Showing posts with label संगीत. Show all posts
Showing posts with label संगीत. Show all posts

Monday, September 10, 2012

काही रागातील गाणी

आमच्या इथे बरीच मंडळी गाणे पेटी तबला शिकतात. दर आठवड्याला जमतात अधूनमधून छोटा कार्यक्रम करतात. गेल्या आठवड्यात असाच एक कार्यक्रम झाला. रागावर आधारित गाणी , त्यातला राग कसा ओळखावा अशी थीम होती. संकल्पना समीर ची होती. रागाचे चलन, त्याचा भाव माहित असले तर गाण्यात ते हळूहळू ओळखता येतात. लगेच जमत नाही पण खूप ऐकून कल्पना येते.

मागे एका पोस्ट वर या वर थोडे लिहिले होते आता थोडी गाणी ऐकवते. आधी रागाची माहिती मग गाणी असे देत आहे.
शूटिंग फार छान नाही पण चालू शकेल.

ललत, यमन, मालकंस, दरबारी भैरवी हे राग घेतले होते.

सुरूवात
ललत गाणे

ललत गाणे - यम माहिती
-
बंदिश येरी आली
आधा है चंद्रमा
आपके अनुरोधपे
निगाहे मिलानेको जी चाहता है

बंदिश मुख मोर मुख मोर
मालकंस माहिती

तू छुपी है कहा
मन तरपत
बंदिश जिनके जियामे
झनक झनक - भैरवी माहिती
भैरवी सावरे
तू गंगा की मौज मै

Monday, December 5, 2011

जागो मोहन प्यारे....

जागो मोहन प्यारे....

आजकाल जमाना फ्यूजन चा आहे. सगळीकडे मिलावट दिसते. वेस्टर्न गाणी, बँड यांचा मुलांवर खूप प्रभाव दिसतो. अर्थात यात त्यांचा दोष नाही. बाहेर सगळीकडे तेच दिसते, ऐकू येते व मुले अनुकरण करतात. पटकन गायक बनण्यासाठी आजकाल सगळे धडपडत असतात. स्टेज शो चे तर सगळ्यांना आकर्षण - लहान असोत की मोठे.

हे सगळे पहाताना वाटते की आपले संगीत यात हरवून तर जाणार नाही ना... आता तुम्ही म्हणाल की खूप मुले गाणे शिकतात...शिकतात हे खरे आहे पण प्रमाण कमी आहे. पूर्वी शाळेत विषय होता आता फारसा दिसत नाही. भारतात लोकांना शिकणे सोपे आहे पण बाहेरच्या देशात थोडे अवघड जाते. आजकाल स्काईप वरून शिकणे हा एक प्रकार चालू झाला आहे.

आपले संगीत शिकायला गुरू ची आवश्यकता असते. गुरू शिष्य पद्धतीवर आपले शिक्षण आधारित आहे. वेस्टर्न प्रकारात सगळे लिहून दिलेले असते. इथल्या मुलांना शाळेपासून शीट म्युझिक ची सवय असते. शाळेत वाद्य शिकणे आवश्यक असते त्या मुळे प्रत्येक मुलाला थोडीतरी जाण असते. बीट सायकल ची ओळख असते त्यामुळे ताल समजतो. लहानपणापासून बँंड, काँन्सर्ट याची शिस्त अंगात भिनलेली असते. पण गाणे जर लिहिलेले नसेल तर कळत नाही. गेली काही वर्षे इथे राहिल्याने हा फरक जाणवतो.

इथे एक म्युझिक सर्कल च्या कामात असे लक्षात आले की अमेरिकन मुले वाद्याचे कार्यक्रम आवडीने बघतात कारण त्यांना ताल कळतो. आपली मंडळी आम्हाला काही ते शास्त्रीय कळत नाही असे म्हणून यायचे टाळतात. असेच एक कलाकार गेल्या महिन्यात आले होते. त्यांनी शिकागो मधील १५ अमेरीकन मुलांना आपल्या पद्धतीने गाणे शिकवले. ५ राग व बंदिशी या नोटेशन लिहून न देता ही मुले म्हणू शकतात. त्यांना आपली गुरू शिष्य परंपरा थोडीतरी कळली आहे हे नक्की. राग भैरव मधील एक बंदिश शेअर करत आहे.

जागो मोहन प्यारे

ही मुले एक सेमेस्टर शिकली आणि छान म्हणत आहेत अगदी १०० टक्के नाही पण कौतुकास्पद आहे. र,ट आणि च हे उच्चार इथल्या मुलांना जमत नाहीत. म्युझिकल नोटेशनशिवाय म्हणले आहे हे ही कौतुकास्पद. त्यांना कोमल आणि शुद्ध हा समजावणे थोडे अवघडच पण या गुरूंनी ते करून दाखवले. या मुलांवर केलेला प्रयोग बघून इतरांना जर यात इंटरेस्ट वाटला तर काही दिवसांनी हिंदुस्तानी संगीताचे चित्र बदलेले दिसेल कारण एखादी गोष्ट पाश्चात्यांनी सांगितली की आम्हाला पटते. पिकते तिथे विकत नाही हेच खरे.

Friday, August 19, 2011

मला बसलेले सांगितीक धक्के.....

मला बसलेले सांगितीक धक्के....

मला कर्नाटकी संगीत विषेश आवडत नाही. (कमी ऐकलेले आणि कळत नाही हे खरे) . जास्त हिंदुस्थानी ऐकलेले. राग संगीत हे आपले वाटते. हे राग गुरू शिष्य परंपरेतून पुढे आले हेही माहीत होते. अगदी सामवेदापासून गायनाचा उल्लेख केलेला आढळतो. काही वर्षापूर्वी एक लेक्चर ऐकले...संगीताच्या इतिहासावर आणि त्याच्या वाटचालीवर तेव्हा कळले की हिंदुस्तानी पेक्षा कर्नाटक संगीत जास्त ओरिजिनल आहे. त्यात कमी बदल झालेत. हिंदुस्तानी संगीतावर मुस्लीम व पर्शिअन प्रभाव जास्त आहे. त्यातल्या त्यात ध्रुपद धमार वाले परंपरा जपत आहेत. पण ध्रुपद पेक्षा लोकांना आता ख्याल बंदिशी जास्त आवडू लागल्या.

