Friday, December 25, 2020

पाउलखुणा संस्क्कृतिच्या १ - ऋग्वेद

पाउलखुणा संस्कृ ितच्या १ - ऋग्वेद

ॐ अिग्नमीळे पुरोिहतं यज्ञस्य देवमृित्वजम् ।

होतारं रत्नधातमम् ॥१॥

हे अिग्नहोत्र िसिरयल चे टायटल साॅंग आज २१ व्या शतकात आपण ऐकतो आहोत ती ऋग्वेदातील पिहली ऋचा आहे आिण साधारण ३५०० ते ४००० वषाचर्ंीप्रवासकरूनजशीच्यातशीआपल्यापयर्ंतपोचलीआहेहेपाहूनथक्कव्हायलाहोते.साधाकानगोष्टीचाखेळ१०मुलातखेळालातरशेवटी येणारी गोष्ट िकतीतरी वेगळी असते. आपल्या देशावर होणारी परकी आक्रमणे त्यांनी आपली िलिखत संपदा जाळणे या सगळ्यातून वाचू, आहे तसे हे विैदकसािहत्यआपल्यापयर्ंतपोचलेआह,ेअगदीआहेतसेआिणकेवळएवढेचकारणत्याचीमािहतीकरूनघ्यायलापुरसेेआह.ेज्याऋषींनीते पािहलेतेतरमहत्त्वाचेआहतेचपणइतक्यािपढ्यानंतरहीतेआपल्यापयर्तपोचवणारहीतेवढेचमहत्त्वाचे

काही वषार्ंपूवीर् माझ्या काकांकडे ऋग्वेदाची देवनागरी प्रत पािहली होती. तेव्हा यात फक्त यज्ञाचे वणर्न गाईंचे दान असे काही असावे असे वाटले होते. त्यानंतरआताच्या,घरातजास्तवेळरहाण्याच्याकाळातथोडासंस्कृतचाअभ्यासथोडाहिेरटेजचाअभ्यासकेलाववेदांच्याअंतरगंाचीथोडीकल्पना आली. त्या काळाचा इितहास, भूगोल, व सामािजक व्यवस्था याची थोडा अंदाज आला. हे सगळे बरचे से मािहत होते पण थोडे joining the dots झाले. वेदातील ऋचा िकं वा मंत्र हे ऋषींना िदसले (सुचले) ते कु णी िलिहले नाहीत म्हणून त्याला अपौरूषेय असे म्हणतात. स्रुती व स्मृती या माध्यमातून ते पुढच्या िपढीकडे सोपवले गेले. ऋक िकं वा ऋचा म्हणजे मंत्र व वेद म्हणजे ज्ञान आिण एकित्रत ऋचा अशी याची सोपी व्याख्या आह.े

वेदांबद्दलमािहतीकरूनघेतानापिहलाधक्काम्हणजेजमर्न,फ्रेंच,िब्रिटशयांनीकेलेलीभाषांतर.े थोडेवाईटहीवाटलेकीआपल्याकडेएवढेिवद्वान असूनही एक दोन भाष्य सोडतां आजही मॅक्सम्यूलरचे नाव पिहले घेतले जाते. या जमर्न लोकांना संस्कृ तच एवढे प्रेम का हे कळत नाही. आजही मोठ्या प्रमाणावर ितथे संस्कृ त चा अभ्यास चालतो. अॅटाॅिमक बाॅंब नंतर गीतेतील श्लोकाची त्यांना आठवण होते आिण एिडसनच्या ग्रामोफोननवर इंग्लंडमधले पिहलेरकेाॅिडर्ंगकरतानामॅक्सम्यूलरअिग्नमीळेपुरोिहतम्हीऋग्वेदातीलऋचाम्हणतोयागोष्टीवाचूनआश्चयर्वाटल्यािशवायरहातनाही. सूयर्ग्रहणावर परदेश लोकांनी बनवलेल्या documentary मध्ये सूयर्ग्रहणाचा पिहला उल्लेख ऋग्वेदात आहे हे नमूद के ले जाते आिण आपल्या मुलांपयर्ंत या गोष्टी पोचलेल्या नसतात यांचे वाईट वाटते. वल्डर् हिे रटेज मध्ये खूप वरचे स्थान ऋग्वेदाचे आह.े

िकतीही नाही म्हटले तरी या परदेशी लोकांनी translation के ले म्हणून आपल्याला या सािहत्यापयर्ंत पोचतां आले वाचतां आले हे नक्की . नाहीतर

िकतीही नाही म्हटले तरी या परदेशी लोकांनी translation के ले म्हणून आपल्याला या सािहत्यापयर्ंत पोचतां आले वाचतां आले हे नक्की . नाहीतर manuscripts ची िस्क्रप्ट मािहत असल्यािशवाय ते वाचतां आले नसते. िब्रिटश मंडळींना याबाबतीत क्रे िडट िदले पािहजे त्यांनी अजंता एलोरा , खजुराहो देवळे उजेडात आणली. मधुबनी पेंिटं ग्ज ना पुनरूज्जीिवत के ले, अजंताची पेंिटं ग्ज त्या वेळची कशी होती हे त्यांच्या आिटर् स्ट नी के लेल्या

पेंिटं ग मुळे बघता आली हे नक्की. आिण ब्राम्ही िस्क्रप्ट डीकोड के ली म्हणून बरचे से िशलालेख वाचतां आले. आटर् इफे क्ट्स म्यिु झयम मधे ठेवल्याने जगापुढे आले व संवधर्न झाले हे नक्की. माझे हे मत बहुतेकांना आवडत नाही आिण त्यांनी आपले कसे फक्त वाईट के ले हे ऐकावे लागते. हे थोडेसे िवषयांतर झाले पण महत्त्वाचे वाटले ...वेस्टनर् लोका वेदांचा philological study kela. History and language study. विै दक संस्कृ त भाषेला तेव्हा भाषा असे म्हटले जाई.

पूवीर्च्या काळी इराण, अफगािणस्थान, पािकस्तान अशा मागार्ंनी काही टोळ्या भारतात आल्या. ही सवर् आताची नावे आहते . अित थंड प्रदेशात त्यांना अिग्नचे महत्व नक्कीच होते. अन्न िशजिवणे, मातीची भांडी भाजणे, ऊबेसाठी अिग्नची गरज होती आिण त्याला सतत तेवता ठेवणे आवश्यक होते. यातूनच अिग्नहोत्राची सुरूवात झाली असावी. आज्य देउन अिग्नची प्राथर्ना करताना या ऋचा अिस्तत्वात आल्या असाव्यात. अिग्नला आहुित देउन त्याच्याकडू न गोधनाची व चांगल्या आरोग्याची अपेक्षा के लेली िदसत.े

गोधन सवार्त महत्त्वाचे कारण त्यापासून बर्‍याच गोष्टी िमळत असत. अिग्न प्रमाणेच सूयर् आिण उषा पण महत्त्वाचे होते. त्यावर काहीऋचा आहते . काही ऋचात सूयार्ला उषेचा मुलगा म्हटलंय कारण तो उषेच्या नंतर येतो तर काहींनी त्याला ितचा िप्रयकर म्हटले आहे कारण तो ितचा पाठलाग करतो. िनसगर् त्यातील नद्या, चंद्र, सूयर् यांवर ऋग्वेदात बरचे काव्य आह.े गायत्री मंत्र जो आपल्यापैकी बरचे जणांना मािहत आहे तो पण ३५०० वषेर् प्रवास करून आपल्यापयर्ंत पोचला आह.े

ॐ भूर् भुवः स्वः । तत्सिवतुवर्रण्ये ं

भगोर्॑ देवस्य धीमिह । िधयो यो नः प्रचोदयात् ॥

त्याकाळीिनसगार्लादेवमानलेलेिदसते.सयू र्,िमत्रऋतपाउसअिग्नरूद्रनद्यायांच्यास्तुतीपरकाव्यवप्राथर्नाअनेकऋचातिदसतात.यासगळ्यांना देवता म्हणत असत. ३३ अशा देवता.चा उल्लेख येतो.या काळातील भौगोिलक मािहती नद्या पवर्त यावरून लक्षात येते. ह्या सगळ्या ऋचा, वेगवेगळ्या ऋषींच्य, सगळ्या लोकांच्यात िवखुरलेल्या होत्या. त्याचे वगीर्करण के ले गेले १० मंडलात. एका मंडलात अनेक सूक्त असत व एका सूक्तांत अनेक ऋचा. यांतील पिहले व १० वे मंडल हे िमसलेिनयस व त्या मानाने नंतरच्या काळातले आह.े त्या दोन्हीत १९१ ऋचा आहते . बाकी २-९ ही ऋिष व

त्यांच्या कु टुंिबयांच्या नावे िवभागली आहते . गृत्समद, िवश्वािमत्र, वामदेव, अित्र, अंिगरस, कण्व व अंिगरस. अशा प्रकारे १०२८ सूक्तांना िवभागली


त्यांच्या कु टुंिबयांच्या नावे िवभागली आहते . गृत्समद, िवश्वािमत्र, वामदेव, अित्र, अंिगरस, कण्व व अंिगरस. अशा प्रकारे १०२८ सूक्तांना िवभागली आह.े िवषयाप्रमाणे व ऋषीप्रमाणे. 33*8*8 असेही हे वगीर्करण बघतां येते. या वगीर्करणामुळे पुढे स्मृतीरूपात त्यांना पुढच्या िपढीकडे देताना त्याला थोडे स्ट्रक्चर आले हे नक्की.

पाठांतराचे ७-८ प्रकारचे प्रकार आहते . प्रथम प्रत्येक पद वेगळे करून सलग पाठ करणे मग १,२ २,३ ३,४ असे व नंतर अजून वेगवेगळे प्रकार वापरलेत. उदात्त, स्विरत व अनुदात्त अशा ठरािवक पद्धतीने म्हटल्याने हे सगळे मंत्र जसेच्या तसे त्या चालीत पुढे पोचले. ही पद्धत बरचे प्रयोग करून ठरवली असावी. खालच्या िलं क मधे ७ िम नंतर पहा.

https://m.youtube.com/watch?v=dVV1Z_MUF08

यांतील काही पध्दित संगीतातले पलट्यांची आठवण करून देतात तर काही गरब्याच्या स्टेप्स ची.

ऋग्वेदाच्या शाकल व बाष्कल पैकी शाकल शाखा आज अिस्तत्वात आह.े वैिदक संस्कृ त भाषा असून ७-८ प्रकारचे छंद वापरले आहते . यामधे ळ हे अक्षर िदसते ड अक्षराच्या दोन्हीकडे जर स्वर आले तर त्याचा ळ होत असे हे एक उदाहरण. व काही जास्तीची रूपे िदसून येतात. एक जास्तीचा काळ पण वापरला गेला आह.े नंतर पािणनी चे क्लािसकल संस्कृ त आले. या ग्रंथात भरतकाम, िवणकाम याचाही उल्लेख आह.े त्यावरून सुई बनवतां येत होती हे कळते अगदी नेलकटर चा पण उल्लेख आहे म्हणजे हे शास्त्र मािहत होते असे कळते. ओत आिण प्राोत हे उभे आडवे धागे िवणताना वापरलेले शब्द आजही वापरात आहते . कापड तयार करण्यात बरचे प्रगत हे लोक होते.

