
आम्ही ६ दिवसात ९०० मैलाचा एक राउंड केला व बरीच ठिकाणे पाहिली. रस्ते अतिशय सुंदर, एकही पॉटहोल लागले नाही. अगदी छोट्या गावात वा रिमोट जागेतही सुंदर रस्ते आहेत. पोर्टलॅंड हून अनेक डे ट्रीप्स करता येतात. आपल्या आवडीप्रमाणे ठिकाणे निवडू शकतो. क्रेटर लेक अगदी साउथ ला व जरा रीमोट आहे.


दिवस१ - पोर्टलँड सिटी -- विमानातून माउंट हूड चे मस्त दर्शन झाले. हा माउंटन पहिले २-३ दिवस बाहेर पडले की सतत दिसत हेता. पहिल्या दिवशी वॉशिंग्टन गार्डन पाहिली. खूप मोठी आहे. आम्ही फक्त जापनीज गार्डन व रोज गार्डन पाहिली. गाईड बरोबर एक टूर केली. इथली ट्रिम केलेली झाडे जनरली असिमेट्रिक असतात. पूल, छोटा तलाव, मासे, धबधबा. झेन गार्डन(वाळू चा वापर) व टी हाउसेस ही एलिमेंटस जापानीज गार्डन मध्ये दिसतात. रिसायकल मटेरिअल जसे जुन्या फरशा विटा ही वापरण्याची पद्धत आहे. इथे एक जपान मधे बनवलले टी हाउस आहे. बागेबाहेर अशुभ गोष्टी दूर रहाव्या म्हणून एक चिन्ह लावलेले असते. एका दगडावर हायकू कोरलेले आहे. स्प्रिंग मध्ये गेलात तर चेरी ब्लाँसम बघता येतो.


रोज गार्डन ही छान होती. अनेक गुलाबाच्या जाती लावून इथेत्याचे टेस्टींग केले जाते. जुन जुलै मध्ये जास्त फुले बघायला मिळतात.


पोनीटेल किंवा अप्पर फॉल ला तुम्ही फॉल च्या मागे जाउ शकता. हा प्रकार फार मस्त आहे. मल्टनोमाला पण वर जाता येते. पोनी टेल हा प्लंज टाइप वाॅटरफाॅल आहे, म्हणजे डायरेक्ट उडी घेउन खाली येतो. आपल्या खंडाळ्याच्या घाटाची आठवण झाली, फरक एवढाच की ते धबधबे फक्त पावसाळ्यात दिसतात तर हे बारमाही. सगळीकडे भरपूर गर्दी होती. अगदी म्हातारे पण तरूणांना लाजवतील असे डोंगर चढत होते.
जाताना मेन हाय वे वर बोनव्हील धरण आहे. कोलंविया रिव्हर ला काबूत ठेवण्यासाठी अनेक धरणे बांधली आहेत.

जगभर व्यापार होतो. सालमन जातीचे मासे इथून थेट अलास्का पर्यंत जातात व परत येतात, कसा काय रस्ता लक्षात ठेवतात देव जाणे. माशांचा उपयोगात नसलेला भाग कापून त्यांना सोडतात, असे मासे सापडले तर ते हॅचरी चे आहेत असे समजतात . या माशांचे वय ३ वर्षे असते. अंडी घातली की ते मरतात. ही माहिती देण्यास तिथे बरीच लोक होती. एकंदरीत बराच अभ्यास व रिसर्च करून हा सगळा बिझिनेस केला जातो. तास दीड तासाचा हा स्टॉप नक्कीच घेण्यामारखा.
नंतर हूड रिव्हर हे छोटे पण टुमदार गाव लागले. नदीवर काईटफ्लाईंग व इतर वॉटर गेम्स फेमस. आम्हाला फ्रूट लूप मधे इंटरेस्ट होता. थोडी शोधाशोध करावी लागली. आधीच नकाशा बरोबर ठेवला तर सोपे जाते. गावाबाहेर अनेक एकरात फ्रूटस ची प्रचंड लागवड आहे. सिझन प्रमाणे चेरी, सफरचंद, पेअर, पीच,स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, ब्लेकबेरी यांची लागवड होते. झाडे फळांनी एवढी लगडलेली होती की बस... इथली हवा व माती या फळझाडांना पोषक आहे. पीचेस, व चेरीज खरेदी करून निघालो फ्रेश फ्रॉम द फार्म..
परत पोर्टलेंडला जाताना २ वॉटरफॉल्स पाहून हॉटेलवर गेलो. वाटेत व्हिस्टा पॉईंटवरचा सूर्यास्त बघण्यासारखा.
दिवस २ - पोर्टलँड ते माउंट हूड ते बेंड - सकाळी लवकर निघालो. माऊंट हूड ला जाण्यासाठी २६ ईस्ट हा सिनिक रूट घेतला. दोन्ही बाजूला हिरव्या ऊंच झाडांच्या भिंती सोबतीला होत्या. सुरूवातीला माऊंट हूड अधून मधून दर्शन देत होता. वाटेत रॉक्स व हरणापासून सावध अशा पाट्या होत्या तसेच स्नो पार्क व चेन अपलोड असेही बोर्ड दिसले. रस्ते इतके स्मूथ आहेत की थंडीत टायर वर चेन कव्हर लावून जावे लागते हे नव्याने कळले तसेच स्नो मधे घाटात गाडी पार्क करण्यासाठी स्नो पार्क ही पाटी सारखी दिसत होती. या स्टेट मध्ये आपण आपल्या गाडीत गॅस भरू शकत नाही, त्यांची माणसे येउन भरतात, भारताची आठवण झाली.