आपल्यकडे गुरू शिष्य परंपरेने गाणे शिकवले जाते. नोटेशन पूर्वी करत नसत. जेव्हा हिंदुस्थानावर आक्रमणे झाली आणि मुगलांचे राज्य आले तेव्हा राजा म्हणेल ती दिशा या न्यायाने गाणे बदलत गेले, अरबी, फारसी इराणी यांचा प्रभाव पडला आणि आपले गाणे डिमांड नुसार बदलले. चांगली गोष्ट एवढीच की ते टिकले लयाला गेले नाही. जेव्हा कला टिकवायला लोकांकडे पैसे नसतात तेव्हा तडजोड करावी लागतेच. या तडजोडी पायी एवढे बदल करावे लागले हे माहीत नव्हते. का कुणास ठाउक मुस्लीमांच्या दयेवर या कला पुढे टिकल्या हे जरी खरे असले तरी त्यातला झालेला बदल धक्कादायक होता.

आपल््यापैकी बहुतेकांना नाट्यसंगीत मनापासून आवडते. त्याला शास्त्रीय संगीताचा पाया असतो. गाणारे पण चांगले होते.
शब्द चांगले असत. परवा बालगंधर्व सिनेमाचा एक प्रोमो पाहिला आणि मला दुसरा धक्का बसला. खाली दिलेली लिंक याचे स्पष्टीकरण देईल. बरीच नाट्यगीते जुन्या बंदिशीवर आधारित आहेत. आठवणीतली गाणी या लिंकवर नाटके या सदरात काही गाण्यांच्या खाली उल्लेख आहे. यातून झाला तर पुढील पिढीचा फायदाच झाला आहे पण मला का कुणास ठाउक ही गाणी अगदी ओरिजिनल वाटत. काही बंदिशीवर आधारित होता हे माहित होते पण एवढ्या प्रमाणात...जरा पचवायला अवघडच गेले. http://www.youtube.com/watch?v=nCU6PfOqMbA&NR=1

ही लिंक पहा...

आता त्या काळी शास्त्रीय संगीताला जेव्हा वाईट दिवस आले होते तेव्हा ते वाचवण्याकरता बंदिशींचा आधार घेतला गेला असे म्हणतात. त्यामुळे शास्त्रीय संगीत सामान्य लोकांपर्यंत पोचले पण आणि आणि टिकले पण.

हे सगळे जरी खरे असले तरीसुद्धा जेव्हा अगदी सही न सही चाल काँपी होते (कुठल्याही भाषेतली) तेव्हा वाईच वाटतेच. आपण नवीन पिढीतल्या काही संगीतकारांना म्हणतो अरे काय चाली चोरतात ...सेम गाणी काँपी करतात म्हणून. आता तुम्ही म्हणाल ती गाणी अगदी फालतू असतात त्याला शास्त्रीय पाया नसतो तरी प्रकार तोच ना......

मराठी लिखाणात पण हा प्रकार खूप आढळतो... त्याबद्दल परत कधीतरी..........


Thursday, July 7, 2011

बरखा....

बरखा....

नुकताच बरखा हा गाण्याचा कार्यक्रम आमच्या स्थानिक कलाकारांनी सादर केला. यात मल्हार रागाची ओळख करून दिली होती. हा मल्हार वेगवेगळ्या रूपात बरसला...कधी मिया मल्हार, कधी मेघ रूपात, तर कधी गौड मल्हार बनून. या रागाच्या बंदिशी मधून त्याच्या स्वभावाची ओळख झाली तर त्या रागावर आधारित सिनेमातील गाण्यामुळे सगळ्याना तो आपल्यातलाच वाटू लागला.

बहुतेक सर्व कलाकार शिकत असल्याने त्यांना या कार्यक्रमातून अजुन बरेच काही शिकायला मिळाले.

मिया मल्हार - हा तानसेन चा म्हणून ओळखला जातो.


भय भंजना.....http://www.youtube.com/watch?v=T8f7mQifcOo - भक्ती गीत

बोले रे पपीहरा.... http://www.youtube.com/watch?v=FZltu1Qz7O0 - सिने गीत

मेघ -http://www.youtube.com/watch?v=tq2bPHNBRaA - गरजे घटा बंदिश

घनघनमाला नभी दाटल्या...http://www.youtube.com/watch?v=dmKlUABn_vs

जन पळभर म्हणतील हाय हाय.....http://www.youtube.com/watch?v=F0n78oRqU8g भा रा तांबे कविता

आज कुणीतरी यावे.....http://www.youtube.com/watch?v=EgOt1m4-w9Q मुंबईचा जावई

कहासे आए बदरा....http://www.youtube.com/watch?v=WmJ1Zm59CAM चश्मे बद्दूर

मेहफिलमे बारबार...http://www.youtube.com/watch?v=PQb1PNrDN0s गझल

कुहु कुहु बोले कोयलिया.... http://www.youtube.com/watch?v=XD2ppdufP-g
रागमाला वापरून हे गाणे केले आहे. सोहनी, जौनपुरी, मल्हार व यमन राग यात वापरले आहेत. गाणारे व वाजवणारे दोघानाही यात चँलेँज असतो कारण दर कडव्याला सूर बदलत असतात.

गौड मल्हार -http://www.youtube.com/watch?v=9rtsa_wcyvI मान न करिये बंदिश

नभ मेघांनी आक्रमले... नाट्यगीत

गरजत बरसत सावन आयो रेhttp://www.youtube.com/watch?v=XOJrefVKMYc


या कार्यक्रमाची संकल्पना आणि सादरीकरण होते समीर चे. व्हिडिओ चे नेटके शूटिंग केले अमृताने. या साठी व्हाँलेंटिअर कार्य बरेच होते. प्रेक्षकांनी कार्यक्रमाला दिलेली पसंती ची पावती कलाकारांना नक्कीच प्रोत्साहित करुन गेली.

आपली कामे संभाळून शिकता शिकता केलेला हा उपक्रम नक्कीच छान वाटला.

Tuesday, November 23, 2010

समर्पण

समर्पण ...

अमेरिकेत आम्ही एका अगदी छोट्या गावात रहातो. सुदैवाने इथे मराठी आणि भारतीयांची संख्या खूप आहे. ड्रायव्हिंग डिस्टन्स कमी असल्याने लोक आपल्या कला गुणांना वाव देउ शकतात. दर वीक एंड ला काहीतरी कार्यक्रम असतोच. गेल्या आठवड्यात तेलगु, क्लासिकल, बांलिवूड अशा तीन कांन्सर्टस झाल्या. शिवाय बोलक्या बाहुल्या चा प्रयोग ही झाला. पुण्यात असल्यासारखे वाटत होते. दर वर्षी नाटक ही असतेच. बरे हे सगळे मंडळी आपली कामे संभाळून करतात. आशा आहे की हे असेच चालू राहील.

