Showing posts with label विचार. Show all posts
Showing posts with label विचार. Show all posts

Friday, March 17, 2017

पुराणातील देव देवता ....एक सफर

मी काही फार देवदेव करणारी नाही पण त्या एका शक्तीवर विश्वास जरूर आहे. या साऱ्या विश्वाचा पसारा पाहिला की आपण त्या शक्तीला नक्कीच मानतो.

लहानपणापासून अनेक देव देवता आपल्याला भेटतात काही घरात, काही गावात तर काही पुस्तकात. आपण अनेक गोष्टी ऐकत आपली मते बनवतो.जसे आपण मोठे होतो तसे काय खरे काय खोटे याचा आपण विचार करायला लागतो. हल्लीच देवदत्त पटनाईक यांची काही पुस्तके आणि भाषणे ऐकली व काही गोष्टींचे संदर्भ लागत गेले.  सध्या त्यांच्या चालू असलेल्या फेसबुक वरच्या कार्यक्रमावर आधारित......

वेदात वर्णन केलेले देव हे जास्त निसर्गातले होते त्या नंतर सामान्य लोकांपर्यंत ज्ञान पोचवण्यासाठी पुराणे व इतर गोष्टींची निर्मिती झाली. तेव्हा अनेक प्रथा पद्धति व चिन्हे ...सिंबाॅल्स ची कल्पना उदयाला आली व या गोष्टी पिढी दर पिढी आजपर्यंत पोचल्या.वेदातले ज्ञान हे पाठांतराने एका पिढीतून दुसरीकडे जात होते. छंद मात्रा यात ते गायले जात असे. नंकर पुराणांचे लेखन झाले त्यानंतर काही वर्षांनी कॅलेंडर आर्ट निघाली. एक चित्र अनेक शब्दांचे प्रतिक असते आणि सामान्य माणसापर्यंत पोचते म्हणून भित्तीचित्रे देवळातील मूर्ती यांचा उदय झाला. नंतर कॅलेंडर व त्यावरील देवदेवतांची चित्रे सर्व जातीधर्मांच्या घरात पोचली.

हिंदू धर्मात एवढे देव आहेत.प्रत्येक देव हा एक विचार असतो. अनेक विचारांनी मिळून बनलेली ही समृद्ध परंपरा आहे. स्थल, कालानुसार यात बदल होतात. म्हणून एक देव विविध रूपात दिसत.

गाया मदर गाॅड मातृ देवता ही कल्पना सगळ्या कल्चर मध्ये आहे. आई ही जन्म देते म्हणून तिला जास्त महत्व दिले जाते. पृथ्वी ला माता म्हणून खूप संस्कृती मानतात. आकाश हे पिता स्वरूपात बधितले जाते. वेदात निसर्गाला खूप महत्व दिले आहे. सुरूवातीला भूमाता मग अनेक देवांची उत्पत्ती, त्यानंतर पुन्हा एक ईश्वर वाद असे साधारण चक्र आहे. इतर धर्मा मध्ये स्त्री देवता फार कमी दिसतात. हिंदू धर्मात बऱ्याच रूपात पूजल्या जातात. सप्तमातृका या पाषाणयुगाच्या आधीपासून सापडतात. पुराणात आणि वेगवेगळ्या काळात वेगळ्या आख्यायिका सापडतात. कधी त्या देवाचे शक्तीरूप म्हणून समोर येतात तर कधी देवांच्या मदतनीस म्हणून. नेहेमी समूहात असतात आणि रक्षणकर्त्या रूपात दिसतात. प्रत्येकीचे वाहन असते. गाया किंवा देवीरूपाबद्दल ही बरेच विचार आहेत. सुरूवातीला आदि मायेपासून सृष्टीची निर्मितीझाली असा एक विचार आहे. त्या नंतर जेव्हा मनुष्य कळप करून राहू लागला तेव्हा स्त्रीला जास्त महत्व देत असत कारण तिच्यात प्रजननाची क्षमता होती. नंतर हळूहळू हे महत्व कमी झाले.  स्वतंत्र व्यक्तिमत्व दाखवणाऱ्या या देवीची रूपे असतात. स्त्री व पुरूष यांना समान व मानाने वागवले जावे.

देवी  देवी म्हणजे प्रकृती निसर्ग.  निसर्गातून सगळ्याची निर्मिती होते.  निसर्गावर आपले नियंत्रण नसते. पुरूष रूपी मन असते आणि देवी म्हणजे निसर्ग. पुराणात त्याला स्त्री रूपात दाखवले आहे.  आदि शक्ती म्हणजे निसर्ग म्हणजेच देवी. भाग्य आणि ईच्छा किंवा काम आणि कर्म या दोन गोष्टीवर आपली समाजरचना झाली आहे. काही गोष्टी आपल्या हातात नसतात आपण त्या बदलू शकत नाही ते भाग्य किंवा कर्म आणि आपल्या मनाप्रमाणे जे करतो ते काम. विष्णू रूप हे प्रवृत्ती दाखवते तर शिव रूप हे निवृत्ती दाखवते. मनुष्याच्या आधी व नंतर निसर्ग असतो आपण त्याला आपल्या इच्छेने बदलू शकत नाही. त्यामुळे देवीला महत्व आहे.

सरस्वती ..  ही देवी शाळेत सगळ्यांना भेटतेच. पाटीपूजन करून या विद्येच्या देवीला आपण पूजतो.  या कुंदे.....या
श्लोकात सुंदर वर्णन केले आहे. ही विद्येची देवता मानली जाते. शुभ्र वस्त्र तिचे बाकी मोहमायेतले वैराग्य दाखवते. ती हंसावर बसलेली असते. हंस हा नीर क्षीर विवेकासाठी प्रसिद्ध आहे. त्याच्या पंखाला पाणी चिकटत नाही. अलिप्तता यातून दिसते.तिच्या हातात वीणा आहे. कवि लोक जे कल्पनेच्या साम्राज्यात वावरतात त्यांची ही देवी आहे. सृजनशीलता , ज्ञान हे सगळे बुद्धी व कल्पनेच्या जोरावर मिळते म्हणून या देवीचे महत्व.

दुर्गा  ही देवी सांगते सर्व भितीच्या अमलाखाली असतात. दुर्ग म्हणजे किल्ला जो रक्षण करतो. महिषासुर राक्षसाला या देवीने मारले. हा राक्षस सर्व देवांना त्रास देत होता तेव्हा देवांच्या आंतरिक शक्तीतून जे तेज एकवटले त्यातून या देवीचा जन्म झला. सगऴेराजा या देवीची पूजा करतात. वेगवेगळी वाहने दिसतात. कधी वाघ तर कधीसिंह. कधी व्हेज तरकधी बळी दिला जातो. माणसाला एक आंतरिक शक्ती व एक बाह्य शक्ती मदत करतात.  बाह्य शक्ती ही शस्त्रे सत्ता यातून मिळते.

काली  कालीचे रूप भयंकर असते. काळा रंग, वस्त्रे नाहीत, गऴ्यात रूंड माळा रक्त पिणारी. काली ही मातेच्या रूपात पूजली जाते. मनुष्य जेव्ह पशूसारखा व्यवहार करतो तेव्हा काली जन्म घेते. संहार होतो. सीता द्रौपदीवर अन्याय झाला तेव्हा त्या पण आपले रूप बदलतात.  निसर्गावर कोणी सत्ता गाजबू शकत नाही हे काली सांगते.

गौरी  सस्कृती माणसाच्या दृष्टीकोनावर अवलंबून असते.  प्रकृतीत कमतरता आहे म्हणून मनुष्य नीती नियम बनवतो. गौरी श्वेतवर्ण फुलांनी सजलेली, दागिने घातलेली असते. गौरी ही कन्येच्या रूपात पूजली जाते. देवी पूजनात नेहमी कन्या पूजन केले जाते. सभ्यता असेल तेथे गौरी वास करते व असभ्यता आली की कालीचा प्रभाव येतो.

गणपति ही महाराष्ट्राची ईष्टदेवता. सुखकर्ता दुखहर्ता अशी याची महती. लंबउदर हे संपन्नतेचे लक्षण मानतात. पूर्वी
धान्याची कमतरता होती तेव्हा भूक मिटवणे यासाठी पूजन केले जाते. वाहन उंदीर आणि कमरेला साप हे परस्यर विरोधी आहेत. ते एकत्र नांदतात जेव्हा भूक हा प्रश्न नाही.  हत्तीचे मुख सामर्थ्य दाखवते, या सगळ्या गोष्टींची कामना आपण गणपती पूजनात करतो. प्रत्येक चित्रातून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

मुरूगन
 हा गणपतिचा भाउ. हातात शस्त्र आणि तेजस्वी. भिती चा सामना करा असे तो सुचवतो.  हा उत्तरेत वेगळ्या रूपात तर दक्षिणेत वेगळ्या रूपात दिसतो. अनेक लोककथा व पुराणातील कथा त्याची महती सांगतात. दक्षिणेत त्याला दोन बायका तर उत्तरेत अविवाहित. त्याच्यासाठी हिमालय व गंगा काही प्रमाणात दक्षिणेत आणली म्हणून दक्षिण काशी व दक्षिण गंगा अशी नावे पडली असे सांगतात. देव हे वेग ळ्या काळात वेगळ्या रूपात बघितले जातात. सहा आया त्यालाआहेत ज्यात अग्नि व वायू यांचाही सामावेश आहे. देवांचा सेनापती मानला जातो. बायकांना या देवळात जाण्याचीबहुतेक ठिकाणी बंदी असते.


कलकी  आता कलियुग चालू आहे व कली अवतार घेउन जग नष्ट करणार अशी कल्पना आपण ऐकतो. हा घोड्यावर
पांढरे कपडे घालून येतो. आपल्या धर्मात प्रत्येक गोष्ट जन्माला येते व अंत पावते व परत जन्माला येते ही कत्पना आहे.


Tuesday, October 30, 2012

पाने इतिहासाची....

गेल्या आठवड्यात हिस्टरी चॆनेल वर एक कार्यक्रम पाहिला.   The men who built America.
खूप छान होता.  इथे अमेरिकेत हिंडताना बिल्डिंग वर, सभागृहांवर किंवा रस्त्यावर काही नावे आपण सतत बघतो. बरीच मोठी फाउंडेशन्स दिसतात. त्या सगळ्यानी अगदी शून्यापासून सुरूवात करून कसे एम्पायर उभे केले याबद्दल सांगितले आहे. हे करत असताना अनेक लोकांना काम मिळाले, गावांची भरभराट झाली आणि थोडक्यात देशाची उभारणी करायला मदत झाली. या माहितीपटामुळे या सगळ्या लोकांचा एकमेकातील नाते स्पष्ट झाले. त्या वेळची सामाजिक स्थिती, आर्थिक स्थिती याचे चित्र बघायला मिळाले. आज जर जे पी माॆर्गन हे नाव वाचले किंवा ऐकले तर पटकन त्याचे काम डोळ्यापुढे येते. हे सगळे पिलर्स एकमेकात कसे जोडले गेले आहेत हे छान लक्षात येते.

