Showing posts with label भटकंती-अमेरिका. Show all posts
Showing posts with label भटकंती-अमेरिका. Show all posts

Tuesday, July 10, 2012

य़लोस्टोन व ग्रँड टिटाँन - एक अदभूत सफर

य़लोस्टोन व ग्रँड टिटाँन - एक अदभूत सफर

यलोस्टोन व ग्रँड टिटाँन ही दोन नँशनल पार्क बघण्याचा बरेच दिवस विचार चालू होता. शेवटी गेल्या महिन्यात हा योग आला.  भारतातून आलेले पाहुणे आमच्याबरोबर होते.  आमच्याकडे ३ दिवस व चार रात्री एवढाच वेळ होता. त्यासाठी बराच विचार करून ही ट्रीप आखली आणि भरपूर गोश्टी बघितल्या. तुमच्याकडे जर असाच कमी वेळ असेल तर तुम्हाला या माहितीचा उपयोग होईल.  इथे इतके निसर्गाचे चमत्कार आहेत की ते तुमच्याशी शेअर करावेसे वाटले.

यलोस्टोन हे अमेरिकेतील पहिले नँशनल पार्क. १८७२ मध्ये ते सुरू झाले.  मोन्टँना, वायोमिंग व आयडाहो स्टेट  ची बाँर्डर याला लाभली आहे. जगातल्या सर्वात मोठ्या ज्वालामुखीवर ते वसलेले आहे. ज्वालामुखीची इतर ठिकाणे समुद्र किंवा डोँगर अशा जागी आहेत पण ह्या ज्वालामुखीच्या बाजूला सगळी जमीन आहे, हे त्याचे वेगळेपण आहे. इथला व्होल्कँनिक खडक rhyolite आहे ज्यात सिलिका भरपूर प्रमाणात आहे.

हा पार्क चा नकाशा आहे ज्यावर अंतरे व ठिकाणे दाखवली आहेत. इथे स्पीड बराच कमी असतो हा लक्षात ठेवावे. वाटेत खाणे गँस याची सोय छान आहे. सिझनच्या सुरूवातीला वा हवा बिघडल्यास रस्ते तात्पुरते बंद करतात.

वेस्ट यलोस्टोन मध्ये राहिल्यास मध्यवर्ती पडते हे नकाशावरून लक्षात येइल.  या पार्कच्या वेबसाइटवर भरपूर माहिती दिली आहे ती जाण्यापूर्वी वेळ काढून जरूर वाचा.







थर्मल फिचर्स - जगातील सर्वात जास्त थर्मल फिचर्स या गायजर बेसिन मध्ये आहेत. ३०० पेक्षा जास्त गायजर्स इथे आहेत. गरम पाण्याचे झरे, वाफेची कुंडे भरपूर आहेत.


ओल्ड फेथफूल दर ९० मि ने उडतो.
  • गायझर - यासाठी उष्णता, पाणी, प्लंबिंग सिस्टीम व खडकातील फटींची गरज असते. खडकातून पाणी आत झिरपते. आत खूप जास्त उष्णता असल्याने पाणी उकळते. उकळत्या पाण्यमुळे खडकातील सिलिका बाहेर पडते व सिमेंट पाईप सारखे बारीक पाईप तयार होतात. या गोष्टीला बरीच वर्षे लागतात. वरून पावसाचे, बर्फाचे पाणी आत साठते.  साठलेल्या पाण्याचे प्रेशर त्यात भर घालते. उष्णतेमुळे पाणी  उकळून वाफ तयार होते व ती पाण्याला वर खेचते. अगदी सरफेसजवळ वाफेच्या खूप प्रेशरमुळे पाणी उंच उचलले जाते व हवेत उडते. प्रेशर कमी झाल्यावर इरप्शन थांबते. ओल्ड फेथफुल हा इथला सगळ्यात प्रेडिक्टेड गायझर. याचे कारण म्हणजे तो थोडा लांब आहे इतरांपासून म्हणून त्याच्या प्लंबिंग सिस्टीम मधे फारसा बदल होत नाही.
या एरिआत लहान मोठे आनेक गायजर्स आहेत. एकाच खडकातून निघाले तरी प्रत्येकाचे गुणधर्म वेगळे आहेत. स्टीमबोट सगळ्यात मोठा आहे. याची माहिती वाचून जर ते पाहिले तर जास्त मजा येइल. नुसते पाहिले तरी सुंदर आहेत.

हाँट वाँटर स्प्रिंग्ज   हे तयार होताना खाली प्लंबिंग सिस्टीम नसते. खालचे गरम पाणी वर व वरचे खाली असे कन्व्हेक्शन करंट मुळे पाणी उडते. याच्या बाँर्डरला मिनरल्स साठून लेस सारखा पँटर्न तयार होतो. पाणी जेवढे क्लिअर तेवढे जास्त गरम. या गरम पाण्यात वेगवेगळे बँक्टेरिआज, अल्गी वाढतात.  ते पाण्याला विविध रंग देतात. क्तिअर, पिवळा, केशरी, निळा, हिरवा असे मस्त रंग दिसतात.या मायक्रोआँरगँनिझम्स वर इतर प्राणी वाढतात व एक प्रकारची फूड चेन तयार होते.


ग्रँड प्रिझमँटिक स्प्रिंगचा हा एरिअल व्ह्यू. सगळ्यात मोठा स्प्रिंग. याचा फोटो काढायचा असेल तर बाजूच्या टेकडीवर जावे लागते. लांबचा ट्रेक आहे पण वरून छान दिसते. आम्ही पार्ट बाय पार्ट फोटो काठावरून काढले.रूंदी व खोली दोन्हीत याचा पहिला नंबर आहे.


  • मड पाँटस  ही या पार्कमधील अँसिडिक फिचर्स आहेत. जिथे पाणी कमी असते तिथे ही दिसून येतात. काही मायक्रोब्स हायड्रोजन सल्फाइड एनर्जी म्हणून वापरतात. ते या गँसचे विघटन करून सल्फ्युरिक अँसिड बनवतात. हे अँसिड कडेच्या खडकाचे रूपांतर मातीत करते. या अोल्या मातीतून बरेच गँसेस बाहेर पडतात त्यामुळे बुडबुडे  दिसतात. पाण्याचा साठा व हवामान यावर याची कन्सिस्टन्सी अवलंबून असते.
  • फ्युमारोल्स    जिथे पाणी कमी असते तिथे आतील उष्णतेमुळे त्या पाण्याची वाफ होते व ती बाहेर पडते. कधी कधी त्यातून आवाज येतो. जो एका डोंगरावर नीट ऐकता येतो. हिसिंग माउंटन वर तो ऐकता येतो.

या एरिआत आले की एकदम रहस्यमय वाटायला लागते. वाफ येत असते मधेच पाणी उडत असते. वेगवेगळे आवाज व वास यात असतात. डोळे, नाक कान सगळे बिझि असतात.

मँमथ हाँट स्प्रिंग्ज   - हे या पार्क मधले अजून एक थर्मल फिचर आहे. इथले खडक लाइम स्टोन या प्रकाराचे आहेत. पाणी वर येताना त्यात खूप विरघळलेले कँल्शिअम कार्बोनाट असते. वरती आल्यावर कार्बन डायआँक्साइड रिलिज होतो व कँल्शिअम कार्बोनाटचे थर साठतात.स्वच्छ पांढरे ट्रँव्हर्टाइन तयार होते इतके पांढरे की डोळ्याने नुसते बघताना त्रास होत होता. खडकावरून संथ व एका वेगात पाणी वहात असते.  जिथे उतार नसतो तिथे छोटे पूल तयार होउन त्यात पाणी साठते व मस्त निळसर पाणी दिसते. पांढरा पिवळा व केशरी रंग दिसतात. अर्थात हे रंग त्यात वाढणारे बँक्टेरिआ देतात. यातील काही टेरेसेस ड्राय दिसल्या पण इथे कधीही परत त्या लाइव्ह होतात त्यामुळे पुन्हा तुम्ही जाल तर वेगळे चित्र दिसते.  हे बदल यलोस्टोनमध्ये सगळीकडे दिसतात. जमिनीखोली जे बदल होतात, शेकडो छोटे  भूकंप होतात त्यामुळे पाण्याचा प्रवाह बदलतो व पाणी वेगळ्या पध्दतिने बाहेर पडते

इथल्या फायरहोल रिव्हर मध्ये  एवढे गरम पाणी व सिलिका मिसळते की ती थंडीत गोठत नाही.

काँटिनेंटल डिव्हइड- ही लाइन पाण्याच्या प्रवाहाची दिशा ठरवते. घराच्या कौलावर पडलेले पाणी जसे २ भागात वाहून जाते तसेच काँटिनेंटल डिव्हइड पाण्याची विभागणी करतो. ही लाइन डोंगरमाथे ठरवतात. यलोस्टोन मध्ये या डिव्हाइडच्या उत्तरेला पडलेला स्नो. पाउस हा झरे, नदी च्या रूपात अँटलँंटिक ओशन ला मिळतो तर साउथचे पाणी पँसिफिक ओशनला मिळते.  काही झरे असे आहेत की त्याचे पाणी दोन्हीकडे जाते कारण ते लाइन क्राँस करतात.

लाँगपोल  ठ्रीज - सध्या पार्कात या प्रकारची झाडे ८० टक्के आहेत. त्याच्या उंचीवरून हे नाव पडले आहे. वाटेत ठिकठिकाणी ही झाडे पडलेली दिसतात. ती न उचलता तशीच डिकंपोज होउ देतात. नवीन झाडे पण खूप दिसतात. त्याची लागवड रेंजर्स करत नाहीत तर नटक्रँकर नावाचे पक्षी करतात. ते आपल्या घशात डझनभर  पाइन कोन्स ठेवू
शकतात.उडताना वाटेत काही पडतात. हिवाळ्यासाठी हे कोन पक्षी जमिनीत लपवून ठेवतात. थंडीत त्यांना ते परत बरोबर सापडतात. त्यांनी खाउन जे उरतात त्यात नवी लागवड होते. अस्वले पण हा मेवा शोधून खातात. याशिवाय काही कोन्स झाडांना चिकटवल्यासारखे असतात. मेणासारख्या पदार्थाने ते चिकटलेले असतात. जंगलात जेव्हा आगी लागतात तेव्हा वरचे आवरण वितळते व ते बाहेर येतात.  किती योजनाबद्ध रीतीने लागवड होते पहा....

वन्यजीवन - या पार्क मध्ये माउंटन गोट, बायसन, कोल्हे, अस्वले, मूस, हरिणे दिसतात. आम्हाला अस्वल मात्र बघायला मिळाले नाही. त्यासाठी लमार व्हँलीत अगदी सकाळी किंवा अंधार पडताना जावे लागते.  अधूनमधून ट्रँफिक जँम करायला या प्राण्यांना आवडते.

ग्रँड कंनिय़न अाँफ यलोस्टोन
अनेको वर्षापूर्वी ज्वालामुखी व त्यानंतर ग्लेसिएशन या मुळे ही कँनिअन तयार झाली असे म्हणतात. वरेच पेंटर्स इथे जागोजागी तुम्हाला दिसताल. आर्टिस्ट पाँइंट मस्ट सी.  इथला खडक पिवळा दिसते. हा रंग सल्फरचा नसून आयर्न आँक्साइडचा आहे असे जिआँलाँजिस्ट म्हणतात. यावर अजून अभ्यास चालू आहे. या एरिआत अप्पर व लोअर फाँल्स आहेत दोन्हीही न चुकवावे असे. थोडे खाली उतरावे लागते दमछाक होते पण व्ह्यू जबरदस्त. लोआर फाँल पाशी २ छोटी ग्लेशिअर्स पण दिसतात. या सर्व ठिकाणांचे सौंदर्य कँमेरा वंदिस्त करू शकत नाही तेव्हा शक्य तितके डोळ्यात भरून घ्या व मनात साठवा.  पाण्याचा फोर्स व बाजूचा निसर्ग दोन्ही नजर खिळवणारा.

 पूर्वी पेंटर्सनी इथली चित्रे काढून काँंग्रेस मध्ये प्रेझेंट करून इथे पार्क करायचा आग्रह धरला होता. कलाकारांचे असेही योगदान महत्वाचे आहे.




पेट्रीफाइड  फाँरेस्ट पूर्वी या ठिकाणी वेगळ्या प्रकारची झाडे होती. आता जास्त करून लाँगपोल ट्ीज दिसतात. या गोष्टीचापुरावा हे फांरेस्ट देते. व्होल्कँनिक अँशखाली, चिखलाखाली बरेच वर्षापूर्वी ही झाडे गाडली गेली. अाँक्सिजनची कमतरता व झाडांनी शोषलेले सिलिका यामुळे या झाडांचे फाँसिल्स बनले. आता इरोजन मुळे जेव्हा वरचे लेअर्स निघाले तेव्हा ही झाडे दिसली व लाखो वर्षापूर्वींचा इतिहास डोळ्यापुढे आला. जवळपास १०० जाति इथे दिसल्या आहेत. याचा एक नमुना आम्ही मँमथ व्हिजिटर सेंटर च्या बाहेर पाहिला. आता कुंपण घालून ठेवले आहे कारण लोकांनी तुकडे पळवायला सुरूवात केली.



लेक मध्ये असे गरम  पाण्याचे गायझर्स दिसतात.
यलोस्टोन लेक हे लेक भूकंपाचा इफेक्ट ने बनलेले आहे. इतके मोठे आहे की त्याला समुद्र म्हणावे असे वाटते. पूर्ण फोटो काढणे अशक्य. समोर मस्त बर्फाच्छादित शिखरे दिसतात. पाण्याचा रंग सुंदर आहे. या लेक मध्ये बोटिंगची सोय आहे.


याच्या बाजूला वेस्ट थंब गायजर्स आहेत. वरती लेकचे गार पाणी व खाली गरम पाण्याचे झरे दिसतात. अगदी खोल हिरवे निळे पाण्याचे पूल इथे दिसतात.
रंग व पँटर्न्स

टाँवर फाँल
लाव्हाने बनलेले काँलम्स
लोअर फाँल विथ ग्लेशिअर

बायसन कळप
खोल स्प्रिंग वेस्ट थंब गायझर बेसिन
हिरवाई
फायरहोल धबधबा

बोर्डवाँकवरून दिसणारी वाफ













काही टिप्स....
  • शक्यतो वेस्ट साइडला हाँटेल चे बुकिंग करावे. आत मिळाले तर उत्तम पण ते वर्षभर आधी करावे लागते. शेवटच्या दिवशी टिटाँन बघून तिथे मुक्काम करावा . यात खूप कमी वेळात जास्त गोष्टी बघता येतात.
  • कधीही गेलात तरी थंडीचे कपडे न्यावेत. सतत बदलती हवा. टोपी, गाँगल, सन स्क्रीन मस्ट.
  • पिण्याचे पाणी जवळ ठेवावे, आत कमी मिळते.... तशी सोय आहे  पण ..
  • २-३ दिवस असतील तर पहिल्या दिवशी - ओल्ड फेथफूल, मिड वे व बिस्किट बेसिन सकाळी व कँनिअन व्हिलेज, दोन्ही वाँटरफाँल्स संध्याकाळी करावे.
  • दुसरा दिवस - मँमथ टेरेसेस, व्हिजिटर सेंटर सकाळी व लेक यलोस्टोन दुपारी करावे. वाटेत बरेच सिनिक स्टँप्स घेता येतात, वाँटरफाँल्स व वाइल्ड लाइफ बघता येते.
  • शेवटी टिटाँन पार्क.
  • हकलबेरी आइसक्रीम ची चव जरूर घ्या.
आम्ही व आमचे पाहुणे खाणे, पिणे व अनुभवणे एवढेच ३-४ दिवस करत होतो. जोडीला गाणीही होतीच. नंतर व्हिडिओ बघताना मस्त, वाँव, किती छान ही प्रत्यकाने दिलेली दाद पुनप्रत्यताचा आनंद देत होती.
इतके धगधगते ठिकाण असूनही, पूर्वी विनाशकारी भूकंप झालेले असूनही सध्या अनेक नयनरम्य गोष्टी आणि निसर्गाचे चमत्कार इथे अनुभवायला मिळतात. शक्य असेल तेव्हा या अदभूत सफरीचा अनुभव एकदा तरी प्रत्येकाने घ्यावाच.


ग्रँड टिटोँन पुढील भागात......

Wednesday, September 7, 2011

डोअर काउंटी - डेथ डोअर

डोअर काउंटी - डेथ डोअर



या लेबर डे ला विस्कांन्सिन मध्ये डोअर काउंटी ला गेलो होतो. विस्कांन्सिन मध्ये ग्रीन बे पासून एक बोटासारखा फाटा लेक मिशिगन मध्ये गेला आहे, डावीकडे ग्रीन बे, स्टर्जन बे असे २-४ बे आहेत. वाँशिंग्टन आयलंड पाशी हे सगळे लेक मिशिगन ला मिळतात. इथे पाण्याचा करंट जास्त असल्याने पूर्वी इथे जहाजे बुडत व या ठिकाणाला डेथ डोअर असे म्हणत.  यावर उपाय म्हणून बरीच लाईट हाउसेस बांधली गेली व हा प्रकार थांबला.

या एरिआत खूप प्रायव्हेट प्रीँपर्टीज आहेत. बरीच घरे रहाण्यासाठी भाड्याने देतात.  दरवर्षी येणारे लोक खूप आहेत. अगदी पाण्याच्या जवळ घरे आहेत. बोटी, कयाक, मोटरबोट, सेल बोट, फिशिंग बोट भरपूर दिसतात. ५-६ स्टेट पार्कस असल्याने हायकिंग, बायकिंग याचे बरेच ट्रेल्स आहेत. झाडी अगदी पाण्यापर्यंत आहे त्यामुळे निळा व हिरवा या रंगांच्या खूप छटा दिसतात. हायकिंग करताना बरेचदा एकीकडे पाणी व एकीकडे झाडी त्यामुळे मस्त वाटते.  पेनिन्सुला स्टेटपार्क मध्ये आम्ही २ तास हायकिंग केले.  यात एका बाजुला पाणी व एका बाजूला हिल आहे. हवा पण मस्त होती. भरपूर हिरवी झाडी व निळेशार पाणी .. डोळे एकदम तृप्त होतात. वाटेत उंच क्लिफ्स लागतात. यातूनच
क्लिफ्स
पूर्वी एक दगडाची खाण काढली होती पण ती आता बंद केली आहे.


हे क्लिफ्स Niagara escarpment चा भाग आहेत. (साधारण  नायागारा पासून इलिनांय पर्यंत हे खडक पसरलेले आहेत). त्याचे फार इरोजन होत नाही. त्यामुळे बरीच झाडे व इको सिस्टीम जपली गेली आहे.  या खडकांचा काही भाग पाण्याखाली पण आहे.  या खडकामुळे या एरिआत बरेच धबधबे दिसतात.  या सगळ्या गोष्टी पुस्तकात वाचण्यापेक्षा अशा प्रत्यक्ष पाहून छान वाटतात.
फिश बाँईल - ही जागा लेक च्या काठी असल्याने फिश भरपूर.  पूर्वापार चालत आलेली यांची ही एक खाण्याची परंपरा आज बिझिनेस मध्ये बदलली आहे. कांदे बटाटे व व्हाईट फिश एका मागोमाग मोठ्या भांड्यात उकळतात. १० मि त फिश तयार होतो व त्यातील चरबी बाहेर यायला लागते. या नंतर केरोसिन जाळात ओततात, त्यामुळे एकदम टेंपरेचर वाढते व सगळी फँट बाहेर येते. या साठी व्हाईट फिश वापरला जातो. हा ४० डिग्री तापमान आवडणारा फिश आहे त्यामुळे तो उन्हाळ्यात खूप खोल पाण्यात जातो. काटेही भरपूर असतात. ही जी काही फँट निघून जाते त्याची भरपाई वरून भरपूर बटर घालून करतात.  नंतर चेरी पाय ची स्वीट डिश असतेच.

सेल बोट - इथे सेल बोटी खूप दिसतात. बरेच लोक हा धंदा करतात. सुरूवातीला मोटर वर पाण्याच्या आत साधारण १५-२० मिनिटे घेउन जातात. मग मोटर बंद करून शिडे उभारतात. वारा जसा असेल त्याप्रमाणे शीड हलवतात. हा अनुभव खूप छान होता. नुसता वारा किती जोरात बोट नेउ शकतो याचा अनुभव घेता आला. कँप्टन पण छान होता. हे सगळे प्रकरण एरो डायनँमिक्स च्या तत्वावर चालते. शिडाचा वापर विमानाच्या पंख्यासारखा होतो. खूप वारा असला तर त्या नुसार शिड खाली वर करता येते.  काही वेळा बोट इतकी तिरकी होते की भिती वाटते पण खाली ८००० पाउंडाचे किल लावलेले असल्याने बोट उलटायचा चान्स कमी असतो. मला त्या कँप्टन ने सांगेपर्यंत कल्पनाही नव्हती की खाली एवढे वजन लावले आहे.  हा सगळा अनुभव घेतल्यावर पुन्हा एकदा आपल्या पूर्वजांचे कौतुक वाटल्याशिवाय रहात नाही. त्याकाळी विशेष साधने नसताना लोक किती धाडसाने समुद्र सफरी करायचे.

चेरी स्पेशल - डोअर काउंटी मध्ये चेरी भरपूर होतात. त्याचे सगळे प्रकार पाय, जँम, सालसा व वाईन बनवतात. त्या नंतर सफरतंदाचा सिझन असतो. या प्रदेशात चीजही भरपूर बनते.  या सगळ्या बागांच्या टूर्स अरेंज करतात व तुम्हाला जवळून सगळ्या गोष्टी बघता येतात.  सगळाकडे लोकल बिझनेसेस ला वाव दिला आहे त्यामुळे नेहमीच्या चेन्स दिसत नाहीत.  लोक छान फ्रेंडली होते इथले.

डोअर काउंटी ला झाडी भरपूर असल्याने फांल कलर्स अर्थातच सुंदर असतात. पाणी, कडेने झाडी व थोडेसे डोंगर यामुळे फाँल ला इथे गर्दी असते. वाँशिंग्टन आयलंडला फेरी ने जाता येते. ते एकदम टोकाला आहे. तिथून ३६० व्ह्यू मस्त दिसतो. ३-४ ठिकाणी रात्री  नाटकांचे शो होतात.

एकंदरीत डोअर काउंटी चा अनुभव छान होता....

Thursday, June 23, 2011

चौथा कोपरा....

चौथा कोपरा..

अमेरिकेत आल्यापासून निसर्गाची वेगवेगळी रूपे बघितली. गेल्या आठवड्यात ् व्हरमोँंट ला मुलीच्या ग्रँज्युएशन
ला गेलो होतो. तिथून yetana अकेडिया पार्क ला भेट दिली. हे पार्क मेन मध्ये आहे. तिथे गेल्यावर लक्षात आले की याआधी तीन कोपरे बघितले आणि आता हा चौथा कोपरा. अलास्काचे ग्लेशिअर्स, हवाई चा ज्वालामुखी आणि प्रशांत महासागर, वेस्ट चे सुंदर निळे पाणी आणि गल्फ आंफ मेक्सिको शेवटी आता बार हार्बर वरून एटलांटिक चे ँ. प्रत्येक ठिकाणचे सौंदर्य वेगळे निसर्ग वेगळा - अर्थात चारीही कोपरे आपल्या जागी सुंदर

बार हार्बर मध्ये अकेडिया पार्क आहे. ही जागा खूप मोठी नाही पण छान आहे. भरपूर हायकिंग ट्रेल्स, लूप रोड, कँडिलँक माउंटन आणि फिश ईंडस्ट्री ही इथली वैशिष्ट्ये. पूर्वी याला माउंट डेझर्ट म्हणत कारण पहिल्यांदा जे लोक आले त्यांना एकदम ओसाड भाग वाटला, झाडे दिसली नाहीत. सुरूवातीला फ्रेंच लोक इथे जास्त आले. त्यातील एकाने आपले नाव या डोंगराला दिले. या भागात रांकफेलर, जे पी मांर्गन यांची भरपूर इस्टेट आहे. मोठे मँन्शन्स आहेत.







जाताना मस्त झाडीने भरलेला रस्ता आहे. दोन्ही बाजूना झाडांच्या भिंती उभ्या आहेत असे वाटते.









इथला पिंक ग्रँनाइट प्रसिद्ध आहे. सुरूवातीला आर्टिस्ट या जागेच्या प्रेमात पडले..त्यांनी इथली चित्रे काढून लोकांना दाखवली व हळूहळू लोक इकडे येउ लागले - साघारण १८०० चा सुमार. हे क्लिफ्स मस्त दिसतात. सन सेट च्या वाळेस रंग अजून सुंदर दिसतात. हा फोटो थंडर होल चा आहे. इथे पाणी खडकात बरेच आत घुसते व पूर्ण भरल्यावर जोरात बाहेर येते. ४० फूचापर्यंत वर पाणी उडते. इथे धुके, मिस्ट व थोडा पाउस अधून मधून आसतोच. नसेल तेव्हा पाणी मस्त निळे दिसते.




कँडिलँक माउंटन १५०० फूट उंच आहे. त्यावर हाइक करता येते किंवा वरपर्यंत गाडीने जाता येते. व्हिजिबिलिटी नसेल तर वर जाण्यात अर्थ नाही..वरून काही दिसणार नाही. वर्षातले काही दिवस इथे सूर्यकिरणे सगळ्यात आधी पडतात म्हणून सनराइज बघण्याचे महत्व. खालती बेटे,अथांग समुद्र व छोटी बेटे छान दिसतात. रस्ता छान आहे. वरती एक छोटा ट्रेल आहे. वाटेत १-२ लेक्स दिसतात. पूर्वी जे फ्रेंच सेटलर्स आले त्यातल्या एकाने आपले नाव या डोंगराला दिले. कँडिलँक गाडीच्या एम्ब्लेम मद्ये जे शिल्ड दिसते ता या फ्रेंच लोकांच्या लढाईचा आठवण म्हणून आहे.




इथे लोँबस्टरचा मोठा व्यवसाय चालतो. लोकांना कोटा दिलेला असतो. त्यावर भांडणेही होतात. पकडलेल्या तील ठराविक फिश च वापरता येतात बाकीचे परत टाकावे लागतात.
फिश खाणारे इथे खूष होतात.
गुड कोलेस्टरोँल देणारा फिश म्हणून खूप डिमांड असते. त्याबरोबर क्रँब ही भरपूर मिळतो. इतर फिश ही मिळतात.







मेन हे स्टेट लाइट हाउस साठी प्रसिद्ध आहे. या पार्क मघ्ये एक टूर आहे ते बरीच लाइट हाउस दाखवतात. बास हार्बर इथले लाईट हाउस मात्र जवळून बघता येते. ते साउथ वेस्ट साइड ला आहे. त्याच्या बाजूला बरेच पिंक ग्रँनाइट चे खडक आहेत. समोर अथांग सागर. खूप छान दिसते. पाण्यात मोठ्या बेल्स लावलेल्या आहेत. धुक्यामुळे कधी कधी लाईट दिसत नाही तेव्हा या बेल्स चा उपयोग होतो.

बोट टूर मध्ये ५-६ लाईट हाउस दिसतात. ती बोटीतून बघावी लागतात.















सुटीचे ३-४ दिवस घालवायला छान जागा आहे. हाइक साठी वेळ जरूर ठेवा. कयाक, कनू व बोटिंग पण करायची सोय आहे. गाईडेड टूर घेतल्यास माहिती छान देतात.
(फोटो क्तिक केल्यास मोठे बघता येतील)

Monday, September 13, 2010

मन हे लाल रंगी रंगले.....कॆनिअन टूर


गेल्या आठवड्यात ३ दिवसांची सुट्टी होती तेव्हा ब्राईस व झायाॆन कॆनियन्स ही युटातील दोन स्टेट पार्क्स पाहिली व त्याबरोबर लेक पोॆवेल आणि अॆंटेलोप कॆनियन्स ही अरिझोनातील ठिकाणेही पाहिली. या सर्व जागा फार सुंदर आहेत. वारा आणि पाणी यांचा सॆंडस्टोन वर परिणाम होउन सुंदर फोॆरमेशन्स तयार झाली आहेत. बरेच डोंगर लाल केशरी दिसतात. सूर्याप्रकाशानुसार ते रंग बदलतात. साहजिकच परतीच्या प्रवासात डोळ्यासमोर हेच रंग दिसत होते आणि मन हे लाल रंगी रंगले..अशी अवस्था झाली

फोटो मोठे बघण्यासाठी त्यावर क्लिक करा....
.
आमच्याकडे ३ दिवस होते तेवढ्यात ही ३ पार्कस करायचे ठरवले. एल ए, aagate इलिनाॆय अशा तीन ठिकाणाहून आम्ही लास वेगास ला पोचलो. सुटी असल्याने उशीरा पोचलो. गाडी रेंट करून रात्री निघालो. लास वेगास मघ्ये उतरताना व रस्त्यावर लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया दिसत होती. ३ तासाने झायाॆन पार्क जवळ पोचलो. मग जी पी एस च्या सौजन्याने रस्ता चुकला.

१२-
१३ मैल एकाकी रस्त्याने गेल्यावर परत फिरलो कारण एकदम एकाकी भाग होता. मग मागे येउन विचारले आणि शेवटी २ ३० ला पोचलो. तशी थोडी भिती वाटत होती कारण रस्ता एकदम सुनसान. या सगळ्या प्रकारात बाहेर चांदणे फार छान दिसत होते. आकाशातून चांदण्या आपल्या अंगावर झेपावत आहेत असे वाटत होते. आकाशात इतके ग्रह तारे दिसत होते की बस. चांदण्यांनी इतके भरलेले आकाश पहिल्यांदाच पाहिले...थॆंकस टू चुकीचा नकाशा...वाईटातून चांगले निघते ते असे. मग ३-४ तास झोप काढली व उठलो. आमच्या बरोबर कोलोरॆडोहून आलेले अजून एक जण होते. थोड्या गप्पा, खाणे करून निघालो.

आमचा झायाॆन नॆरोज चा ट्रेक करायचा ठरले. पूर्व तयारी म्हणून स्पेशल शूज, मोजे काठी घेतले. तिथे एक माहितीपटही दाखवला. तोवर सगळे भुकेजले होते मग ब्रंच करून निघालो. स्प्रिंगडेल या गावात छान छोटी दुकाने आहेत. या पार्क मध्ये आत शटल ठेवली आहे. गाड्यांना बंदी आहे. त्यामुळे पोल्युशन कमी. शटल ने जाताना मस्त डोंगर दोन्ही बाजूंना दिसतात...बरेच लाल रंगाचे आहेत. १००० ते २००० फूटा पर्यंत आहेत. पूर्वी इथे नेटिव्ह इंडियन्स रहात त्यांच्या बर्याच गोष्टी गाईड सांगत होता. शेवटच्या स्टांप पासून १ मैलावर हा ट्रेक सुरू होतो. इथले क्लिफ्स - डोंगर पाण्यामुळे कापले गेले . दोन्ही बाजूला उंच कपारी व मध्ये पाणी. खाली गोटे..माती...पाण्याला ओढ बरीच ..त्यामुळे बरीच कसरत करत जावे लागते. काठीचा खूप उपयोग होतो. प्रत्येक वळणावर वेगळे रंग दिसतात . उन्हामुळे क्लिफ्स चे रंग सुंदर दिसतात. ७५ टक्के पाण्यात व थोडे कडेने चालता येते. २ एक मैल गेल्यावर हे कडे एकदम जवळ .ेतात. फक्त २० फूट अंतर रहाते. गर्दी भरपूर पण मंडळी मजेत जातात. लहान मुले खूप भरभर जातात. कुठेही धक्काबुक्की नाही लहान
मोठे सगळे चालत होते. मला वारीची आठवण झाली. आम्ही २ तासानी परत फिरलो. खूप दमलो पण मजा आली. एक वेगळा अनुभव मिळाला.