ऋिषका नी पण काही सूक्त िलिहली आहते व त्यांचा सामावेश के ला गेला आह.े यावरून त्या वेळची सामािजक पिरिस्थती कळू शकते. िस्त्त्रयांना महत्व होते. नंतर याचं देशात स्त्री िशक्षण चालू व्हायला िकतीतरी काळ जावा लागला होता. तेव्हा ऋग्वेदाचे दाखले कसे िदले गेले नाहीत कु णास ठाऊक. मुलींना आपले वर िनवडायची मुभा होती. उपनयन हे मुलामुलीचे दोघांचे होई व िशक्षण ही दोघांना िदले जाई. वणर् व्यवस्था होती व नंतर त्यात जाित ला महत्व आल.े

पवमान सोम व त्याच्या बद्दलच्या अनेक ऋचा आहते . सोम याग मोठा समजला जाई. आज सोम वनस्पित नक्की काय होती हे लोकांना मािहत नाही पण त्याच्या यज्ञाचे भरपूर मािहती उपलब्ध आह.े

ऋग्वेदात बरीच संवाद सूक्त आहते . पुरूरवा उवर्शी यांचे प्रिसद्ध पण अगदी थोडक्यात असे हे सूक्त आहे ज्यांचा शेवट गोड नाही, पण पुढे पुराणात हा शेवट थोडा बदलतो व कािलदासाच्या नाटकात सुखांताच्या िदशेने जातो, पण मूळ धागा ऋग्वेदात आह.े नदी सूक्तामध्ये िवराट व शुतुद्री च्या संगमावर (सतलज व िबयास) िवश्वािमत्र ऋिष जातात त्यांना नदी ओलांडायची असते म्हणून ते व नद्याना पाणी थोडे कमी करायला सांगतात तेव्हा दोघीं नद्या

       

(सतलज व िबयास) िवश्वािमत्र ऋिष जातात त्यांना नदी ओलांडायची असते म्हणून ते व नद्याना पाणी थोडे कमी करायला सांगतात तेव्हा दोघीं नद्या त्यांना सांगतात, आमची नावे घालून काव्य िलही म्हणजे ते खूप वषेर् िटके ल. यातला िवश्वास की हे वेद अनेक वषेर् िटकतील पहाण्यासारखा आह.े

ऋग्वेद काळात अित्र ऋषींच्या मंडलात सूयर्ग्रहणाचा उल्लेख आह.े सावलीमुळे सूयर् झाकला गेला आहे व ठरािवक काळ्याने तो पूवर्वत होईल हे सांिगतले आह.े चांद्र कॅ लेंडर व सौर कॅ लेंडर दोन्हीचा उल्लेख आह.े देन्हीतला फरकही दाखवला आह.े नक्षत्रांचे उल्लेख आहते . त्यामुळे सूयर् व पृथ्वी चे भ्रमण त्यांना मािहत होते. अथार्त हे िनिरक्षणातून समजले होते का काही साधने होती याचा कु ठेही उल्लेख नाही. िनरीक्षण करून त्या काळात खूपच मािहतीत्यांनाहोती.दश,सहस्त्रहेउल्लेखबरचेदाआहतेत्यावरूननंबरिसस्टीमहीप्रगतहोतीहेकळते.लो.िटळकांच्यादआिक्टर्कहोमइनवेदाज पुस्तकात काही ऋचांचा अथर् आिक्टर् क प्रदेशात (अित थंड प्रदेशातील सूयार्चे भ्रमण) लागतो हे दाखवले आह.े

नासदीयसूक्तामध्येमानवालसततवाटणारीसृष्टीच्यािनिमर्तीच्याशक्याशक्यतापडताळूनपाहण्यातआल्याआहते .िनिमर्तीतलेमहत्त्वाचेटप्पेत्यात चांगले मांडले आहते . माणसाचे हे कु तुहल आजही जागृत आह.े आधी काहीच नव्हते. सुरूवातीला पाणी व त्यानंतर हळूहळू सगळे िनमाणर् झाले. अशा बर्‍याच शक्यता आजकालच्या संशोधनात साम्य दाखवतात. पुरूष सूक्त पण िनिमर् तीच्या प्रिक्रयेवर भाष्य करते. दुसरे कु तुहल मृत्यूपश्चात काय होते ते उपिनषदात मांडलेले िदसते. आज इतक्या वषार्ंनंतरही हे दोन्ही प्रश्न अनुत्तिरत आहते . पण िह िजज्ञासा िकती जुनी आहे ते पाहून आश्चयर् वाटत.े त्या काळी दुिबर् ण नसताना अाकाशापिलकडे कािहतरी असावे व ते काय असावे यांवर खूप िचं तन आह.े

अक्ष सूक्त चक्क जुगाराबद्दल आह.े कृ षी सूक्त शेतीबद्दल् आह.े िबया रूजणे, वाढणे पाउस इ वर मंत्र आहते . एक कल्पना अशी आहे की पाउस हे पृथ्वीवर पडणारे बीज आहे जे धान्यरूपात पुढच्या वषीर् उगवून येते.

त्या काळात काही समकालीन होते जे वेद मानत नसत. नािस्तक चावार्क जैन बुद्ध हे वेदप्रामाण्य मानत नव्हत.े

आपल्याकडे हरप्पन संस्कृ ितचे खूप अवशेष सापडलात पण लेखन अथवा िलपी मािहत नाही, वेद आज आहे त्या रूपात आहते पण अवशेष अिजबात सापडलेले नाहीत त्यामुळे हे tangible Ani intangible च्या मधे अडकलेले आह.े मान्यता व अजून मािहती िमळण्यासाठी विै दक काळातील अवशेष तरी सापडायला हवेत िकं वा हरप्प्न भाषा िसं बाॅल्स decode व्हायला हवेत. आपल्या ऋचात जर ॲस्ट्रॅनाॅमी गिणत जर एवढे प्रगत होते तर जगाला ते कळलेच पािहजेत. या सगळ्यांची सुरूवात जर शाळेत झाली तर मूठभर मुले तरी त्यात interest घेउन हे काम नक्की पुढे नेतील. आिण हजारो वषार्ंची प्रवास के लेल्या मंत्रांना न्याय िमळेल असे वाटते.

मलातरीऋग्वेदाच्याअंतरगंातडोकवायलामजाआली,तुमचेकाय? 

Friday, June 12, 2020

करोना. एक चिंतन

करोना .. एक चिंतन

      गेल्या वर्षी अाॆस्ट्रेलिया न्यूझीलंड ची ट्रीप करून आलो. निसर्गसौंदर्य व मानव निर्मित सौंदर्य या दोन्हीचा अनुभव घेतला. तिथे असताना एक दोन िठकाणी ट्रेन ने जाता आले नाही कारण आगी लागल्या होत्या. त्या मंडळींना हे नेहेमीचेच होते जसे कॆलिफोर्निआत वार्षिक आगी लागतात तसे.परत आल्यावर या आगी एवढ्या वाढल्या की कंट्रोल करणे अवघड झाले. बरीच जंगले जळाली. कांगारू व क्वाआलांना वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. शेवटी या गोष्टी इतक्या वाढल्या की लोकांना स्थलांतर करावे लागेल असे वाटत होते. पूर्वीच्या काळी जसे इजिप्त, हरप्पा, मेसोपोटेमिया या संस्क्रुति लयाला कशा गेल्या अचानक ह्या नेहेमी पडणाऱ्या प्रश्नाचे थोडेसे उत्तर मिळाले. निसर्गातील पंचमहाभूतापैकी एखादे जरी कोपले तर ते मानवाला नेस्तनाबूत करू शकेल हे पटले.
      तिथून परत आल्यावर एखाद महिन्यात वुहान च्या बातम्या आल्या. सुरूवातीला चीन पर्यंतच गोष्ट आहे असे वाटत असतामाच सारे जग एका विषाणूच्या विळख्यात बघता बघता अडकले. विमानसेवा, क्रूझेस, रेल्वे सगळे ठप्प. आपल्या आधीच्या पिढीने प्लेग, फ्लू च्या आठवणी जागवल्या. तेव्हा नव्हते बाई असे घरात बसणे व सारखे हात धुणे असे त्यांचे म्हणणे. हा व्हायरस एवढा भयंकर निघाला की त्याचे रोजचे वाढते आकडे ठी व्ही वर पाहून डिप्रेशन यायला लागले. प्रत्येक बाबतीत उलट सुलट मते, आपण करतो ते बरोबर का चूक असे सारखे वाटत राही. हा व्हायरस नवीन असल्याने कोण बरोबर कोण चूक हे ठरवणे पण कठिण. 
    या अशा परिस्थितित सोशल मिडिया लोकांच्या मदतीला धावला.  थोडा विरंगुळा टेन्शनमधे हवासा वाटु लागला. आम्ही नाही त्यातले असे म्हणणारे झूम वर दिसू लागले. झूम चे शेअर्स वधारले. वाॆटसअप जोक्स मधे प्रचंड क्रिएटिव्हिटी आली. थोड्याच दिवसात सिरीअस पोस्टवर सगळ्यांनी बंदी घातली. अशातच फेसबुक लाइव्ह व झूम वर अनेक कलाकार आपली कला दाखवू लागले. बरेच जण आपल्या खांद्यावर ही जबाबदारी आहे असे समजून रोजचे कार्यक्रम करू लागले. शेवटी काय बघावे व काय नाही असा प्रश्न पडू लागला. शेवटी आपली आवड व क्वालिटी हेच निकष कामी आले. गाणी, गोष्टी, काव्यवाचन, स्वरचित स्वलिखित गप्पा,एक ना दोन. सनुष्य प्राण्याला संवाद हा फार महत्वाचा हेच खरे. गाण्याच्या कार्यक्रमात येणारा लँग व अकंपनीमेंट चा अभाव यावर आता बरेच लोक उपाय शोधायला लागले असतील. 
    आता आपण पुढच्या टप्प्यावर आलो आहोत. काम सुरू करावे का घरात बसावे हे धर्मसंकट आहे
फ्री मधे असलेले लाईव्ह कार्यक्रम आता पैसे घेउ लागलेत. सगळीकडे थोडा अनलाँक सुरू झालाय. जरा साथीचा रेट कमी होतोय म्हणतोय तोवर प्रोटेस्ट सुरू आहेत. हजारोंनी माणसे एकत्र जमत आहेत. याचा परिणाम १५ दिवसात कळेलच. सगळी ट्रायल व एरर चालू आहे. सर्वात आधी लस वा औषध बनवून कोण गब्बर होते ते बघायचे. लस तयार झाली तर नक्की साशंक वाटणार आहे. सरकारने काहीही केले तरी दोन्ही बाजूने लोक बोलणारच आहेत. अमेरिकेची यात कशी जास्त वाट लागली आहे याबाबत वरीच मंडळी समाधानीही आहेत. मला अमेरिकेला नावे ठेवणारी एवढी माणसे भेटतात तरी इथली व्हिसाची लाइन संपत नाही याचे आश्चर्य वाटते.

