Wednesday, May 30, 2018

जपान एक अनुभव


जपान एक  अनुभव

कराटे सुशी, ओरिगामी, सोनी, यामाहा व टोयोटा या गोष्टीतून आमची आतापर्यंत जपानची ओळख झाली होती. या सगळ्या गोष्टीत क्वालिटी हा समान धागा होता. तसेच माउंट फुजी बुलेट ट्रेन व हिरोशिमा बद्दल पण ऐकले होते.  साकुरा साठी जपानला जायचे असे मायदेशी  काही नातेवाईकांचे ठरले व आम्ही त्यात सामील झालो. सगळा कार्यक्रम बघता चेरी ब्लाॅसम, माउंट फुजी व जपान कल्चर जवळून पाहणे या इंटरेस्टींग गोष्टी होत्या. आजकाल नातेवाईकांबरोबर फक्त लग्नात भेटी होतात, या ट्रीपमुळे बराच वेळ बरोबर घालवता आला व जास्त ओळख झाली हे नक्की.

पान हा देश लहान आहे.अंदाजासाठी कॅलिफोर्निया स्टेट पेक्षा लहान व जर्मनी पेक्षा मोठा. बरीच बेटे मिळून बनलेला. ६६ % झाडांनी व्यापलेला असल्याने हिरवा गार. आम्ही टोकियो, निक्को, फुजियामा, क्योटो, नारा, हिरोशिमा, मियाजिमा बेट व कवाने या गावांना भेट दिली. जपान मध्ये बरीच वर्षे राहिलेला आमचा गाईड होता त्यामुळे भाषा,जेवण आणि जपानींचे माणसे त्याला चांगले माहिती होते. इंग्लिश चा वापर अगदी कमी असल्याने त्याची ठिकठिकाणी मदत झाली.आम्ही जपान एअरवेज ने प्रवास केला.


 टोकियो जपानची राजधानी. जपानमध्ये बैठी घरे असतात, उंच इमारती कमी या ऐकीव गोष्टी इथे दिसत नाहीत. खूप उंच बिल्डींग्ज आहेत. टोकियो स्काय  ट्री  देखणी आहे. हा टाॅवर कसा बांधला याची फिल्म जाण्यापूर्वी बघितली होती.   वेळ असेल तर हा नक्की बघा. दुसरा आयफेल टाॅवर हून थोडा उंच असलेला टोकियो टाॅवरआहे. 

बऱ्याच ठिकाणी छोटे पुतळे ओळीने उभे केलेले दिसतात देवळांच्याजवळ. ही लहान मुलांशी स्मारके आहेत जी फार जगली नाहीत किंवा जन्मली नाहीत त्यांच्यासाठी. त्याना लाल स्वेटर्स व टोप्या काही वेळेस घातलेल्या दिसतात.



दुसरे दिवशी  पॅलेस, मेजी टेंपल व आसाकुसा मधील सेन्सोजी टेंपल पाहिले. या देशांत शिंटो व बुद्धिस्ट टेंपल्स ठिकठिकाणी दिसतात. शिंटो हे निसर्गातील अनेकगोष्टीना देव मानतात. मला आपल्या वैदिक काळाशी या धर्माचे साम्य वाटले. हे देउळ दयेच्या  कॅनन या बुद्धीस्ट देवतेचे आहे. दारात लाल रंगांचा मोठा कागदाचा कंदिल आहे ज्यावर थंडर गेट असे लिहिले आहे. इथले बरेच बांधकाम लाकडीअसल्याने त्याचे नूतनीकरण वेळोवेळी होते, हे देउळ ही त्याला अपवाद नाही. सोनेरी व लाल केशरी रंगांचा वापर खूप आहे. या देवळाच्या बाहेर दुतर्फा तुळशीबाग स्टाईल दुकाने आहेत. स्त्रीवर्ग तिथे रेंगाळला हे सांगायलाच नकोच. जपानी पंखे, बाहुल्या, स्टीकर्स, बुक मार्क्स, टी शर्ट्स आणि अजून बरेच काही. यानंतर राजाचा पॅलेस लांबून बघितला. इथेही राजाचे महत्व आहे. या रस्त्यावर काही फुललेली झाडे दिसली. नंतर मेजी टेंपल ला भेट दिली. खूप झाडी आहे इथे. यानंतर जेवढी ठिकाणी पाहिली ती सगळी निसर्गरम्य अशीच होती. मेजी राजवटीत आधुनिक आणि शक्तीशाली जपानची रचना झाली. अगदी गावात असूनही भरपूर झाडीत हे ठिकाण आहे. बांधकामाच्या वेळी जव जवळ लाखभर झाडे लावली होती. इथले दगडी कंदिल लक्ष वेधून घेतात. दारात तोरी गेट आहे. या गेट मधून जाताना तुम्ही स्पिरिट्युअल जगात प्रवेश करता असा समज आहे. आत राजाच्या वैयक्तिक गोष्टींचे संग्रहालय आहे. 