जे पी माॆर्गन-बँक, कार्नेजी-स्टील, जाँन राँकरफेलर-स्टँडर्ड आँइल,  एडिसन-इलेक्ट्रिसिटी, वेन्डरबिल्ट-रेल्वे आणि असे अनेक लोक ज्यानी अमेरिकेच्या पायाभरणीत महत्वाचा वाटा उचलला. या सगळ्यांच्या मनात खूप जिद्द होती. बिझनेस वाढवताना त्यांना अनेक अडचणी आल्या. काहीही झाले तरी त्यानी बिझिनेस चालू ठेवला, वाढवला. ईर्षा ही गोष्ट किती फायद्याची ठरते हे लक्षात येते.  सतत आपल्या प्रतिस्पर्ध्यावर कुरघोडी करण्याचे प्रयत्न करत या लोकांनी समृद्धी आणली. दुसरी एक गोष्ट लक्षात आली की यात सरकार चे काम किंवा हस्तक्षेप फारसा नव्हता. त्यामुळे थोडक्या दिवसात उद्योजकांकडून खूप प्रगति झाली. नवीन शोध लागले की जुन्या गोष्टी कशा कमी महत्वाच्या ठरतात हे पण चांगले दाखवले आहे. जसे एडिसन ने इलेक्ट्रीसिटी आणल्यावर केरोसिनचे महत्व कमी झाले. अर्थात यावर कसे निर्णय घेउन या मंडळींनी आपले बिझिनेस पुढे नेले हे बघण्यासारखे आहे. अफाट श्रीमंती आल्यावर या सगळ्या लोकांनी भरपूर देणग्या दिल्या आणि समाजाचे भले केले आहे. फक्त स्वताचे घर न भरता एवढ्या देणग्या देणे हे नक्कीच कौतुकास्पद.

या फिल्मसाठी  जुने त्या वेळचे फोटो वापरले आहेत.  जुना काळ चांगल्या प्रकारे दाखवला आहे. काही नवीन शूटिंग केले आहे.  दर मंगळवारी ८ - १० history channel वर हा कार्यक्रम असतो . 4 parts मधे आहे. If u  do not get that channel its available on History.com

१३ नोव्हेबर पासून अशीच एक मालिका दाखवणार आहेत. आइस एज पासूनचा मानवाचा प्रवास. यात कशा संस्कृति वसत गेल्या हे दाखवतील. आणि महत्वाचे म्हणजे त्यांचा एकमेकावर कसा प्रभाव पडला ते दाखवतील. मला खूप दिवसापासून याबद्दल लिहायचे होतो. म्हणजे एकाच वेळी भारतात आणि जगात काय चालू होते  ते आता या निमित्ताने बघायला मिळेल.  ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी जरूर बघा.

जाता जाता परत नेहेमीचा विचार मनात येतोच. भारतात अशी फिल्म का बनत नाही. इतिहासाबद्दलची भांडणे बाजूला ठेवून जर सगळ्या लोकांबद्दल दाखवले तर  छान फिल्म तयार होईल. अगदी स्वातंत्र्यानंतरची जरी बनवली तरी अनेक लोकांबद्दल माहिती मिळेल. सध्या उंच माझा झोका मधून अशा काही समकालीन लोकांबद्दल बघायला मिळाले तेव्हा छान वाटले. इतिहासात आपण ते शिकतोच पण ते एकमेकांशी कसे जोडले गेले आहेत हे अशा माहितीपटावरून जास्त चांगले कळते.

Monday, September 10, 2012

लहानपण देगा देवा....

काल टी व्ही वर मेलिँडा गेट्स ची मुलाखत पाहिली. मिळकतीतील बराच हिस्सा त्यांनी दान केला आहे. अमेरिकेतील शिक्षणमान खाली घसरले आहे, मुले काँलेजला कमी प्रमाणात जातात म्हणून त्यांनी शिक्षणक्षेत्रात मदत करायचे ठरवले आहे. टीचर चांगली तर मुलांना शिक्षणात रस वाटतो म्हणून त्या दिशेने सुधारणेला सुरूवात केली आहे. टीचर ट्रेनिंग सारखे उपक्रम हाती घेतले आहेत. मला खरेच कौतुक वाटले, एवढा पैसा दान करणे सोपे नाही. आणि तो बरोबर ठिकाणी दान होतो का नाही हे बघणे फार आवश्यक आहे. गेट्स फाउंडेशन दोन्ही करत आहे.

यावर मैत्रिणिशी बोलत होते. ती एका शाळेत शिकवते. तिच्या वर्गातला एक मुलगा तिच्याशी बोलत होता.


मुलगा - मी जर हा आठवडाभर नीट वागलो तर मला वीक एण्डला माझ्या वडिलांकडे जायला मिळणार.

टीचर - हो का...(तिला कल्पना आली की हा विभक्त कुटुंबातला आहे).

मुलगा - मला ३ डँड आहेत

टीचर - काय (धक्का बसलेला न दाखवता)

मुलगा - मी माझ्या आईकडे रहातो. आई गँरी बरोबर रहाते, म्हणून तो माझा एक डँड. मी, आई, गँरी, सुझान . जँक असे आम्ही रहातो. सुझान व जँक ही गँरी ची मुले आहेत.

टीचर - मग तुझा डँड...

मुलगा - तो दुसरीकडे रहातो. टाँम व बाँब एकत्र रहातात. म्हणून ते माझे अजून २ डँड.... मी,आई, गँरी, सुझान व जँक असे एक घर व मी, डँडी व बाँब हे एक घर आणि मला दोन्हीकडे रहायला आवडते.......

टीचर - वा छान......मग नीट वाग म्हणजे तुला जायला मिळेल तिकडे. ( ती कल्चरल शाँक मध्ये)

हा मुलगा वय वर्षे ६, आणि हे सगळे स्पष्टपणे बोलतोय.....काय हे कल्चर.......आजच्या पुढारलेल्या देशातील....

अमेरिकेत वरेच ठिकाणी हे अगदी काँमन आहे. आई वडील विभक्त, मुले काही दिवस आईकडे काही दिवस वडिलांकडे. अभ्यास हा महत्वाचा नाही..त्यांना आई, वडील भेटणे व त्यांचा सहवास महत्वाचा वाटतो. होम वर्क ला महत्व कमी दिले जाते. मुलांच्या नजरेतून पाहिले तर बरोहर वाटते कारण ५-६ वर्षाच्या मुलांचे विश्व हे आई, बाबा, बहिण, भाउ यात गुंतलेले असते. साहजिकच अभ्यासाकडे कमी लक्ष दिले जाते. मोठेपणी जर घर पक्के नसेल, सतत वेगळ्या घरात रहावे लागले तर मुलांना आवडत नाही. या सगळ्याचा शेवटी शिक्षणावर परिणाम होतो.

मुलांना पटकन स्वताच्या पायावर उभे रहायचे असते व स्वातंत्र्य व स्टेडी आयुष्य हवे असते. मग जेमतेम हायस्कूल करून मुले स्वताच्या पायावर उभी रहातात व काँलेज दूर रहाते. अर्थात या परिस्थितून शिकणारी पण खूप मुले आहेत. हुशार पण आहेत पण जनरल चित्र असे दिसते.....

एक मात्र खरे, सोसायटीत आसा प्रकार बरेच ठिकाणी घडतो म्हणून मुलांना सगळे माहित असते. लपवाछपवी नाही, कोणी हसतही नाही. आपल्याकडे ओपनली कोणी बोलत नाही कारण सोसायटी वेगळी आहे.... आजकाल सगळे प्रकार मात्र चालू असतात. एखाद्याला २ डँड असू शकतात. २ आया असू शकतात. सगळे मान्य आहे.

५-६ वर्षाच्या मानाने केवढी ही गुंतागुंत......आणि आपण म्हणतो लहानपण दे गा देवा.... लहानपण किती सुखाचे...






Wednesday, January 12, 2011

साद देती सह्याद्रीचे कडे....




साद देती सह्याद्रीचे कडे....

भारतात महाराष्ट्रात औद्योगिक प्रगति बरीच झाली आहे. रस्त्यांनी शहरे जोडली गेलेली आहेत. झाडी, जंगल हा प्रकार अगदीच कमी. सह्.ाद्री चे किल्ले,गड मात्र ताठ मानेने उभे आहेत. आजकाल व्लाॆगवर, फेसबुकवर, वर्तमानपत्रात बरेच लोक यावर लिहितात. अनुभव, फोटो व इतर माहिती बरीच दिसते. आजकाल बरीच मंडळी या सहलींचे आयोजन करताना दिसतात. तरूणाई ट्रेक कडे परत वळत आहे हे पाहून छान वाटते.

हे सगळे वाचताना असे वाटले या सगळ्यांनी एकत्र येउन एका साईटवर सगळी माहिती एकत्रित ठेवली तर किती छान होईल. बरे हे सगळे स्वानुभवातुन आलेले असल्याने रंजक तसेच माहितीपूर्ण ही असेल. ३-४ लोकांनी एकत्र येउन थोडे थोडे काम वाटून घेतले तर हे काम सहज होण्यासारखे आहे. नवीन जाणारा माणूस या अनुभवातून बरेच काही शिकू शकतो. आणि एका प्रकारे माहिती असली की चांगले वाटते. गडावर जायचा नक्की रस्ता कुठला हे माहित असावा,,,तुम्ही म्हणाल की अशा चुकण्यात मजा असते ... मान्य आहे पण काहींना ती सजा वाटू शकते. गाईडनी पैसे खूप सांगणे यावर पण कंट्रोल राहू शकतो.

मी १०-१२ गडावर गेले आहे मग देशाबाहेर राहिल्याने तिथल्या गोष्टी जास्त बघितल्या गेल्या. अमेरिकेत हिंडताना एक गोष्ट जाणवते, कितीही बारीक गोष्ट असो त्याची माहिती व्यवस्थित लिहिलेली असते. (त्याबद्दल दुमत नसते) गेल्यावर व अजून २-३ ठिकाणी नकाशा लावलेले असतो. रेंजर लोक ३-४ वेळा माहितीपूर्ण प्रेझेंटेशन देतात. अघून मघून साघ्या लाकडाच्या खांबावर पाट्या लावून त्यावर थोडक्यात माहिती दिलेली असते. भौगोलिक ऐतिहासिक महत्व लिहिलेले असते. मी काही लोकांच्या ब्लाॆगवर वाचले की काही किल्ल्याबद्दल तिथल्या लोकांनाही माहिती नसते. सरकार या गोष्टीत लक्ष घालेल अशा वाट बघण्यापेक्षा काही लोकांनी एकत्रित येउन केले तर हे काम लवकर होईल. स्पांन्सर नक्की पुढे येतील आणि तसा फार खर्च येणार नाही.

आपण बाकी गोष्टी जितक्या पटकन काॆपी करतो तसे हे ही करायला हवे. गाईडच्या बाबतीत पण गावातल्या लोकांना एकत्र करून शिकवले तर मुले छान काम करू शकतात. आम्ही रायगडावर याचा अनुभव घेतला. तिथे बाबासाहेब पुरंदरे यांनी मुलांना शिकवून तयार केले आहे. ती मुले कविता म्हणून सगळी माहिती सांगत होती. ऐतिहासिक माहिती ज्याबद्दल दुमत आहे ती लिहिणे टाळावे. शिवाजी महाराजांनी केलेले काम मोठे आहे ते महत्वाचे. डिटेल्स मध्ये तफावत असू शकते. आपल्याकडे इतिहास नीट लिहिलेला नाही .. बखरकार पण वेगवेगळे इंटरप्रीटेशन करणार त्यामुळे वादाचे मुद्दे टाळून हे काम करावे लागेल. लिहिलेल्या पाट्या खराब न करणे, त्यावर काही न लिहिणे हे हळूहळू लोक शिकतील अशी आशा ठेवायला काहीच हरकत नाही. काही गडावर आत्ता असे नकाशे आहेत पण अगदीच कमी.

काय बाहेर राहून इथल्या उचापति कशाला अशा खूप लोकाॆच्या प्रतिक्रिया होतील पण मला हे मनापासून वाटते हे खरे.

Sunday, January 2, 2011

शिक्षण असेही

शिक्षण असेही...

गेल्या दशकात भारताचे नाव आउटसोर्सिंगच्या क्षेत्रात चमकते आहे. साॆफ्टवेअर मध्ये तर भरपूर मागणी आहे. आणि त्यात आपली मंडळी ठसा उमटवत आहेत. मेडिकल, सेवा, अभियांत्रिकी या क्षेत्रातही भरपूर वाव आहे. हळूहळू त्यातही लोकांना कामाच्या संघी मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर परवा एक लेक्चर ऐकले आणि वाटले की आपण (भारतीय) लोकांना इतके काम करून देतोय आणि आपल्याकडे मात्र शिक्षणाचे आउटसोर्सिंग चालू होते का काय....

अमेरिकेत आल्यावर सुरूवातीला व्हाॆलेंटिअरिंग, फंड रेझिंग बघून मी जाम इंप्रेस झाले होते. गिव्हींग बॆक हा कन्सेप्ट खूप दिसतो. शाळेत, ओल्ड पिपल होम, बेवारशी प्राणी सांभाळणे, त्यांचे संवर्धन करणे खूप दिसते. अगदी लहान पणापासून हे शाळेत शिकवले जाते. अशातच काही सेवाभावी संस्था भारतातील शाळांसाठी मदत करताना दिसून आल्या. अगदी खेड्यापाड्यात जाउन तरूण मुले ही कामे करतात ते पाहुन कौतुक वाटते. आणि - आम्हाला काही गरज नाही, उगाच येउन कामे करतात, आजकाल कुणालाही गरज नाही, भारतात पैशाची कमी नाही... हे वर ऐकावेही लागते. अमेरिकेतून आलेल्या मदती बद्दल मी हेच जास्त ऐकले आहे. एकल विदयालय अगदी खेड्यात ३६००० एक शिक्षकी शाळा चालवते.

टीच फाॆर अमेरिका या धरतीवर टीच फाॆर इंडिया हा असाच एक उपक्रम पण त्यात वेगळेपण आहे. याची मुख्य भारतीयच आहे. पुणे व मुंबई मिळून ६५ शाळात हे लोक काम करतात. ज्या मुलीने अनुभव सांगितले ती अमेरिकन आहे. ती तिथे नोकरी करते. सरकारी शाळेत - इंग्लीश मिडिअम त्यांचा प्रयोग चालतो. प्रथम तिने सांगितले की ह्या लो इन्कम ग्रुप च्या शाळा असल्याने पालक मुलांच्या अडचणी सोडवू शकत नाहीत. तिथल्या शिक्षकांना २००० रू पगार मिळतो. बरीच मुले पाठांतर करतात व समजून न घेता शिकतात - मार्क कमी पडतात मग त्यांना शिकवणी ला पाठवतात... त्यामुळे शाळेत यायला नाखूष असतात. काही मुले यातूनही व्यवस्थित शिकतात. अशा शाळात २री ते ४ थी मध्ये १ वर्ग सिलेकट करून तिथे अमेरिकन पद्धतिने हे लोक शिकवतात नीट समजावतात, जास्त वेळ मुलांना देतात. साहजिकच मुले शाळेत जायची वाट बघतात, शाळा आवडायला लागते. २-३ महिन्यात त्यांना मुलांच्यात फरक दिसला. आत्मविश्वास वाढलेला दिसला, वाचन सुधारले.

सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे शिक्षक म्हणजे नुकतीच ग्रॆज्युॆेट झालेली भारतातील मुले आहेत. हुशार मुले आहेत. २ वर्षाची कमिटमेंट देउन ही मुले काम करतात. अगदी चांगल्या प्रकारच्या नोकरीचा मोह सोडुन २ वर्षे आपल्या देशाला द्यायची यांची तयारी आहे. वेळप्रसंगी पालकांशी भांडुन या कामासाठी मुले तयार होतात कारण त्यांना देशासाठी काहीतरी करायचे आहे. ही गोष्ट त्या मुलीला खूप इन्स्पायर करून गेली. तरूण मुलांच्यात ही शिक्षणाची ओढ बघून छान वाटले. त्यासाठी त्यांना थोडा जास्त पगार दिला जातो व हे पैसे ट्रस्ट कडून फंड जमा करून मिळवले जातात. हा भार सरकारवर पडत नाही.
आता मद्रास, हैद्राबाद व दिल्ली इथेही या शाळा चालू होणार आहेत. इंग्लिश मिडिअम असले की बरेच जण भाग घेउ शकतात . खेड्यात पुढे जायचा या लोकांचा विचार आहे पण त्यासाठी लोकल भाषेचे शिक्षक घ्यावे लागतील.

हे सगळे अनुभव ऐकल्यावर एवढेच वाटले हे सगळे शिक्षण खात्याला दिसत नाही का...आपल्या देशात नक्कीच चांगले लोक आहेत जे शिक्षणात बदल आणू शकतात मग ते का होत नाही.... त्यासाठी असा घास का घ्यावा लागतो....

Wednesday, November 3, 2010

मिशन मिशनरींचे...

मिशन मिशनरींचे...

अमेरिकेत आजकाल भारतीय खूप आहेत. आपले खाणे, कपडे व क्रिकेट याबद्दल खूप आकर्षण असते. आपले कल्चर दाखवण्यासाठी अघूनमघून भारतीय गोश्टी डिस्प्ले करतात. असाच काल एका चर्च मध्ये इंडिया डे होता. तिथे आजकाल बरेच भारतीय जातात म्हणून त्यांनी कल्चरल एक्स्चेंज नावाखाली हा कार्यक्रम ठेवला होता. ९-१० स्टेट्स चे स्टाॆल्स मांडले होते. वेगवेगळ्या भाषा , भांडी, किराणासामान, आणि दागिने हेही होतेच. एका ठिकाणी क्रिकेट बद्दल माहिती सांगणारा विभागही होता. साडी नेसवण्याचीही सोय होती. मी म्युझिक स्टाॆलबरोबर गेले होते. लोकांना तबला, पेटी व वीणा यांचे प्रात्यक्षिक होते. खाण्याच्या विभागात चहा समोसा ठेवला होता. आपल्या वेगवेगळ्या भाषा - लिपी, खाणे व क्रिकेट याबद्दल अमेरिकेत खूप आकर्षण आहे.

त्यानंतर एका मिशनरी बाईचे भाषण होते. मी नेहेमी मिशनरींबद्दल लोकांकडून ऐकलेले म्हणून म्हटले बघू तरी काय म्हणते ते.... त्या बाईंनी ५० वर्षे कलकत्त्याला राहून काम केले आहे. सुरूवातीला टेंट मध्ये राहून लोकांना ंमदत केली. भारताच्या प्रगतीबद्दल सुरूवातीला ती बोलली. नंतर मात्र उपासमार, बेकारी, शिक्षणा ला वंचित मुले, याची भरपूर आकडेवारी दिली. अर्थात त्यात खोटे काही नव्हते. अगदी सुरूवातीला अापल्या धर्मातील जातिवाद, अंघश्रद्धा व अडाणिपणा याचा पुरेपूर फायदा या मिशनरींनी घेतला. खालच्या जातीतिल लोकाॆना शिक्षणापासून दूर ठेवले होते त्यांना जवळ केले. एखाद्या घरात आंधळे, डिफाॆर्म मूल जन्मले तर गेल्या जन्मीचे पाप समजून त्यावर उपचार करत नसत. औषधाला पैसेही नसत अशांना या लोकांनी जवळ केले .. साहजिकच ही मुले त्या धर्मात ओढली गेली. अगदी कचराकुंडीतील मुले आणून ती वाढवली. शाळा काढल्या , दवाखाने काढले व दोन वेळचे जेवण पुरवले. अन्न, वस्त्र व निवारा या तिन्ही गरजा भागतात म्हटल्यावर लोक तिथे जायला लागले. हा सगळा खर्च इथल्या चर्चच्या पैशावर चालतो.

हे सगळे ऐकल्यावर वाटले की खरेच भारतात आज बाहेरून एवढी मदत घेण्याची गरज आहे का....जगातील श्रीमंत लोकात आज काहींचा नंबर लागतो. आपल्याकडेही अनाथआश्रम धर्मशाळा आहेत मग या लोकांचे का फावते....आपण म्हणतो की ही मंडळी धर्मप्रसार करतात पण एक नक्की की त्यासाठी कष्ट व सेवा ही करतात. काही लोकांचे म्हणणे असे असते की कोणाला आजकाल खायची भ्रांत नाही पण परिस्थिती अशी आहे की अशा गरजू लोकांपर्यंत आपण पोचत नाही आपला परिघ खूप छोटा असतो. त्यापलिकडे बघायला हवे. खेड्यात रहातात त्यांना वेगळा अभ्यासक्रम केला पाहिजे. आपली मंदिरे दानी व्यक्ति यांचे पैसे योग्य तर्हेने वापरले गेले पाहिजेत. नियोजन केल्यास आणि यात कोणितरी लक्ष घातल्यास अन्न वस्त्र निवारा पुरवायची क्षमता आपल्यात नक्की आहे. शिक्षण देणारी भरपूर मंडळई आहेत या सगळ्या गोष्टींचा विचार करून आलेली मदत योग्य ठिकाणी वापरण्याचे भान असणारा नेते आता यायला हवा.

Friday, October 15, 2010

सिटीझनशिप.....

अमेरिकेत आल्यावर जास्त काळ रहायचे असल्यास वर्क व्हिसा, रेसिडँट कार्ड सिटीझनशिप या चक्रातून सगळे जात असतात. हे केले म्हणजे व्हिसा ची कटकट रहात नाही. जगात फिरताना बरेच ठिकाणी व्हिसा घ्यावा लागत नाही हा दुसरा मोठा फायदा. काही नोकरीच्या ठिकाणी जरूरी असते सिटीझनशिपची.

नुकतीच अमेरिकन सिटीझनशिप साठी परिक्षा दिली. या लोकांनी सगळे पद्धतशीर करून ठेवले आहे. कागदपत्र खूप मागतात. कंटाळा .ेईपर्यंत. त्यानंतर फिंगरप्रिंट घेतात...९ प्रकारचे फिंगरप्रिंटस स्टॆडर्ड मानले जातात. आमचे घोडे तिथेच अडले. २ वेळा त्यांनी प्रयत्न केला मग बहुदा आहे त्यावर समाधान मानले. मागच्या वेळेस पोलिस स्टेशन वरून पत्र आणायला लागले होते ( काय काय करावे लागते...) आशा केसेस मध्ये प्रिंटस बघायला लागले तर काय करतात कोणास ठाउक... हाताला जास्त क्रिम लावले तर, जास्त साबण लावला तर असे होते आशा अनेक अफवा आहेत. यानंतर १०० प्रश्न आभ्यासाला देतात आणि त्यातले १० प्रश्नांची उत्तरे अपेक्षित असतात. १-२ अगदी सोपी वाक्ये लिहायला देतात. एक मात्र नक्की या देशाबद्दल, तिथला बेसिक इतिहास भूगोल व गव्हर्नमेंट याची माहिती होते - माझ्यासारख्या इतिहास न आवडणारे असताताच ना...

ही सगळी तयारी चालू असताना सहज मनात विचार आला की भारतात कशी असते ही प्रक्रिया. ही परिक्षा घेतात का... तिथे काय परिस्थिती आहे...तसेही भारतात घुसखोर खूप आहेत. व्हिसा सारखे कागदपत्र कितपत तपासले जातात माहित नाही. आजकाल आयडेंटिटी कार्ड सारखे कार्ड देणार आहेत असे वाचनात आले होते. यांच्याप्रमाणे भारताहद्दल जर टेस्ट तयार केली तर कशी असेल असा बसल्या बसल्या विचार करत होते... त्यातून हे प्रश्न डोक्यात आले....

१. भारताची घटना कधी लिहिली
२. सर्वात लांब नदी कोणती
३. कारगिल युद्धाच्या वेळी कोण पंतप्रधान होते
४. भारतात किती राज्ये आहेत
५. टॆक्स भरण्याची शेवटची तारीख काय
६. पाकिस्तान बरोबर किती युद्ध झाली
७. मुक्तिविहिनी ची स्थापना कोणी केली
८. पंतप्रघान व उप पंतप्रधान यांची नावे सांगा
९. आपले राष्ट्रपिता कोण
१०. लोकसभेत किती जागा असतात
११. तुमच्या गव्हर्नर चे नाव
१२. २ क्रांतिकारकांची नावे
१३. आपली आॆफिशिअल भाषा कुठली आहे
१४. राष्ट्रपतींचे नाव
१५. भारतावर आक्रमण केलेल्या दोन सत्ता
१६. पद्मविभूषण मिळालेल्या २ व्यक्ति
१७. सर्वात उंच शिखर
१८. सह्याद्रीतले २ किल्ले
१९. भारतात नांदणारे २ धर्म
२०. आदिवासींच्या २ जाति
२१. राज्यसभेत किती मेंबर्स असतात
२२. आपले राष्ट्रगीत व त्याचे लेखक
२३. झेंड्यावर चे ३ रंग काय सांगतात
२४. २ थंड हवेची ठिकाणे
२५. राजकारणातील २ प्रमुख पार्टीज
२६. पश्चिमेकडे असलेला समुद्र
२७. पूर्वेकडे असलेला समुद्र
२८. २ सार्वजनिक सुट्ट्या
२९. २ प्रेक्षणिय स्थळे
३०. मुख्यमंत्रयांचे नाव
३१. ब्रिटीश भारतात येण्याचे कारण
३२. लोकमान्य टिळकांचे कार्य
३३. भारताचे घटनाकार
३४. ताजमहाल कुठे आहे
३५. मतदान करण्यासाठी कगती वय लागते
३६. २ भारतरत्न
३७. पहिले पंतप्रधान कोण
३८. २ क्रिकेट खेळाडूंची नावे

साधारण अशा प्रकारचे प्रश्न विचारतात .....

Thursday, September 16, 2010

गणपति बाप्पा मोरया....






गणपति बाप्पा मोरया....

काल इ सकाळ वर गणपति ची आरास, फोटो बघत होते. सगळीकडे गर्दी, उत्साह दिसत होता. खरेच या १० दिवसात सगळे वातावरण कसे मंगलमय होउन जाते ना...

लोकमान्यांनी रूजवलेली ही प्रथा आज तयाचा वेलू गेला गगनावरी अशा अवस्थेला येउन पोचली आहे. त्या काळात सर्व जातिच्या लोकांनी एकत्र येउन, भेदभाव विसरावेत हा मुख्य हेतू होता. त्याला विविध गुणदर्शनाची जोड दिली त्यामुळे लोकांना कला प्रदर्शनाला चांगले व्यासपीठ मिळाले. ही प्रथा सगळ्यांना नक्कीच भावली आणि त्यामुळे इतकी वर्षे ती चालू आहे ,,,दरवर्षी नव्या उत्साहाने चालू आहे.

सार्वजनिक मंडळे वेगवेगळे देखावे करतात हा प्रकार छान वाटतो. हलते देखावे लहान मुलांच्या छान लक्षात रहातात आणि नकळत मुलांवर संसकार घडत असतात. पुराणातल्या कथा टी व्ही वर बघण्यापेक्षा अशा छान लक्षात रहातात. चालू घडामोडींवर पण भर असतो त्यामुळे त्यावरही आपोआप चर्चा होते. ठिकठिकाणी गाणे, नाच, वादन यांचे कार्यक्रम होतात व त्यामुळे बरेच उभरते कलाकार लोकांसमोर येतात. वेगवेगळ्या मंडळांची देखावे करण्यात स्पर्धा होते. एकत्र येउन काम करायचा अनुभव मिळतो. मूर्ति कारागीर, डेकोरेशन वाले, फूलवाले, प्रसाद बनवणारे, भाजीवाले या सगळ्यांना यातून धंदा मिळतो. गणपति अथर्वशीर्ष व इतर मंत्र पठणाचे एकत्रित कार्यक्रम होतात. देखावे हघण्यातील मजा घेता येते.

आता जग जवळ आले आहे. बाहेरच्या देशात ही मंडळी मोठ्या उत्साहाने गणपति बसवतात. आणि या सणाला सर्व नुसतेच मराठी नाही तर सर्व भारतीयांना हजेरी लावायची असते हे विशेष... अगदी विद्यार्थी सुद्धा यात मागे नाहीत. सजावट, आरत्या, प्रसाद, कार्यक्रम सगळे लहान प्रमाणात का होईना साजरे होते.

आजकाल १० नंतर ध्वनिप्रक्षेपक बंद करतात हे चांगले पाउल आहे. वाहतुकीची गैरसोय, आवाजाचे प्रदुषण, वर्गणी साठी केलेली जबरदस्ती, गर्दीचा फायदा घेउन केलेली छेडछाड , मंडळातील हेवेदावे हे चॆलेंजेस आहेत पण ते यापुढील पिढ्यांनी सोडवून गणेशउत्सवाचा मूळ हेतू टिकवून हा ठेवा पुढे न्यावा ........

Tuesday, September 14, 2010

फेसबुक चा चेहेरा......



इंटरनेट ने जसाजसा आपला पसारा वाढवला तसे तसे बरेच लोक ते वापरायला लागले. सुरूवातीला मेल, मग हळूहळू चॆट मग इंटरनेट वरून फोन असे स्टेप बाय स्टेप कम्युनिकेशनचे चॆनेल्स वाढत गेले.

याहू ची मक्तेदारी कमी झाली, गुगल ने पाय पसरायला सुरूवात केली. स्काईप वरून आॆनलाइन क्लासेस सुरू झाले. या सगळ्या स्पर्धेत आपले फावले. आपण जास्त श्रेष्ठ हे दाखवण्यासाठी या कंपन्या जास्त सुविधा देउ लागल्या. आॆरकुट, नेटलाॆग, लिंक्डइन असे वेगवेगळे प्लॆटफाॆर्म्स तयार होु लागले आणि अशातच फेसबुक चा चेहेरा नेट वर दिसायला लागला. काॆलेज मधल्या काही मुलांनी एकत्र येउन हे सुरू केले. तिथेही बरेच राजकारण होउन (चोराचोरी) हा प्रकार फेमस झाला. आपल्या ओळखीच्या मुलांची माहिती एका ठिकाणी मिळावी व एकमेकांशी कम्युनिकेट करता यावे हा हेतू. बघता बघता फेसबुक चे लोण इतके पसरले की तो एक डिक्शनरीतला शब्द झाला आहे. असे काय आहे यात की लोकांनी एवढे डोक्यावक घ्यावे..

माझ्या मते फेसबुक वापरायला अगदी सोपे आहे. अकाउंट काढणे सोपे आहे. आपल्याला हवे तेवढेच मित्र आपण ठेवू शकतो. एखादी गो।्ट अनेक लोकांना अगदी पटकन सांगता येते. फोटो पटकन दिसतात. कुणाची एंगेजमेंट, कुणाचे बारसे, असे फोटो अगदी लगेच दूरच्या लोकांना बघता येतात. आजकाल जगभर मंडळी फिरत असतात त्यांच्या नजरेतून त्या जागा बघता येतात. मंडळी भरपूर लिंक्स टाकतात त्या बहुदा मनोरंजक असतात. अजून मोठा फायदा म्हणजे जुने मित्र भेटतात. मुलींना य मुलांना माहिती काढता येते.

मला खूप लाक म्हणतात फार वेळ जातो बाबा यात ...मला असे अजिबात वाटत नाही...सगळी सेटिंग्ज माहित करून घेतली की चांगला कंट्रोल रहातो. काही फ्रेंड्सना हाईड करून अधून मधून चेक करू शकतो. माझ्या मते छान खजिना आहे हा माहितीचा. घरी रहाणारा ज्येष्ठ नागरिक सगळ्या नातवंडांशी कनेक्टेड राहू शकतात. आपले फोटो वेळोवेळी बदलता .ेतात आणि हे सगळे खूप सोपे आहे....मग काय उघडा या खजिन्याचे दार.....

या गोष्टीवर आता एक सिनेमा येउ घातलाय...नक्की बघणार आहे.

Tuesday, August 10, 2010

वेदाबद्दल -- असाही एक वक्ता

परवा एके ठिकाणी वेद आणि हिंदू धर्म यावर एका अमेरिकन माणसाचे लेक्चर ऐकले. मी सहसा अशी भाषणे ऐकायला जात नाही कारण तिथे नवीन काही ऐकायला मिळत नाही. इथे बोलणारा अमेरिकन होता त्बामुळे विचार केला, बघू या, या लोकांचा व्ह्यू काय आहे ते. त्याची वेब साइट ही चांगली वाटली.

स्टीफन नप ( आता त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला आहे. ख्रिश्चन व इतर अनेक धर्मांचा त्यांनी अभ्यास केला, हिंदू धर्मात खूप नाँलेज आहे असे वाटल्याने त्यानी हा धर्म स्वीकारला. आपल्या अनेक ग्रंथांचे वाचन केले. १७ पुस्तकांचे लेखन केले. हिंदू धर्म कमी करण्यासाठी कसे प्रयत्न चालू आहेत यावर ही त्यांनी एक पुस्तक लिहिले आहे. बेसिक गोष्टी ज्या मुलांना माहित हव्या त्यासाठी एक वेगळी लिंक वेबसाईट वर आहे. मी खूप साईटस बघते हिंदुइझम वर पण ही सगळ्यात चांगली वाटली. बेसिक गोष्टी यात चांगल्या लिहिल्या आहेत. त्यांच्या लिखाणात जागोजागी पुस्तकांचे संदर्भ दिले आहेत. भारतात २० वेळा लेक्चर साठी त्यांना बोलावले आहे. दुसरा धर्म स्वीकारून त्यांच्या समुदायापुढे माहितीपूर्ण भाषण करणे हे कौतुकास्पद वाटले.

अमेरिकेत वाढणारी आजकालची जी तरूण पिढी आहे त्याना बर्याच प्रश्नांना तोंड द्यावे लागते. आजकाल घरातून मुलांना संस्कार कमी मिळतात कारण तरूण पालकांना माहिती असतेच असे नाही. कारण कळल्याशिवाय तरूण मुले काही मान्य करत नाहीत (ही अतिशय चांगली गोष्ट आहे माझ्या मते). भारताबाहेर रहाताना आपल्या घर्माबद्दल बेसिक माहिती असणे आवश्.क आहे. यात पालकांची जबाबगारी जास्त आहे असे मला वाटते.कोणी तुम्हाला प्रश्न विचारला तर उत्तर देता आले पाहिजे. आणि हे उत्तर एकसारखे असले पाहिजे आपल्याकडे प्रत्येकाते मत वेगळे. भारतात मुलांची काय परिस्थिती आहे माहित नाही.

त्यांनी लिहिलेले क्राइम अगेन्स्ट इंडिया हे पुस्तक चांगले वाटले. वरवर बघता आपल्याला जाणवत नाही पण धर्म बुडवण्याचे पद्धतशीर प्रयत्न चालू आहेत. लोक बाटत आहेत. आता एकीकडे म्हणतात की भारतात खाण्याची कमतरता नाही पण याच कारणासाठी लोकांना बाटवले जात आहे. सरकार लक्ष घालेल तर काही होउ शकते. आपल्या धर्मात स्वातंत्र्य खूप असल्याने अनेक पंथ आणि विचार धारा निर्माण झाल्या आहेत त्यामुळे लोकांचे एकत्रिकरण अवघड झाले आहे.

आपल्या रोजच्या जीवनात फारसा फरक पडत नसल्याने धर्म या गोष्टीकडे फारसे लक्ष दिले जात नाही असे वाटते.

Thursday, April 29, 2010

सिनेमा बघताना......

सिनेमा बघताना......

काल नेटफ्लिक्स कडून आलेला सिनेमा बघत होते. नंतर सहज मनात विचार आला, किती सोपे झाले आहे आता सिनेमा बघणे. पूर्वी महिन्यातून एखादा सिनेमा (बर्‍याच वेळेला गरी कुणीतरी बघून मग परवानगी दिलेली असे) बघत असू. त्यावेळेस ३ रू वगॆरे बाल्कनीचे तिकीट असे. आधी ऍडव्हान्स बुकींग करून बहुतेक वेळेला सिनेमा बघितला जाई. ब्लॅक तिकीट वाले बाहेर ऒरडताना दिसत (तो सुद्धा रेट फार नसे) त्यावेळेस त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टीने बघितले जाई. नंतर हळुहळु तिकीटचे भाव वाढत गेले. आणि सिनेमाचे प्रकार पण वाढत गेले.

नंतर दूरदर्शन वर सिनेमा बघायला सुरूवात झाली. त्यावेळेस मजा वाटायची, छोट्या पडद्यावर का होईना पण घरी बसून सिनेमे बघता येऊ लागले. हळूहळू ब्लॅक ऍन्ड व्हाईट वरून रंगीत चित्रपट बघायची सोय झाली. नंतर व्हिडिऒ कॅसेट चा जमाना आला. आता तर वेळे चेही बंधन राहिले नाही. आपल्या सवडीनुसार सिनेमे बघता येऊ लागले. यापाठोपाठ डी व्हि डी चे पदार्पण झाले. चांगल्या प्रतीचे सिनेमे दिसू लागले पण यामुळे पायरसी चा प्रॉब्लेम सुरू झाला जो अजूनही चालू आहे. अमेरिकेत ६ महिने पर्यंत कुठलाही नवीन अमेरिकन सिनेमा बघता येत नाही ( सापडल्यास जबर शिक्षा असते). इंडियन स्टोअर मध्ये मात्र लगेच पायरेटेड डि व्हि डी बघता येते.
मधल्या काळात मल्टीप्लेक्स मुळे लोक परत थोडे थिएटर मध्ये जाऊन सिनेमे बघू लागले. पण त्यासाठी पॆसे जास्त लागतात. यानंतर लॅपटॉप वर सिनेमे डाऊनलोड करून बघणे सुरू झाले. यात अनलिमिटेड सिनेमे बघू शकत्तो. विमानातून निघालो की थोड्याच वेळात पटापट लॅपटॉप्स उअघडून सगळी युवा जनता आपले आवडते सिनेमे बघताना दिसतात. आजकाल विमानात पण पर्सनल टी व्ही असतात. टि व्ही चे पण स्क्रीन साईज वाढले, क्वालिटी सुधारली. होम थिएटरचा जमाना आला. घरी सिनेमा बघत्ताना थिएटर इफेक्ट मिळू लागले. टी व्ही वर स्पर्धा वाढल्याने सिनेमांमध्ये चॉईस करता येउ लागला. डि व्हि डि प्लेअर चे अनेक प्रकार आले त्यात सोनी ब्लू रे वर तर इंटरनेट वरून यू ट्यूब वरचे सिनेमे बघता येऊ लागले. त्यावरून नेटफ्लिक्स पण बघता येते. नेटफ्लिक्स वाले आपल्याकडे घरी पोस्टाने सिनेमे पाठवतात आपला बघून झाला की पोस्ट बॉक्स मध्ये ठेवा काम खतम....बाहेर जायला नकॊ याशिवाय डायरेक्ट डाउनलोड करून ही सिनेमे बघता येतात. अजून काय पाहिजे..........

हे सगळे पाहिले की वाटते की आता पुढे काय? पूर्वॊ आपण ३ रू त महिन्यातून एखादा सिनेमा बघत असू. आता इतके ऑपशन्स झाले आहेत ....कुठलीही भाषा, नट, देश या सगळ्या सीमा पार करून सिनेमा आपल्यापर्यंत पोचतो आहे. आता यानंतर नवीन काय सुविधा काढ्तील? माणसाची भूक खरेच मोठी आहे.

Friday, April 16, 2010

ऎश इन द एअर.....

ऎश इन द एअर.....

हे टायटल वाचून तुमचा गॆरसमज होईल की हे ऎश्वर्या राय बद्दल आही आहे का? ही वेगळीच ऎश आहे. गेल्या आठवड्यात आइसलंड ला व्होल्कॅनो इरप्ट झाला आणि ’ऎश इन द एअर’ अशा बातम्या पेपरात दिसू लागल्या. युरोपमधल्या फ्लाईटस कॅन्सल झाल्या आणि लोकाना हळूहळू त्याचे गांभीर्य कळू लागले. जोपर्यंत आपला त्याच्याशी संबंध येत नाही तोवर जनरली आपण ते वाचतो आणी सोडून देतो. असे बरेच उद्रेक निसर्गात होतात पण ते आपल्यापासून दूर असतात, आपला संबंध येत नाही त्याच्याशी. पूर्वी अलास्कात अशा प्रकारची बातमी वाचली होती आणि हे विमानांना हानिकारक असते असे वाचलेही होते. अलास्कात विमाने तशी कमी जातात पण आता युरोप ची सगळी हवाई यंत्रणा थंडावली म्हटल्यावर त्याची चर्चा जोरात सुरू आहे.

आपण आता कलियुगात आहोत आणि आता प्रलय होणार हे सगळीकडे आपण ऎकत असतो. सर्व धर्म त्याबद्दल वेग्वेगळ्या तर्‍हेने बोलत असतात. गेल्या काही महिन्यातल्या बातम्या बघितल्या तर हेति , चायना, मेक्सिको, ईंडोनेशिया इथले भूकंप, आताचे बंगालमधले वादळ, अमेरिकेतील वादळे, ग्लेशिअर ची मूव्हमेंट होऊन लोक मरणे, खाणीतील दुर्घटना हे सगळे काय दर्शवतात? नॆसर्गिक आपत्ती या पाठोपाठ येत आहेत आणि माणूस किती छोटा आहे हे सिद्ध करत आहेत असे वाटते. माणसाने इतकी प्रगती केली पण काही गोश्टी त्याच्या हाताबाहेर अजूनही आहेत हे जाणवते. कधी कधी वाटते निसर्ग माणसाला चॅलेंज देतो की आहे का तुमच्याकडे यावर उत्तर? कदाचित या असल्या आपत्तींमध्ये पुढील अनेक शोधांची बीजे दडली असतील.

chk this link about this volcano

Wednesday, February 10, 2010

मिशेल ऒबामा ...थँक्स

मिशेल ऒबामा ...थँक्स

काल लॅरी किंग च्या प्रोग्रॅम मध्ये मिशेल ओबामा यांचा इंटरव्ह्यू पाहिला. आणि एकदम छान वाटले.

फर्स्ट लेडी च्या नात्याने त्यांनी शाळेतले लंच पॊष्टिक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबद्द्ल बिल पास करण्याच्या दृष्टीने पहिले पाउल टाकले आहे.

अमेरिकेत बहुते सगळी मुले शाळेत जे लंच मिळते ते खातात. म्हणजे दिवसातले मेन जेवण बाहेर होते ज्यात न्युट्रीशन कमी आणि फॅट खूप. जोडीला सोडा असतोच. चीजचा भरपूर वापर आणि भरपूर मिळते मग वजन वाढायला काय प्रॉब्लेम? ज्यूस देतात तो पण खूप साखरवाला. माझी मुलगी शाळेत जायची तेव्हा आम्ही बरीच चर्चा करायचो का हे शाळेत असे जेवण देतात? त्यावर उपाय म्हणून कधी घरचा डबा तर कधी शाळेतले असा उपाय होता.

इथल्या शाळकरी मुलांच्यात ओबिसिटी(जाडी) चे प्रमाण खूपच वाढले आहे.(दर ३ मुलांच्यात १ मुल जाड आहे) जर दुसरा उपाय शक्य असेल तर मुले ते खातील पण तो नाही. जाडीमुळे डायबेटिस चे प्रमाण वाढले आहे. बाहेर ही ज्या गोष्टी मिळतात त्या पण खूप फॅटी असतात. आणि लोकांचे बाहेर खायचे प्रमाण भरपूर. जंक फूड हे लहान मोठे सगळ्यांना पटकन आवडते. बरे शाळेच्या पॅनेलवर डॉक्टर असतात, न्युट्रीशनीस्ट असतात तरी असे का हे कळत नाही. बर्‍याच वेळा आपल्याला खूप काही करायचे असते पण आपण ते करू शकत नाही त्यातलाच हा प्रकार. आम्ही नुसतीच चर्चा केली.

कालचे भाषण ऎकून एवढे नक्की की पुढील ५-७ वर्षात शाळेत जरा चांगल्या गॊष्टी मुलांना खायला मिळतील. कारण हा निर्णय सरकारी पातळी वरून घेतला जाणार आहे आणि बरेच लोक त्यात सामील असतील. माझ्या दृष्टीने फ़र्स्ट लेडी म्हणून मिशेल ओबामा ने उचललेले हे पाउल अतिशय स्वागतार्ह आहे. (कदाचित मला बरेच दिवस जे करायचे होते ते आता होईल म्हणून)

Tuesday, January 26, 2010

बळी तो कान पिळी

बळी तो कान पिळी

आजकाल खूप वेगळ्या विषयावर सिनेमा निघत आहेत. पूर्वीच्या प्रेमाच्या त्रिकोणातून बाहेर पडत आहे. काही हलके फुलके तर काही विनोदी तर काही गंभीर सगळे विषय हाताळले जात आहेत. मराठी सिनेमाही याला अपवाद नाही. प्रत्येकाला आपल्या आवडीचे काहीतरी बघायला मिळते आहे. काही चित्रपट मात्र ’आय ऒपनिंग’ या विभागात मोडतात. कालपरवाच ’जोगवा’ या सिनेमाला ५ राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचे वाचले. सर्व कलाकारांचे आणि दिग्दर्शकाचे अभिनंदन. विशेष म्हणजे अमराठी गायकांना बक्षिस मिळाले आहे.

या सिनेमातल्या काम अरणार्‍यांना घरे द्या, जोगत्यांना काम द्या वगॆरे गोष्टी पेपर मध्ये येत होत्या. कर्नाटकात अजूनही ही प्रथा चालू आहे हे पाहून फार विचित्र वाटते. आज आपण एकीकडे महासत्ता होण्याचे स्वप्न बघत आहोत आणि अजूनही अशा प्रथा चालू आहेत हा केवढा विरोधाभास आहे. पूर्वी काही कारणाने ही प्रथा सुरू झाली असेल पण आपण जसे आपल्या इतर परंपरात बदल करत गेलो तशा या गोष्टींना थांबवू नाही शकलो. माझे थोडे शिक्षण कोल्हापूर इथे झाले. तिथे अधून मधून यल्लमाची जत्रा बघायला मिळॆ. माझ्या वर्गात ही एक मुलगी होती ८ वी -९ वी त. तिला जट आली म्हणून थोडे दिवस वर्गात चर्चा चाले पण थोड्या दिवसात ते थांबले. त्या वेळेस एवढे काही कळत नव्हते पण त्या मुलीची मनःस्थिती अजूनही आठवते. ती खूप अस्वस्थ असे.

आता जोगवा ची खूप चर्चा होईल. असला विषय म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर नक्कीच चर्चा होणार कारण या भारताबहे्रच्या लोकांना असल्या विषयात भारी इंटरेस्ट. भारतात पण एका ठराविक वर्गात हा सिनेमा बघितला जाईल. पण प्रत्यक्ष जे लोक यातून जात आहेत त्यांच्यापर्यंत हा सिनेमा पोचवायचे काम कोण करणार? आजकाल टीव्ही तर सगळीकडे पोचले आहेत. सरकारने हे काम केले पाहिजे आणि त्यांना रोजगाराच्या दुसर्‍या संधी दाखवल्या पाहिजेत तरच या सिनेमाला मिळालेल्या राष्ट्रीय पारितोषकाला काही अर्थ आहे असे मला वाटते. हे काम सोपे नाही कारण नवीन प्रथा सुरू करणे सोपे आहे पण जुन्या प्रथा मोडणे अवघड असते. आपल्या अनट्चेबल बद्द्ल पण बाहेर खूप आकर्षण असते.

असेच काही सिनेमे जे मला खूप प्रभावी वाटले ते म्हणजे --




अर्धसत्य - पोलिस जीवनावर-ऒम पुरी,
देव - हिंदॊ मुसलमान वादावर..प्रत्येकाने एकदा तरी जरूर पहावा-ओम पुरी व बच्चन जबरदस्त अभिनय
वॉटर - बनारस मधील विधवांच्या जीवनावर ..याचे चित्रीकरण सुद्धा बनारस मध्ये न करता श्रीलंकेत करावे लागले
स्लमडॉग मिलिनेअर - भरपूर चर्चा होऊन पुढे काही फरक नाही
नटरंग - तमाशावाल्यांचे जीवन
कुर्बान - थोड्या फार प्रमाणात

हे सगळे सिनेमे खूप चांगले बनवले आहेत पण ते ज्या लोकांनी बघायला पाहिजेत तिथे पोचवले तर ते बनवणार्‍यांचे श्रम कारणी लागतील असे वाटते. थोडी लोक जरी बदलली, त्यांचे विचार बदलले तरच या सिनेमांचा काही उपयोग झाला असे वाटते. मी तर हे सगळे सिनेमा पाहून एवढेच म्हणीन ...बळी तो कान पिळी

Monday, January 18, 2010

सीमेपार बघताना ...

सीमेपार बघताना ...

आता २६ जानेवारी जवळ आली. सगळीकडे देशभक्तीपर गाणी, सिनेमा, प्रदर्शने वगॆरे सुरू होतील. याच सुमारास मी जम्मूला गेले होते त्याची आठवण झाली.
आमचे एक नातेवाईक आर्मी मध्ये आहेत. त्यांचे पोस्टींग जम्मू येथे होते. मी माझ्या मामाच्या फॅमिली बरोबर तिथे सुट्टीत गेले होते. ही गोष्ट २५ एक वर्षापूर्वीची आहे. त्यावेळेस जम्मू भागात एवढी गडबड नव्हती. त्यांचे घर जम्मूपासून थोडेसे बाहेर होते. आतमध्ये आर्मी चा सगळा कारभार. कोण कुणाकडे आले याची व्यवस्थित नोद. गेल्यावर आम्ही जम्मू बघायला दुसर्‍या दिवशी गेलो. जाताना वन ट्न या ट्रक सारख्या गाडीने आम्हाला सोडले गावात. तिथे गेल्यावर कुणाशी जास्त बोलायचे नाही अशी सूचना होती. नाहीतर फळ वाले, दुकानदार सहज चॊकशी करतात आणि माहिती काढून घेतात. अशी बरीच हेरगिरी चालते. आम्हाला हे सांगितले नसते तर लक्षातही आले नसते. आम्ही जम्मूतील मंदिर व इतर ठिकाणे बघून रात्री परत आलो. वाटेत कोणी लोकल भेटले की विचारायचे, "आप बंबई से हो? फिर आपको फिल्म ऍक्टर्स मिलते / दिखते हॆ क्या?" मग आम्ही सांगायचो ते काही असे रस्त्यातून हिंडत नाहीत. गम्मत म्हणजे आम्हाला हे प्रश्न विचारणार्‍या मुली इतक्या दिसायला छान असायच्या कि त्यांच्यापुढे आपल्या नट्या ठीक ठाक वाटत. पण सिनेमाचे वेड सगळीकडे असतेच.
तिथे असताना थोडीफार आर्मीच्या जीवनाची कल्पना आली. एकंदर खूप साहसाचे आयुष्य असते त्यांचे. टेन्शन म्हणजे काय याचा पुरेपूर अनुभव येतो त्यांना रोजच्या जीवनात. या सगळ्याच्या मध्ये विरंगुळा म्हणून पिकनिक ठरवतात.

आम्ही तिथे असताना असेच एक पिकनिक होते. परत त्या मोठ्या ट्रक मधून आम्ही गेलो. अगदी सीमेजवळ जायला मिळणार म्हणून थ्रिल वाटत होते. जाताना अंताक्षरी सारखे खेळ चालले होते. यात भाग घेणारे काही नुकतेच धाडसी कामे करून परत आले होते किंवा तिकडे जाणार होते. वाटेत एका खेड्यात थांबून संध्याकाळच्या जेवणासाठी चिकन खरेदी झाली. अगदी फ्रेश ....त्यानंतर सगळे वॉच टॉवर पाशी गेलो. तिथून एका बाजूला आपला टॉवर व काही अंतरावर पलीकडे त्यांचा. अध्ये थोडे कुंपण होते. त्या टॉवर वर आम्ही अगदी वर पर्यंत चढून गेलो. तिथे बसून नेहेमी सॆनिक आसपास नजर थेवून असतात. बराच उंच टॉवर होता. वरून सीमेपलिकडचा भाग दिसत होता. मनात थोडी उत्सुकता, थोडी का भरपूर भिती आणि छातीत धडधड अशी परिस्थिती होती. तसे बघितले तर इकडे आणि तिकडे सारखीच जमीन तशीच झाडे पण तो भाग शत्रूचा हे ते मधले कुंपण सांगत होते त्यामुळे लगेच बघण्याचा अर्थ बदलत होता. ते आणि आपण अशी सीमा मध्ये होती. सीमेपार बघत्ताना कसे वाट्ते याचा अनुभव घेता आला.
हे चित्र नेट वरून घेतले आहे कारण तेव्हा कॅमेरा न्यायला बंदी होती. पण साधारण याच्या तिप्पट उंच टॉवर होता.

आपण घरी बसून शांतपणे आपले रोजचे व्यवहार या सॊनिकांच्या जीवावर करत असतो. त्यांना २६ जानेवारीच्या निमित्ताने धन्यवाद.

Thursday, January 14, 2010

मी आणि माझा देश(मला माहित नसलेला)

मी आणि माझा देश(मला माहित नसलेला)

आपल्यापॆकी प्रत्येकाने लहानपणी काचेचे रंगीत तुकडे गॊळा करून कलायडोस्कोप मधून त्याची वेगवेगळी डिझाईन्स बघितली असतीलच. दर डिझाईन वेगळे, त्याचे रंग वेगळे. प्रत्येकाला ते वेगळे भासते. आपला भारत देश पण तसाच आहे, इतकी विविधता मला वाटते इतर कुठल्या देशात नसेल. अनेक धर्म, भाषा, चालीरीती, खाणॆ इथे नांदत आहेत. प्रत्येक आणि बाहेरचा माणूस त्याकडे जसा बघेल तसा त्याला तो दिसतो. बाहेरच्या देशात रहाताना बरेच वेळेला लोक प्रश्न विचारतात आपल्या देशातील या विविधतेबद्द्ल आणि बर्‍याच वेळेला आपल्याकडे खात्रीलायक उत्तर नसते. भारताबाहेर रहाताना मला नेहेमी हे वाटते (मिडल इस्ट व अमेरिका) की याबाबतीत शिक्षण खाते काहीतरी करू शकेल. भारताबाहेर कशाला, भारतात रहाणार्‍यांनाही याचा खूप उपयोग होईल.

तुम्ही म्हणाल आजकाल इंटरनेट वर सगळे मिळते पण सगळ्यांकडे ती सोय असेलच असे नाही. आपल्या देशाची ही विविधता जर शाळेपासून शिकवले गेली तर फार चांगले कारण तॊ वर्षे फार महत्वाची असतात. आणि पुस्तक वाचण्यापेक्षा डिव्हीडी बघितली तर मुलांच्या चांगले लक्षात रहाते. शाळेचे ऑफ पिरीयड त्यासाठी वापरायला हरकत नाही. प्रत्येक प्रांताची एक आणि पूर्ण भारताची एक अशा दोन डिव्हीडीज बनवाव्यात. त्यामध्ये त्या प्रांताचे सण वार, खाणे , कला,पर्यटनाची ठिकाणे, थोडा इतिहास, कपडे यांचे फोटो , जमल्यास व्हिडिऒ टाकावे. अगदी डिटेल् नाही बनवले तरी हरकत नाही पण साधारण कल्पना आली पाहिजे. महाराष्ट्र असेल तर त्यावर किल्ल्यांची लिक असावी. यामध्ये वेगवेगळ्या धर्मांबद्दल पण माहिती दिली पाहिजे म्हणजे लहान पणापासून दुसर्‍यांच्या धर्मात काय असते हे कळेल व कदाचित एकमेकांच्या धर्मांबद्द्ल आदर वाढेल(?)