या सगळ्यातून काही फायदेही झाले आहेत. व्यायामाचे प्रकार, डाएट चे सल्ले, योगा व्हिडिओ यांच्या माऱ्याने लोकांचा थोडातरी फायदा नक्कीच झाला आहे. घरकाम व घरचे खाणे यामुळेही वजन खरेच कमी होउ शकते हे दिसून आले आहे. वर्क फ्रांम होम मुळे चक्क जास्त काम होतय असे लक्षात आलय. प्रदूषण कमी झालय. आणि हो अमेरिकेत सगळे काम घरी कसे करावे लागते याचा थोडाफार अनुभव सगळ्यांनी घेतला आहे. क्रेडिट कार्ड हल्ली फार स्वाइप होत नाही म्हणून काही बायका नाराज आहेत म्हणे. आपण आहार व्यायाम नीट ठेवणे व इतर काळजी घेणे हे करू शकतो, दुसरा ते करेल याची खात्री नाही. कर्मण्येवाधिकारस्ते … लक्षात असू द्या. 

या काळात पाहिलेले चांगले कार्यक्रम.....

यू ट्यूबवर
 खजिना स्पहा जोशी ने साधलेले संवाद य़ात चांगल्या कविता ऐकायला मिळतील.
रंगपंढरी नाटकासंबंधी मुलाखती

फेसबुक लाईव्ह
इंडॆालाँजी त आवड असेल तर खूप व्हिडिओज आहेत.
वीरगळ म्हणजे गावातल्या हिरोंचा सन्मान करण्यासाठी केलेल्या शिळा, सतीचे वाण म्हणजे काय प्रत्येक गावाचा तो मला मेमोरिअल डे वाटला.
कार्बन डेटिंग
देवळांची माहिती
बुद्धीस्ट व इतर केव्हज
टिळकांच्या आर्क्टिक होम इन वेदाज पुस्तकाबद्दल
के मुहाम्मद यांची आर्किआँलाँजी  लेक्चर्स
पूर्वीच्या पुस्तकातील फिजिक्स स्तोत्र रूपात लिहिलेले

ब्रम्हांडाची रचना वेदिक पुस्तकातील

Monday, December 16, 2019

आॅस्ट्रेलिया... आयलंड काॅंटिनेंट ची सफर ( सिडने व मेलबोर्न)


आॅस्ट्रेलिया... आयलंड काॅंटिनेंट ची सफर (सिडने व मेलबोर्न)

जपान या आयलंड देशाला आणि हवाई या आयलंड स्टेट ला भेट देउन झाल्यावर आता आॅस्ट्रेलिया या आयलंड काॅंटिनेंट ला या वर्षी भेट देण्याचा योग आला. ईंडिअन ओशन, पॅसिफिक ओशन, साउथ सी, तास्मानिया, असे अनेक समुद्र इथे भेटू शकतात. मनात विचार येतो, ही एकाच पाण्याची वेगवेगळे रूपे आहत, नावे फक्त वेगळी, एरिया नुसार. आमची सुटी व बघण्याच्या गोष्टी यांचा विचार करता, सिडने १० दिवस, मेलबोर्न ५ दिवस व न्यूझीलॅड चे साउथ आयलंड ५-६ दिवस असा प्रोग्रॅम ठरला.

आॅस्ट्रेलिया चा फ्लॅग जर बघितला तर त्यांवर काही स्टार्स दिसतात. हे स्टार्र्स सदर्न क्राॅस दाखवतात. आपण नेहेमी दिशादर्शक म्हटले की नाॅर्थ स्टार कडे बघतो. पण सदर्न हेमिस्पिअर मधे सदर्न क्राॅस व इतर तारे मिळून दक्षिण दिशा दखवायचे काम करतात. पहिल्यांदा हे ऐकल्यावर गंमत वाटली. पूर्वी सनुद्री मार्गाने आलेल्या लोकांनी दिशादर्शक तारा शोधण्यासाठी नक्कीच खूप कष्ट घेतले असतील. इथल्या मुक्कामात पौर्णिमा होती. त्या दिवशी चंद्र वेगळा दिसत होता कारण तिथून अपसाईड डाउन चंद्र दिसतो. घरी आल्यावर पृथ्वीच गोल घेउन पाहिले तेव्हा या गोष्टी जास्त क्लिअर झाल्या. इतर वेळी या गोष्टी लक्षात पण येत नाहीत.

सिडने मधे बघण्यासारखे विशेष काही नाही असे बरेच लोकांकडून ऐकले होते. आम्ही मात्र सिडने डाउन टाउन व आजूबाजूला बरेच हिंडलो. इथे पब्लिक ट्रान्सपोर्ट फिरायला सोपा आहे. ट्रेन्स छान आहेत. प्रीपेड कार्ड काढतां येत असल्याने तिकीट काढण्यासाठी थांबावे लागत नाही. खाण्यात चाॅइस खूप आहे अगदी व्हेज लोकांना पण.


 आॆपेरा हाउस व हार्बर ब्रिज ही दोन्ही सिडनीची मेन अॅट्रॅक्शन्स बघायला पहिल्या दिवशीच बाहेर पडलो. या दोन्ही गोष्टी बऱ्याच सिनेमात बघितलेल्या असतात. आॅपेरा हाउस हे वर्ल्ड हेरिटेज मधले सगळ्यात तरूण मेंबर आहे. नाहीतर हेरिटेज साइटस् म्हटल्या की जुन्या इमारती देवळे डोळ्यापुढे येतात. आॅपेरा हाउस व त्याची शेल्स म्हणजे छप्पर आयकाॅनिक आहेत मला मात्र ती फारशी वोटीची शिडे म्हणून अपिल झाली नाहीत. या बिल्डिंग मधे बरीच थिएटर्स, आॅपेरा हाउस हे थिएटर आहे हे प्रथमदर्शनी खरे वाटत नाही. आम्ही तिथे दीड तासाची गाइडेड टूर घेतली. एका डॅनिश आर्किटेक्चर चे हे काम. काॅम्पिेटिशन मधे त्याची एन्ट्री सिलेक्ट झाली.
निसर्ग हेच या माणसाचे प्रेरणास्थान होते. सोललेल्या संत्र्यावरून हे डिझाईन सु"चले असे म्हणतात. वारा, पाउस, वजन व नैसर्गिक आपत्ती या सगळ्यांचा किती फोर्स याा डिझाइन वर पडेल हे समजणे आवश्यक होते. तसेच त्याला आधार देण्यासाठी वापरण्यात येणारे आधार हे एका प्रकारचे असणे आवश्यक होते. त्यासाठी त्यांना डिझाईन मधे बेसिक भूमितीचा वापर आवश्यक होता तेव्हा एका गोलाच्या वरच्या भागातून वेगवेगळे तुकडे काढून हे डिझाईन तयार झाले. स्फेरिकल जाॅमेट्री चा वापर केला आहे.
खर्च व इतर गोष्टीमुळे बांधकामाला बरीच वर्षे लागली पण त्यानंतर सिडने म्हणजे आॅपेरा हाउस हे समीकरण तयार झाले. यातले प्रत्येक शेल अनेक छोट्या टाईल्स चे बनले आहे. जसासूर्यप्रकाश बदलतो तसा याचा रंगही वेगळा वाटतो. टूर संपेपर्यंत भरपूर पायपीट झाली. यातल्या थिएटर्स मधे लिफ्ट एवढ्या मोठ्या आहेत की अख्ख सेट वरखाली करता येतो. आॅपेरा हाउस खूप भव्य आहे. तिथले अॅकाॅस्टीक चांगले ठेवण्यासाठी वरेच वेगवेगळे प्रयोग केले आहेत. तिथला ग्रॅंड आॅर्गन बघण्यासारखा. आश्चर्य म्हणजे या आर्किटेक्ट ने पूर्ण झालेले डिझाईन सिडने ला येउन कधीच बघितले नाही.

आॅपेरा हाउस च्या शेल्स किंवा छपरावर रोज सनसेट नंतर ७-८ मि ची फिल्म दाखवतात. फिल्मसाठी चांगला कॅनव्हास या टाईल्स नी पुरवला आहे. इथले ओरिजिनल अबोरिजिनल लोकांचे जीवन हा विषय ही बरेच दा असतो.

आॅपेरा कडे जातानाच हार्बर ब्रिज दिसतो. याच्या आकारावरून याला कोट हॅंगर असेही नाव पडले आहे. बोटॅनिकल गार्डन मधून लेडी मॅक्वायर चेअर वरून ब्रिज व आॅपेरा हाउस यांचा छान व्ह्यू दिसतो.
बोटॅनिक गार्डन पण बरीच मोठी आहे. नेटीव्ह झाडे जोपासली आहेत. फुलांपेक्षा मोठे वृक्ष जास्त दिसले. या गार्डन मधून आॅपेरा हाउस व हार्बर ब्रिज चे अनेक वेगवेगळे व्ह्यूज दिसतात.

https://artsandculture.google.com/exhibit/sQLihA_whFJ_KgT


Blue Mountains... Three Sisters

सिडने पासून साधारण दोन तासावर हे युनेस्को हेरिटेज लिस्ट मधे जागा पटकावलेले नॅशनल पार्क आहे. युकॅलिप्टस च्या अनेक जातींची झाडे इथे पहायला मिळतात. त्यांनी हवेत टाकलेले आॅइल ड्राॅप्स पाणी व धूलीकण हे सूर्यकिरणातला निळा रंग जास्त स्प्रेड करतात त्यामुळे डोंगर निळसर दिसतात असे म्हणतात. हायकिंग किंवा स्काय वे नी धबधबे बघतां येतात. बरेच हायकिंग ट्रेन्ल्स या पार्क मध्ये आहेत.












थ्री सिस्टर्स हे फाॅर्मेशन बघण्यासारखे आहे. पायऱ्या वरून बरेच खाली जाता येते. मधेच हॅंगिंग ब्रिज आहे, खाली खोल दरी...थ्रिलिंग आहे. भरपूर झाडी आहे. क्वाआला हे प्राणी भरपूर आहेत कारण त्यांची गुजराण मेनली युकॅलिप्टस च्या पानावर होते भरपूर झाडांमुळे आगी लागण्याचाही धोका असतो. इथे आता मोठे अॅम्पिथिएटर बांधण्यात काम चालू आहे. एकंदर प्रेक्षणीय जागा आहे. हिल स्टेशन सारखे छोटेसे टुमदार गाव व भरपूर फुललेली झाडे बघण्यासारखी. नेहेमीप्रमाणे सनसेट पाॅईंट आहे तो आम्ही भर उन्हात पाहिला. बरेच बाजूने पाॅइंट्स आहेत तिथून वेगवेगळे व्ह्यूज दिसतात. सगळेच प्रेक्षणीय होते. वेळ असेल तर हायकिंग साठी उत्तम ठिकाण.






बाॅंडाय बीच... हा सिडनेतला प्रसिद्ध बीच आहे. स्वीमिंग, सर्फिंग, विंड सर्फिंग या साठी प्रसिद्ध. आजूबाजूला बार, रेस्टाॅरंटस, म्युझिक हे सगळे आहेच. एका बाजूला घरे व समोर अथांग समुद्र. व्हाईटसॅंड बीच आणि गावापासून जवळ म्हणून भरपूर गर्दी असते.आम्ही गेलो तेव्हा तिथे स्कल्पचर्स बाय द सी हे प्रदर्शन चालू होते. आर्टिस्ट ना चान्स देण्यासाठी दरवर्षी हे भरवले जाते. समुद्राच्या बॅकग्राउंडवर काही छान दिसत होती. स्कल्पचर पेक्षा कडेचा बीच, खळाळणारे पाणी लाटा व एका बाजूला डोंगर हेच जास्त प्रेक्षणीय होते. वारा भरपूर असल्याने चालताना बरीच कसरत झाली.




