यानंतर एका टोकियो बे व्ह्यू असलेल्या ठिकाणी जेवण घेउन बोट राइड साठी गेलो. विंडी असल्याने बोट राईड झालीनाही पण तिथून व्ह्यू छान होता. नंतर अजून थोडे टोकियो दर्शन करून परतलो. वाटेत ठिकठिकाणी वेगवेगळे फुले चालण्याचा थकवा घालवत होती.

निक्कोम्हणजेसूर्य.... दुसऱ्या दिवशी निक्को ची डे ट्रीप केलीटोकियो पासून साधारण  तासावर अतिशय निसर्गरम्य जागी अनेक देवळे आहेत शिंटो  बुद्धीस्टबरीच वर्ल्ड हेरिटेज साइटस् मधे मोडतातजाताना बस च्या प्रवासात हवा मेहेरबान होतीथोडा पाउसउनथोड्या गारा असे सगळे आणि दुतर्फा साकुरा
 ठिकाणी थांबून सगळ्यांनी फोटोची हौस भागवली.वेगवेगळ्या प्रकारची झाडे दिसली.  इथे खूप उंच सेडार ची झाडे आहेतथोडी कुमाऊ हिल्स ची आठवण आलीरिन्नोजी च्या देवळात रेस्टोरेशन चालू होते व्या शतकात या देवळांची स्थापना झालीसुरूवातीला शिंक्यो ब्रिज लागलात्यामागे देवाने नदी पार करण्यासाठी भक्ताला ब्रिज बांधून मदत केली अशी कथा आहेतेव्हा दोन सापांचा ब्रिज केला असे सांगतातसुरूवातीला घोड्यांचा तबेला लागतोशिंटो देवळांना घोडे प्रिय होतेघोड्यांना आजार होउ नयेत म्हणून तिथे बरीच माकडे ठेवली होती नेहेमी जे बुरा मत देखोबुरा मत सुनो हे तीन माकडांचे चित्र पहातो त्याचे उगमस्थान इथे आहेलाकडी कलाकुसर खूप आहे छान त्रिमिती इफेक्ट दिला आहेसकाळ पासून संध्याकाळ पर्यंत तुम्ही इथली कलाकुसर पाहू शकता एवढे प्रकार करून ठेवले आहेतभरपूर गोल्ड कलर चा  गोल्ड लिफ् चा वापर आहेएका हत्ती  बघितलेल्या कलाकाराने काढलेले हत्तीचे चित्र आहे तर एका प्रसिद्ध शिल्पकाराने केलेले मांजराचे शिल्प आहेत्यावरचे भाव खूप छान आहेत.यावरून पुढे पोर्सेलीन चे प्राणी बनवायला लागले असे म्हणतातकोरीव काम बघून दमायला झाले.एका देवळात बराच वेळ जपानीमंत्रपठण चालले होते तिथल्या एका खोलीच्या छतावर गोल्डन ड्रॅगन चे पेंटिंग आहे त्याखाली उभे राहून दोन लाकडी पट्ट्या एकमेकांवर वाजवल्या की ड्रॅगन चा आवाज येतो हे तिथल्या पुजाऱ्याने करून दाखवले.  जपानी मंडळी खूप भक्तीभावाने सगळे बघत होतीदेवळाच्या मागे१००-१२५ पायऱ्या चढून आमच्यातील काही चपळ मंडळी वरून व्ह्यू बघून आलीइथे खूप कलाकुसर  चित्रे यांची गर्दी झाली आहे असे वाटलेरंग पण खूप आहेतया जागेला देवळापेक्षा प्रदर्शन म्हणावे असे वाटले

 इथला इंपिरिअल पॅलेस पाहिला. आपल्या पॅलेस च्या कल्पनेपेक्षा खूपच साधा वाटतोतिथले ४०० वर्षापूर्वीचे साकुरा चे झाड पूर्ण फुललेले होते खोल्याततामी या जपानी चटयासरकती दारे  अधूनमधून पेंटिग्ज होती ठिकाणीच कार्पेट  शॅंडेलिअर्स होती.  जपानी रहाणीतला साधेपणा दिसून आलाआपल्या मनातल्या पॅलेस या कल्पनेपेक्षा हा खूप वेगळा होतायानंतर सुशी खायला आमच्या आजच्या गाईड च्या रेस्टाॅरंट मध्ये गेलो. अगत्यशीलतेचा अनुभव जिथे जेवलो तिथे सगळीकडे आलाइथल्या व्हेज सुशी मध्ये वेगळ्या भाज्या होत्या. 

