इतिहास माणसाच्या संस्कृतिचा...भाग १
कालच बातमी वाचली की जगाच्या उत्पत्तीचा नकाशा तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. ग्रह, तारे, आकाशगंगा कसे आणि कधी तयार झाले याबाबत माहिती दिलेली आहे. हा सगळा अवकाशाचा इतिहास नकाशात बंदिस्त करण्यात मनुष्य यशस्वी झाला आहे. अशीच माहिती देणारी एक ६ भागातील मालिका आता history channel वरून दर मंगळवारी प्रसारित होत आहे. माणसाच्या सुरूवातीपासून कसा कसा तो घडत गेला आणि उत्क्रांत होत गेला यावर माहिती आहे. मला बरेच दिवसापासून यावर लिहायचे होते, आता काम सोपे झाले. या सेरीज मध्ये काही गोष्टी पटत नाहीत, काही गाळल्या आहेत तर काहींना महत्व कमी दिले गेले आहे असे वाटते पण तरीसुद्धा सगळे एकत्रित करण्याचा चांगला प्रयत्न आहे. तुमचा मते-माहिती यावर मांडलीत तर अजूनच ही मालिका पूर्ण वाटेल. आपण इतिहासात या गोष्टी शिकतो पण त्याचे कनेक्शन विसरतो. माझ्या मते ज्या गोष्टींचे लिखित स्वरूपात काहीतरी शिल्लक आहे त्यांना यात स्थान दिले आहे. भांडणे कमी व्हावीत हा हेतू असावा, कारण इतिहास म्हटला की वाद आलेच, असो.....
बिग बँग ने या विश्वाची निर्मिती झाली. ग्रह, तारे, आकाशगंगा तयार झाले. आपली पृथ्वी त्यातलीच एक. आत्तापर्यंत माहिती असलेला हा एकच ग्रह आहे की ज्यावर पाणी आणि वातावरण दोन्ही आहे. हे दोन्ही जीव जगवण्यासाठी पूरक आहे. १३ बिलिअन वर्षानंतर मनुष्यप्राणी अस्तित्वात आला. सुरूवात पूर्व आफ्रिकेत झाली. आपल्या सगळ्यामध्ये त्या लोकांच्या डी एन ए चा काही तरी अंश आहेच. रिफ्ट व्हँलीत पहिली माणसे रहात होती. अग्निचा उपयोग करून अन्न शिजवले जाउ लागले. अग्नि ज्वलनासाठी आवश्यक त्या गोष्टी असल्याने माणसाला त्याचा फायदा करून घेता आला. चांगले अन्न मिळाल्याने मेंदूची वाढ झाली, तो आधीपेक्षा आकाराने दुप्पट झाला. त्याच्या गुंतागुंतीच्या रचनेने माणूस विचार करायला शिकला. त्या वेळेस १०००० लोक पृथ्वीवर होते(सध्या १ तासात तेवढे जन्मतात) याच सुमारास पृथ्वीचा अॅक्सेस कलल्याने तापमान घटले व बराच भाग बर्फाखाली गेला. या थंडीला न जुमानता काही लोक नवीन जागेचा शोध घ्यायला बाहेर पडले. थंड हवेशी सामना करण्यासाठी कातडीचे कपडे शिवायला माणूस शिकला. आगीपासून उब घेत गुहेत रहायला शिकला. या गुहांमध्ये त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा दिसतात. आपण नेहेमी म्हणतो की लोक फार गोष्टीवर कोरतात, आपली नावे लिहितात किंवा चित्रे काढतात पण याच सवईमुळे त्यांच्या पाउलखुणा आपण बघू शकलो.
१०००० बी सी मध्ये १ मिलिअनन पर्यंत लोकसंख्या गेली. बर्फाचे रूपांतर पाणी व पावसात होउन गवत उगवले. त्यातून धान्यनिर्मिती झाली. कुणा एका बाईने फेकून दिलेले धान्य उगवते हे पाहिले व धान्य पेरले जाउ लागले. धान्यामुळे खात्रीचा जगण्याचा मार्ग मिळाला. हळूहळू या शेताजवळ लोक वस्ती करायला लागले. ३००० बी सी मध्ये इंग्लंड च्या आसपास खेडी वसली.व लोकवस्ती वाढू लागली. धान्य व पाळीव प्राण्यानी माणसाला जगण्याचा मार्ग दिला तसेच रोग व भांडणेही दाखवली. त्यावेळत्या उत्खननात १० पैकी एकजण मारामारीत मेलेला सापडला. याचवेळेस जगात हळूहळू धर्मांचा उदय झाला. जी लोक गेली त्यांची आठवण म्हणून स्टोन हेंज ची निर्मिती युरोपात झाली, त्याचवेळेस पिरँमिडस ची निर्मिती सुरू झाली.