सिडने टाॅवर आय हा टाॅवरअगदी गावात सगळ्या बिल्डिंग च्या मधेच आहे. चक्क शाॅपिंग सेंट्रल मधून आत जायला एन्ट्री आहे वरून सिटी चे सगळ्या बाजूने व्ह्यू मस्त दिसले. माहिती सांगणाराही चांगला होता. एका बाजूला हाईड पार्क मधील फाउंटन चा टाॅप व्ह्यू मस्त दिसतो. त्याचा षटकोन आकार वरून पाहिल्यावर लक्षात आला. दिवाळी नुकतीच झाल्याने वरती पणत्यांचे स्टीकर्स लावले होते. इंडियन्स ची संख्या जास्त असल्याचे परिणाम. वरून पुन्ह एकदा आॅपेरा हाउस चे दर्शन झ

हाइड पार्क टाॅवर जवळच आहे. इंग्लंडचा प्रभाव इथे सगळ्या गोष्टीवर आहेत.






दुकानाची
 नावे , बिल्डिंग अगदी भाजी मार्केट वर पण व्हिक्टोरिया बाईं ठाणं मांडून आहेत. तसेच हाईड पार्क हे लंडन च्या पार्क वरून घेतलेले नाव. जॅकारंडा ची मस्त झाडे फुललेली होती. त्याचा निळा जांभळा रंग मस्त दिसला. पार्कमधेह इतर फुले बरीच दिसली. सेंटर ला छान फाउंटन आहे. अगदी गावात हे पार्क असल्याने छान वाटते.

या पार्क च्या पलीकडेच सेंट मेरीज चे भव्य चर्च आहे. १८५० च्या सुमारास बांधलेले. यांतील खिडक्यांवर खूप सुंदर
स्टेशन ग्लास पेंटिग्ज आहेत. ही पेंटिंग्ज पाहिली की वाटते की आजकालच्या घरात पण एखादा कोपरा वा झरोका असा बांधावा. जुनी कला टिकेल व सौंदर्य ही वाढेल. आतमध्ये अगदी शांततेत मास चालू होता. हे लोक इतक्या शांततेत बसतात ते पाहून आश्चर्य वाटते. आपल्या देवळात केवढा आवाज असतो. मेरी चा एक सुंदर स्टॅच्यू आत आहे. ईमारत खूप उंच असल्याने भव्य वाटते. बाहेर भरपूर फुले लावून छान मेंटेन केले आहे.

यानंतर क्विन व्हिक्टोरिया बिल्डिंग बघायला गेलो. ही पण खूप भव्य आहे. जवळ जवळ दोन ब्लाॅक्स लांब. इथला स्पेशल सॅंडस्टोन लवकर खराब होत नाही त्यामुळे बांधकाम छान आहे. आत शिरताना एक स्टेन ग्लास ची मोठी विंडो आहे त्यांवर इथल्या महत्त्वाच्या गोष्टी दाखवल्या आहेत. कोट हॅंगर, सेल बोटस् डाॅल्फिन्स, हार्बर इ. आत बरीच विंडो शाॅपिंग वाली दुकाने आहेत. जगातल्या महत्त्वाच्या शहरातल्या वेळा दाखवणारे एक घड्याळ आहे. ख्रिसमस सिझन जवळ आल्याने तीन माजली उंच झाड डेकोरेट केले होते. इथे बसून इंग्लिश टी चा आस्वाद घेतला एकदम इंग्लिश स्टाईल मधे व त्यानंतर घरी परतलो. या बिल्डिंग च्या खालीच ट्रेन स्टेशन असल्याने लगेच ट्रेन पकडतां आली. ही बिल्डिंग रिलेशन च्या काळात बांधली गेली. त्यामुळे बरेच कारागिर आपली कला दाखवू शकले. बिल्डिंगचा डोम बाहेरून कालपर्यंत व आतून ग्लास चा आहे.

शेवटच्या दिवशी वाॅटसन बे ला गेलो. या जागी कॅ फिलिप पहिल्या.दा आला असे म्हणतात. मेन स्टेशन पासून बोटीने ३० मिनिटात जाता येते. पोचताच तिथल्या डाॅइल्स या फिश न चिप्स ची गर्दी लक्ष वेधून घेते. हे हाॅटेल १८५० च्या आधीपासून आहे.पाण्षाच्या अगदी जवळ बसून आम्ही इथे जेवण केले. समोर शांत बे पसरलेले होता दूरवर सिडनेची स्काय लाईन दिसत होती मधे बोटी तरंगत होत्या. आमच्यासारख्या व्हेज लोकांनी खाण्यापेक्षा वातावरणच जास्त एनजाॅय केले. पुढे फिरण्यास एक ट्रेल आहे. एका बाजूला पाणी सेल बोटस् असे सुंदर व्ह्यू बघत लाइट हाउस पर्यंत चालत जाता येते. लाइट हाउस पासूनसमुद्राचा व्ह्यू सुंदर दिसतो. तळाशी खळखळणाऱ्या लाटा त्याचा फेस, त्यातून तयार होणारे पॅटर्न्स आणि थंड हवा तिथे शांत बसून अनुभवण्यासारख्या गोष्टी. समोर साउथ पॅसिफिक / तास्मान समुद्र भेटतो. समुद्राचा क्षितिजापर्यंतचा व्ह्यू दिसतो एका बाजूला. वाटेत येताना एक न्यूड बीचही लागला. मंडळी बिनधास्त पोहत होती तिथे.

या वाॅटसन बे वर नेव्हीचा तळ काही काळ होता. अजूनही वसाहत आहे. वाटेत तोफा पण दिसल्या.

इकडे एक गॅप म्हणून जागा प्रसिद्ध आहे, तिथून समुद्राचा सुंदर व्ह्यू दिसतो. एका बाजूला स्काय लाईन व एकीकडे हार्बर. ही जागा फेमस झाली कारण बरेच लोक तिथून आत्महत्त्या करायचे म्हणून. कशासाठी प्रसिद्धी मिळेल सांगतां येत नाही.



सिडने मधे पुतण्याकडे राहिल्याने खूप आरामात हिंडू शकलो हे नक्की. रहाणे, जेवण याचा विचार करायचा नसल्याने भरपूर फिरता आले व त्यांच्या लोकल टिप्स सतत मिळत असल्याने खूप फायदा झाला.

मेलबोर्न ला आमच्या भाचीने फिलिप आयलंड ला नेले. तिच्याबरोबर गेल्याने तिथली माहिती व जाणे येणे सुखाचे झाले. तसेच डॅंडेलाॅंग हिल्स मधे छान फेरफटका मारता आला.हि जागा पाहून आपल्या हिलस्टेशन ची आठवण झाली. पाउस थोडे धुके व घाटाचे रस्ता अशी मस्त रेसिपी होती



पेंग्विन परेड ......... मेलबोर्न मधले हे ठिकाण आमच्या लिस्ट वर होते. फिलिप आयलंड वर यांची परेड संध्याकाळी बघायला मिळते. हे लिटल पेंग्विन्स किंवा ब्लू पेंग्विन्स म्हणून ओळखले जातात. आकार व पंखाच्या रंगावरून ही नावे पडली असावीत. या ठिकाणी रोज संध्याकाळी समुद्रातून पेंग्विन्स बाहेर पडतात. अगदी अंधार पडायला लागल्यावर ते बाहेर येतात. रोजची संख्या वेगळी असते. बाहेर येईन ग्रुप्स मधे बाहेर पडतात व आजूबाजूला असलेल्या बरोज मधे असलेल्या पिलांना खायला घालतात. तुम्ही म्हणाल आपली पिले ते कशी ओळखतात तर फक्त आवाजावरून ..... समुद्रात मासे हे त्यांचे मेन खाद्य.
कधी कधी त्यांची जुनी पिसे झडून नवी पिसे येण्याच्या काळात पण हे पेंग्विन बाहेर रहातात. तेव्हा खाणे बंद असते. आधीच जास्त खाऊन ते आपली सोय करतात. ही Moulting phase असते. समुद्रात पोह्ताना थंडीपासून नंरक्षण म्हणून वरती पिसे चक्क वाॅटरप्रुफ असतात. त्यासाठी एक ग्लॅंड तेलकट थर पंखावर पसरवते. समुद्रात बरेच दिवस हे पोहतात तेव्हा पाणी मिळावे म्हणून त्यांच्या डोळ्याजवळ ग्लॅंड असतात ज्या समुद्राच्या पाण्यातले मीठ शोषून घेतातव त्यांना चांगले पाणी मिळते. हे सगळे पाहून थक्क व्हायला होते. गरजे नुसार शरीरात कशी आवश्यक ती यंत्रणा असते ते पाहून. बाहेर पडताना एक छोटे म्युझिअम व आर्ट इफेक्टस आपल्याला माहिती पुरवतात. इथे आपल्याला साउथ सी भेटतो.

ग्रेट ओशन रोड हे नॅशनल हेरिटेज मधले ठिकाणही आमच्या लिस्टवर होते. वर्ल्ड वाॅर माॅन्युमेंट म्हणून हा रोड बांधला आहे. अशा प्रकारचे एवढे मोठे माॅन्युमेंट दुसरे नसेल. वाॅर मधून परत आलेल्या लोकांनी, न आलेल्या लोकांसाठीबांधलेले. जाताना डावीकडे समुद्र उजवीकडे डोंगर व त्यांवर छोटी सुबक घरे. समुद्रात निळ्या रंगाच्या अनेक छटा. मधे एक दोन ठिकाणी बीचेस वर उतरलो. लाटा, वाळू, पसरललेला बीच आणि क्लिअर हवा सगळे प्रसन्न वातावरण होते. तिथे बरीच फोटोकग्राफी झाली. पुढे जेवणाचा स्टाॅप घेउन एका रेनफाॅरेस्ट चा फेरफटका झाला. इथे बरेच चढ उतार असल्याने हेवी जेवणाचे गिल्ट थोडे कमी झाले. जास्त करून युकॅलिप्टस व भरपूर फर्न ची झाडे होती. काॅलेज च्या बाॅटनी ची आठवण झाली. पुढे एका ठिकाणी रंगीत पक्षी बघायला थांबलो. सवयी मुळे व खाण्याच्या लोभाने ते बिनधास्त अंगावर येउन बसत होते. झाडावर कोआला बघतां आले पण ते खूप उंचावर होते. हा प्राणी २२ तास झोपतो म्हणे.