बुलेट ट्रेनचा प्रवास हे पुढच्या प्रवासातला नवीन अनुभव होता. आम्ही ७ दिवसाचा पास काढला होता त्याचे पैसे पुरेपुर वसूल केले. जेवढे वर्णन ऐकले होते त्यापेक्षा बुलेट ट्रेनचा अनुभव छान होता. गाडी स्टेशनवर येताना कमी आवाज,अतिशय शिस्तीत चढणारे उतरणारे प्रवासी व धक्का न बसतां चालू होणारच गाडी यामुळे खूप सुखकर प्रवास झाला.सिंगापूर युरोप अमेरिका यापेक्षा ही बुलेट ट्रेन नक्कीच उजवी आहे. आता भारतात बुलेट ट्रेन येताना ही सगळी शिस्त त्याबरोबर आली तर मजा येईल. ट्रेन च्या सिट्स फिरवतां येतात. समोरच्याच सीटच्या पाठीवर  सगळी माहिती दिलेली होती. कुठून कुठे चालले, बाथरूम, कचरा डबा, धूम्रपान या सोई कुठे आहेत. याचावापर सगळी मंडळी करतात त्यामुळे सगळे स्वच्छ होते. लहान मुलांना घरी व शाळेत हे धडक दिले जातात त्यामुळे कचरा दिसत नाही. एक छोटासा हुक कडेला सामान ठरवण्यासाठी होता ज्यावर १किती वजन ठेवतां येईल ते दिले होते. ट्रेस केला तरच तो बाहेर येत होता. जेवढे तिकीट चेकपोस्ट कंडक्टर डब्यात येत ते डब्याच्या शेवटी वळून कंबरेत वाकून पुढे जात होते हे पाहून आपले टी सी आठवले व आजच्या जगातही अशी लोकं आहेत हे बघायला मिळाले. जवान मध्ये या ट्रेन्स ना शिंकानसेन म्हणतात. १९६४ च्या आॅलिंपिक्स पासून साचीपुरूवात झाली. लोकांना राजचा प्रवास सुखकर व कमी वेळात होउ लागला. सुरूवातीला टनेल मधून बाहेर पडताना मोठा बूम येत असे तो टाळण्यासाठी बराच रिसर्चर केला गेला. मेन इंजिनिअर ला पक्षी निरीक्षणाची आवड होती त्य अनुभवावरून इंजिनाचा 

 हा बराचसा किंग फिशर च्या चोचीप्रमाणे केलागेला कारण हा पक्षी हवेतून पाण्यात जाताना पाणी उडवत नाही वा आवाज करत नाही. दोन वेगळ्या मिडिअम मधून केल्याने ट्रेन जास्त आवाज करत होती. दुसरी सुधारणा पेंटोग्राफ च्या डिझाईन मधे केली. इथेही पक्षीनिरीक्षक मदतीला आले, गरूडाच्या सगळ्यात वरच्या पंखाला कात्रे असतात त्यामुळे हवेचा अावाज जास्त होत नाही. पंखाप्रमाणे पेंटोग्राफ च्या डिझाईन मधे सुधारणा केली व आवाज कमी झाला.
आपण जे म्हणतो निसर्ग हा मोठा गुरू आहे त्याची इथे प्रचिती येते.


माउंट फुजी आपल्याला जसा हिमालय तसा  जपानी लोकांचा माउंट फुजी. वर्ल्ड हेरिटेज सेंटर असलेल्या एका 

 ला आम्ही भेट दिली. माउंच फूजी उलटा केला तर जसा दिसेल तसे हे माॆडेल केले आहे. बाहेरून लाकूड बांबू चौकट वापरली आहे. बाहेर पाणी आहे त्यात छान प्रतिबिंब दिसते. हे पाणी याच पर्वताचे रिसायकल केलेले आहे. आपण आत मधे चढत वर जातो व जाताना मोठ्या स्क्रीन वर डोंगरावर दिसणारी सिनरी बघत जातो. खूप छान बनवले आहे. नेहेमीप्रमाणे एक फिल्म दाखवली जाते ज्यात सगळ्या सिझन्स चे फोटो दाखवले आहेत. शेवटी आपण एका टेरेस वर बाहेर पडतो आणि समोर पूर्ण डोंगर दिसतो हे इथले सुंदर सरप्राईज होते. हवेने साथ दिल्याने मजा आली. भरपूर फोटो काढले. परत खाली येताना अजून बरीच माहिती ४ भाषात पुरवली आहे. काही वर्षापूर्वी मनिषाताई साठे आल्या होत्या. त्यांनी माउंट फुजीच्या बॆकड्राॆप वर कथक केले होते त्याची आठवण झाली. फार सुंदर परफाॆर्मन्स होता तो.

चेरी ब्लाॅसम अर्थात साकुरा.....

