Showing posts with label भटकंती- मेहिको. Show all posts
Showing posts with label भटकंती- मेहिको. Show all posts

Wednesday, April 20, 2011

मेहिको - एक बघण्यासारखा देश


मेहिको - एक बघण्यासारखा देश

आपण प्रवासाला जाताना बरेच वेळा ऎकीव माहितीवर जात असतो. कुणीतरी बघून आले की त्यांच्या अनुभवावरून किंवा पुस्तके वाचून आपण आपले मत ठरवतो. अमेरिकेत आल्यापासून मेक्सिकन लोक आणि त्यांचा देश याबद्दल नेहेमी वाईट ऎकत आले. इथे मेक्सिकन लोक नेहेमी खालची कामे करताना दिसतात हे त्याचे कारण असू शकेल. गरिबी, चोरी, ड्रग्ज अशा संदर्भात सतत हा देश येतो. परत बेकायदेशीर इमिग्रेशन मध्ये हे अग्रेसर. कानकुन बद्दल मात्र चांगले ऎकलेले. आणि माया कालखंडातले काही जुने अवशेष आहेत हे ऎकले होते. त्यामुळे हे देश नाही बघितला तरी चालेल असे वाटत होते, तेेवढ्यात मेक्सिकोपर्व हे डाँ मीना प्रभूंचे पुस्तक वाचण्यात आले आणि माझे मत बदलले. मी त्यांची सगळी पुस्तके वाचली आहेत आणि बरीच ठिकाणे पाहिली आहेत. त्या खूप डिटेल मध्ये देश बघतात व छान माहिती देतात.


या देशावर स्पंनिशांनी आक्रमण करेपर्यंत खूप संस्क्रति नांदल्या. आपल्यासारखाच इथे १८०० ला स्वातंत्र्य लढा सुरू झाला. धर्माच्या नावावर लोकांना वाकवले, परकियांनी सत्ता व संपत्ती भरपूर उपभोगली. नंतर जेव्हा उत्खननात जुन्या गोष्टी सापडल्या त्या मात्र जतन केल्या आहेत व त्यावर टूरिझम चालतो आहे. गरिबी, बेकारी आहे पण झोपडपट्ट्ी बकालपणा कमी आहे. या देशाने मका, कोको, मिरची, तंबाकू,च्युइंग गम,रबर दिले. भाषा उच्चार अवघड- नऔवात्ल भाषेत त्ल हे अक्षर फार येते लेखिकेला भाषा येत नसताना ती एकटी फिरू शकली हे विषेश. इतिहास चांगल्या प्रकारे या लोकांनी जपलेला दिसतोय.

मला या देशात काही गोष्टी बघाव्याश्या नक्की वाटल्या.....नकाशातील नावावरून साधारण त्या कुठे आहेत याची कल्पना येईल.
कांपर कॅनिअन - ग्रॅंड कॅनिअन पेक्षा भव्य आणि हिरवळ , अतिशय संथ आगगाडीचा प्रवास, आदिवासीना जवळून पहाता येते
मेक्सिको सिटी - मुंबईपेक्षा बरीच मोठी,ट्रॅफिक वाईट, तिसरा मोठा स्क्वेअर -झोकालो, कोर्तेस चा राजवाडा,सन, मून पिरॅमिडस, रिव्हेराची भित्तीचित्रे ,
चांदीचे साठे - व्हानाव्होता येथील सोन्याने सजलेले चर्च - तास्को चांदीची कलाकुसर,
-लेडी ग्वादालूपे कॅथिड्ील, म्युझिअम
बुलफाईट,
पुएब्ला- येथील ४०० वर्षांचे ग्रंथालय, तालावेरा पाॅटरी,
समुद्र किनारे- कानकुन, तुलुम
अकापुल्को- १५० फुटावरून उड्या मारणारे धाडसी वीर, जाएँट हेड, व्हेलता १२ फुटी जायंट हेडस
पालेके- टेंपल आॅफ इनस्क्रीपशन्स,
चिचेन इत्झा- प्रसिद्ध माया कॅलेंडर दाखवणारा पिरॅमिड

बघुया यातले काय काय बघायचा योग आहे...