खूफू राजाने हे बांधकाम सुरू केले. ३५००० कामगार २० वर्षे हे काम करत होते. त्यासाठी २ मिलिअन दगड वापरले गेले. हे एवढे बांधकाम करणे सोपी गोष्ट नव्हती. त्यासाठी शिस्तबद्ध कामाची गरज होती.
त्यावेळेस चित्रलिपी चा आधार घेउन लिहिले गेले व हे भव्य काम पूर्ण झाले. आजही तिथे गेलो की थक्क व्हायला होते. लाइम स्टोन ने दिलेला मुलामा व सोनारी कळस आता शिल्लक नाही पण तरीसुद्धा ५००० वषापूर्वीचे काम बघून आपण थक्क होतो.
याचवेळेस मिडल इस्ट मध्ये छोटी गावे उदयाला येत होती. आताचे टर्की त्यापैकीच एक. शेतकरी हत्यारे वापरू लागले होते आणि व्यापाराला सुरूवात झाली होती. टिन चा शोध लागला होता. त्यानंतर ब्राँझ चा शोध लागला आणि पुढील २००० वर्षे युद्धात व इतरत्र त्याचा वापर झाला. याच सुमारास पहिले ट्रॅक रेकाॅर्ड ठेवला गेले. इडी ने फरशांवर आपले हिशोब व माहिती कोरून ठेवली आहे. व्यापारासाठी लोक युरोप, भारतात व आजूबाजूला पसरले.
इकडे इजिप्त मध्ये मोझेस ३ राजा होता. त्यावर सूदान मधून १२००० सैन्यासह हल्ला आला. त्यांना हरवून इजिप्शिअन राजानी आपले वर्चस्व सिद्ध केले. ही सगळ्यात पहिली िलखित लढाई समजली जाते. त्यानंतर त्या लोकांनी ४००० स्क्वेअर माइल्स एवढे आपले साम्राज्य पसरवले. सूर्याची किरणे पोचतात तिथपर्यंत त्यांचे राज्य आहे असे ते म्हणत. नंतर तिथे बरेच राजे झाले, राजांना देवाचा दर्जा दिला जाउ लागला. आफ्टर लाइफ, पिरॅमिडस भरपूर बांधले गेले. पुढे हे राज्य लयाला गेले. समूद्रातून आलेले हल्ले परतवणे त्यांना जमले नाही. नवीन शत्रू जास्त सामर्थ्यशाली होता. शस्त्रांनी परिपूर्ण होता.
यानंतर आयर्न युग सुरू झाले. त्याने सगळे भविष्य बदलले. पृथ्वीचा गाभा लोहाचा बनलेला आहे. कोळसा, लाकूड यांच्याबरोबर हे खनिज तापवून हत्यारे बनवण्यात आली. ती हत्यारे जास्त टिकाउ व तीक्ष्ण होती. त्यावेळेस कोळसा बनवण्यासाठी ७० मिलिअन एकर झाडे पाडली गेली. या लोखंडी हत्यारामुळे दणकट बोटी बनवता येउ लागल्या. फिनिश लोक यात सगळ्यात पुढे होते. अतिशय धाडसी व नवीन गोष्टींचा शोध घेण्यास तयार असल्याने ते अटलांिटक वर सत्ता गाजवू लागले. त्यांनी बोटींसाठी कील बनवले, ज्यायोगे बोटी स्थिर राहू लागल्या व ते अजून सामर्थ्यवान झाले. त्यांच्या बोटीच्या प्रवासात त्यांनी माउंट कामारून हा आफ्रिकेतला ज्वालामुखी पाहिला. त्यातून येणारी आग, धूळ पाहून त्याला त्यांनी देवाचा रथ असे नाव दिले. या लोकांची अजून एक महत्वाची कामगिरी म्हणजे त्यांनी जगाला २२ अल्फाबेटस दिली. त्यामुळे शिकणे व संदेश सोपे झाले. वाटेत एका बेटावर त्यांनी गोरिला पाहिल्याची नोंद आहे व त्याला ग्रेट एप असे म्हटले होते. ती माणसांची पूर्वज असावीत असा निष्कर्ष ही काढला होता आणि हे सगळे डार्विन च्या सिद्धांतापूर्वी २५०० वर्षे.