जपानच्या ह्या ट्रीप मध्ये साकुरा हे मोठे आकर्षण 
होतेयंदा हा सिझन लवकर आल्याने कमी ब्लाॅसम्स बघायला मिळालेपण जे पाहिले ते फार सुंदर होतेनिळ्या आकाशाच्या बॅकड्राॅपवर पांढरी गुलाबी झाडे फार मस्त दिसलीचेरी ब्लाॅसम येणारी जवळ जवळ १०० वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहेतकाही लवकर येतात काही उशिरा पाकळ्यांपासून ते १०० पाकळ्यांपर्यंत फुलणार ही झाडे आहेतआम्ही - प्रकार पाहिलेपांढरागुलाबीवीपींग विलो प्रकारातलेकाही  पाकळ्या तर काही गच्च पाकळ्या असलेलीमार्च एंड ते एप्रिल पहिला आठवडा हा सिझन मुख्यत्वे असतोनंतर ही फुले दिसतातशक्य तोवर मार्च एंड लाच ट्रीप प्लान करावी  थोडी फ्लेक्झिबल ठेवावी म्हणजे ब्लाॅसम्स नक्की बघायला मिळतीलया सिझनमधे सगळे जपानी सहभागी होतातही फुले सुंदर असतात  थोडे दिवस  रहातात या प्रमाणेआपले आयुष्य थोडे  सुंदर असते तेव्हा त्याचा चांगला आस्वाद घ्याचांगले कारणी लावा असे तत्वज्ञान जपानी लोकांनी या फुलांमधे शोधले आहेयाच सुमारास नवीन वर्ष ही सुरू होतेवसंत ऋतू च्या सुरूवातीला नवीन फुले पाने येउन झाडांचेही एक प्रकार नवीन वर्ष सुरू होतेया फुलांचे डिझाईन्स बुक मार्क्सरुमालवाॅल पेंटिंग्जकॅलेंडर किमोनो या सगळ्यावर आपले स्थान टिकवून आहेआम्ही थोडी आर्टिफिशिअल फुले आठवण म्हणून आणली. आता पुढत्ा वेळी वाॆशिंग्टन डी सी ला जाउ साकुरा पहायला. जपानच्या राजाने दिलेली २५०० झाडे नदीकिनारी लावली आहेत. किती छान कल्पना आहे ना भेट देण्याची.

  क्योटो .... इथे बरीच ठिकाणे बघण्यासारखी आहेतआम्ही फुशिमी इनारी श्राइनकिनकौजी टेंपलकियोमिझू डेरा टेंपल व सिल्व्हर टेंपल बघितले. इनारी हे तांदुळ देणाऱ्या वा वाढवणाऱ्या देवासाठी आहे. इथल्या केशरी रंगांच्या तोरी लक्श वेधून घेतातही तोरणे लाकडातील असून देणगीदारांची नावे त्यांवर लिहिली आहेतवाटेत कोल्हा  त्याच्या तोंडात कागदाची गुंडाळी असलेली अनेक दगडी शिल्पे दिसतातकोल्हा हा त्या देवतेचा दूत मानला जातोआजूबाजूचे डोंगरझाडी  ताजी हवा यामुळे वरती जायला मजा आलीआपल्याकडेच तिरूपतिला जसे देवाला धंद्यात पार्टनर करून घेतात तसा थोडा प्रकार आहे

 किनकौजी या झेन देवळाला नंतर भेट दिलीनुकताच वसंत ऋतू आलाय हे इथल्या झाडाची पालवी दाखवत होतीहिरव्या रंगांच्या खूप छटाप्रववेशापासून आत बरेच  अंतर या झाडीतून गेलो आणि अचानक समोर गोल्डन टेंपल दिसले  तोंडातून  पिक्चर परफेक्ट हे शब्द बाहेर पडलेवरचे दोन मजल्यासाठी गोल्ड लिफ् वापरले आहेसोन्याची शुद्धता मत्यूबद्दलचे सगळे निगेटिव विचार काढून टाकते असा काहीसा विचार गोल्ड लिफ् वापरण्यामागे आहेयाच्या समोर तळे आहे उन्हात सुंदर प्रतिबिंब दिसतेइथे भरपूर फोटोग्राफी झालीयाला गोल्डन पॅव्हिलिअन म्हणतात