गेल्या आठवड्यात असाच एक कार्यक्रम झाला. कार्यक्रमाची थीम होती भजन, अभंग ई. तेलगु, कानडी , मराठी अशा सगळ्या भजनांचा समावेश होता. माझा सहभाग पडद्यामागे असतो. अर्थात त्यातूनही खूप शिकायला मिळते. तुम्ही पण आनंद घ्या या कार्यक्रमाचा......
एक सूर चराचर छायो निर्गुणि भजन
हरि सुंदर नंद मुकुंदा हे भजन दोन स्पीड मद्ध्ये आहे. पुण्यात अंतर्नाद मध्ये ते सादर झाले होते.
राम का गुणगान करिये
चदरिया झिनी रे झिनी निर्गुणि भजन - संत कबीर
जोहार मायहाप जोहार संत चोखा मेळा
सुनता है गुरू ग्यानी
निर्गुणि भजन - संत कबीर
जो भजे हरि को सदा भैरवी
क्रिष्णाने भेगणे.. याचे हिंदी व्हर्जन कलोनियल कझिन्स च्या अल्बम मध्ये होते
सामगान - कर्नाटकी स्टाईल (आपला मालकंस)
ओंकार प्रधान रूप गणेशाचे संत तुकाराम
पायोजी मैने व ठुमक चलत

Saturday, July 24, 2010

काही रागातील गाणी

आधीच्या पोस्ट मध्ये भर घातल्याने परत टाकले आहे

आमच्या इथे बरीच मंडळी गाणे पेटी तबला शिकतात. दर आठवड्याला जमतात व अधूनमधून छोटा कार्यक्रम करतात. गेल्या आठवड्यात असाच एक कार्यक्रम झाला. रागावर आधारित गाणी , त्यातला राग कसा ओळखावा अशी थीम होती. संकल्पना समीर ची होती. रागाचे चलन, त्याचा भाव माहित असले तर गाण्यात ते हळूहळू ओळखता येतात. लगेच जमत नाही पण खूप ऐकून कल्पना येते.

मागे एका पोस्ट वर या वर थोडे लिहिले होते आता थोडी गाणी ऐकवते. आधी रागाची माहिती मग गाणी असे देत आहे.
शूटिंग फार छान नाही पण चालू शकेल.

ललत, यमन, मालकंस, दरबारी व भैरवी हे राग घेतले होते.

आधीच्या पोस्ट मध्ये भर घातल्याने परत टाकले आहे

सुरूवात
ललत गाणे

ललत गाणे - यम माहिती
-
बंदिश येरी आली
आधा है चंद्रमा
आपके अनुरोधपे
निगाहे मिलानेको जी चाहता है

बंदिश मुख मोर मुख मोर
मालकंस माहिती

तू छुपी है कहा
मन तरपत
बंदिश जिनके जियामे
झनक झनक - भैरवी माहिती
भैरवी सावरे
तू गंगा की मौज मै

Tuesday, July 20, 2010

रागावर आधारित गाणी

आमच्या इथे बरीच मंडळी गाणे पेटी तबला शिकतात. दर आठवड्याला जमतात व अधूनमधून छोटा कार्यक्रम करतात. गेल्या आठवड्यात असाच एक कार्यक्रम झाला. रागावर आधारित गाणी , त्यातला राग कसा ओळखावा अशी थीम होती. संकल्पना समीर ची होती. रागाचे चलन, त्याचा भाव माहित असले तर गाण्यात ते हळूहळू ओळखता येतात. लगेच जमत नाही पण खूप ऐकून कल्पना येते.

मागे एका पोस्ट वर या वर थोडे लिहिले होते आता थोडी गाणी ऐकवते. आधी रागाची माहिती मग गाणी असे देत आहे.
शूटिंग फार छान नाही पण चालू शकेल.

ललत, यमन, मालकंस, दरबारी व भैरवी हे राग घेतले होते.

सुरूवात
ललत गाणे

ललत गाणे - यम माहिती
-
बंदिश येरी आली
आधा है चंद्रमा
आपके अनुरोधपे
निगाहे मिलानेको जी चाहता है

बंदिश मुख मोर मुख मोर
मालकंस माहिती

तू छुपी है कहा
मन तरपत
बंदिश जिनके जियामे
झनक झनक - भैरवी माहिती
भैरवी सावरे
तू गंगा की मौज मै

Tuesday, June 8, 2010

राग रंग

राग रंग

आपल्या जीवनात हिंदी, मराठी गाणी सतत आपली सोबत करत असतात. प्रवासात, घरी एकटेपणा घालवताना आपण बरीच गाणी गुणणतो. काही गाणी आपल्या नकळत आपण बर्‍याच वेळेला पुन्हा पुन्हा ऎकतो. काही गाण्यांशी आपल्या आठवणी निगडीत असतात. जुनी गाणी अर्थातच जास्त मनात घर करून रहातात. (काही नवीन गाणीही छान आहेत ). अमेरिकेत आल्यापासून बरेच शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम ऎकून आजकाल बंदिश हा प्रकार एकदम आवडायला लागला आहे. साहजिकच मग त्याचा रिसर्च आणि ऎकणे चालू होते. बरे मी काही शास्त्रीय संगीत शिकलेली नाही त्यामुळॆ सुरांशी फार परिचय नाही, पण ऎकायला छान वाटते हे नक्की. ह्या सूरांच्या रचनेत काही मॆथेमॆटिकल पॆटर्न्स असावेत असे वाटल्याने मी थोडा रिसर्चही करत आहे.

आपल्या संगीतकारांनी ३-४ मिनिटाच्या गाण्यात अशी अनेक गाणी अजरामर करून ठेवली आहेत. आपण गाणी ऎकताना हे गाणे अमूक रागातले किंवा रागावर आधारित आहे असे ऎकतो. बर्‍याच वेळा नकळत तो राग गुणगुणत असतो पण त्यावेळेस आपल्याला तो राग माहित असतोच असे नाही. प्रत्येक राग हा काही विशिष्ट भाव प्रकट करतो( भक्ति, शृंगार, करूण, विरह वगॆरे). राग हे ठराविक वेळेला गायले जातात, काही वेळा दोन वेगळ्याच भावांची गाणीही एकाच रागात असतात. काही राग एकापेक्षा जास्त भाव प्रकट करतात. असे सगळे असताना एखादे गाणे कुठल्या रागात आहे हे ऒळखणे जरा कॉम्प्लिकेटेड असते.