ला पाईन ला पोचेपर्यंत हिरवी झाडी ते रखरखीत वाळवंट व ९७ डि ते ६० असा फरक अनुभवला. शिवाय १५ मिनिटांचे वादळ जोरदार पाऊस व मोठ्या गारा हे सग़ळे निसर्गाचे रौद्र रूप दाखवून गेले. बेंडपासून अजून एक सिनिक रूट आहे त्याला लेक हायवे म्हणतात, त्यावर थ्री सिस्टर्स हे स्नो कॅप्ड ३ डोंगर दिसतात.
दिवस - ३ - ला पाइन ते चेमूल्ट ते क्रेटर लेक -
चेमूल्ट हे अतिशय छोटे गाव आहे. लोकवस्ती ६००. इथे १९२९ मध्ये बांधलेल्या एका हॉटेलात राहिलो. रेल्वे कामगारांसाठी त्या सुमारास बांधलेले. मनात जरा धाकधूक होती पण क्रेटर लेक पासून फार दूर नाही. क्रेटर लेक ला नॉर्थ एंट्रन्स ने पोचलो. हा रस्ता बराच एकाकी आहे.

लेकच्या रिम रोड वरून ३५-४० मैलाची प्रदक्षिणा आहे. अनेक ठिकाणी लेक बघण्यासाठी लुक आउट्स आहेत.
लगेच क्लीटवूड ट्रेल ने खाली लेकपर्यंत गेलो. खूप सुंदर ट्रेल आहे. साधारण एका मैलात ७०० फूट चढ असल्याने वर येताना दमछाक होते. वाटेत झाडे व बसायला बाके आहेत. मागे बघताना पाण्याचा सुंदर रंग दिसतो. प्रत्येक फोटो हा पिक्चर परफेक्ट वाटतो. लेक मधे बोट टूर आहे पण पावसाची शक्यता असल्याने आम्ही घेतली नाही. उन्हामध्ये पाण्याचा रंग मस्त दिसतो. निळ्या रंगाच्या खूप छटा दिसतात.६ मैल रूंद व १९०० फूट खोल असलेले हे व्होल्कॅनोने बनलेले क्रेटर आहे. फक्त पावसाचे व बर्फाचे पाणी यात येते म्हणून खूप शुद्ध पाणी आहे. लेक मधे १२४-१४० फूट पर्यंत खाली डिस्क सोडून दाखवतात. आपण ती नीट बघू शकतो, इतके पाणी शुद्ध आहे. खरे वाटत नाही ना..

दिवस - ४ - चेमूल्ट ते सेलम - हायवे १३८ हा सिनीक राउट घेतला. ९० माइल्स चा सुंदर नागमोडी रस्ता आहे. दोन्ही बाजूला उंच गर्द झाडी व वाटेत अनेक धबधबे. याला हायवे ऑफ वॉटरफॉल असेही म्हणतात. फ्लायफिशिंग हा इथला फेमस गेम आहे. कडेने उम्पका रिव्हर, बाजूला उंच झाडी व घाटाचा नागमेडी रस्ता सतत आपल्याला फिरवत असतो. ७०००फूटापासून सपाटीवर आणून सोडतो.

या रस्त्यावर लेक्स व धबधबे भरपूर. डास मात्र आहेत तेव्हा रिपेलंट नेलेले बरे. या नंतर सेलम येथे मुक्ाम केला. ही ओरेगॉन ची राजधानी पण शहर खूप मोठे नाही.


याच बीचवर जो मोठा खडक आहे त्याला हेस्टेक म्हणतात, त्यावर ३-४ महिने सी गल्स येऊन अंडी घालतात व आपल्या पिलांना वाढवतात. इथे २-३ दुर्बिणी लावून ठेवल्या होत्या व त्यातून पक्षी छान दिसत होते घरट्यातले. व्हॉलेंटिअर्स मुळे हे शक्य झाले. पिले घरट्यातून बाहेर पडली की पक्षी दुसरीकडे जातात व पुढच्या वर्षी परत येतात, त्यांच्या जी पी एस सिस्टीमला मानले पाहिजे, कशा जागा लक्षात ठेवतात देव जाणे.

यानंतर सीसाईड येथे मुक्काम केला हॉटेलमागेच बीच होता. वाटेत पार्क आहे तिथून समुद्र सुंदर दिसतो.
दिवस - ६ - सी साईड ते पोर्टलँड ृ शेवटच्या दिवशी पुन्हा एकदा बीचवर जाउन आलो. परत घाटाच्या सुंदर रस्तयाने पोर्टलँडला आलो व घराच्या दिशेने निघालो. या ६ दिवसात जवळजवळ ८००-९०० मैल फिरलो. पाण्याची अनेक रूपे पाहिली. कधी माउंट हूड चा बर्फ, कधी समुद्र किनारे, कधी क्रेटर लेक सारखे लेक तर कधी कोलंबिया अथवा इतर नद्यांवरचे धबधबे. निसर्गाच्या जवळ गेल्यासारखे वाटले. सुंदर रस्ते व घाट, चविष्ट सी फूड जोडीला होतेच. एकंदरीत ही ट्रीप बरेच काही शिकवून गेली.