 देशी जेवणाचा आस्वाद घेउन कियोमिझू डेरा टेंपल पाहिले. हे देउळ शुद्ध पाण्यासाठी प्रसिद्ध आहेदेवळाकडे जाताना थोडा स्टीप रोड आहेआजूबाजूस भरपूर दुकाने आहेत खाण्याची  सुवेनिअर्स चीएका खडकावर ओटावा स्प्रिंग च्या वर हे देउळ आहेया झऱ्यातले पाणी शुद्ध मानले जातेइथे मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी मंडळी चिठ्ठ्या बांधून ठेवत होती. हे एक युनिव्हर्सल रिचुअल आहे.  देवळाच्या सुरूवातीला केवळ लाकडी खांबांच्या आधारावर मोठा वऱ्हांडा  स्टेज आहेतिथून गाव  आजूबाजूलाच परिसर मस्त दिसतोइथे बऱ्याच बायका किमोनो खालून आल्या होत्याछोटी कंपनी विशेषतया ट्रॅडिशनल पोषाखात गोड दिसत होती-- या वर्षी मुलांना देवाला नेत्यांची पद्धत आहेतेव्हा त्यांचे भरपूर लाड केले जातात दया करणारी ११ डोकी असलेली देवता या देवळात प्रसिद्ध आहेखरे सांगायचे तर कुठल्याही देवळात मूर्तिकडे फारच कमी लक्ष जात होते आजूबाजूलाच परिसर इतका नयनरम्य होता तोच बघण्यात माझा जास्त वेळ गेलाचेरी  इतर बरीच झाडे आहेतबाजूला इतर छोटी देवळे तीन माजली पॅगोडा होतेचेरी ब्लाॅसम  फाॅल कलर्स मधे हे देउळ जास्त छान दिसते

यानंतर गिनकौजी सिल्व्हर पॅव्हिलिअन पाहिले ते एवढे छान वाटले नाहीतिथे वाळू गार्डन बघायला मिळाली

 आमचा पुढच्या मुक्काम नारा जवळच्याच डाॅर्म मध्ये होता. इथे तुम्ही रिझनेबल रेट् मधे राहू शकता. बुक करण्यापूर्वी काय सोयी आहेत याची चौकशी केलेली बरी. आमचा या जागेतला अनुभव विशेष चांगला नव्हता. इथे जपानी रहाणीची झलक मिळाली. ततामी या जपानी चटया वर खाली गादीवर झोपणे, सरकत्या दाराचे दरवाजे, जुने हीटर्स काॅमन बाथ शी पहिली ओळख. एका मोठ्या हाॅल मध्ये १२-१५ बायकांची अंघोळीची सोय तेही बर्थसूट सध्ये. आपल्याला अजिबात सवय नसलेली ही गोष्ट. काही नियम आम्ही धाब्यावर बसवले. नशिब इथे - दिवसच राहिलो

नारा हे डिअर पार्क तोडायजी टेंपल साठी प्रसिद्ध आहे. डिअर पार्क मधे हरिणे हिंडत होती, लोक त्यांना खायला घालत होते अर्थात फोटो काढत होते. त्याच्या पुढे हिरवळ छान फुले राखलेला परिसर त्याच्या मागे भव्य असे देउळ. त्याला साजेसा भव्य दरवाजा. साधारण व्या शतकात इथली बरीच देवळे बांधली गेली व नंतर अनेक वेळा पुनरूज्जीवन केले आहे 

सर्वात मोठे लाकडी स्ट्रक्चर सर्वात मोठी ब्राॅंझ ची बु्द्धाची मूर्ती असलेले हे देउळ आहे.१५ मी उंच कमळाच्या


पाकळ्यांवर बसलेली मूर्ति आहे. गोल्ड लिफ् चा पण वापर आहे. कमळाच्या पाकळ्यावर पण बरेच कोरीवकाम आहे. बाहेर एक बासरीवाला बुद्धकोरलेला होता तो पाहून कृष्णाची आठवण आली. बाजूला - स्केल माॅडेल्स मांडली आहेत देवळाची फार सुंदर होती. या देवळात धूळ पहिल्यांदा दिसली. देवळाच्या बाहेर अशोकस्तंभ दिसला. भारताचा राजा अशोकाचा उल्लेख पाहून छान वाटले. या स्तंभाच्या खाली ओपनिंग सेरिमनी च्या वेळी एक कागद ठेवला आहे तो २०३८ मध्ये उघडणार आहेत......टाइम कॅप्सुल . बाहेर चेरी ब्लाॅसम जवळ ग्रुप फोटो झालाच.आमच्या गाईड ने इथे सगळ्यांना गरम चहा देउन सरप्राइज दिले फार बरे वाटले कारण गार हवेत चालून सगळे दमले होते. जपान मधे बाहेर आपल्या स्टाईलचा चहा कमी मिळतो म्हणून जास्त महत्व.

पुढचा दिवस हिरोशिमा 
अणूस्फोटाला  सामोरी गेलेली ही जागा. कुणाच्या तरी अस्मितेसाठी झालेला लाखो लोकांचा संहार,  का व कशासाठी हे प्रश्न सुटत नाही. 
कशीबशी वाचलेली ही बिल्डिंग बऱ्याच आधारावर उभी आहे. पीस पार्कम्युझिअम  फेमस डोम बिल्डिंग आहेएका डोम च्या खाली गेलेल्या लोकांची नावे लिहिली आहेतएक ज्योत सतत तेवत ठेवली आहे तिथे. अणू बाॅंब मुळे झालेले नुकसान  दूरगामी परिणाम म्युझिअम मधे मांडले आहेतपुन्हा हे घडू नये हे  शांति प्रस्थापित व्हावी हे दाखवले आहे.  