या काळात अध्यात्मिक विचारांचे वारे ही हळूहळू पसरू लागले होते. भारतात हिंदूइझम, हिमालयाच्या पायथ्यापासून पूर्वेकडे बुद्धीझम आणि चीन मध्ये कन्फ्यूशिअस पंथ पसरू लागला होता. मिडल ईस्ट च्या बाजूला ग्रीस मध्ये अनेक लढवय्ये होते. स्पार्टा त्यातील एक राज्य. हे लोक लढवय्ये म्हणून प्रसिद्ध. मुलगा ७ वर्षाचा झाला की त्याला लढाईचे शिक्षण देत. सर्व प्रकारात पारंगत करत. त्यांच्यावर जेव्हा पर्शिअन सैन्य चालून आले तेव्हा लढायचे का शरण जायचे हा प्रश्न पडला. सर्वसामान्य नागरिकांचे मत घेतले गेले व लढायचे ठरले. त्याकाळी असे पहिल्यांदाच घडले की सगळ्यांची मते घेउन लढाईचा निर्णय घेतला गेला व अतिशय पद्धतशिरपणे एकत्र राहून शत्रूचा हल्ला मोडून काढला. कमी सैन्य असताना देखिल ही लढाई अथेन्सने जिंकली. आपल्या आजच्या लोकशाही पद्धतिची सुरूवात या लढईत झाली. या जया बद्दल पार्थेनान ची उभारणी झाली. त्यात अथेना देवीचे मंदिर आहे.
याच सुमारास चीन मध्ये liquid iron set करून हत्यारे बनवायचा शोध लागला.
त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हत्यारांची निर्मिती होउ लागली व युदध जिंकणे
सोपे होउ लागले. सुरूवातीचे क्राँस बो हे सुद्धा अतिशय चांगले होते. त्या वेळच्या राजाने एकमेकात लढणारे सगळे भाग एकत्र करून चायना ला नावारूपास आणले व मोठे राज्य स्थापन केले. All creatures under heaven असे त्याचे वाक्य होते.यामुळे चायना जास्त बलवान झाले.
राज्याचे रक्षण करण्यासाठी The great wall of China chi nirmiti zali. त्यासाठी अमेक कामगारांनी आपले प्राण गमावले. अनेक वर्षे हे बांधकाम चालले. होते. दर युद्धात नवीन शोध लागतात व रक्षणासाठी किंवा विजयानंतर मोठी बांधकामे होतात हे तेव्हापासून दिसते.

हा राजा अमरत्वाच्या मागे लागला होता. त्याला दिल्या जाणारे औषध हेच शेवटी जीवघेणे ठरले. तेव्हा आफ्टर लाइफ च्या नावाखाली त्याच्या बरोबर त्याच्या बायका व मुले यांनाही पुरले. हे स्मारक टेकडी, झाडे व पाणी याखाली अनेको वर्षे बंद राहिले. १९७१ च्या सुमारास त्याचे उत्खनन झाले. त्यावेळी त्याच्याबरोबर पुरलेली टेराकोटा आर्मी सापडली. ८००० शिपाई व प्रत्येकाचा चेहरा वेगळा. खरोखर कमाल आहे. आणि हे सगळे शिल्लक राहिले इतक्या वर्षांनी......
बॅबिलाॅन मध्ये याच सुमारास काही ज्यू कैद्यांना ठेवले होते, इस्राईलवर हल्ला करून त्यांना हरवून या लोकांना बंदीवान केलेले होते. त्यांच्या २-३ पिढ्या तिथे राहिल्या होत्या.
या लोकांनी हिब्रू भाषेत बायबल लिहायला सुरूवात केली. इतरांपेक्षा वेगळे म्हणजे पहिल्यांदा त्यांनी एक देव असल्याची कल्पना मांडली. हे लिखाण त्यांनी कैदेतच करायला सुरूवात केली. यानंतर परत पर्शिअन लोकांनी बॅबिलाँनवर हल्ला केला. त्यावेळेस कैदेत जो राजघराण्यातला राजपुत्र होता त्याने १०० एक कुटुंबांना तिथून ५०० मैलावर असलेल्या जेरूसलेम मध्ये नेले. जी त्यांची भूमी होती. काही लोक मागे राहिले. पुढे गेलेल्या लोकांनी बायबल चे स्क्रिप्ट आपल्याबरोबर नेले तेच ओल्ड टेस्टामेंट.या पुस्तकाच्या जगात ५०० वर्षात ६ बिलिअन प्रति छापल्या गेल्या...आजपर्यंतच्या सर्वात जास्त.
हे सगळे पाहिल्यावर मोहेंजो दारो हराप्पा, रामायण महाभारत यांचा उल्लेख नाही हे जरूर खटकते. आपल्याकडे एवढे उत्खनन व नोंदी नाहीत हेही खरेच. नोंद असलेल्या गोष्टीच घेतलेल्या दिसतात. तसेही आपल्याकडे महाभारत व रामायण हे काव्य आहे असे म्हणतात. बघू आता पुढे काय काय म्हणतात ते. एक गोष्ट चांगली आहे, लगेच फेसबुक पेज उघडले असल्याने लोकांनी आपली मते नोंदवायला सुरूवात केली आहे. मनुष्याची सतत नव्याची आस आणि जिद्द या गोष्टीमुळे शोध लावत आपण कसे आजपर्यंत पोचलो हे बघणे नक्कीच छान आहे. आपल्या देशात काही घडत असताना त्याच वेळेस बाहेर काय घडत होते हे बघणे या सिरीअल ने नक्की होईल.
पुढील भाग लौकरच....