नुसत्या भावावरून गाण्याचा राग ऒळखणे अवघड असते. जर आपल्याला गाण्याचे सूर कळत असतील तर साधारण रागाची कल्पना येऊ शकते. पण सगळ्यांना सूर माहित नसतात. प्रत्येक राग कसा म्हणायचा याचे काही नियम असतात. ठराविक स्वर ठराविक पद्धतिनेच म्हणावे लागतात. त्या रागाचे स्वर आणि त्या रागाचा ठराविक भाव हे दोन्हीही त्यातून प्रकट व्हावे लागते. याला रागाचे चलन ( मी त्याला सोप्या भाषेत रागाची चाल म्हणते) म्हणतात. आता हे चलन किंवा या फ्रेझेस आपल्याला हिंदि मराठी गाण्यात सतत दिसत असतात. आपण जर एकाच रागावर आधारित गाणी एका पाठोपाठ ऎकली तर हळूहळू या फ्रेझेस आपल्याला कळू शकतात आणि त्या गाण्याचा राग लक्षात येऊ शकतो. यासाठी आधी त्या रागाचे चलन ही ऎकले पाहिजे. मुख्यांगाचे स्वर ही ऎकले पाहिजेत.

उदा. राग भूप ....आता पुढील गाणी ऎकलीत तर तुम्हाल ही गोष्ट स्पष्ट होईल....प्रत्येक गाण्यात काहीतरी साम्य आहे हे जाणवेल. हे साम्य म्हणजे या फ्रेझेस ......कदाचित एकदा ऎकून भागणार नाही पुन्हा पुन्हा ऎकावे लागेल.

chk the following two links and then listen the songs.

link shws raag bhoop

chk this link

१. ज्योति कलश झलके
२. नील गगन की छाऒमे
३. सायोनारा सायोनारा
४. पंछी बनू उडती फिरू
५. गीतरामायण - शरयू तीरावरी
६. इन आंखोकी मस्ती....
अशीच इतर रागांवरही गाणी ऎकता येतील पण त्यासाठी निदान रागाचे चलन माहित करून घ्यायला हवे.


नेहेमी रागावर आधारित हे शब्द आपण ऎकतो कारण बरेच वेळा संगीतकारांना थोडेसे बदल करावे लागतात. म्हणून आधारित चा आधार घेतला जातो. काही गाण्यात आपण सरगम ऎकत त्यावरून त्या रागाची कल्पना येते. उदा. निगाहे मिलाने को जी चाहता हॆ मधील सरगम किंवा ए आर रेहमान बर्‍याच गाण्यात २-३ ऒळी सरगम घालून त्यातून गाणे चालू करतो त्यावरून त्याच्या स्वरांची कल्पना येते.(गुरू मधील गाणी) मला वाटते दर सिनेमात एक तरी गाणे असे सरगम व शब्द असे मिश्र गाणे असावे म्हणजे लोकांना आपोआप तसे ऎकायची सवय होईल व कानसेन तयार होतील. सिनेमातील गाणी जेवढ्या आवडीने ऎकली जातात व फॉलो होतात तेवढे दुसरे काही होत नाही. अशा गाण्यांवर आधारित पुढचे पोस्ट लिहायचा विचार आहे.

कधी कधी वाट्ते सिनेमातील गाणी छान वाटली की ती एनजॉय करावीत ...कुठल्या का रागावर आधारित असेनात............

Sunday, May 9, 2010

संगीत की/कि राजनीती

संगीत की/कि राजनीती (हे टायटल तुम्ही मराठीत किंवा हिंदीत वाचू शकता.)

काल एक सितार, व्होकल व तबला असा एकत्र प्रोग्रॅम ऎकला. तसेच एक संतूर चा प्रोग्रॅम ऎकला.खूपच छान होता. मुख्य म्हणजे सगळे कलाकार तिशीच्या आतले. बरीच वर्षे रियाज केलेले होते. एवढ्या लहान वयात इतकी तयारी बघून कॊतुक वाटले आणि हिंदुस्तानी क्लासिकल म्युझिक चे भवितव्य उज्ज्वल आहे याची पुन्हा एकदा खात्री पटली.

गेल्या ५ वर्षात बरेच म्युझिक प्रोग्रँम ऑरगनाइज करण्यात भाग घेत असल्याने बर्‍याच कलाकारांशी बर्‍याच गप्पा झाल्या. आजकाल अमेरिका, युरोप, ऒस्ट्रेलिया, मिडल ईस्ट सगळीकडे कलाकार जाउन आपली कला सादर करतात. बाहेरच्य़ा देशात जाताना व्हिसा, वाद्यांची ने आण हे महत्वाचे असते. कस्ट्म ऑफिसर कुणाचे तबले ऒपन करतात तर लेदर लावलेली वाद्ये खूप डिटेल तपासतात त्यात कधी ती खराबही होतात. कधी नीट हाताळत नाहीत. या सगळ्या तपासण्यांची आजकाल टेररिस्ट मुळे आवश्यकता आहे. त्यामुळॆ काही म्हणता येत नाही. या तरी बाहेरच्या गोष्टी आहेत.

हे प्रोग्रॅम ठरवताना बरेच मार्केटिंग करावे लागते विशेषतः नवीन कलाकारांना. नाव झालेले कलाकार लोकांना माहित असतात त्यांचे काम थोडे सोपे असते. आजकाल इंटरनेट वरून कलाकार रेकॉर्डिंग्ज पाठवतात पण तरीही नवीन कलाकारांना बोलवायला पटकन कुणी तयार होत नाही. कलाकाराला एखादे ऍवॉर्ड मिळाले असले तर जरा महत्व वाढते पण सुरूवातीला कुठून ऍवॉर्ड मिळणार? आजकाल सगळीकडे राजकारण घुसले आहे. प्रोग्रॅम ठेवण्यासाठी कलाकारांकडे पॆसे मागतात हे ऎकून आश्चर्य वाटले. तुमचा कुणी गॉड फादर असेल तर त्याच्या नावामुळे फायदा होऊ शकतो पण हे सगळ्यांना शक्य नसते. बाहेर देशात आता येणार्‍या कलाकारांचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे हे राजकारण घुसले असावे. कारण कॉम्पिटिशन वाढली. प्रोग्रॅम ठरवणारे एजंटस स्वतःच्या मनाप्रमाणे वागतात. आणि एजंट नसला तर शिरकाव करू देत नाहीत. परत कार्यक्रम ठरवणारा , त्याची ऒळख फार महत्वाची ठरते. मग गुणवत्ता थोडी कमी जास्त असली तरी चालते. परत क्लासिकल संगीत म्हटले कि प्रेक्षक कमी आणि पॆसे कमी तोच शाहरूख चा सिनेमा किंवा सोनू निगम चा कार्यक्रम असला कि महाग तिकिटे काढून प्रेक्षक हजर.(मान्य आहे सर्व सामान्यांना ते कळते) कलाकार म्हणतात त्यांचा(पॉप्युलर) कार्यक्रम ठरवताना रिसेशन नसते आणि आमच्या वेळेस नेमके कसे असते? खरे आहे