दुपारीमियाजिमा म्हणजे श्राईन आयलंडहिरोशिमा ला भेट दिल्यावर या आयलंड वर आम्ही गेलोबोटीचा छोटासा प्रवास होताआधी एका नदीतून मग समुद्रात शिरलोबोटीच्या ओपन डेक वरून सुंदर सीनरी दिसत होती

 आयलंड चे नाव इत्सुकुशिमा असे आहेत्याला फ्लोटिंग आयलंड असेही म्हणतात कारण भरतीच्या वेळेस देवळांच्या खालचा भाग पाण्याखाली जातोपाण्यात एक तोरी गेट आहेते पण तरंगल्यासारखे वाटतेआम्ही भरतीच्या आधी गेलो होतो.  त्यावेळी गेट पर्यंत जाता येतेइथे चक्क सरस्वतीच मंदिर आहेतिचा फोटो मात्र नीट घेतां आला नाहीइथे अनेक देवळे आहेत सगळे बघायचे तर २दिवस रहायला हवे१०० एक पायऱ्या चढून एक पॅगोडा आहेवाटेवर चेरी ब्लाॅसम्स असल्याने तो खूप मस्त दिसलाआजूबाजूला सुवेनिअर शाॅप्स बेकरीज होत्यापण ते सगळे सोडून इथल्या देवळांच्या बाजूला नुसते बसून डोंगर झाडी तोरी गेट पाणी हे नुसते बघत बसावेसे वाटत होते












































मियाजिमा म्हणजे श्राईन आयलंडहिरोशिमा ला भेट दिल्यावर या आयलंड वर आम्ही गेलोबोटीचा छोटासा प्रवास होताआधी एका नदीतून मग समुद्रात शिरलोबोटीच्या ओपन डेक वरून सुंदर सीनरी दिसत होतीया आयलंड चे नाव इत्सुकुशिमा असे आहे फ्लोटिंग आयलंड असेही म्हणतात कारण भरतीच्या वेळेस देवळांच्या खालचा भाग पाण्याखाली जातोपाण्यात एक तोरी गेट आहेते पण तरंगल्यासारखे वाटतेआम्ही भरतीच्या आधी गेलो होतो.  त्यावेळी गेट पर्यंत जाता येतेइथे चक्क सरस्वतीच मंदिर आहेतिचा फोटो मात्र नीट घेतां आला नाहीइथे अनेक देवळे आहेत सगळे बघायचे तर २दिवस रहायला हवे१०० एक पायऱ्या चढून एक पॅगोडा आहे.

त्याच्या आत एक पेंडुलम लटकवलेला असतो, जमिनीपीसुन थोडा वर. लाकडाचे आकुंचन प्रसरण व भूकंप या दोन्हीत तो मदतीला येतो. आजकाल आत जाउन पॅगोडा बघता येत नाही. 

पाच मजले पंचमहाभूते रिप्रेझेंट करतात.वाटेवर चेरी ब्लाॅसम्स असल्याने तो खूप मस्त दिसलाआजूबाजूला सुवेनिअर शाॅप्स बेकरीज होत्यापण ते सगळे सोडून इथल्या देवळांच्या बाजूला नुसते बसून डोंगर झाडी तोरी गेट पाणी हे नुसते बघत बसावेसे वाटत होते

 शिझुओका भागातील कवाने इथे शेवटचा मुक्काम होता. आम्ही क्येाटो पासून बुलेट ट्रेन नंतर बसने गेलो. हा रस्ता म्हणजे डोळ्यांसाठी मेजवानी होती. दुतर्फा हिरवेगार झाडीचे डोंगरबाजूला खाली तेवढीच छान नदी व अधून मधून चहाचे मळे. हिरव्या रंगाच्या अनेक छटा. या भागात समुद्र नद्या डोंगर  झाडी या सगळ्यांनी नटलेला निसर्ग आहे. आम्ही डोंगर असलेल्या भागात मुक्काम केला होता.  आमच्या टूर गाइडने इथे एका तरूण आजीशी ओळख करून दिलीती वयाच्या मानाने खूप उत्साही होती. अवघे ८१ वयमान.अजूनही आर्ट क्लासेस घेतेतिने आम्हाला सगळ्यांना टी शर्ट दिले  त्यांवर पेंटिंग करून घेतलेफायनल इफेक्ट मात्र आजीचाखूपच प्रेमळ 
बाई आहे. त्यांचे एक टेंपुरा रेस्टाॆरंट आहे तिथेही जेउन आलो. आपल्या भज्यांसारखा हा प्रकार.  