आपण लहानपणापासून आपल्या भोवतीची माणसे बघत बरेच काही शिकतो. आपल्याला जर पर प्रांतीय परधर्मीय मित्र असतील तर थोडी त्यांच्या रीतींची माहिती होते. पण प्रत्येकाला हा चान्स असतोच असे नाही. बाहेरच्या देशात गेलो की आपल्याला बरीच माहिती कळते. मला तर किती दिवस साउथ इंडियन सगळे सारखे वाटायचे जेव्हा त्यांच्यात मिसळले तेव्हा त्यांची माहिती कळली. आता तुम्ही म्हणाल इतिहास भूगोलात हे सगळे असतेच ..पण अभ्यास म्हणून पाठ करण्याऎवजी मुलांना डिव्हीडी वर बघितले की पटकन लक्षात रहाते.

आपल्याकडे टॅलटची कमी नाही, टेक्नीकल नॉलेज खूप जणांना असते. अशा डिव्हिडीज बनवणे सहज शक्य आहे. मझाही प्रयत्न चालू आहे. बघू केव्हा प्रत्यक्षात येते ते.

Tuesday, November 10, 2009

खरेच गरज आहे का?

खरेच गरज आहे का?

आजकाल सेवाभावी संस्था बर्‍याच वेळेला काही ना काही कारणाने पॆसे जमवत असतात. कधी नॅचरल कलॅमिटीज तर कधी शाळेला मदत तर कधी निराधार मुलांना मदत. आता हे पॆसे जमवताना खूप वेळा लोकांना नाही म्हटले तरी प्रेशर येते. बरे ही मदत प्रत्यक्ष हवी तिथे जाते का नाही हे बर्‍याच वेळेला समजत नाही. विश्वासावर सगळे चालू असते. काही सेवाभावी संस्था आणि स्वयंसेवक यांच्या सहकार्याने हे काम चालू असते. आता आपण शक्य असेल तर दुसर्‍याला मदत करावी हे सगळ्यांनाच वाटते पण ती आपल्याला हवी तिथे करण्याची सोय हवी. सोशल प्रेशर खाली करायला लागू नये. प्रत्येकाने हवे तिथे जाउन मदत केली की करणार्‍यालाही बरे वाटते.

अमेरिकेतून अशी मदत करणार्‍या कॆक संस्था आहेत. बरे भारतातील लोकांशी बोलताना नेहेमी अमेरिका विरोधी सूर जास्त दिसतो. असे असले तरी मदतीची अपेक्षा असतेच. तुमच्याकडे लोकसंख्या कमी म्हणून सगळे शक्य असा एक सूर असतो आणि हे करायलाच पाहिजे असेही बर्‍याच लोकांचे म्हणणे असते. जेव्हा नॅचरल कलॅमिटीज येतात तेव्हा शक्य तेवढी मदत केली पाहिजे पण आता भारतात शाळा, निराधार मुले यांना मदतीची खरंच गरज आहे का? सध्या अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा पुरवण्याची क्षमता मला वाटते आता देशाकडे नक्की आहे.

शहरांपासून जरा दूर गेले की हे प्रॉब्लेम्स दिसतात. शाळा, दवाखाने यांच्या अपुर्‍या सोई...अगदी पुण्याच्या जरा बाहेर गेले की हे चित्र दिसते. आता वेगवेगळे बिजिनेसेस, काही मोठी देवळे , आणि काही ट्रस्टस यांच्याकडे एवढा पॆसा आहे कि तो नक्कीच पुरा पडेल. कमी आहे ती फक्त नियोजनाची. आता नवीन सरकार, नवीन विचाराची माणसे आली आहेत ती हे काम पुढे नेउ शकतील आणि जास्तीत जास्त लोकांच्या मूलभूत गरजा भागवतील असे वाटते. देशाबाहेर राहिले की हे नेहेमी जाणवते अरे आपल्या देशात जर एवढी लोकसंख्या आहे तर तिचा उपयोग करून घ्यायला हवा. बाकी प्रगती होत आहे तर या गोष्टीकडे पण सरकार ने लक्ष दिले पाहिजे. आपल्या कडे पॆसा आहे, धान्य आहे, स्किल आहे. या गोष्टी फक्त व्यवस्थित पणे सगळ्या लोकांपर्यंत पोचायला हव्यात.

Thursday, November 5, 2009

आउट इन द ओपन......

अमेरिकेत आल्यावर इथले रहाणे, खाणे याची सवय व्हायला फार वेळ लागला नाही. मुलीची शाळा पण चांगली होती. सॊदी अरेबिया सारख्या ठिकाणाहून येउनही ती पटकन रूळली.( दोन्ही कल्चर मध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे) मित्र मंडळ, फिरणे, वगॆरे व्यवस्थित चालले होते. एकंदर इथला फ्रीडम बघून छान वाटत होते.

अशात एकदा शाळेत बॉंब ठेवल्याची बातमी आली. शाळेला अशा गोष्टींची सवय असावॊ पण आम्ही फुल टेन्शन मध्ये. त्यांनी व्यवस्थित परिस्थिती हाताळली व एका मुलाला पकडले. नंतर शाळॆमध्ये एखाद्या मुलाने गोळीबार करणे, एखाद्या ऑफिसमध्ये लोकांना ऒलिस ठेवणे अशा बर्‍याच बातम्या वाचनात येत असत. आणि शेवटी एक ऒळ असे... मारेकर्‍याने स्वतःला मारून घेतले. दोन मॊठ्या युनिव्हर्सिटीत हा प्रकार घडला आणि नाहक अनेक निरपराध मुलांचा जीव गेला. इथल्या लोकल मुलांबरोबर अगदी बाहेर देशातून इथे शिकायला आलेली अनेक मुले यात बळी गेली. इथे बंदूक मिळवणे हा फार अवघड प्रकार नसल्याने अशी मुले हे प्रकार करू शकतात.
बरे त्यातून त्याना काही मिळते असेही नाही कारण शेवटी ती स्वतःला पण गोळी घालून घेतात. अर्थात त्यांची मानसिक अवस्था त्याला कारणीभूत असते बर्‍याच वेळेला.

इथल्या शाळेमध्ये मुलांची संपूर्ण माहिती ठेवलेली असते. अगदी लहानपणापासून त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे चेकिंग होते. स्किल्स डेव्हलप मेंट, स्पीच डेव्हलपमेंट वगॆरे आणि ठराविक लेव्हल च्या खाली असलेल्या मुलांसाठी वेगळ्या शाळॆची सोय असते याला स्पेशल एड स्कूल्स असे म्हणतात. भारतात मतिमंद, गतिमंद यांच्या शाळा पाहिल्या होत्या. ब्लाइंड स्कूल्स, अपंग मुलांसाठी शाळाही बहितल्या. इथे ज्या मुलांना नेहेमीच्या सूचना समजत नाहीत त्यांना अशा स्पेशल एड शाळेत घालतात. त्यात ऑटिस्टिक मुले असतात, काही बायपोलर असतात ज्यांना मूड स्विंग्ज खूप असतात तर काही स्लो लर्नर असतात. लहान पणी हा फरक तसा खूप धूसर असते. बरीच मुले मेडिसिन वर असतात. ही मुले कधीतरी खूप चिडतात आणि कंट्रोल जातो. त्यांना साभाळण्याचे ट्रेनिंग शिक्षकांना दिलेले असते. ह्या शाळांसाठी सरकार कडून मदत ही होते. त्यांना शक्य तितके नॉर्मल मुलांसारखे ठेवायचा प्रयत्न करतात.

हे सगळे ठराविक वयापर्यंत चालते. त्यानंतर ही मुले स्वतंत्र असतात. ज्यांच्या मागे कुणी काळजी करायला असेल त्यांची काळजी घेतली जाते,, बाकीची मात्र स्वतंत्र रहात असतात. कधी त्यांचे मानसिक संतुलन ढळले की ती चिडतात आणि अशा बातम्या वाचायला मिळतात. अर्थात प्रत्येक घटनेमागे अशीच मुले असतात असे नाही. हे सगळे प्रकार कशाने होतात यावर संशोधन चालू आहे. घटस्फॊट, दारू अशी बरीच कारणे असू शकतात या मेंदूतल्या गडबडीला. नक्की काहीच सांगता येत नाही. भारतात पण अशा प्रकारची मुले असत्तातच ती पण असे काही प्रकार करत असतातच. खून, मारामर्‍या यांच्या बर्‍याच बातम्या येतात. हे सगळे पाहून मला मात्र काही दिवस प्रत्येक मुलाकडे पाहिले की वाटायचे, हा काही मेडिसिन वर तर नसेल, बाय पोलर तर नसेल कारण दिसायला इतर मुलांसारखीच दिसतात. आता हळूहळू सवय झाली आणि आपण काही करू शकत नाही हेही लक्षात आले.

डॉक्टर लोकांना यामागची कारणे शोधण्यात लवकर यश यावे एवढेच आपण म्हणू शकतो.

Sunday, August 9, 2009

धर्माची गोष्ट

धर्माची गोष्ट

तुमच्या हिंदू धर्मात इतके देव कसे? तुम्ही दगडाच्या स्टॅच्यू ची पूजा कशी करता? तुमच्या देवांची तर चक्क फॅमिली असते ना? ते आपल्यासारखे दागदागिने कसे घालतात? तुमचा कृष्ण प्ले बॉय होता का? इंडिया मध्ये सगळे हिंदूच असतात का? तुमच्या राजांना एवढ्या राण्या (बायका) कशा असतात ? तुम्ही कुठले पुस्तक फॉलो करता? (बायबल, कुराण सारखे), शिवलिंगामागे काय कल्पना आहे? तुमच्याकडे सती प्रथा अजून आहे का? आणि अनटचेबल्स असतात का? अरे हो किती प्रश्न...जगात लोकांना हिंदू देव देवतांबद्द्ल आणि आपल्या धर्माबद्द्ल एवढे प्रश्न असतील असे भारताबाहेर राहिल्याशिवाय लक्षात येत नाही. इतर काही माहिती असो वा नसो या गोष्टीत फार इंटरेस्ट. शाळात, नोकरीच्या ठिकाणी, प्रवासात अनेक लोक तुम्हाला सतत असे प्रश्न विचारून कोड्यात टाकत असतात.

आपण आपल्या देशात आपल्या माणसात असतो तेव्हा मुले वाढताना त्यांच्यावर आजूबाजूच्या गोष्टीमुळे आपोआप संस्कार होत असतात. सण वार, मित्र मंडळी, घरातले वातावरण या सगळ्याचा त्यांच्यावर कळत नकळत परिणाम होत असतो. आजकाल चे युग आहे ग्लोबलायझेशन चे. त्यामुळे जगभर आपली मंडळी विखुरली आहेत. मुले बाहेरच्या जगात वेगवेगळ्या संस्कृति मध्ये मिसळत आहेत. अनेक सणवार तिथे साजरे केले जातात. इतर मुलेही त्यात सामील होतात. साहजिकच आपल्या मुलांना प्रकारच्या प्रश्नांना त्यांना तोंड द्यावे लागते. भारताबाहेर रहाणार्‍या मुलांना बरेच वेळा संस्कार वर्ग, हिंदू धर्माबद्दल लेक्चर्स किवा इंटरनेट अशा ठिकाणातून मुले आपली मते बनवत असतात. आजकालचे पालक वेळ नाही या नावाखाली मुलांना एखाद्या संस्कार वर्गात घालतात व आपली जबाबदारी संपली असे म्हणतात. खरे तर आपला धर्म कळायला घराच्या बाहेर जायला लागावे ही नामुश्कीची गोष्ट आहे. या गोष्टी घरातून, मोठ्यांच्या वागणूकीतून मुले नकळत शिकत असतात.