पूर्वीच्या काळी राजे लोक कलाकारांना तनखे देऊन ठेवून घेत असत ते खरेच चांगले होते निदान त्यांना शांतपणे साधना करता येत असे. मुख्य म्हणजे घर कसे चालेल हि चिंता नसे. आजकाल खूप तरूण मुले शास्त्रीय संगीत शिकत आहेत. भरपूर रियाज करत आहेत. कष्ट करायला मागे नाहीत. स्वतःचे कॊशल्य प्रूव्ह करायला ते तयार आहेत पण ठराविक मर्यादेत असेल तोवर. पण त्यातच करिअर करताना, स्वतःला एस्टॅब्लिश करायला फार प्रयत्न करावे लागतात त्यांना. या राजनीती मुळे गुणवत्ता हे मोजमाप बाजूला जाते व इतर गोष्टींना महत्व आले आहे. त्यामुळे साधना करताना नक्कीच त्रास होतो. या साठी एखादी ट्रान्सपरंट पद्धत तयार झाली तर बरे होईल. आणि कलाकारांना पाठबळ देणारे लोक जर पुढे आले तर खूप फायदा होईल. क्रिकेट मध्ये लोक जसे संघांना पॆसे देतात तसेच जर कलाकाराना पाठबळ मिळाले तर छान होईल. गुणवत्तेनुसार कार्यक्रम झाले तर लोकांचा व कलाकारांचा दोघांचाहि फायदा होईल.

आता तुम्ही म्हणाल कि तुम्हाला काय करायचय यात पडून? वाटले तर कार्यक्रम बघा नाहितर गप्प बसा. पण या कलाकारांशी बोलून एवढे नक्की वाट्ले कि आपण जेव्हा एखाद्या कलाकाराचा कार्यक्रम बघतो तेव्हा त्याच्यामागे केवढे राजकारण असते हे तुमच्यापर्यंत पोचवावे. आजच्या तरूण पिढीत इतके छान कलाकार आहेत, ते आपली कला भारताबाहेर प्रदर्शित करत आहेत तर त्यांच्या गुणांचे चीज व्हावे.

Friday, December 25, 2009

तुमचे स्केल काय हो?

आमच्या घरी गाण्याचे बरेच हॊशी कार्यक्रम बसवले जातात. कधी मराठी मंडळासाठी, कधी म्युझि्‍क ग्रुप साठी तर कधी नुसतेच जमून गाणी म्हणतात. बर्‍याच वेळेला नवीन कुणी जॉईन होते. गाणे म्हणण्याचा आग्रह होतो आणि मग हो नाही करत गाण्याला सुरूवात होते. त्या आधी कुणीतरी विचारते, "तुमचे स्केल काय?" बहुतेक वेळेला "माहित नाही" हेच उत्तर येते. नाहीतर तुम्हीच सांगा असे उत्तर येते. सुरूवातीला मलाही हे स्केल प्रकरण कळत नसे.

आपण नेहेमी रेडिऒवर किंवा रेकॉर्ड वर जी गाणी ऎकतो ती खूप हाय स्केल वर असतात. साधारण गायकाला त्या पट्टीत गाता येत नाही. म्हणून आपली पट्टी किंवा स्केल शोधणे महत्वाचे आहे. पेटी वर आपण नेहेमी काळ्या पांढ्र्‍या पट्ट्या बघतो. त्या मद्र, मध्य व तार अशा ३ सप्तकात विभागलेल्या असतात. स्केल शोधताना तुम्ही ज्या काळ्या किंवा पांढर्‍या पट्टीच्या वरचे व खालचे सूर सहज म्हणू शकता ती तुमची पट्टी. ती सूर ट्राय करून शोधावी लागते. त्यामुळॆ काळी १, काळी ४, पांढरी ६ अशा स्केल्स असू शकतात. थोडक्यात काळी १ हा तुमचा ’सा’ धरून पुढ्चे सूर वाजवावे लागतात. आपल्या संगीतात हार्मोनिअमची ही खसियत आहे की कुठलीही की ही ’सा’ म्हणून वापरता येते आणि त्यानुसार रेफरन्स बदलत जातात.



पांढरी १




काळी ४


आता साथ करणार्‍याने प्रॅक्टीस एका स्केल वर केली आणि गाणार्‍याने अचानक स्केल बदलले तर त्याची गडबड होते. कारण आपले डोळॆ ठराविक रेफरन्स ने सेट झालेले असतात. हे सारेगामा वाले किती गाणी किती वेगवेगळ्या स्केलवर वाजवतात, कमाल आहे.

अर्थात असे प्रश्न निर्माण झाले की त्याच्यावर उपाय ही काढतात. स्केल चेंजर म्हणून एक हार्मोनिअमचा प्रकार मिळतो त्यात कीज स्लाईड करण्याची सोय असते. की बोर्ड वर ट्रान्सपोज नावाचे बटण वापरून हे करता येते. त्यामुळे इंटर्नली चेंज होतो व वाजवणार्‍याला सोपे जाते. गाणे म्हणणार्‍याला पण स्लो स्पीड वर गाणे म्हणायचे झाले(प्रॅक्टीस साठी) तर विंडोज मिडिया प्लेअर वर तशी सोय असते. जरज निर्माण झाली की तशी तशी सॉफ्ट्वेअर्स लिहिली जातात.

हे सगळे कळायला आमच्या घरी होणार्‍या प्रॅक्टीसचा मला असा खूपच फायदा झाला हे नक्की.

Thursday, November 19, 2009

सूर ताल

सूर ताल

गेली २-३ वर्षे म्युझिक सोसायटी मध्ये व्हॉलेंटिअर म्हणून काम करत आहे. २५ हून जास्त कलाकारांचे कार्यक्रम बघितले. बर्‍याच मोठ्या कलाकारांना भेटण्याची संधी मिळाली. वेगवेगळ्या वाद्ये ऎकली. आपोआपच थोड्या गोष्टी शिकले. त्यांनाच एका कोड्यात गुंफलय. बघा सुटतय का? उत्तर पुढील आठवड्यात....




उभे शब्द
१. या रागाची सुरूवात माळवा प्रांतात झाली असे म्हणतात. (४)
२. साथीच्या सर्व वाद्यात हे वाद्य खूपसे आपल्या आवाजाच्या जवळ वाजते.(३)
३. हा स्वर प्रत्येक रागात असतोच (१)
५. तबल्याचा १० मात्रांचा ताल (४)
७. एक राग किंवा मातीचा प्रकार (४)
८. गाणे शिकताना बहुतेक वेळेला सुरूवातीला हा राग शिकवतात (२)
९. एक ’सुगंधित’ राग .(३)
११. कल्याण थाटाचा एक राग(३)
१३. हे वाद्य अक्रोड किंवा मेपल च्या लाकडापसून बनवतात (३)
१४ तीन वेळा तालाचे सायकल पूर्ण करून समेवर येणे(३)

आडवे शब्द
४. या वाद्यात चक्क पाणी वापरले जाते(५)
६. या तालाच्या मात्रा विषम आहेत(३)
१० ही संभाळणे हे तबलजीचे मोठे काम असते(२)
१२ कर्नाटक शास्त्रीय संगीतात हिचे महत्व कमीच(२)
१३ गाण्याच्या साथीला ही हवीच(४)
१४ तबल्याचा एक बोल(२)
१५ मॆफिलीचा शेवट बहुतेक वेळेला या रागाने होतो.(३)
१६ अंतर्‍याच्या आधी ही येते(३)

Wednesday, October 7, 2009

गुरू-शिष्य परंपरा.कॉम -

आपल्याकडे गुरू-शिष्य परंपरेला फार महत्व आहे. एखादी कला, विद्या शिकायची असल्यास गुरू लागतोच. गुरूविण कोण दाखविल वाट? असे म्हटलेच आहे. नुसती पुस्तके वाचून किंवा कुणाचे पाहून विद्या मिळवता येत नाही. नाहीतर सगळ्या शॆक्षणिक संस्था बंद पडल्या असत्या. एकलव्य असतो पण एखादाच.

या सगळ्यावर एक चांगला उपाय आता इंटरनेट ने दिला आहे. पाश्चात्य देशात बर्‍याच कॉलेजेस मध्ये अभ्यासाच्या नोटस इंटर नेट वर फार पूर्वीपासून उपलब्ध आहेत. परिक्षा सुद्धा ऒनलाइन देण्याची सोय असते. घरी बसून, नोकरी सांभाळून तुम्ही अभ्यास करू शकता. ड्रायव्हिंग चे कष्ट, त्रास व ताण वाचतो. पेट्रोल बचत होते ती वेगळीच.

काही दिवसापूर्वी पुण्यातल्या पेपर मध्ये या डिस्टन्स लर्निंग बद्दल माहिती आली होती. अगदी खेड्यातल्या मुलांना या गोष्टीचा फायदा होइल हे दाखवून दिले होते. अशा शिक्षणासाठी बर्‍याच माहितीपूर्ण साइट्स ही लोकांनी बनवल्या आहेत. या डिस्ट्न्स लर्निंग साठी एक कॉम्प्युटर, इंटरनेट व वेब कॅम ची गरज आहे. वीज पुरवठा चांगला असणे आवश्यक आहे.

आता ग्लोबलायझेशनमुळे मंडळी जगभर पसरली आहेत. बाहेर देशात तिथल्या कला (आणि बरेच काही) शिकता येतात पण शेवटी जेव्हा आपल्या कडील (इंडिअन) एखादी गोष्ट शिकायची म्हटले की प्रश्न पडतो. साधारण मोठ्या शहरात गाणे, नृत्य व वादन याचे क्लास असतात पण बर्‍याच वेळा राहते घर व क्लासची जागा लांब असते. ड्रायव्हिंग मध्ये फार वेळ जातो. आता ब्लूमिंग्टन सारखे छोटे गाव असले तर हा प्रश्न फारसा येत नाही. बर्‍याच घरात आई व वडील दोघेही नोकरी करतात त्यामुळे घर, नोकरी व शाळेचा अभ्यास संभाळून मुलांचे क्लासेस संभाळणे फार अवघड जाते. वीक एण्ड त्यात जातो.

आजकाल इंटरनेट चा वापर करून गाणे, पेटी/कुठलेही वाद्य व नृत्य शिकता येते. तुम्हाला त्या त्या विषयातले नामवंत मार्गदर्शक मिळतात. आणि वन ऑन वन ट्रेनिंग मिळते. अजून काय पाहिजे? आता यात थोडे ड्रॉबॅक्स येतात पण ते हळूहळू कमी होत आहेत. गाणे शिकणे सोपे आहे कारण त्यात मेनली आवाज ऎकू येणे महत्वाचे असते. समोरची व्यक्ती दिसली नाही तरी चालते त्यामुळे वेब कॅम हा एक फॅक्टर कमी होतो. थोडासा लॅग येउ शकतो पण त्याची सवय होते. भारतात बर्‍याच वेळा वीज जाणे, नेट मध्ये व्यत्यय हे प्रॉब्लेम्स येउ शकतात पण ते हळूह्ळू कमी होत आहेत. इंटरनेट स्पीड कधी मॅच होत नाही. हे सगळे अधून मधून उदभवणारे प्रश्न असतात. शिकणारा व शिकवणारा यांच्या मध्ये ते अडथळा ठरू शकत नाहीत कारण त्यांना मनापासून शिकायचे असते.

या सगळ्या गोष्टी शिकतान अजून एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते ती म्हणजे वेळेचे गणित. भारत व अमेरिका, मिडल इस्ट, जपान, ऑस्ट्रेलिया या सगळ्या ठिकाणच्या वेळा व टाइम झोन लक्षात घ्यावे लागतात. एका ठिकाणी सकाळ तर दुसरीकडे संध्याकाळ तर तिसरीकडे अजून वेगळी वेळ. या वेळेनुसार क्लासची वेळ ठरवावी लागते. आमच्या घरात माझी मुलगी व नवरा दोघेजण या सोईचा उपयोग करून आपापले छंद जोपासत आहेत.

काही दिवसांनी एअरपोर्ट वर जशी वेगवेगळी घड्याळे लावलेली असतात तशी भारतातल्या क्लासमध्ये लावावी लागतील आणि एकाच ठिकाणाहून जगभरातली लोक आपल्याला हवी ती कला भारतातल्या गुरूंकडून शिकू शकतील. हा दिवस फार दूर नाही. यालाच गुरू-शिष्य-परंपरा डॉट कॉम म्हणायला हरकत नाही असे वाटते.

Wednesday, August 19, 2009

निवेदन एक कला....

निवेदन एक कला....

मागचे पोस्ट हे गाण्याच्या मागे जी व्यवस्था लागते त्याबद्द्ल लिहिले तेव्हा आता हे प्रत्यक्ष एका गाण्याच्या कार्यक्रमाबद्दल. बर्‍याच वेळेला आपण गाण्याचे कार्यक्रम ’बघतो’ नुसते ’ऎकत’ नाही. आजकाल स्टेज डेकोरेशन, कपडे, निवेदन या सगळ्याला महत्व आलेले आहे. बहुतेक वेळेला कुठलीतरी एक थीम घेउन गाणी बसवतात. कधी प्रेमावर तर कधी पावसावर तर कधी विरहावर तर कदी एखाद्या गायक/संगीतकाराची गाणी असतात. ह्या सगळ्या गाण्यांना एका सूत्रात बांधणारी एक महत्वाची व्यक्ती असते ती म्हणजे निवेदक. बर्‍याच वेळेला दोन निवेदक असतात (स्त्री व पुरूष). निवेदकाचे काम खूप महत्वाचे असते.

