकडलेल्या तील ठराविक फिश च वापरता येतात बाकीचे परत टाकावे लागतात.
फिश खाणारे इथे खूष होतात.
गुड कोलेस्टरोँल देणारा फिश म्हणून खूप डिमांड असते. त्याबरोबर क्रँब ही भरपूर मिळतो. इतर फिश ही मिळतात.







मेन हे स्टेट लाइट हाउस साठी प्रसिद्ध आहे. या पार्क मघ्ये एक टूर आहे ते बरीच लाइट हाउस दाखवतात. बास हार्बर इथले लाईट हाउस मात्र जवळून बघता येते. ते साउथ वेस्ट साइड ला आहे. त्याच्या बाजूला बरेच पिंक ग्रँनाइट चे खडक आहेत. समोर अथांग सागर. खूप छान दिसते. पाण्यात मोठ्या बेल्स लावलेल्या आहेत. धुक्यामुळे कधी कधी लाईट दिसत नाही तेव्हा या बेल्स चा उपयोग होतो.

बोट टूर मध्ये ५-६ लाईट हाउस दिसतात. ती बोटीतून बघावी लागतात.















सुटीचे ३-४ दिवस घालवायला छान जागा आहे. हाइक साठी वेळ जरूर ठेवा. कयाक, कनू व बोटिंग पण करायची सोय आहे. गाईडेड टूर घेतल्यास माहिती छान देतात.
(फोटो क्तिक केल्यास मोठे बघता येतील)