आजकाल मुले काहीही अडले की गुगलबाबाचा आधार घेतात. या विषयावर हजारो साईट्स उपलब्ध आहेत पण त्यातल्या उपयुक्त किती हे बघितले तर फार कमी साईटस सापडतात. आपला धर्म खूप जुना आहे. अनेक लोकांचे चांगले विचार एकत्र होऊन तो तयार झाला आहे. काळानुसार, प्रांतानुसार त्यातील बंधने कमी झाली आहेत. त्यात अनेक चांगल्या लोकांचे विचार एकत्रित आहेत म्हणून तो अजूनही टिकला आहे.

हिंदू धर्मामध्ये पुनर्जन्म हा एक मुद्दा लोकांना पटत नाही. आजकालच्या पिढीला सगळ्या गोष्टींचे प्रूफ हवे असते आणि ही गोष्ट अजून झालेली नाही. लॉजिकली त्याचे बरेच स्पष्टीकरण देतात पण सायन्स ने अजून त्याचे सर्वाना समजेल असे प्रूफ दिलेले नाही. तुम्ही जोपर्यंत सगळ्यांना समजेल असे प्रूफ देत नाही तोवर लोक ते ग्राह्य धरत नाहीत. फिलॉसॉफी चा आधार घेउन बरेच स्पष्टीकरण दिले जाते पण सामान्य लोकांना ते समजणे अवघड असते. त्यामुळे आमचा हा विश्वास आहे किंवा आम्ही हे मानतो असे म्हटले तर समोरचा थोडा शांतपणे ऎकतो. श्रद्धा हा सगळ्या धर्माचा पाया आहे. (अंधश्रद्धा नव्हे). तसे इजिप्त चे जुने लोक ही आफ्टर लाईफ वर खूप विश्वास ठेवायचे.

दुसरा एक गॆरसमज म्हणजे हिंदू धर्मात खूप देव आहेत असे नेहेमी बाहेरच्या लोकांना वाटते कारण ते ठिकठिकाणी मंदिरे बघतात आणि त्यात अनेक वेगवेगळ्या मूर्ती असतात. आपल्याला पटेल, आवडेल अशा रूपात आपण देव बघू शकतो पण शेवटी सगळे एकच देव मानतात हे लोकांना पटत नाही कारण इतर धर्मात बहुधा एक देव मानतात. आणि त्यांना हा फ़्रीडम नाही.

बाकी आपल्याकडे आणि इतर धर्मातही चांगले वागण्यासाठी नियम करून दिलेले आहेत. त्यासाठी वेगवेगळी उदाहरणे दिली जातात. आपल्याकडे जसे हवे त्या देवाची पूजा करता येते तसे धार्मिक पुस्तक ही अमूक एकच वापरा असे बंधन नाही. हे बंधन नसणे बाहेरच्या लोकांना पटकन पटत नाही. गीता वाचली नाही तरी हिंदू माणूस हिंदूच रहातो. देवळात जाणे, पूजा करणे, उपास तापास व्रत वॆकल्ये या गोष्टी म्हणजे एक रस्ता आहे आपल्या धर्माने दाखवलेला, तॊ रस्ता घ्यायचा का आपला स्वतःचा हे तुम्हीच ठरवायचे असते.

स्वामी विवेकानंदांनी म्हटले होते की मुलांना लहानपणापासून शाळेत मॊरल सायन्स हा विषय शिकवला पाहिजे. त्यात इतर धर्माबद्दल माहिती दिली पाहिजे. म्हणजे मुले इतर धर्माचा आदर करतील व त्यांना माहिती पण होईल. गॆरसमज दूर होतील. हया विषयाला आपल्या शाळेत फार कमी महत्व दिले जाते. त्यांनी त्या काळी दूर दृष्टीने अशा बर्‍याच सूचना केल्या होत्या पण त्याला कमी महत्व मिळाले नाहीतर आज वेगळा भारत बघायला मिळाला असता.

भारतात इतके धर्म एकत्र नांदू शकतात कारण हिंदू धर्म खूप सहनशील आहे. आजकाल धर्माच्या आडून सगळी भांडणे होतात. जी गोष्ट लोकांना एकत्र आणायला उपयोगात यायला हवी तीच आज लोकांना एकमेकांविरूद्ध करते आहे, आणि याला कुणी कंट्रोल करू शकत नाही. आमचा धर्म सगळ्यात चांगला असे म्हणण्याऎवजी आमचा धर्म आमच्यासाठी चांगला असे जर म्हटले तर काही प्रमाणात परिस्थिती बदलेल. यासाठी लहानपणापासून बरोबर गोष्टी शिकवण्याची गरज आहे.

हिंदू धर्म हा खूप जुना आहे. बाकीचे धर्म अजून नवीन आहेत कदाचित हळूहळू त्यांच्यातही बदल होईल. आपल्या धर्मात अनेक देवांची उपस्थिती पाहून काही मंडळी विचारतात की मग आमचा अल्ला, आमचा येशू तुमच्या धर्मात कुठे बसतो? मला वाटते मुलांनी जर आपल्या धर्माबद्दल बेसिक माहिती घेतली, (ईंटरनेट वरून, कुणा वडिलधार्‍याकडून किंवा पुस्तकातून) तर अशा प्रश्नांची उत्तरे देणे सोपे जाईल, तुम्हाला काय वाटते?

Sunday, July 19, 2009

आग होती पण धग नव्हती...

परवा ’लज्जा’ ही तस्लीमा नसरीन यांनी लिहिलेली कादंबरी वाचली. बाबरी मशिद पाडल्यावर बांगला देशात बरीच जाळपोळ, लुटमार झाली त्या पार्श्वभूमीवर ही कादंबरी लिहीली आहे. अल्पसंख्यांक लोकांना जगभर हयाची झळ पोचली. या कादंबरीच्या लिखाणानंतर लेखिकेला बराच त्रास सहन करावा लागला. या पुस्तकाच्या बर्‍याच प्रती खपल्या. पुस्तक वाचल्यानंतर सहजच विचार आला, आपण त्या वेळी कुठे होतो, काय परिस्थिती होती वगॆरे...आम्ही त्या वेळी रियाध, सॊदी अरेबियात होतो. हा देश मुस्लीमांचा आहे. ही मंडळी धर्माने अगदी बांधलेली असतात. शेजारी पाजारी, दुकानदार सगळेच आजूबाजूला मुसलमान. मी त्यावेळी इंडिअन स्कूल मध्ये नोकरी करत होते. तिथेही ८०% मुस्लीम, १०% इतर व १०% हिंदू असे साधारण प्रमाण होते. शाळेत वातावरण खूप मोकळे होते. हिंदू, ख्रिश्चन, सिक्ख सगळेच एकमेकांशी ऒपनली बोलत असत. कधी चेष्टा, कधी टीका, कधी थोडीशी वादावादी पण सगळे स्पोर्टिंगली चालत असे.

बाबरी मशिद पडल्याची बातमी ऎकली. हळूहळू टी व्ही वर सतत बातम्या दाखवू लागले. थॊड्याच वेळात हळूहळू वातावरणात टेन्शन दिसू लागले. जाळपोळ लूटालूट यांची दृष्ये टी व्ही वर येउ लागली. आम्ही शाळेत असताना मुलांच्यात साहजिकच चर्चा होऊ लागली. आमच्या नेहेमीच्या मॆत्रिणींच्या नजरेत थोडासा बदल दिसून येत होता. पण हे सगळे १०-१५ मिनिटेच टिकले. दिवसभर थोडासा ताण होता वातावरणात पण सगळे व्यवहार नेहेमीप्रमाणे चालू होते. काही पालकांनी आवाज केला पण त्यांना शाळेने समज दिली. सॊदी अरेबियात जमाव बंदी, मोर्चा बंदी असल्याने आणि शिक्षा कडक असल्याने गावात शांतता होती. संध्याकाळी बाजारात अथवा गावात हिंडताना काही भिती वाटली नाही. तसे सगळ्यांना कळत होते की मूठभर माणसांचे हे काम होते आणि त्यात नाहक दोन्हीकडचे लोक बरेच दिवस भरडले जाणार होते. पुढील एक दोन दिवसात सतत बातम्या येत होत्या , एका मशिदीच्या पाडण्यामुळे अनेक देवळे पाडली गेली, हिंदू मुस्लीम दंग्यात अनेकांची घरे जाळली गेली, आणि परिस्थिती हाताबाहेर गेली. ही सगळी गोळाबेरीज बघताना वाटले की जो मूळ उद्देश होता तो साधला गेला का?

आजपर्यंत जेवढे दंगे झाले तेव्हा असे दिसले की काही माणसांच्या चुकीच्या वागणूकीने त्या गोष्टीशी संबंध नसलेले अनेक लोक उगाचच भरडले जातात. आजकाल ग्लोबलायझेशनमुळे जगभर सर्व धर्माची माणसे पसरलेली आहेत. त्यात अर्थातच अल्पसंख्यांक नेहेमी बळी पडतो. ही परिस्थिती कधी सुधारेल का? सर्व धर्म जर चांगले वागा अशी शिकवण देतात तर दुसर्‍याच्या धर्माचा आदर करायला लोक का शिकत नाहीत? आपल्याकडे शाळेत मॉरल सायन्स नावाचा एक विषय कधी कधी शिकवला जातो (बहुधा तो ऒप्शनला टाकला जातो) त्याला जास्त महत्व दिले गेले आणि लहानपणापासून जर इतर धर्माबद्द्ल पण माहिती दिली गेली तर कदाचित थोडा बदल घडेल. ( विवेकानंदांनी हे बर्‍याच वर्षापूर्वी लिहून ठेवले आहे) आपल्या देशाचा इतिहास बघता युद्धापेक्षा जास्त माणसे या दंग्यात मारली गेली असतील. फाळणी, गोध्रा हत्याकांड, मुंबई हल्ले, अक्षरधाम हल्ला, ईंदिरा गांधी मृत्यु व असे बरेच प्रसंग बघता या परिस्थितीत कधी बदल होईल असे वाटत नाही. त्यावर बरेच सिनेमे निघाले चर्चा झाल्या पण दर वेळेस पुन्हा नव्याने तेच. अमेरिकेसारख्या अगदी प्रगत राष्ट्रात सुद्धा ९-११ चा विषय निघाला की एशिअन लोकांकडे बघायची नजर बदलते. आणि यात मला हे वागणे फार चुकीचे वाटत नाही. ’ज्याचे जळते त्याला कळते’ या नुसार ज्याचा पर्सनल लॉस होतो तो माणूस नक्कीच पेटून उठतो. अशावेळी सदसदविवेक बुद्धी ने विचार करणे सामान्य माणसाला जमत नाही.

दोन दिवसांनी आम्ही सुटीसाठी भारतात गेलो. एअर पोर्टवर खूप टेन्शन दिसत होते. आम्हाला पटकन मुंबईच्या बाहेर पडायला सांगितले. आजूबाजूला दंगलीच्या खुणा दिसत होत्या, तेव्हा आम्हाला या प्रकारातल्या गांभीर्याची कल्पना आली. आम्ही भारताच्या बाहेर अगदी मुस्लीम अड्ड्यात होतो पण तसा त्रास काही झाला नाही. आम्ही अगदी आगीच्या जवळ होतो पण नशिबाने धग मात्र लागली नाही.