 
दुपारी बांबूच्या पन्हळी उतरत्या ठेवून त्यात पाणी सोडून  शिजवलेले नूडल्स, टोमॅटो, मुळा  वरून सोडले आम्ही सगळ्यांनी साईडला बसून ते अडवून बरोबरच्या टेस्टी साॅस बरोबर खाल्ले हा एक सगळ्यांना भाग घेतां येईल असा वेगळाच अनुभव होताया फॅमिलीबरोबर बराच वेळ घालवलाफळे सॅलडस  थोडे आपले जेवण त्यांनी बनवले होतेपरत जाताना सगळ्यांना छोट्या गिफ्ट ही दिल्या अगदी आपण जसे पाहुण्यांचे आदरातिथ्य करतो तसे वाटलेअगदी छोट्या डब्यात संत्री घालून प्रवासात बरोबर डब्यात दिली होती.  तिथली मेयर आजीची मैत्रिण होती. ती आम्हाला भेटायला आली व चहा म्युझिअम ला भेट द्या असा आग्रह करून देली. दुपारी आम्ही ते म्युझिअम बघितले. चहाचे मोठे झाड असते हे तिथे कळले. जगभरातले चहाचेप्रकार तो बनतो कसा हे सगळे दाखवले आहे. हा प्रांत ग्रीन चहाचा मोठा प्रोड्यूसर आहे. थोडी चहाची चवही मिळाली. तिथे बाहेर सुंदर जपानीबाग होती. जपानी गार्डन मधे बुशेस, छोटी तळी

 चहा ची जागा, रंगीत मासे, काही जुन्या गोष्टी वापरलेल्या दिसतात. थोडक्यात निसर्गातील बरेच एलिमेंटस दिसतात. बांबू पण बराच वापरला जातो. चढ उतार दिसतात बागेत. शांत वाटते. 


या  ग्रीन चहा चे रिच्युअल झाले. विशिष्ट पद्धतिने गरम पाणी घालून चहा तयार केला गेला पण मला तो विशेष आवडला नाही. जपानी लोककलेचा एक नमुना आमच्या जपानी गाईडने व त्याच्या बायकोने दाखवला.





इथे राहिलेल्या जागी गरम पाण्याचे झरे Onsen होते. जपान मध्ये व्होल्कॅनिक ऎक्टीव्हिटी खूप असल्याने खूप ठिकाणी हे झरे आहेत. त्यातील काही मिनरल्स शरीरासाठी चांगली असल्याने जपानी माणूस त्याचा खूप वापर करतो. काही ठिकाणी गरम पाहण्याच्या शेजारी थंडगार पाणीही उपलब्ध असते. प्रायव्हेट अथवा पब्लिक दोन्ही ठिकाणी या सोयी असतात. काही वेळा यातले गरम पाणी नळातून फिरवतात हाॅटेल्स मध्ये सोय करतात. निसर्गाच्या सानिध्यात असल्याने मस्त वाटते. पाणी मात्र बऱ्यापैकी गरम असते. पूर्वी या जागा पुरूष स्त्रिया एकत्र वापरत पण गेल्या काही वर्षांत प्रवासी वाढल्यावर दोघांसाठी वेगळी सोय असते. या सगळ्या ठिकाणी आत उतरताना बर्थ सूट मधे जावे हा संकेत आहे. हा रूल नसतां तर जास्त मजा आली असती. आपल्याला अजून इतर लोकांबरोबर असे वावरण्यात नक्कीच संकोच वाटतो. आमच्या रहाण्याच्या जागेत ही सोय होती म्हणून बरे. प्रायव्हसी आवश्यक तेवढी मिळाली. पूर्वी रोम मधे ही पब्लिक बाथ होते असे युरोप टूर मध्ये बघितले होते. जिथे व्होल्कॅनो जास्त त्या भागात हा प्रकार दिसतो. परवा फ्रेडरिक फोरसिथ चे लेटेस्ट पुस्तक वाचले त्यातही त्याने या अनुभवाचे बरेच वर्णन केले आहे आणि पूर्वरंग मध्येही यांचे विनोदी वर्णन आहे.  हा एक अनुभव सगळ्यांना वेगळाच वाटतो.

