

ओबमा गोज ब्ल्यू....
तारीख १ मे २०१०, स्थळ फूटबॉल स्टेडियम ऍन आर्बर मिशिगन, ८५०० विद्यार्थी आणि ८०,००० प्रेक्षक यांनी स्टेडियम गच्च भरलेले. बरोबर ११ वाजता बॅंडच्या साथीवर त्याने एंट्री घेतली आणि सगळीकडे टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला. कॅमेर्याचे फ्लॅश उडू लागले. सुरूवातीचे काही सोपस्कार पार पडल्यावर पुढची ४० मिनिटे चिडीचूप शांततेत लोकांनी भाषण ऎकले. अधूनमधून विनोदाची पेरणी करत , दुसर्या पार्टीच्या लोकांना मधूनच चिमटे काढत, रोज नवीन नवीन उदभवणार्या प्रश्नांचा उल्लेख करत, आजच्या तरूण ग्रॅज्युएटस नी कसे वागावे हा मेसेज देत ही ४० मिनिटे कशी संपली ते कळले नाही. हा अनुभव तुमच्याशी शेअर करण्यासाठी हे पोस्ट. ०
माझ्या मॆत्रिणिच्या मुलीचे ग्रॅज्युएशन होते. त्यासाठी आम्ही जायचे ठरवले. नंतर कळले कि, मुख्य पाहुणे प्रेसिडेंट ऒबामा आहेत. मी आतापर्यंत त्यांची बरीच भाषणे प्रेसिडेंशिअल डिबेट च्या काळात ऎकली होती. तिथले एकंदर वातावरण, लोकांचे शिस्तीत टाळ्या वाजवणे आणि मुख्य म्हणजे ऒबामांचे वक्तृत्व याचा माझ्यावर प्रभाव पडलेला होता. हा मनुष्य चांगला ऒरेटर आहे. मुद्दे तयार असतात. अधेमधे अडखळणे अजिबात नाही. ऎकायला खूप छान वाटते.

यावर्षी सगळी तिकीटे संपली होती कारण लोकांना ऒबामाला बघायचे होते, ऎकायचे होते. आधी मेल वर सगळ्यांना सुचना पाठवलेल्या होत्या....बरोबर काही ठेवायला परमिशन नव्हती म्हणजे तेवढेच सिक्युरिटी चेकिंग सोपे. ८० वर्षाच्या आजी आजोबांपासून २ महिन्याच्या बाळापर्यंत लोक ऑडियन्स मध्ये होते.


गो ब्ल्यू' हे मिशिगनचे स्टेटमेंट त्याने आल्याआल्याच म्हटले...प्रत्येक जण ते भाषणाच्या शेवटी म्हणत होता ऒबामा ने डेमोक्रसी टिकवण्यासाठी प्रयत्न करायला सांगितले, पॉलिटिक्स मध्ये तरूणांनी सक्रिय सहभाग घ्यायला पाहिजे, आपली जागा सोडून दुसरीकडे गेले पाहिजे, वेगळ्या गोष्टी वाचल्या पाहिजेत. आपल्या समोर जो प्रतिस्पर्धी असेल त्याचे म्हणणे (विचार) ऎकून घेणे हे अतिशय महत्वाचे आहे असा त्यांनी मुलांना सल्ला दिला. गव्हर्मेंट ला नावे ठेवणे हे खूप कॉमन झाले आहे पण लोकांनी हे लक्षात ठेवावे की आपण गव्हर्मेंटचाच भाग आहोत, दुसरे तिसरे कुणी नाही. वेगवेगळ्या लोकांबरोबर (वंश, जाति, धर्म) राहिले कि त्यांचे प्रॉब्लेम्स जास्त कळतात म्हणून वेगळ्या लोकात मिसळ्णे आवश्यक आहे असाहि सल्ला दिला. मला वाटते सगळ्या लोकशाही राष्ट्रातील लोकांना हाच सल्ला योग्य आहे.
कालचा जमलेली गर्दी ही त्याच्या भाषणासाठी झालेली मोठी गर्दी होती. ( त्याच्या ओथ ला याहून जास्त गर्दी होती) ब्लूमिंग्ट्न

3 comments:
ओबामाने बदलाचे आश्र्वासन दिलेले असले तरी अमेरिकेच्या धोरणात मूलगामी बदल करणे त्यांच्या कुवतीबाहेरचे आहे.
खरे आहे. कदाचित इतर साध्या गोष्टीत बदल आणू शकेल. कळेलच पुढील १-२ वर्षात.
ओबामा एकदा का बोलायला लागला की ८०,००० काय कितीही लोकांना सहज आपलेसे करून टाकतो. त्याच्या समोर ना कधी कागद पाहिलायं का कधी बोलतांना अडखळणे... अं अं करणे... एकदा सुरवात झाली की मुद्देसूद, अमंळ कडक, मध्येच हास्याची लकेर झडेल असे काही तर कधी भावनेला हात घालणारे... मी एकदम मोठ्ठा पंखा आहे त्याची. बाकी शिस्त असली व ती पाळणारे असले की समुदाय किती का मोठा असेना सारे कसे नेमके व उल्लेखनीय असते.
Post a Comment