यापुढील स्टाॅप होता शिपरेक पाॅईंटचा. या ठिकाणी धुक्यामुळे एक जहाज बुडले होते. त्यातील दोनच माणसे वाचली. त्यांची नावे या पाॅईंटला दिली आहेत. सॅंडस्टोनचे खडक त्यात वाऱ्यामुळे
तयार झालेल्या कमानी व त्यात फेसाळणारे पाणी कितीही वेळ पाहिले तरी कमीच वाटत होते. निसर्गसौंदर्य कसे आपल्याला एका जागी खिळवून ठेवते त्याचा प्रत्यय आला. या नंतर शेवटचा स्टाॅप होता कॅंपबेल नॅशनल पार्क चा. हे १२ अॅपाॅस्टल्स साठी प्रसिद्ध आहे. लाइट स्टोनचे वेगवेगळे स्टॅक्स समुद्रात अनेक वर्षे उभे आहेत. इथे पोचताना पावसाने हजेरी लावल्याने सूर्यप्रकाशात वेगवेगळे दिसणारे रूप बघतां आले नाही पण पावसाळी वातावरणातही छान दिसले. परतीचा प्रवास हायवे वरून झाला आणि बसमधे वायफाय असल्याने लोक त्याच्या किंवा झोपेच्या आधीच झाले.
इकडे सगळ्या टूर्स १०० डाॅ च्या आसपास पैसे घेतात ते सुरूवातीला जास्त वाटले होते पण प्रत्येक ठिकाण हे बरेच लांब होते. वाटेतले पाॅइंट्स काॅमेंटरी व निसर्गाची रूपे बघून पैसे वसूल झाले असे नक्कीच वाटले

मेलबोर्न क्रिकेट ग्राउंड... या वर्षीच्या वर्ल्ड कप क्रिकेट मधे न्यूझीलंड च्या केन विल्यम्यसन चा खेळ पाहून या ट्रीपमधे क्रिकेट ग्राउंड ला भेट द्यायचे ठरवले. SCG in Sydney MCG in Melbourne ani Hagley oval in CHCH NZ या पाकी एका ग्राउंडला भेट द्यायचे ठरले.
पैकी मेलबोर्न च्या MCG ची आम्ही टूर घेतली. CBD पासून इथे यायला फ्री ट्राम ने येतां येते त्याचा आम्ही फायदा घेतला. छोटी पण छान ट्राम होती.
आमची टूर लीडर ७० हून जास्त वयाची अतिशय उत्साही म्हातारी होती. तिने भरपूर फिरवले. आता यापुढे मॅच बघताना खेळाडूंच्या जागा, थर्ड अंपायरच्या कॅमेरा कुठे असतो, बाकीचे महत्त्वाचे लोक कुठे बसतात, हे सगळे डोळ्यापुढे येइल. या ग्राउंडचा उपयोग क्रिकेट सोडून फूटबाॅल साठी पण होतो. इतरही मॅचेस व गेम्स इथे होतात.पूर्वीच्या काळी लाकडी बेंचेस असे बसवले होते की त्याची दिशा बदलतां येत असे. एका बाजूने क्रिकेट तर दुसरीकडे फूटबाॅल बघतां येत असे. मॅच प्रमाणे दिशा बदलत.







आता जेव्हा क्रिकेट चा सिझन नसतो तेव्हा मोठ्या ट्रकने क्रिकेट पिच उचलून घेतात व त्या जागी लाॅन लावतात व फूटबाॅल ची मॅच होते. हवे तेव्हा पुन्हा क्रिकेट चे पिंच तयार करतात. तळमजल्यावर लाॅकर रूम्स व सगळी रेकाॅर्डस वर्षानुसार लावली आहेत. या शिवाय एक मोठे म्युझिअम ही आहे. डाॅन ब्रॅडमन व लिटल् मास्टर चा फोटो भारतीयांची मान उंचावतो. टूर संपेपर्यंत भूक लागली होतीच तेव्हा मेंबर्स कॅंटीन मधे जेवलो. या बिल्डिंग च्या बाहेर इतरही अनेक खेळातल्या दिग्गजांचे पुतळे दिसतात. टूर ला येणारे भारतीय बरेच दिसत होते.


आता या ग्राउंडवर टीम इंडिया जेव्हा त्यांना हरवेल ते बघायला खरी मजा येईल.

वाॅकिंग टूर मेलबोर्न....



साधारण ४-५ कि मी चालायचा तयारी असेल तर सिटी बघण्याचे हा उत्तम मार्ग आहे, सकाळी १० च्या सुमारास दिलेल्या स्पाॅटला बरीच मंडळी हजर होती. संख्या बरीच होती त्यामुळे दोन ग्रुप्स मधे विभागणी झाली. आमचा गाईड एक काॅलेज स्टुडन्ट होता. सुरूवातीला मेलबोर्न हे नाव कसे एका माणसाच्या नावावरून पडले ते सांगितले. साधारण १४-१५ ठिकाणी थांबून त्या ठिकाणाची माहिती दिली. गोल्ड रश च्या काळात मेलबोर्न हे जंगलातले श्रीमंत शहर होते हे नव्याने कळले. त्याचे प्रतिक म्हणून बांधलेला युरेका टाॅवर पाहिला, त्याचा वरच्या भाग गोल्डन आहे जो गोल्ड रश साठी आहे आणि त्यांवर असलेली लाल रेघ हा नंतर झालेला संहार दाखवतो. ट्रेजरी मधे याबद्दलचे चांगले म्युझिअम आहे. ८ तासांचे वर्क डे सुरू झाले त्याचे एक माॅन्युमेंट पाहिले. तिथल्या राॅबिन हूड नेट केली त्याची जेलमधली जागा पाहिली. मेलबोर्नमधे ग्राफिटी वाॅल्स फेमस आहेत पूर्ण भिंतीवर चित्रे काढलेली आहेत. त्यातील काही फारच छान होती. चक्क प्रॅक्टिस करण्यासाठी पण एक गल्लीतील होती.
गाईड ने बार, रेस्टाॅरंट कल्चर बद्दल पण बरेच सांगितले. एका हाॅटेल मधून दुसऱ्या त जायचा जिना असू शकतो. रस्त्यावर टेबल्स टाकून खाण्याची ेस्टाइल आहे. मौझेक टाइल्स नी गालिचा सारखी डिझाईन्स खूप दुकानांच्या दारात दिसली. ब्लाॅक आर्केड मधे. जुने प्रिन्स थिएटर पाहिले. तिथे हॅरी पाॅटर चा ब्राॅडवे स्टाईल शो बरेच दिवस चालू आहे. चायना टाउन ने इथेही बस्तान बसवले आहे .फेडरेशन स्क्वेअरचे एक्झिबिशन बिल्डिंगचे डिझाइन मात्र जरा विचित्र वाटले. फ्लिंडर्स स्टेशन आपल्या व्हिक्टोरिया टर्मिनल सारखे वाटले. यारा रिव्हर च्या इथे टूर चा शेवट झाला. फ्री टूर म्हटली तरी प्रत्येकाने पैसे दिले आपापल्या मर्जीनुसार. इथल्या बिल्डिंग्ज व आर्किटेक्चर छान आहे.

या वेळेस खरेदी विशेष करायची नाही असे ठरवले होते. पण सिडनेची तुळशीबाग पॅडीज मार्केट ला गेल्यावर हा निश्चय मोडला. बूमरॅंग पासून कांगारु सारखे स्टफ टाॅय, आणि नेमीचे स्टीकर्स टी शर्ट अशी मुबलक सुवेनिअर्स ची खरेदी झाली. राॅक्स वाशी पण चांगली दुकाने होती. पण जरा महाग वाटले तो बाजारसिडनेला व्हिक्ट्राॅनिक्स ची कटलरी चांगली मिळते. सुऱ्यांची बरीच खरेदी झाली. सोलणी, व इतर गोष्टींही भरपूर घेतल्या. अगदी कडक भोपळा, गाजर किंवा टोमॅटो दोन्हीही सहज कापले जाते. यासाठी व्हिक्टोरियाज बेसमेंट नावाचे दुकान प्रसिद्ध आहे. शेवटी बॅगा फार भरल्या खरेदीने. तसे आजकाल सगळीकडे सगळे मिळते म्हटले तरी त्या जागी मिळणाऱ्या गोष्टी वेगळ्याच. चाॅकलेट ची पण भरपूर खरेदी झाली.

Wednesday, May 30, 2018

जपान एक अनुभव


जपान एक  अनुभव

कराटे सुशी, ओरिगामी, सोनी, यामाहा व टोयोटा या गोष्टीतून आमची आतापर्यंत जपानची ओळख झाली होती. या सगळ्या गोष्टीत क्वालिटी हा समान धागा होता. तसेच माउंट फुजी बुलेट ट्रेन व हिरोशिमा बद्दल पण ऐकले होते.  साकुरा साठी जपानला जायचे असे मायदेशी  काही नातेवाईकांचे ठरले व आम्ही त्यात सामील झालो. सगळा कार्यक्रम बघता चेरी ब्लाॅसम, माउंट फुजी व जपान कल्चर जवळून पाहणे या इंटरेस्टींग गोष्टी होत्या. आजकाल नातेवाईकांबरोबर फक्त लग्नात भेटी होतात, या ट्रीपमुळे बराच वेळ बरोबर घालवता आला व जास्त ओळख झाली हे नक्की.

पान हा देश लहान आहे.अंदाजासाठी कॅलिफोर्निया स्टेट पेक्षा लहान व जर्मनी पेक्षा मोठा. बरीच बेटे मिळून बनलेला. ६६ % झाडांनी व्यापलेला असल्याने हिरवा गार. आम्ही टोकियो, निक्को, फुजियामा, क्योटो, नारा, हिरोशिमा, मियाजिमा बेट व कवाने या गावांना भेट दिली. जपान मध्ये बरीच वर्षे राहिलेला आमचा गाईड होता त्यामुळे भाषा,जेवण आणि जपानींचे माणसे त्याला चांगले माहिती होते. इंग्लिश चा वापर अगदी कमी असल्याने त्याची ठिकठिकाणी मदत झाली.आम्ही जपान एअरवेज ने प्रवास केला.


 टोकियो जपानची राजधानी. जपानमध्ये बैठी घरे असतात, उंच इमारती कमी या ऐकीव गोष्टी इथे दिसत नाहीत. खूप उंच बिल्डींग्ज आहेत. टोकियो स्काय  ट्री  देखणी आहे. हा टाॅवर कसा बांधला याची फिल्म जाण्यापूर्वी बघितली होती.   वेळ असेल तर हा नक्की बघा. दुसरा आयफेल टाॅवर हून थोडा उंच असलेला टोकियो टाॅवरआहे. 

बऱ्याच ठिकाणी छोटे पुतळे ओळीने उभे केलेले दिसतात देवळांच्याजवळ. ही लहान मुलांशी स्मारके आहेत जी फार जगली नाहीत किंवा जन्मली नाहीत त्यांच्यासाठी. त्याना लाल स्वेटर्स व टोप्या काही वेळेस घातलेल्या दिसतात.



दुसरे दिवशी  पॅलेस, मेजी टेंपल व आसाकुसा मधील सेन्सोजी टेंपल पाहिले. या देशांत शिंटो व बुद्धिस्ट टेंपल्स ठिकठिकाणी दिसतात. शिंटो हे निसर्गातील अनेकगोष्टीना देव मानतात. मला आपल्या वैदिक काळाशी या धर्माचे साम्य वाटले. हे देउळ दयेच्या  कॅनन या बुद्धीस्ट देवतेचे आहे. दारात लाल रंगांचा मोठा कागदाचा कंदिल आहे ज्यावर थंडर गेट असे लिहिले आहे. इथले बरेच बांधकाम लाकडीअसल्याने त्याचे नूतनीकरण वेळोवेळी होते, हे देउळ ही त्याला अपवाद नाही. सोनेरी व लाल केशरी रंगांचा वापर खूप आहे. या देवळाच्या बाहेर दुतर्फा तुळशीबाग स्टाईल दुकाने आहेत. स्त्रीवर्ग तिथे रेंगाळला हे सांगायलाच नकोच. जपानी पंखे, बाहुल्या, स्टीकर्स, बुक मार्क्स, टी शर्ट्स आणि अजून बरेच काही. यानंतर राजाचा पॅलेस लांबून बघितला. इथेही राजाचे महत्व आहे. या रस्त्यावर काही फुललेली झाडे दिसली. नंतर मेजी टेंपल ला भेट दिली. खूप झाडी आहे इथे. यानंतर जेवढी ठिकाणी पाहिली ती सगळी निसर्गरम्य अशीच होती. मेजी राजवटीत आधुनिक आणि शक्तीशाली जपानची रचना झाली. अगदी गावात असूनही भरपूर झाडीत हे ठिकाण आहे. बांधकामाच्या वेळी जव जवळ लाखभर झाडे लावली होती. इथले दगडी कंदिल लक्ष वेधून घेतात. दारात तोरी गेट आहे. या गेट मधून जाताना तुम्ही स्पिरिट्युअल जगात प्रवेश करता असा समज आहे. आत राजाच्या वैयक्तिक गोष्टींचे संग्रहालय आहे. 