निवेदकाला कार्यक्रमातील सगळी गाणी जोडावी लागतात. यासाठी अधून मधून विनोद, कधी गाण्याबद्द माहिती तर कधी काही कविता असे सागावे लागते. प्रेक्षकांना गाणी ऎकताना खूप वेळ माहिती ऎकणे कंटाळवाणे होते त्यामुळे थोडक्यात पण इंटरेस्ट वाटेल असे बोलणे आवश्यक असते. कार्यक्रमाचा काळ, कल्पना आणि वेग या तिन्ही गोष्टी संभाळणे आवश्यक असते. मधे मी एक कार्यक्रम बघितला त्यातल्या निवेदकाने ’वेदनेशिवाय जे ऎकावे वाटते ते निवेदन’ अशी सुट्सुटीत व्याख्या केली होती.
आमच्या इथे असच एक कार्यक्रम बसवला होता (हॊशी) त्याचे हे निवेदन व गाण्याच्या लिंक्स देत आहे. तुम्हाला गाण्याचा एक प्रोग्रॅम बघितल्याचे समाधान वाटेल हे नक्की. या कर्यक्रमात गायकांना त्याच्या आवडीची गाणी म्हणायला परवानगी होती त्यामुळे ती जोडणे हे फार कॊशल्याचे काम होते कारण खूप वेगळ्या विषयावरची गाणी एकत्र गुंफायची होती. हे अवघड काम सोपे केले सॊ. देवयानी गोडसे यांनी. माझाही थोडाफार हातभार होताच. तर बघूया हा कार्यक्रम....

नमस्कार मंडळी. आजच्या माझे गाणे या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचे स्वागत. या कार्यक्रमात आपली गायक मंडळी घेउन आली आहेत आपल्या आवडीची गाणी. कुणी पसंती दिली आहे आपल्या आवडत्या गायकाला, कुणी त्यातल्या काव्याला तर कुणी चालीला. कार्यक्रमाची सुरूवात करू या एका अभंगाने....
सकल मराठी जनांची मायमाउली म्हणजे आपला पंढरीचा विठोबा. या आपल्या माउलीला भेटायला दर वर्षी लाखो भाविक पंढरीची वाट धरतात. टाळ मृदुंगाची साथ आणि मुखाने विठूनामाचा गजर. चला तर आपणही सामील होऊ या या गजरात. संत एकनाथ महाराजांचा अभंग आपल्या दमदार आवाजात सादर करत आहेत.........माझे माहेर पंढरी.....

पंढरीची वारी म्हटली की हमखास पावसाची आठवण होते. या पुढचे गाणे आहे पावसावरचे.
दाटून आलेले आभाळ, वार्‍याची गोड शिरशिरी आणि मनाला धुंदी आणणारा तो मृदगंध हे सगळे आपल्याला पहिल्या पावसाची आठवण करून देते. असे हे सुंदर क्षण अनुभवताना आपली आवडती व्यक्ती बरोबर हवी असे साहजिकच वाटते. अगदी हेच भाव पुढील गाण्यातून सादर केले आहेत......अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचू लागले....

या गाण्यात तिच्या मनातले भाव तुम्ही ऎकलेत आता विरहाच्या नुसत्या कल्पनेने त्याची काय परिस्थिती झाली हे बघूया.
प्रेमात गुंतलेले दोन जीव एकमेकांसाठीच जगत असतात. अधून मधून विरहाचे क्षणही येतात पण ते प्रेमाची गोडी अजूनच वाढवतात. आपल्या शिवाय तिचे दिवस कसे सरतील असा गोड प्रश्न त्याला पडलाय. खरे तर दोघांची परिस्थिती तीच आहे पण तिच्याकडून प्रेमाची कबुली घेण्यातली मजा आही ऒरच. संदीप खरे यांची ही सुंदर कविता सादर होत आहे. यातले शब्द आणि चाल तुम्हाला नकीच ठेका धरायला लावतील. कसे सरतील सये....

आपल्या संस्कृतीत लोककलेचा वारसा फार मोठा आहे. मायमराठीचा ठळक्पणे सांगता येणारा लोककलेचा प्रकार म्हणले लावणी. लावण्याचा भावाविष्कार करते ती लावणी. शृंगाररसाची धिटाईने मांडणी करते ती हिच लावणी आणि ऎकणार्‍याला आपल्या तालावर थिरकायला लावते ती पण लावणीच. मध्यंतरी या लावणीला कठिण काळातून जावे लागले पण त्यातून बाहेर पडून पुन्हा लोककलेचा मानाचा तुरा म्हणून ती आता ऒळखली जाते.
अशीच एक नखरेल लावणी आपल्या भेटीला घेउन येत आहे ......रेशमाच्या रेघांनी....

यानंतर पंढ्रीची मायमाउली पुन्हा आपल्या भेटीस येत आहे. संत मंडळींना या माउलीला भेटायला प्रत्यक्ष देवळात जावे लागते असे नाही. विठ्ठ्लाच्या रूपाने भारलेल्या वातावरणातच भक्तांना त्याचा साक्षात्कार होतो. संत चोखा मेळा यांच्या अभंगातून विठूनामाचा महिमा सादर करत आहोत.....अबीर गुलाल उधलीत रंग............