सतरंगी
लखलख चंदेरी

मधे असे छान स्टाॆप्स











याच पार्क मध्ये अजून बरेच ट्रेकस आहेत. त्यातील ऎंजल्स लॆंडिंग हा प्रसिद्ध आहे. १००० - १२०० फूट कडा चढायचे आव्हान आहे. अगदी शेवटी चेन्स लावल्या आहेत. खूप मंडळी वरपर्यंत जातात. याच्या वाटेत झाडी, सावली अजिबात नाही. काही ठिकाणी अगदी चढी चढण आहे पण मला वाटते मनुष्याला चॆलेंज ची आवड असतेच. वाॆल्टर नावाच्या इंजिनिअरने २१ स्विचबॆक्स बांधले आहेत. त्या वेळेस धोड्यांना चढायला सोपे पडावे म्हणून हे बांधले. वरून मस्त व्ह्यू दिसतो. हा ट्रेक पुढच्या वेळेस करायचे ठरले.













उभा कडा व त्यावर जातानाचा काही भाग....



यानंतर नेक्स्ट प्लान होता पेज या गावाला जायचा. जाताना बराच धाट लागतो. रस्त्याचे काम चालू होते त्यमुळे थांबत थांबत जावे लागत होते त्याचा एक फायदा झाला वाटेत मस्त सिनरी होती ती बघत बघत पुढे जाता आले. वारा पाणी आणि ग्रॆव्हिटी यामुळे झालेले इरोजन बघता ये होते. दिशा व फोर्स यानुसार डोंगरावर वेगवेगळे पॆटर्न्स तयार झाले आहेत. काही गुळगुळात, काहीवर चौकोन काहीवर रेघा तर काही वर लेअर्स. एकंदरीत डोळ्यांना मेजवानी होती.

पेज हे गाव साधारण १९५७ च्या सुमारास अस्तित्वात आले. इथे लेक पोॆवेल आहे त्याच्यावर एक धरण आहे. जवळच ५-६ मैलावर एॆंटेलोप कॆनिअन्स आहेत. त्याचे अप्पर व लोअर असे दोन प्रकार आहेत. आम्ही लोअर मध्ये गेलो. ही जागा इंडिअन रिझर्व्हेशन वर आहे त्यामुळे त्यांचा गाईड घ्यावा लागतो. जमिनीलापावसानंतर इथे फ्लॆशफ्लड हा प्रकार होतो . जमिनीला एके ठिकाणी मोठी भेग पडली आहे. त्यातून पावसाचे पाणी वेगाने आत घुसते. ते गोल गोल फिरत पुढे जाते आणि त्यामुळे आत स्वर्ल्स तयार झाले आहेत, कुंभार जसे लाल माठ बनवतो तसा हा रंग दिसतो. आतला रस्ता आगदी अरूंद आहे. काही ठिकाणी शिड्या लावल्या आहेत पण एकंदर कसरत करावी लागते. अप्पर कॆनिअन्स एवढे अवघड नाहीत. इथे भरपूर फोटोग्राफर्स होते. वरून येणारा प्रकाश परिवर्तन होउन वेगवेगळे रंग दिसतात. डोळ्यांना वेगळे रंग दिसतात आणि फोटो फार वेगळे दिसतात.




आत जायचा रस्ता














दिसणारा रंग

















कॆमेरा दाखवतो ते रंग





त्या नंतर लेक पोॆवेल वर बोट राईड घेतली. पाण्याचा रंग एकदस निळाशार होता. बोट बरीच आत घेउन जातात. अगदी कडेच्या क्लिफ्स ना लागेल असे वाटते. ह्या लेकची लांबी वेस्ट कोस्ट लांबीहून जास्त आहे म्हणे. आयजेनहोवर च्या काळात ते बांधले. या लेकमुळे एल ए यांना पाणी मिळते



















संध्याकाळी वाटेवर (साउथ ८९) होॆर्स शू बेंड बघायला गेलो. थोडा उशीर झाला होता त्यामुळे जरा पळापळ झाली पण इट वोॆज अमेझिंग. कोलोरॆडो नदी वहाताना बाजूचे इरोजन जोस्त झाले त्यामुळेअसा शेप तयार होतो. ही बेट तयार होण्यापूर्वीची स्थिती. अजून काही वर्षांनी इथे बेट तयार होईल.इथे पूर्ण फोटो काढायला वाईड अॆंगल लेन्स लागते.







शेवटच्ा दिवस होता ब्राईस कॆनियन चा. इथे बरेच गार होते. शटलची सोय इथेही होतीच. सुरूवातीला आम्ही रिम वरून चक्कर मारली. वरून मस्त नजारा दिसत होता. इथे गुलाबी, केशरी रंग जास्त होता. आपल्याला क्लिफ्स जवळून बघण्यासाठी खाली उतरावे लागते. फार पूर्वी इथे पाणी होते. त्यानंतर अनेको (मिलिअन्स) वर्षानी बदल होत होत हे खडकांचे पुतळ्यासारखे गिसणारे आकार तयार झाले. गुलाबी, केशरी, पांढरा, काळा हे रंग दिसतात. सूर्य प्रकाश जसा बदलेल तसे हे रंग छटा बदलतात.
आपण जसे बघू तसे आकार शोधत बसतो. या आकारांना हुडुज म्हणतात. पाणी पावसाचे आणि बर्फाचे या खडकात फटीत साठते. टेम्परेचर डिफरन्स खूप असल्याने रात्री बर्फ व दिवसा पाणी आसे चक्र चालू असते. त्यामुळे इरोजन होते. वरचा थर कडक असतो तो तसाच रहातो व शेवटी खालचा भाग कमकुवत झाल्यावर पडतो. मघूनच रंगीत वाळूचे लेअर्स खूप छान दिसतात. रांगोळी आहे असे वाटते.