यानंतर एका टोकियो बे व्ह्यू असलेल्या ठिकाणी जेवण घेउन बोट राइड साठी गेलो. विंडी असल्याने बोट राईड झालीनाही पण तिथून व्ह्यू छान होता. नंतर अजून थोडे टोकियो दर्शन करून परतलो. वाटेत ठिकठिकाणी वेगवेगळे फुले चालण्याचा थकवा घालवत होती.

निक्कोम्हणजेसूर्य.... दुसऱ्या दिवशी निक्को ची डे ट्रीप केलीटोकियो पासून साधारण  तासावर अतिशय निसर्गरम्य जागी अनेक देवळे आहेत शिंटो  बुद्धीस्टबरीच वर्ल्ड हेरिटेज साइटस् मधे मोडतातजाताना बस च्या प्रवासात हवा मेहेरबान होतीथोडा पाउसउनथोड्या गारा असे सगळे आणि दुतर्फा साकुरा
 ठिकाणी थांबून सगळ्यांनी फोटोची हौस भागवली.वेगवेगळ्या प्रकारची झाडे दिसली.  इथे खूप उंच सेडार ची झाडे आहेतथोडी कुमाऊ हिल्स ची आठवण आलीरिन्नोजी च्या देवळात रेस्टोरेशन चालू होते व्या शतकात या देवळांची स्थापना झालीसुरूवातीला शिंक्यो ब्रिज लागलात्यामागे देवाने नदी पार करण्यासाठी भक्ताला ब्रिज बांधून मदत केली अशी कथा आहेतेव्हा दोन सापांचा ब्रिज केला असे सांगतातसुरूवातीला घोड्यांचा तबेला लागतोशिंटो देवळांना घोडे प्रिय होतेघोड्यांना आजार होउ नयेत म्हणून तिथे बरीच माकडे ठेवली होती नेहेमी जे बुरा मत देखोबुरा मत सुनो हे तीन माकडांचे चित्र पहातो त्याचे उगमस्थान इथे आहेलाकडी कलाकुसर खूप आहे छान त्रिमिती इफेक्ट दिला आहेसकाळ पासून संध्याकाळ पर्यंत तुम्ही इथली कलाकुसर पाहू शकता एवढे प्रकार करून ठेवले आहेतभरपूर गोल्ड कलर चा  गोल्ड लिफ् चा वापर आहेएका हत्ती  बघितलेल्या कलाकाराने काढलेले हत्तीचे चित्र आहे तर एका प्रसिद्ध शिल्पकाराने केलेले मांजराचे शिल्प आहेत्यावरचे भाव खूप छान आहेत.यावरून पुढे पोर्सेलीन चे प्राणी बनवायला लागले असे म्हणतातकोरीव काम बघून दमायला झाले.एका देवळात बराच वेळ जपानीमंत्रपठण चालले होते तिथल्या एका खोलीच्या छतावर गोल्डन ड्रॅगन चे पेंटिंग आहे त्याखाली उभे राहून दोन लाकडी पट्ट्या एकमेकांवर वाजवल्या की ड्रॅगन चा आवाज येतो हे तिथल्या पुजाऱ्याने करून दाखवले.  जपानी मंडळी खूप भक्तीभावाने सगळे बघत होतीदेवळाच्या मागे१००-१२५ पायऱ्या चढून आमच्यातील काही चपळ मंडळी वरून व्ह्यू बघून आलीइथे खूप कलाकुसर  चित्रे यांची गर्दी झाली आहे असे वाटलेरंग पण खूप आहेतया जागेला देवळापेक्षा प्रदर्शन म्हणावे असे वाटले

 इथला इंपिरिअल पॅलेस पाहिला. आपल्या पॅलेस च्या कल्पनेपेक्षा खूपच साधा वाटतोतिथले ४०० वर्षापूर्वीचे साकुरा चे झाड पूर्ण फुललेले होते खोल्याततामी या जपानी चटयासरकती दारे  अधूनमधून पेंटिग्ज होती ठिकाणीच कार्पेट  शॅंडेलिअर्स होती.  जपानी रहाणीतला साधेपणा दिसून आलाआपल्या मनातल्या पॅलेस या कल्पनेपेक्षा हा खूप वेगळा होतायानंतर सुशी खायला आमच्या आजच्या गाईड च्या रेस्टाॅरंट मध्ये गेलो. अगत्यशीलतेचा अनुभव जिथे जेवलो तिथे सगळीकडे आलाइथल्या व्हेज सुशी मध्ये वेगळ्या भाज्या होत्या. 

बुलेट ट्रेनचा प्रवास हे पुढच्या प्रवासातला नवीन अनुभव होता. आम्ही ७ दिवसाचा पास काढला होता त्याचे पैसे पुरेपुर वसूल केले. जेवढे वर्णन ऐकले होते त्यापेक्षा बुलेट ट्रेनचा अनुभव छान होता. गाडी स्टेशनवर येताना कमी आवाज,अतिशय शिस्तीत चढणारे उतरणारे प्रवासी व धक्का न बसतां चालू होणारच गाडी यामुळे खूप सुखकर प्रवास झाला.सिंगापूर युरोप अमेरिका यापेक्षा ही बुलेट ट्रेन नक्कीच उजवी आहे. आता भारतात बुलेट ट्रेन येताना ही सगळी शिस्त त्याबरोबर आली तर मजा येईल. ट्रेन च्या सिट्स फिरवतां येतात. समोरच्याच सीटच्या पाठीवर  सगळी माहिती दिलेली होती. कुठून कुठे चालले, बाथरूम, कचरा डबा, धूम्रपान या सोई कुठे आहेत. याचावापर सगळी मंडळी करतात त्यामुळे सगळे स्वच्छ होते. लहान मुलांना घरी व शाळेत हे धडक दिले जातात त्यामुळे कचरा दिसत नाही. एक छोटासा हुक कडेला सामान ठरवण्यासाठी होता ज्यावर १किती वजन ठेवतां येईल ते दिले होते. ट्रेस केला तरच तो बाहेर येत होता. जेवढे तिकीट चेकपोस्ट कंडक्टर डब्यात येत ते डब्याच्या शेवटी वळून कंबरेत वाकून पुढे जात होते हे पाहून आपले टी सी आठवले व आजच्या जगातही अशी लोकं आहेत हे बघायला मिळाले. जवान मध्ये या ट्रेन्स ना शिंकानसेन म्हणतात. १९६४ च्या आॅलिंपिक्स पासून साचीपुरूवात झाली. लोकांना राजचा प्रवास सुखकर व कमी वेळात होउ लागला. सुरूवातीला टनेल मधून बाहेर पडताना मोठा बूम येत असे तो टाळण्यासाठी बराच रिसर्चर केला गेला. मेन इंजिनिअर ला पक्षी निरीक्षणाची आवड होती त्य अनुभवावरून इंजिनाचा 

 हा बराचसा किंग फिशर च्या चोचीप्रमाणे केलागेला कारण हा पक्षी हवेतून पाण्यात जाताना पाणी उडवत नाही वा आवाज करत नाही. दोन वेगळ्या मिडिअम मधून केल्याने ट्रेन जास्त आवाज करत होती. दुसरी सुधारणा पेंटोग्राफ च्या डिझाईन मधे केली. इथेही पक्षीनिरीक्षक मदतीला आले, गरूडाच्या सगळ्यात वरच्या पंखाला कात्रे असतात त्यामुळे हवेचा अावाज जास्त होत नाही. पंखाप्रमाणे पेंटोग्राफ च्या डिझाईन मधे सुधारणा केली व आवाज कमी झाला.
आपण जे म्हणतो निसर्ग हा मोठा गुरू आहे त्याची इथे प्रचिती येते.


माउंट फुजी आपल्याला जसा हिमालय तसा  जपानी लोकांचा माउंट फुजी. वर्ल्ड हेरिटेज सेंटर असलेल्या एका 

 ला आम्ही भेट दिली. माउंच फूजी उलटा केला तर जसा दिसेल तसे हे माॆडेल केले आहे. बाहेरून लाकूड बांबू चौकट वापरली आहे. बाहेर पाणी आहे त्यात छान प्रतिबिंब दिसते. हे पाणी याच पर्वताचे रिसायकल केलेले आहे. आपण आत मधे चढत वर जातो व जाताना मोठ्या स्क्रीन वर डोंगरावर दिसणारी सिनरी बघत जातो. खूप छान बनवले आहे. नेहेमीप्रमाणे एक फिल्म दाखवली जाते ज्यात सगळ्या सिझन्स चे फोटो दाखवले आहेत. शेवटी आपण एका टेरेस वर बाहेर पडतो आणि समोर पूर्ण डोंगर दिसतो हे इथले सुंदर सरप्राईज होते. हवेने साथ दिल्याने मजा आली. भरपूर फोटो काढले. परत खाली येताना अजून बरीच माहिती ४ भाषात पुरवली आहे. काही वर्षापूर्वी मनिषाताई साठे आल्या होत्या. त्यांनी माउंट फुजीच्या बॆकड्राॆप वर कथक केले होते त्याची आठवण झाली. फार सुंदर परफाॆर्मन्स होता तो.

चेरी ब्लाॅसम अर्थात साकुरा.....

जपानच्या ह्या ट्रीप मध्ये साकुरा हे मोठे आकर्षण 
होतेयंदा हा सिझन लवकर आल्याने कमी ब्लाॅसम्स बघायला मिळालेपण जे पाहिले ते फार सुंदर होतेनिळ्या आकाशाच्या बॅकड्राॅपवर पांढरी गुलाबी झाडे फार मस्त दिसलीचेरी ब्लाॅसम येणारी जवळ जवळ १०० वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहेतकाही लवकर येतात काही उशिरा पाकळ्यांपासून ते १०० पाकळ्यांपर्यंत फुलणार ही झाडे आहेतआम्ही - प्रकार पाहिलेपांढरागुलाबीवीपींग विलो प्रकारातलेकाही  पाकळ्या तर काही गच्च पाकळ्या असलेलीमार्च एंड ते एप्रिल पहिला आठवडा हा सिझन मुख्यत्वे असतोनंतर ही फुले दिसतातशक्य तोवर मार्च एंड लाच ट्रीप प्लान करावी  थोडी फ्लेक्झिबल ठेवावी म्हणजे ब्लाॅसम्स नक्की बघायला मिळतीलया सिझनमधे सगळे जपानी सहभागी होतातही फुले सुंदर असतात  थोडे दिवस  रहातात या प्रमाणेआपले आयुष्य थोडे  सुंदर असते तेव्हा त्याचा चांगला आस्वाद घ्याचांगले कारणी लावा असे तत्वज्ञान जपानी लोकांनी या फुलांमधे शोधले आहेयाच सुमारास नवीन वर्ष ही सुरू होतेवसंत ऋतू च्या सुरूवातीला नवीन फुले पाने येउन झाडांचेही एक प्रकार नवीन वर्ष सुरू होतेया फुलांचे डिझाईन्स बुक मार्क्सरुमालवाॅल पेंटिंग्जकॅलेंडर किमोनो या सगळ्यावर आपले स्थान टिकवून आहेआम्ही थोडी आर्टिफिशिअल फुले आठवण म्हणून आणली. आता पुढत्ा वेळी वाॆशिंग्टन डी सी ला जाउ साकुरा पहायला. जपानच्या राजाने दिलेली २५०० झाडे नदीकिनारी लावली आहेत. किती छान कल्पना आहे ना भेट देण्याची.

