Sunday, May 9, 2010

संगीत की/कि राजनीती

संगीत की/कि राजनीती (हे टायटल तुम्ही मराठीत किंवा हिंदीत वाचू शकता.)

काल एक सितार, व्होकल व तबला असा एकत्र प्रोग्रॅम ऎकला. तसेच एक संतूर चा प्रोग्रॅम ऎकला.खूपच छान होता. मुख्य म्हणजे सगळे कलाकार तिशीच्या आतले. बरीच वर्षे रियाज केलेले होते. एवढ्या लहान वयात इतकी तयारी बघून कॊतुक वाटले आणि हिंदुस्तानी क्लासिकल म्युझिक चे भवितव्य उज्ज्वल आहे याची पुन्हा एकदा खात्री पटली.

गेल्या ५ वर्षात बरेच म्युझिक प्रोग्रँम ऑरगनाइज करण्यात भाग घेत असल्याने बर्‍याच कलाकारांशी बर्‍याच गप्पा झाल्या. आजकाल अमेरिका, युरोप, ऒस्ट्रेलिया, मिडल ईस्ट सगळीकडे कलाकार जाउन आपली कला सादर करतात. बाहेरच्य़ा देशात जाताना व्हिसा, वाद्यांची ने आण हे महत्वाचे असते. कस्ट्म ऑफिसर कुणाचे तबले ऒपन करतात तर लेदर लावलेली वाद्ये खूप डिटेल तपासतात त्यात कधी ती खराबही होतात. कधी नीट हाताळत नाहीत. या सगळ्या तपासण्यांची आजकाल टेररिस्ट मुळे आवश्यकता आहे. त्यामुळॆ काही म्हणता येत नाही. या तरी बाहेरच्या गोष्टी आहेत.

हे प्रोग्रॅम ठरवताना बरेच मार्केटिंग करावे लागते विशेषतः नवीन कलाकारांना. नाव झालेले कलाकार लोकांना माहित असतात त्यांचे काम थोडे सोपे असते. आजकाल इंटरनेट वरून कलाकार रेकॉर्डिंग्ज पाठवतात पण तरीही नवीन कलाकारांना बोलवायला पटकन कुणी तयार होत नाही. कलाकाराला एखादे ऍवॉर्ड मिळाले असले तर जरा महत्व वाढते पण सुरूवातीला कुठून ऍवॉर्ड मिळणार? आजकाल सगळीकडे राजकारण घुसले आहे. प्रोग्रॅम ठेवण्यासाठी कलाकारांकडे पॆसे मागतात हे ऎकून आश्चर्य वाटले. तुमचा कुणी गॉड फादर असेल तर त्याच्या नावामुळे फायदा होऊ शकतो पण हे सगळ्यांना शक्य नसते. बाहेर देशात आता येणार्‍या कलाकारांचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे हे राजकारण घुसले असावे. कारण कॉम्पिटिशन वाढली. प्रोग्रॅम ठरवणारे एजंटस स्वतःच्या मनाप्रमाणे वागतात. आणि एजंट नसला तर शिरकाव करू देत नाहीत. परत कार्यक्रम ठरवणारा , त्याची ऒळख फार महत्वाची ठरते. मग गुणवत्ता थोडी कमी जास्त असली तरी चालते. परत क्लासिकल संगीत म्हटले कि प्रेक्षक कमी आणि पॆसे कमी तोच शाहरूख चा सिनेमा किंवा सोनू निगम चा कार्यक्रम असला कि महाग तिकिटे काढून प्रेक्षक हजर.(मान्य आहे सर्व सामान्यांना ते कळते) कलाकार म्हणतात त्यांचा(पॉप्युलर) कार्यक्रम ठरवताना रिसेशन नसते आणि आमच्या वेळेस नेमके कसे असते? खरे आहे

पूर्वीच्या काळी राजे लोक कलाकारांना तनखे देऊन ठेवून घेत असत ते खरेच चांगले होते निदान त्यांना शांतपणे साधना करता येत असे. मुख्य म्हणजे घर कसे चालेल हि चिंता नसे. आजकाल खूप तरूण मुले शास्त्रीय संगीत शिकत आहेत. भरपूर रियाज करत आहेत. कष्ट करायला मागे नाहीत. स्वतःचे कॊशल्य प्रूव्ह करायला ते तयार आहेत पण ठराविक मर्यादेत असेल तोवर. पण त्यातच करिअर करताना, स्वतःला एस्टॅब्लिश करायला फार प्रयत्न करावे लागतात त्यांना. या राजनीती मुळे गुणवत्ता हे मोजमाप बाजूला जाते व इतर गोष्टींना महत्व आले आहे. त्यामुळे साधना करताना नक्कीच त्रास होतो. या साठी एखादी ट्रान्सपरंट पद्धत तयार झाली तर बरे होईल. आणि कलाकारांना पाठबळ देणारे लोक जर पुढे आले तर खूप फायदा होईल. क्रिकेट मध्ये लोक जसे संघांना पॆसे देतात तसेच जर कलाकाराना पाठबळ मिळाले तर छान होईल. गुणवत्तेनुसार कार्यक्रम झाले तर लोकांचा व कलाकारांचा दोघांचाहि फायदा होईल.

आता तुम्ही म्हणाल कि तुम्हाला काय करायचय यात पडून? वाटले तर कार्यक्रम बघा नाहितर गप्प बसा. पण या कलाकारांशी बोलून एवढे नक्की वाट्ले कि आपण जेव्हा एखाद्या कलाकाराचा कार्यक्रम बघतो तेव्हा त्याच्यामागे केवढे राजकारण असते हे तुमच्यापर्यंत पोचवावे. आजच्या तरूण पिढीत इतके छान कलाकार आहेत, ते आपली कला भारताबाहेर प्रदर्शित करत आहेत तर त्यांच्या गुणांचे चीज व्हावे.

No comments: