नव वर्षाच्या शुभेच्छा....
२००९ संपत आले आणि २०१० ची आपण सगळेच वाट बघतोय. खरे पाहिले तर कालगणने चा एक कालखंड संपून पुढचा सुरू होतो एवढेच. लोकांना मात्र खूप उत्साह असतो. लहान मोठे सगळेच त्या क्षणाची आतुरतेने वाट बघत असतात.
एक वर्षाचा काल हा बर्याच गोष्टींचे मापन करतो. मग तो सिनेमाचा ऑस्कर/ फिल्म फेअर चा सोहळा असो, मुलांचे शॆक्षणिक वर्ष असो, विश्व सुंदरी स्पर्धा असो अथवा अगदी टॅक्स भरणे असो आपण पुन्हा नवीन उत्साहाने या सगळ्यात भाग घेतो. ना खूप मोठा ना अगदी छोटा असा हा कालखंड सगळ्या गोष्टींचे मापन करायला वापरला जातो. अमेरिकेत आल्यावर ’टाइम झोनशी ’ पहिल्यांदा संबंध आला. पुण्यातले लोक आमच्या सकाळी(३१ डिसे) नवीन वर्षाच्या पार्ट्या करत असतात. सुरूवातीला खूप विचित्र वाटायचे. अजूनही इकडे दिवस तिकडे रात्र हे पटकन पटत नाही विशेषतः अशा वेळी. पहिल्यांदा लोकांना ही गोष्ट लक्षात आली तेव्हा किती विचित्र वाटले असेल ना? आणि ज्याने सांगितले असेल त्यावर लोकांना विश्वास ठेवायला खूप दिवस लागले असतील. आजकाल टी व्ही वाले शक्य तिथली न्यू इयर सेलिब्रेशन्स दाखवायला सुरूवात करतात. हवाई व त्यापुढ्ची आयलंडस सगळ्यात शेवटी न्यू इयर साजरे करतात.
यावर्षी म्हणे न्यू इयर इव्ह ला ब्ल्यू मून दिसणार आहे म्हणजे चंद्र निळा नाही दिसणार (आजकाल अवतार मुळे लोकांना निळे बघायची सवय लागली आहे) एका महिन्यात २ दा पॊर्णिमा आली की त्याला ब्लू मून म्हणतात म्हणे( याहू उअवाच किंवा गूगल उवाच) असो. आपण आपले चांदणे व त्यात चमकणारा बर्फ एंजॉय करावा. न्यूयॉर्क ला या वर्षी १२ वाजता जो बॉल ड्रॉप होणार तो म्हणे ग्रीन असणार. हा पण ग्रीन म्हणजे हिरवा नाही तर एनर्जी एफिशिअंट. ब्लू म्हणजे निळा नाही ग्रीन म्हणजे हिरवा नाही. २०१० मध्ये रंगांचे काही खरे दिसत नाही. आपण मात्र न्यू इयर चे फायर वर्क्स व त्यातल्या रंगांचा आनंद घ्यावा हे खरे.
मंडळी आपणा सर्वांना नवीन वर्ष सुखाचे व समृद्धीचे जावो.अमेरिकेत येउन बघता बघता १० वर्षे झाली. त्या निमित्ताने केलेले हे शुभेच्छापत्र......

या आधीची शुभेच्छापत्रे
इथे बघता येतील.