तिथे एक रेंजर चे प्रेझेंटेशन ऐकले. खूप छान माहिती सांगितली. ग्रॆंड कॆनिअन पासून ब्राईस पर्यंत ५ भाग पडताच. चाॆकलेटी,व्हर्मिलिओॆन,पांढरा,राखी,व गुलाबी असे वेगवेगळे रंग दिसतात. प्रत्येक भागातले खडक वेगळे, इरोजन चा रेट वेगळा, त्यात सापडणारे प्राणी वेगळे...हा साधारण ६००० फूटाचा भाग ५ स्टेप्स सध्ये डिव्हाईडेड आहे. याला ग्रॆंड स्टेअरकेस म्हणतात. यावर बराच अभ्यास केलेला आहे लोकांनी.

एकंदर हे २-३ दिवस डोळे भरून निसर्ग बघितला, लाल रंगाच्या मोहात पडलो. मनसोक्त चांदणे पाहिले. काही ठिकाणी परत जायचे ठरले.

मन हे लाल रंगी रंगले..........


Wednesday, September 8, 2010

मन हे लाल रंगी रंगले...(Zion Bryce Lake Powell)


गेल्या आठवड्यात ३ दिवसांची सुट्टी होती तेव्हा ब्राईस व झायाॆन कॆनियन्स ही युटातील दोन स्टेट पार्क्स पाहिली व त्याबरोबर लेक पोॆवेल आणि अॆंटेलोप कॆनियन्स ही अरिझोनातील ठिकाणेही पाहिली. या सर्व जागा फार सुंदर आहेत. वारा आणि पाणी यांचा सॆंडस्टोन वर परिणाम होउन सुंदर फोॆरमेशन्स तयार झाली आहेत. बरेच डोंगर लाल केशरी दिसतात. सूर्याप्रकाशानुसार ते रंग बदलतात. साहजिकच परतीच्या प्रवासात डोळ्यासमोर हेच रंग दिसत होते आणि मन हे लाल रंगी रंगले..अशी अवस्था झाली

फोटो मोठे बघण्यासाठी त्यावर क्लिक करा....
.
आमच्याकडे ३ दिवस होते तेवढ्यात ही ३ पार्कस करायचे ठरवले. एल ए, aagate इलिनाॆय अशा तीन ठिकाणाहून आम्ही लास वेगास ला पोचलो. सुटी असल्याने उशीरा पोचलो. गाडी रेंट करून रात्री निघालो. लास वेगास मघ्ये उतरताना व रस्त्यावर लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया दिसत होती. ३ तासाने झायाॆन पार्क जवळ पोचलो. मग जी पी एस च्या सौजन्याने रस्ता
चुकला
.
१२
-१३ yaa yekethatyaa रस्त्याने गेल्यावर परत फिरलो कारण एकदम एकाकी भाग होता. मग मागे येउन विचारले आणि शेवटी २ ३० ला पोचलो. तशी थोडी भिती वाटत होती कारण रस्ता एकदम सुनसान. या सगळ्या प्रकारात बाहेर चांदणे फार छान दिसत होते. आकाशातून चांदण्या आपल्या अंगावर झेपावत आहेत असे वाटत होते. आकाशात इतके ग्रह तारे दिसत होते की बस. चांदण्यांनी इतके भरलेले आकाश पहिल्यांदाच पाहिले...थॆंकस टू चुकीचा नकाशा...वाईटातून चांगले निघते ते असे. मग ३-४ तास झोप काढली व उठलो. आमच्या बरोबर कोलोरॆडोहून आलेले अजून एक जण होते. थोड्या गप्पा, खाणे करून निघालो.

आमचा झायाॆन नॆरोज चा ट्रेक करायचा ठरले. पूर्व तयारी म्हणून स्पेशल शूज, मोजे काठी घेतले. तिथे एक माहितीपटही दाखवला. तोवर सगळे भुकेजले होते मग ब्रंच करून निघालो. स्प्रिंगडेल या गावात छान छोटी दुकाने आहेत. या पार्क मध्ये आत शटल ठेवली आहे. गाड्यांना बंदी आहे. त्यामुळे पोल्युशन कमी. शटल ने जाताना मस्त डोंगर दोन्ही बाजूंना दिसतात...बरेच लाल रंगाचे आहेत. १००० ते २००० फूटा पर्यंत आहेत. पूर्वी इथे नेटिव्ह इंडियन्स रहात त्यांच्या बर्याच गोष्टी गाईड सांगत होता. शेवटच्या स्टांप पासून १ मैलावर हा ट्रेक सुरू होतो. इथले क्लिफ्स - डोंगर पाण्यामुळे कापले गेले . दोन्ही बाजूला उंच कपारी व मध्ये पाणी. खाली गोटे..माती...पाण्याला ओढ बरीच ..त्यामुळे बरीच कसरत करत जावे लागते. काठीचा खूप उपयोग होतो. प्रत्येक वळणावर वेगळे रंग दिसतात . उन्हामुळे क्लिफ्स चे रंग सुंदर दिसतात. ७५ टक्के पाण्यात व थोडे कडेने चालता येते. २ एक मैल गेल्यावर हे कडे एकदम जवळ .ेतात. फक्त २० फूट अंतर रहाते. गर्दी भरपूर पण मंडळी मजेत जातात. लहान मुले खूप भरभर जातात. कुठेही धक्काबुक्की नाही लहान (४
) मोठे सगळे चालत होते. मला वारीची आठवण झाली. आम्ही २ तासानी परत फिरलो. खूप दमलो पण मजा आली. एक वेगळा अनुभव मिळाला.