कुठलाही मराठी गाण्यांचा कार्यक्रम ऋतु हिरवा मधील गाण्याशिवाय पूर्ण होत नाही. मग आपला कार्यक्रम तरी त्याला अपवाद कसा असणार? वीणेच्या स्वरसाजाचे स्वभाव सांगणारे गाणे यानंतर सादर होत आहे. आपण आपल्या भावना नेहेमी शब्दातून व्यक्त करतो आणि संवाद साधतो. पण संवादासाटी खरेच शब्दांची आवश्यकता असते का? तुम्ही जर कधी वीणा ऎकली तर लक्षात येईल की वीणेचे स्वर नानाविध भाव वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त करतात. कधी तराणा, कधी नखरेल खटका तर कधी सुंदर ताना. मग हे स्वर आपल्या मनाला भिडतात आणि सहजच शब्देविणु संवादु साधला जातो.
बा. भ. बोरकरांच्या कवितेतून सादर झालेले हे विचार सादर होत आहेत पुढच्या गाण्यातून..... झिनीझिनी वाजे बीन

सलील कुलकर्णी व संदीप खरे या जोडगॊळीने सध्या मराठी तरूणाई वर मोहिनी घातली आहे. सरळ सोपे आणि म्हणूनच आपलेसे वाटणारे शब्द, अधी डोलायला लावणारे तर अधी व्याकूळ करणारे. याच जोडीचे एक विरहगीत आता आपल्या पुढे येत आहे. संसारत रूसवे फुगवे, अबोला हे तर नेहेमीचेच पण हे जर एका मर्यादेबाहेर गेले तर कधी कधी ताटातुटीचे क्षण ही येउ शकतात. अशावेळी एकटेपणा प्रकर्षाने जाणवतॊ. नकळतच आपण आपल्या मनाशी कबुली देतो. आपल्या सुरेल आवाजात ही कबुली देत आहेत.
नसतेस घरी तू जेव्हा जीव तुटका तुटका होतो..........

यानंतर शेवटचे गाणे सादर करण्यापूर्वी वादकांची ऒळख झाली.

आता वळू या कार्यक्रमाच्या शेवटच्या गाण्याकडे. ग्रामीण बाजाची गाणी म्हणजे आपल्या साहित्यातला अनमोल ठेवा. ग्रामीण भागातले बोलणे, वागणे अगदी मोकळं. कसं बोलू काय बोलू असे भिडस्त प्रश्न नाहीत. सगळा कारभार कसा खुल्लम खुल्ला. अशा प्रकारची गाणी देण्यात दादा कॊंडके यांचा फार मोठा वाटा आहे. या गाण्यातला तो व ती म्हणजे खेड्यातली जिवंत तरूणाई.
आंधळा मारतो डोळा या चित्रपटातील तिखी नोकझोक खास गावरान ठसक्यात सादर होत आहे पुढ्च्या गाण्यातून...
अग हिल हिल पोरी तुला..
.






Wednesday, August 12, 2009

गाणे ऎकताना.........

गाणे ऎकताना.........

गाणे कसे ऎकावे किंवा कुठले ऎकावे याबद्दल हे पोस्ट नाही. आजकाल गाण्याचे अनेक प्रोग्रॅम्स आपण ऎकतो. कार्यक्रम बर्‍याच वेळा वेळेवर सुरू होत नाही. मग आज नीट ऎकू आले नाही किंवा तबलाच फार जोरात होता अशा काहीतरी कॉमेंटस होतात. जो माणूस पॆसे खर्च करून कार्यक्रम बघायला जातो तो काही अपेक्षेने जातो. आणि ते बरोबरही आहे. आमच्या घरी हॊशी कार्यक्रमांच्या बर्‍याच प्रॅक्टीस होतात. माझा सहभाग अर्थात पडद्यामागचा असतो. ते कार्यक्रम बसवताना माझ्या माहितीत थोडीफार भर पडली ती तुमच्याशी शेअर करत आहे.

गाणे ऎकताना काही मंडळी शब्द ऎकतात काही तालाला महत्व देतात तर काही सूरांवर प्रेम करतात. या तिन्ही गोष्टी प्रेक्षकांपर्यंत व्यवस्थित पोचण्याची आवश्यकता असते तेव्हाच कार्यक्रम यशस्वी होतो. यासाठी माइक्स, स्पिकर्स, ऍम्प्लिफायर व फीडबॅक स्पीकर्स ची गरज असते. आणि हे सगळे मॅनेज करण्यासाठी ज्याला चांगला ’कान’ आहे असा साउंड टेक्निशिअन आवश्यक असतो. नेहेमी प्रोग्रॅम बसवताना गायक, वादक भरपूर असतात पण साउंड टेक्निशिअनचे काम करायला फार कमी मंडळी पुढे येतात. तसे बघितले तर ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे.

माइक हे गायक, वादक याच्यासाठी वापरतात. ते बरोबर अंतरावर लावले नाहीत तर नीट आवाज येत नाही. स्पिकर्स हे प्रेक्षकांसाठी असतात. हॉलच्या कपॅसिटीच्या प्रमाणे स्पिकर्स लावावे लागतात. कमी किंवा जास्त कपॅसिटीचे लावले तर व्यवस्थित ऎकू येत नाही. फीडबॅक स्पीकर्स हे गायक व वादकांसाठी असतात. मोठ्या हॉलमध्ये स्पीकर्स मधून प्रेक्षकांना आवाज पोचतो पण तो परत गायकाकडे पोचेपर्यंत मधे थोडा वेळ जातो आणि लॅग - विलंब येतो हे टाळण्यासाठी फीड्बॅक स्पीकर्स वापरत्तात. माइक चे बरेच प्रकार असतात. त्यात रिमोट व रेग्युलर मायक्रोफोन्स जास्त वापरले जातात. रेग्युलर मायक्रोफोन्सच्या वायर्स जनरली रंगीत किंवा नंबर लिहिलेल्या असतात. साउंड टेक्निशिअन रंगांवरून अथवा नंबरवरून कुठला माइक कुणाचा हे लक्षात ठेवतो आणि त्याच्या सहाय्याने आवाज कमी जास्त करतो. जेवढे माइक जास्त तेवढे जास्त लक्ष द्यावे लागते. या सगळ्या माइक्स च्या वायर्स एका ऍम्प्लिफायर ला जोडतात. त्याचे एक आउट्पुट स्पीकर्स ला व दुसरे फीडबॅक मॉनिटर ला देतात.

खाली एक बेसिक सिस्टीम दाखवली आहे.




एकामागोमाग दोन प्रोग्रॅम्स असतील तर मधे सेटींग ला वेळ कमी मिळतो. सिस्टीम सेट झाली की आवाजाचे टेस्टींग करावे लागते आणि त्यानंतर कार्यक्रम सुरू होतो. या सगळ्या गोष्टी करताना शक्यतो सभागृह रिकामे असावे लागते. या सगळ्या गोष्टींना वेळ लागला की प्रेक्षकांना जास्त वाट बघायला लागते. कधी कधी नवीनच काहीतरी प्रश्न निर्माण होतात. वायर्स कुणी हलवल्या किंवा त्या एकमेकात अडकल्या तर स्पिकर्स मधून जोरात आवाज येतो. फीडबॅक च्या समोरून माइक नेला तर जोरात आवाज येतो की लोकांना कानावर हात ठेवावे लागतात. आता पुढचा कार्यक्रम बघताना, ऎकताना हे सगळे फॅक्टर्स तुम्ही नक्कीच लक्षात घ्याल आणि कार्यक्रमाची मजा घ्याल असे वाटते.