  क्योटो .... इथे बरीच ठिकाणे बघण्यासारखी आहेतआम्ही फुशिमी इनारी श्राइनकिनकौजी टेंपलकियोमिझू डेरा टेंपल व सिल्व्हर टेंपल बघितले. इनारी हे तांदुळ देणाऱ्या वा वाढवणाऱ्या देवासाठी आहे. इथल्या केशरी रंगांच्या तोरी लक्श वेधून घेतातही तोरणे लाकडातील असून देणगीदारांची नावे त्यांवर लिहिली आहेतवाटेत कोल्हा  त्याच्या तोंडात कागदाची गुंडाळी असलेली अनेक दगडी शिल्पे दिसतातकोल्हा हा त्या देवतेचा दूत मानला जातोआजूबाजूचे डोंगरझाडी  ताजी हवा यामुळे वरती जायला मजा आलीआपल्याकडेच तिरूपतिला जसे देवाला धंद्यात पार्टनर करून घेतात तसा थोडा प्रकार आहे

 किनकौजी या झेन देवळाला नंतर भेट दिलीनुकताच वसंत ऋतू आलाय हे इथल्या झाडाची पालवी दाखवत होतीहिरव्या रंगांच्या खूप छटाप्रववेशापासून आत बरेच  अंतर या झाडीतून गेलो आणि अचानक समोर गोल्डन टेंपल दिसले  तोंडातून  पिक्चर परफेक्ट हे शब्द बाहेर पडलेवरचे दोन मजल्यासाठी गोल्ड लिफ् वापरले आहेसोन्याची शुद्धता मत्यूबद्दलचे सगळे निगेटिव विचार काढून टाकते असा काहीसा विचार गोल्ड लिफ् वापरण्यामागे आहेयाच्या समोर तळे आहे उन्हात सुंदर प्रतिबिंब दिसतेइथे भरपूर फोटोग्राफी झालीयाला गोल्डन पॅव्हिलिअन म्हणतात


 देशी जेवणाचा आस्वाद घेउन कियोमिझू डेरा टेंपल पाहिले. हे देउळ शुद्ध पाण्यासाठी प्रसिद्ध आहेदेवळाकडे जाताना थोडा स्टीप रोड आहेआजूबाजूस भरपूर दुकाने आहेत खाण्याची  सुवेनिअर्स चीएका खडकावर ओटावा स्प्रिंग च्या वर हे देउळ आहेया झऱ्यातले पाणी शुद्ध मानले जातेइथे मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी मंडळी चिठ्ठ्या बांधून ठेवत होती. हे एक युनिव्हर्सल रिचुअल आहे.  देवळाच्या सुरूवातीला केवळ लाकडी खांबांच्या आधारावर मोठा वऱ्हांडा  स्टेज आहेतिथून गाव  आजूबाजूलाच परिसर मस्त दिसतोइथे बऱ्याच बायका किमोनो खालून आल्या होत्याछोटी कंपनी विशेषतया ट्रॅडिशनल पोषाखात गोड दिसत होती-- या वर्षी मुलांना देवाला नेत्यांची पद्धत आहेतेव्हा त्यांचे भरपूर लाड केले जातात दया करणारी ११ डोकी असलेली देवता या देवळात प्रसिद्ध आहेखरे सांगायचे तर कुठल्याही देवळात मूर्तिकडे फारच कमी लक्ष जात होते आजूबाजूलाच परिसर इतका नयनरम्य होता तोच बघण्यात माझा जास्त वेळ गेलाचेरी  इतर बरीच झाडे आहेतबाजूला इतर छोटी देवळे तीन माजली पॅगोडा होतेचेरी ब्लाॅसम  फाॅल कलर्स मधे हे देउळ जास्त छान दिसते

यानंतर गिनकौजी सिल्व्हर पॅव्हिलिअन पाहिले ते एवढे छान वाटले नाहीतिथे वाळू गार्डन बघायला मिळाली

 आमचा पुढच्या मुक्काम नारा जवळच्याच डाॅर्म मध्ये होता. इथे तुम्ही रिझनेबल रेट् मधे राहू शकता. बुक करण्यापूर्वी काय सोयी आहेत याची चौकशी केलेली बरी. आमचा या जागेतला अनुभव विशेष चांगला नव्हता. इथे जपानी रहाणीची झलक मिळाली. ततामी या जपानी चटया वर खाली गादीवर झोपणे, सरकत्या दाराचे दरवाजे, जुने हीटर्स काॅमन बाथ शी पहिली ओळख. एका मोठ्या हाॅल मध्ये १२-१५ बायकांची अंघोळीची सोय तेही बर्थसूट सध्ये. आपल्याला अजिबात सवय नसलेली ही गोष्ट. काही नियम आम्ही धाब्यावर बसवले. नशिब इथे - दिवसच राहिलो

नारा हे डिअर पार्क तोडायजी टेंपल साठी प्रसिद्ध आहे. डिअर पार्क मधे हरिणे हिंडत होती, लोक त्यांना खायला घालत होते अर्थात फोटो काढत होते. त्याच्या पुढे हिरवळ छान फुले राखलेला परिसर त्याच्या मागे भव्य असे देउळ. त्याला साजेसा भव्य दरवाजा. साधारण व्या शतकात इथली बरीच देवळे बांधली गेली व नंतर अनेक वेळा पुनरूज्जीवन केले आहे 

सर्वात मोठे लाकडी स्ट्रक्चर सर्वात मोठी ब्राॅंझ ची बु्द्धाची मूर्ती असलेले हे देउळ आहे.१५ मी उंच कमळाच्या


पाकळ्यांवर बसलेली मूर्ति आहे. गोल्ड लिफ् चा पण वापर आहे. कमळाच्या पाकळ्यावर पण बरेच कोरीवकाम आहे. बाहेर एक बासरीवाला बुद्धकोरलेला होता तो पाहून कृष्णाची आठवण आली. बाजूला - स्केल माॅडेल्स मांडली आहेत देवळाची फार सुंदर होती. या देवळात धूळ पहिल्यांदा दिसली. देवळाच्या बाहेर अशोकस्तंभ दिसला. भारताचा राजा अशोकाचा उल्लेख पाहून छान वाटले. या स्तंभाच्या खाली ओपनिंग सेरिमनी च्या वेळी एक कागद ठेवला आहे तो २०३८ मध्ये उघडणार आहेत......टाइम कॅप्सुल . बाहेर चेरी ब्लाॅसम जवळ ग्रुप फोटो झालाच.आमच्या गाईड ने इथे सगळ्यांना गरम चहा देउन सरप्राइज दिले फार बरे वाटले कारण गार हवेत चालून सगळे दमले होते. जपान मधे बाहेर आपल्या स्टाईलचा चहा कमी मिळतो म्हणून जास्त महत्व.

पुढचा दिवस हिरोशिमा 
अणूस्फोटाला  सामोरी गेलेली ही जागा. कुणाच्या तरी अस्मितेसाठी झालेला लाखो लोकांचा संहार,  का व कशासाठी हे प्रश्न सुटत नाही. 
कशीबशी वाचलेली ही बिल्डिंग बऱ्याच आधारावर उभी आहे. पीस पार्कम्युझिअम  फेमस डोम बिल्डिंग आहेएका डोम च्या खाली गेलेल्या लोकांची नावे लिहिली आहेतएक ज्योत सतत तेवत ठेवली आहे तिथे. अणू बाॅंब मुळे झालेले नुकसान  दूरगामी परिणाम म्युझिअम मधे मांडले आहेतपुन्हा हे घडू नये हे  शांति प्रस्थापित व्हावी हे दाखवले आहे.  

दुपारीमियाजिमा म्हणजे श्राईन आयलंडहिरोशिमा ला भेट दिल्यावर या आयलंड वर आम्ही गेलोबोटीचा छोटासा प्रवास होताआधी एका नदीतून मग समुद्रात शिरलोबोटीच्या ओपन डेक वरून सुंदर सीनरी दिसत होती

 आयलंड चे नाव इत्सुकुशिमा असे आहेत्याला फ्लोटिंग आयलंड असेही म्हणतात कारण भरतीच्या वेळेस देवळांच्या खालचा भाग पाण्याखाली जातोपाण्यात एक तोरी गेट आहेते पण तरंगल्यासारखे वाटतेआम्ही भरतीच्या आधी गेलो होतो.  त्यावेळी गेट पर्यंत जाता येतेइथे चक्क सरस्वतीच मंदिर आहेतिचा फोटो मात्र नीट घेतां आला नाहीइथे अनेक देवळे आहेत सगळे बघायचे तर २दिवस रहायला हवे१०० एक पायऱ्या चढून एक पॅगोडा आहेवाटेवर चेरी ब्लाॅसम्स असल्याने तो खूप मस्त दिसलाआजूबाजूला सुवेनिअर शाॅप्स बेकरीज होत्यापण ते सगळे सोडून इथल्या देवळांच्या बाजूला नुसते बसून डोंगर झाडी तोरी गेट पाणी हे नुसते बघत बसावेसे वाटत होते












































मियाजिमा म्हणजे श्राईन आयलंडहिरोशिमा ला भेट दिल्यावर या आयलंड वर आम्ही गेलोबोटीचा छोटासा प्रवास होताआधी एका नदीतून मग समुद्रात शिरलोबोटीच्या ओपन डेक वरून सुंदर सीनरी दिसत होतीया आयलंड चे नाव इत्सुकुशिमा असे आहे फ्लोटिंग आयलंड असेही म्हणतात कारण भरतीच्या वेळेस देवळांच्या खालचा भाग पाण्याखाली जातोपाण्यात एक तोरी गेट आहेते पण तरंगल्यासारखे वाटतेआम्ही भरतीच्या आधी गेलो होतो.  त्यावेळी गेट पर्यंत जाता येतेइथे चक्क सरस्वतीच मंदिर आहेतिचा फोटो मात्र नीट घेतां आला नाहीइथे अनेक देवळे आहेत सगळे बघायचे तर २दिवस रहायला हवे१०० एक पायऱ्या चढून एक पॅगोडा आहे.

त्याच्या आत एक पेंडुलम लटकवलेला असतो, जमिनीपीसुन थोडा वर. लाकडाचे आकुंचन प्रसरण व भूकंप या दोन्हीत तो मदतीला येतो. आजकाल आत जाउन पॅगोडा बघता येत नाही. 