जपान मधे व्हेज लोकांना खायला मिळेल की नाही असा प्रश्न मला बऱ्याच लोकांनी विचारला. काळजीचे कारण नाही खूप प्रकार मिळतात. पदार्थ कसा दिसेल हे असे करून वरेच ठिकाणी मांडलेले असते. जपानी फूड मधे सुशी, टेंपुरा वेगवेगळे नुडल्स ट्राय केले. चाॅपस्टीकही वापरल्या. सुशी मधे अमेरिकेपेक्षा वेगळ्या भाज्या होत्या. या पदार्थात मसाले अगदी कमी पण बरोबरच्या साॅस ने छान लागतात. सॅलड्स भरपूर छान करतात. ड्रेसिंग माइल्ड पण टेस्टी होतेआश्चर्य म्हणजे खूप इंडियन्स रेस्टाॅरंटस् आहेत. जास्त करून नेपाळी कुक होते. त्यांच्या पदार्थात पण मसाले, क्रीम कमी वापरून चवदार जेवण होते आणि दर वेळेला आम्ही एवढे दमून जेवायला जात असू की समोर आलेले गरम जेवण छानच वाटायचे. फळे पण छान मिळतात. बाकी बीन्स पेस्ट तांदुळाची पिठी वापरून बरीच स्वीट्स बनवतात पण ती फार आवडली नाहीत. ब्रेड चे बरेच चांगले प्रकार मिळतात जे आमच्या टूर गाईडने ब्रेकफास्ट ला दिले. एका बेकरी ला ही व्हिजिट दिली. आणि सांके आवडणाऱ्यांची चंगळ होती. बाकी बसमधे प्रत्येकाने बरोबर आणलेले खाणे होतेच मधे  तोंडात टाकायलाबरोबर घरातला ग्रुप असल्याने गप्पा गाणी  खाणी हे बसमध्ये चालू असेजपानी लोक खूप शांत असतात बाहेर वावरताना पण आम्ही आमच्यावर काही परिणाम होउ दिला नाही. गप्पा चालूच.

जपान मधील लोक एकदम चपळ वाटतातजाड माणसे खूप कमीसमोरच्याच माणसाच्या वयाचा अंदाज सहास चुकतोच इतकी ती तरूण वाटतात , तसे म्हटले तर भात राइस नूडल्स  व्हीट नूडल्स भरपूर खातातत्यांचे जीन्स वजन कमी वाढवतात असे आम्ही समाधान करून घेतले.. ट्रेन मध्ये ही मंडळी कमी बोलताना दिसलीरेल्वे स्टेशन म्हटले की आपल्याला आधी सगळे आवाज आठवतात इथे शांतताकामाला जाताना काळे सूट घातलेली खूप मंडळी दिसली.  विमानात एअर होस्टेस बोलत नाहीत कुजबुजतातस्वच्छता  शिस्त सगळे पाळताना दिसलेरेल्वे स्टेशन, देवळे बागा सगळे स्वच्छसुवेनिअर्स च्या दुकानात वस्तूवर एक छोटा कागद लावून सुंदर पॅकिंग करतत्या कागदावर त्या जागेची चित्रे काढलेली असतयांना छोट्या छोट्या गोष्टी भेट देण्याची  घेण्याची आवडआम्ही पण काही भेटवस्तू नेल्या होत्या माझा वाढदिवस तिथे होतातर आमच्या बरोबरच्या जपानी गाईड ने एक छोटी भेटवस्तू छान पॅक करून बरोबर  एक ओरिगामी चा नमुना करून दिला होतामी पण येताना काही ओरिगामी डिझाइन्स  पेपर्स आणले आहेत बघू किती जमतय... एकंदरीने साधे  सुंदर असे सगळे प्रकार वाटले मग ते जेवण असो कपडे असोत वा घरे असोतमाझ्या इतर मित्रांचाही फिरताना हाच अनुभव होता अगदी मनापासून मदत करतातअजून तरी फसवाफसवीचे अनुभव कमी येतात. या सगळ्यात आजच्या तरूण पिढीचा काय सहभाग असतोजुन्या गोष्टीत त्यांना रस आहे का नाही याचा अंदाज आला नाही

जपानी लोकांनी आधुनिकते बरोबर जुन्या गोष्टी पण खूप जपल्या आहेत. आणि टूरिझम वाढवला आहे. नेहेमीप्रमाणे मनात विचार आलाच की आपल्या देशात हे का नाही होउ शकत.... इतकी सुंदर देवळे, निसर्गसुंदर ठिकाणे आहेत त्याची जगात फारच थोड्या लोकांना माहिती आहे. जगात कशाला देशात ही परिस्थिती अशूच आहे. थोडी स्वच्छता वाढवली,  सोई उपलब्ध केल्या व फसवेगिरी कमी केले तर हे नक्की जमेल. 

एकंदरीने या ट्रीपमध्ये भरपूर जपान पाहिला तरी काही पहायचे गेले राहून असेही वाटले. टोयोटा शो रूम, कात्सुरा गार्डन, माउंट फुजी जवळून, ओसाका चा किल्ला इ... थोडे वेगळे प्लॅनिंग असते तर ते शक्यही होतेपण ग्रुप मध्ये आणि दुसऱ्याने प्लान केले की थोडे हे होणारचजे पाहिले ते खूप होते. शांत स्वच्छ  नयनरम्य.......
आमच्या ट्रीप चे नाव सरप्राईजिंग जपान असे होते आणि ते नाव सार्थ ठरले. Green, Clean and Serene अशी नवीन ओळख जपानची झाली