सतरंगी
लखलख चंदेरी

मधे असे छान स्टाॆप्स











याच पार्क मध्ये अजून बरेच ट्रेकस आहेत. त्यातील ऎंजल्स लॆंडिंग हा प्रसिद्ध आहे. १००० - १२०० फूट कडा चढायचे आव्हान आहे. अगदी शेवटी चेन्स लावल्या आहेत. खूप मंडळी वरपर्यंत जातात. याच्या वाटेत झाडी, सावली अजिबात नाही. काही ठिकाणी अगदी चढी चढण आहे पण मला वाटते मनुष्याला चॆलेंज ची आवड असतेच. वाॆल्टर नावाच्या इंजिनिअरने २१ स्विचबॆक्स बांधले आहेत. त्या वेळेस धोड्यांना चढायला सोपे पडावे म्हणून हे बांधले. वरून मस्त व्ह्यू दिसतो. हा ट्रेक पुढच्या वेळेस करायचे ठरले.













उभा कडा व त्यावर जातानाचा काही भाग....



यानंतर नेक्स्ट प्लान होता पेज या गावाला जायचा. जाताना बराच धाट लागतो. रस्त्याचे काम चालू होते त्यमुळे थांबत थांबत जावे लागत होते त्याचा एक फायदा झाला वाटेत मस्त सिनरी होती ती बघत बघत पुढे जाता आले. वारा पाणी आणि ग्रॆव्हिटी यामुळे झालेले इरोजन बघता ये होते. दिशा व फोर्स यानुसार डोंगरावर वेगवेगळे पॆटर्न्स तयार झाले आहेत. काही गुळगुळात, काहीवर चौकोन काहीवर रेघा तर काही वर लेअर्स. एकंदरीत डोळ्यांना मेजवानी होती.

पेज हे गाव साधारण १९५७ च्या सुमारास अस्तित्वात आले. इथे लेक पोॆवेल आहे त्याच्यावर एक धरण आहे. जवळच ५-६ मैलावर एॆंटेलोप कॆनिअन्स आहेत. त्याचे अप्पर व लोअर असे दोन प्रकार आहेत. आम्ही लोअर मध्ये गेलो. ही जागा इंडिअन रिझर्व्हेशन वर आहे त्यामुळे त्यांचा गाईड घ्यावा लागतो. जमिनीलापावसानंतर इथे उ्लॆशफ्लड हा प्रकार होतो . जमिनीला एके ठिकाणी मोठी भेग पडली आहे. त्यातून पावसाचे पाणी वेगाने आत घुसते. ते गोल गोल फिरत पुढे जाते आणि त्यामुळे आत स्वर्ल्स तयार झाले आहेत, कुंभार जसे लाल माठ बनवतो तसा हा रंग दिसतो. आतला रस्ता आगदी अरूंद आहे. काही ठिकाणी शिड्या लावल्या आहेत पण एकंदर कसरत करावी लागते. अप्पर कॆनिअन्स एवढे अवघड नाहीत. इथे भरपूर फोटोग्राफर्स होते. वरून येणारा प्रकाश परिवर्तन होउन वेगवेगळे रंग दिसतात. डोळ्यांना वेगळे रंग दिसतात आणि फोटो फार वेगळे दिसतात.




आत जायचा रस्ता














दिसणारा रंग

















कॆमेरा दाखवतो ते रंग





त्या नंतर लेक पोॆवेल वर बोट राईड घेतली. पाण्याचा रंग एकदस निळाशार होता. बोट बरीच आत घेउन जातात. अगदी कडेच्या क्लिफ्स ना लागेल असे वाटते. ह्या लेकची लांबी वेस्ट कोस्ट लांबीहून जास्त आहे म्हणे. आयजेनहोवर च्या काळात ते बांधले. या लेकमुळे एल ए यांना पाणी मिळते



















संध्याकाळी वाटेवर साउथ ८९ होॆर्स शू बेंड बघायला गेलो. थोडा उशीर झाला होता त्यामुळे जरा पळापळ झाली पण इट वोॆज अमेझिंग. कोलोरॆडो नदी वहाताना बाजूचे इरोजन जोस्त झाले त्यामुळेअसा शेप तयार होतो. ही बेट तयार होण्यापूर्वीची स्थिती. अजून काही वर्षांनी इथे बेट तयार होईल.इथे पूर्ण फोटो काढायला वाईड अॆंगल लेन्स लागते.







शेवटच्ा दिवस होता ब्राईस कॆनियन चा. इथे बरेच गार होते. शटलची सोय इथेही होतीच. सुरूवातीला आम्ही रिम वरून चक्कर मारली. वरून मस्त नजारा दिसत होता. इथे गुलाबी, केशरी रंग जास्त होता. आपल्याला क्लिफ्स जवळून बघण्यासाठी खाली उतरावे लागते. फार पूर्वी इथे पाणी होते. त्यानंतर अनेको (मिलिअन्स) वर्षानी बदल होत होत हे खडकांचे पुतळ्यासारखे गिसणारे आकार तयार झाले. गुलाबी, केशरी, पांढरा, काळा हे रंग दिसतात. सूर्य प्रकाश जसा बदलेल तसे हे रंग छटा बदलतात.
आपण जसे बघू तसे आकार शोधत बसतो. या आकारांना हुडुज म्हणतात. पाणी पावसाचे आणि बर्फाचे या खडकात फटीत साठते. टेम्परेचर डिफरन्स खूप असल्याने रात्री बर्फ व दिवसा पाणी आसे चक्र चालू असते. त्यामुळे इरोजन होते. वरचा थर कडक असतो तो तसाच रहातो व शेवटी खालचा भाग कमकुवत झाल्यावर पडतो. मघूनच रंगीत वाळूचे लेअर्स खूप छान दिसतात.













तिथे एक रेंजर चे प्रेझेंटेशन ऐकले. खूप छान माहिती सांगितली. ग्रॆंड कॆनिअन पासून ब्राईस पर्यंत ५ भाग पडताच. चाॆकलेटी,व्हर्मिलिओॆन,पांढरा,राखी,व गुलाबी असे वेगवेगळे रंग दिसतात. प्रत्येक भागातले खडक वेगळे, इरोजन चा रेट वेगळा, त्यात सापडणारे प्राणी वेगळे...हा साधारण ६००० फूटाचा भाग ५ स्टेप्स सध्ये डिव्हाईडेड आहे. याला ग्रॆंड स्टेअरकेस म्हणतात. यावर बराच अभ्यास केलेला आहे लोकांनी.

एकंदर हे २-३ दिवस डोळे भरून निसर्ग बघितला, लाल रंगाच्या मोहात पडलो. मनसोक्त चांदणे पाहिले. काही ठिकाणी परत जायचे ठरले.

मन हे लाल रंगी रंगले..........