पाच मजले पंचमहाभूते रिप्रेझेंट करतात.वाटेवर चेरी ब्लाॅसम्स असल्याने तो खूप मस्त दिसलाआजूबाजूला सुवेनिअर शाॅप्स बेकरीज होत्यापण ते सगळे सोडून इथल्या देवळांच्या बाजूला नुसते बसून डोंगर झाडी तोरी गेट पाणी हे नुसते बघत बसावेसे वाटत होते

 शिझुओका भागातील कवाने इथे शेवटचा मुक्काम होता. आम्ही क्येाटो पासून बुलेट ट्रेन नंतर बसने गेलो. हा रस्ता म्हणजे डोळ्यांसाठी मेजवानी होती. दुतर्फा हिरवेगार झाडीचे डोंगरबाजूला खाली तेवढीच छान नदी व अधून मधून चहाचे मळे. हिरव्या रंगाच्या अनेक छटा. या भागात समुद्र नद्या डोंगर  झाडी या सगळ्यांनी नटलेला निसर्ग आहे. आम्ही डोंगर असलेल्या भागात मुक्काम केला होता.  आमच्या टूर गाइडने इथे एका तरूण आजीशी ओळख करून दिलीती वयाच्या मानाने खूप उत्साही होती. अवघे ८१ वयमान.अजूनही आर्ट क्लासेस घेतेतिने आम्हाला सगळ्यांना टी शर्ट दिले  त्यांवर पेंटिंग करून घेतलेफायनल इफेक्ट मात्र आजीचाखूपच प्रेमळ 
बाई आहे. त्यांचे एक टेंपुरा रेस्टाॆरंट आहे तिथेही जेउन आलो. आपल्या भज्यांसारखा हा प्रकार.  



 
दुपारी बांबूच्या पन्हळी उतरत्या ठेवून त्यात पाणी सोडून  शिजवलेले नूडल्स, टोमॅटो, मुळा  वरून सोडले आम्ही सगळ्यांनी साईडला बसून ते अडवून बरोबरच्या टेस्टी साॅस बरोबर खाल्ले हा एक सगळ्यांना भाग घेतां येईल असा वेगळाच अनुभव होताया फॅमिलीबरोबर बराच वेळ घालवलाफळे सॅलडस  थोडे आपले जेवण त्यांनी बनवले होतेपरत जाताना सगळ्यांना छोट्या गिफ्ट ही दिल्या अगदी आपण जसे पाहुण्यांचे आदरातिथ्य करतो तसे वाटलेअगदी छोट्या डब्यात संत्री घालून प्रवासात बरोबर डब्यात दिली होती.  तिथली मेयर आजीची मैत्रिण होती. ती आम्हाला भेटायला आली व चहा म्युझिअम ला भेट द्या असा आग्रह करून देली. दुपारी आम्ही ते म्युझिअम बघितले. चहाचे मोठे झाड असते हे तिथे कळले. जगभरातले चहाचेप्रकार तो बनतो कसा हे सगळे दाखवले आहे. हा प्रांत ग्रीन चहाचा मोठा प्रोड्यूसर आहे. थोडी चहाची चवही मिळाली. तिथे बाहेर सुंदर जपानीबाग होती. जपानी गार्डन मधे बुशेस, छोटी तळी

 चहा ची जागा, रंगीत मासे, काही जुन्या गोष्टी वापरलेल्या दिसतात. थोडक्यात निसर्गातील बरेच एलिमेंटस दिसतात. बांबू पण बराच वापरला जातो. चढ उतार दिसतात बागेत. शांत वाटते. 


या  ग्रीन चहा चे रिच्युअल झाले. विशिष्ट पद्धतिने गरम पाणी घालून चहा तयार केला गेला पण मला तो विशेष आवडला नाही. जपानी लोककलेचा एक नमुना आमच्या जपानी गाईडने व त्याच्या बायकोने दाखवला.





इथे राहिलेल्या जागी गरम पाण्याचे झरे Onsen होते. जपान मध्ये व्होल्कॅनिक ऎक्टीव्हिटी खूप असल्याने खूप ठिकाणी हे झरे आहेत. त्यातील काही मिनरल्स शरीरासाठी चांगली असल्याने जपानी माणूस त्याचा खूप वापर करतो. काही ठिकाणी गरम पाहण्याच्या शेजारी थंडगार पाणीही उपलब्ध असते. प्रायव्हेट अथवा पब्लिक दोन्ही ठिकाणी या सोयी असतात. काही वेळा यातले गरम पाणी नळातून फिरवतात हाॅटेल्स मध्ये सोय करतात. निसर्गाच्या सानिध्यात असल्याने मस्त वाटते. पाणी मात्र बऱ्यापैकी गरम असते. पूर्वी या जागा पुरूष स्त्रिया एकत्र वापरत पण गेल्या काही वर्षांत प्रवासी वाढल्यावर दोघांसाठी वेगळी सोय असते. या सगळ्या ठिकाणी आत उतरताना बर्थ सूट मधे जावे हा संकेत आहे. हा रूल नसतां तर जास्त मजा आली असती. आपल्याला अजून इतर लोकांबरोबर असे वावरण्यात नक्कीच संकोच वाटतो. आमच्या रहाण्याच्या जागेत ही सोय होती म्हणून बरे. प्रायव्हसी आवश्यक तेवढी मिळाली. पूर्वी रोम मधे ही पब्लिक बाथ होते असे युरोप टूर मध्ये बघितले होते. जिथे व्होल्कॅनो जास्त त्या भागात हा प्रकार दिसतो. परवा फ्रेडरिक फोरसिथ चे लेटेस्ट पुस्तक वाचले त्यातही त्याने या अनुभवाचे बरेच वर्णन केले आहे आणि पूर्वरंग मध्येही यांचे विनोदी वर्णन आहे.  हा एक अनुभव सगळ्यांना वेगळाच वाटतो.

जपान मधे व्हेज लोकांना खायला मिळेल की नाही असा प्रश्न मला बऱ्याच लोकांनी विचारला. काळजीचे कारण नाही खूप प्रकार मिळतात. पदार्थ कसा दिसेल हे असे करून वरेच ठिकाणी मांडलेले असते. जपानी फूड मधे सुशी, टेंपुरा वेगवेगळे नुडल्स ट्राय केले. चाॅपस्टीकही वापरल्या. सुशी मधे अमेरिकेपेक्षा वेगळ्या भाज्या होत्या. या पदार्थात मसाले अगदी कमी पण बरोबरच्या साॅस ने छान लागतात. सॅलड्स भरपूर छान करतात. ड्रेसिंग माइल्ड पण टेस्टी होतेआश्चर्य म्हणजे खूप इंडियन्स रेस्टाॅरंटस् आहेत. जास्त करून नेपाळी कुक होते. त्यांच्या पदार्थात पण मसाले, क्रीम कमी वापरून चवदार जेवण होते आणि दर वेळेला आम्ही एवढे दमून जेवायला जात असू की समोर आलेले गरम जेवण छानच वाटायचे. फळे पण छान मिळतात. बाकी बीन्स पेस्ट तांदुळाची पिठी वापरून बरीच स्वीट्स बनवतात पण ती फार आवडली नाहीत. ब्रेड चे बरेच चांगले प्रकार मिळतात जे आमच्या टूर गाईडने ब्रेकफास्ट ला दिले. एका बेकरी ला ही व्हिजिट दिली. आणि सांके आवडणाऱ्यांची चंगळ होती. बाकी बसमधे प्रत्येकाने बरोबर आणलेले खाणे होतेच मधे  तोंडात टाकायलाबरोबर घरातला ग्रुप असल्याने गप्पा गाणी  खाणी हे बसमध्ये चालू असेजपानी लोक खूप शांत असतात बाहेर वावरताना पण आम्ही आमच्यावर काही परिणाम होउ दिला नाही. गप्पा चालूच.

जपान मधील लोक एकदम चपळ वाटतातजाड माणसे खूप कमीसमोरच्याच माणसाच्या वयाचा अंदाज सहास चुकतोच इतकी ती तरूण वाटतात , तसे म्हटले तर भात राइस नूडल्स  व्हीट नूडल्स भरपूर खातातत्यांचे जीन्स वजन कमी वाढवतात असे आम्ही समाधान करून घेतले.. ट्रेन मध्ये ही मंडळी कमी बोलताना दिसलीरेल्वे स्टेशन म्हटले की आपल्याला आधी सगळे आवाज आठवतात इथे शांतताकामाला जाताना काळे सूट घातलेली खूप मंडळी दिसली.  विमानात एअर होस्टेस बोलत नाहीत कुजबुजतातस्वच्छता  शिस्त सगळे पाळताना दिसलेरेल्वे स्टेशन, देवळे बागा सगळे स्वच्छसुवेनिअर्स च्या दुकानात वस्तूवर एक छोटा कागद लावून सुंदर पॅकिंग करतत्या कागदावर त्या जागेची चित्रे काढलेली असतयांना छोट्या छोट्या गोष्टी भेट देण्याची  घेण्याची आवडआम्ही पण काही भेटवस्तू नेल्या होत्या माझा वाढदिवस तिथे होतातर आमच्या बरोबरच्या जपानी गाईड ने एक छोटी भेटवस्तू छान पॅक करून बरोबर  एक ओरिगामी चा नमुना करून दिला होतामी पण येताना काही ओरिगामी डिझाइन्स  पेपर्स आणले आहेत बघू किती जमतय... एकंदरीने साधे  सुंदर असे सगळे प्रकार वाटले मग ते जेवण असो कपडे असोत वा घरे असोतमाझ्या इतर मित्रांचाही फिरताना हाच अनुभव होता अगदी मनापासून मदत करतातअजून तरी फसवाफसवीचे अनुभव कमी येतात. या सगळ्यात आजच्या तरूण पिढीचा काय सहभाग असतोजुन्या गोष्टीत त्यांना रस आहे का नाही याचा अंदाज आला नाही

जपानी लोकांनी आधुनिकते बरोबर जुन्या गोष्टी पण खूप जपल्या आहेत. आणि टूरिझम वाढवला आहे. नेहेमीप्रमाणे मनात विचार आलाच की आपल्या देशात हे का नाही होउ शकत.... इतकी सुंदर देवळे, निसर्गसुंदर ठिकाणे आहेत त्याची जगात फारच थोड्या लोकांना माहिती आहे. जगात कशाला देशात ही परिस्थिती अशूच आहे. थोडी स्वच्छता वाढवली,  सोई उपलब्ध केल्या व फसवेगिरी कमी केले तर हे नक्की जमेल. 

एकंदरीने या ट्रीपमध्ये भरपूर जपान पाहिला तरी काही पहायचे गेले राहून असेही वाटले. टोयोटा शो रूम, कात्सुरा गार्डन, माउंट फुजी जवळून, ओसाका चा किल्ला इ... थोडे वेगळे प्लॅनिंग असते तर ते शक्यही होतेपण ग्रुप मध्ये आणि दुसऱ्याने प्लान केले की थोडे हे होणारचजे पाहिले ते खूप होते. शांत स्वच्छ  नयनरम्य.......
आमच्या ट्रीप चे नाव सरप्राईजिंग जपान असे होते आणि ते नाव सार्थ ठरले. Green, Clean and Serene अशी नवीन ओळख जपानची झाली