दोन दिवसात राॅकी माउंटन पार्क...
पूर्वी असे टुरिझम च्या पुस्तकात वाचले की हसायला यायचे. पण खरेच जर नीट प्लान केले तर खूप गोष्टी तुम्ही दोन दिवसात करू शकता. आमच्या बरोबर एक माहितगार फॅमिली मेंबर असल्याने आमचा खूप फायदा झाला. त्याने खूप ट्रेक्स वेगवेगळ्या वेळी इथे केले आहेत. पार्क ची वेबसाईट खूप माहितीपूर्ण आहे. त्या वरून आपल्याला काय बघायचे हे ठरवता येते.
आमची ही व्हिजिट हायकिंग साठी होती. यापूर्वी कोलोरॅडो स्प्रिंग्ज, अेअर फोर्स म्युझियम, गाॅर्ज, गार्डन आॅफ द गाॅड्स, पाईक्स पीक, डेन्व्हर सिटी हाॅल व अॅंम्फीथिएट , ट्रेल रीज रोड व ग्रॅंड लेक तसेच काॅन्टीनेंन्टल डिव्हाईड बघून झाले होते.
अमेरिकेतच नॅशनल पार्क्स ही सगळ्यांसाठी मोठी भेट आहे. हे
पार्क विमानतळापासून दीड एक तासावर आहे. सकाळी जर पोचलो तर पूर्ण दिवस मिळतो. रहायचे ठिकाण शक्यतोवर पार्क च्या अगदी जवळ शोधले तर खूप वेळ वाचेल. भरपूर आॅप्शन्स आहेत नेटवर. जाताना गाडीत पाणी व भरपूर स्नॅक्स ठेवा. सकाळी एक ट्रेक करून मग चेक इन करता येते साधारण ३ वाजता.
आम्ही पहिल्या दिवशी चार लेक्स चा लूप केला. बेअर लेक ट्रेल हेड शी शटल घेउन जाणे सोईच. पार्किंग लगेच भरते. साधारण ९४७५ फूट ते १०२४० फूटावर आपण जातो. साधारण १००० फूट उंची ६ मैल अंतरात आपण जातो. लगेच मनातल्या मनात सिंहगड शी तुलना झाली. त्यापेक्षा आपण कमी चढतो फरक इतकाच की हा हाय अल्टिट्यूड ट्रेक आहे. वाटेत भरपूर झाडी व उत्साही हायकर्स दिसत होते. लहान मोठे सगळे एकदम टिपटाॅप वेषात चढत होते.
निंफ लेक ला पहिला स्टाॅप घेतला. यात पिवळ्या पाॅंड लिलीज दिसल्या. या फक्त हाय अल्टिट्यूड वरच येतात. वाटेत भरपूर झाडी,अधूनमधून वेगवेगळे डोंगरमाथे दिसत होते. अतिशय फ्रेश हवा, मजा आली.
साधारण अर्ध्या पाउंड तासावर एक लेक लागते.
त्यानंतर ड्रीमलेक ला थांबलो. वाटेत भरपूर वाइल्ड फ्लाॅवर्स डोळे खुश करत होती.
यानंतर एमराल्ड लेक हे सुंदर सबअल्पाईन लेक आहे. नावाप्रमाणेच याचा रंग आहे. काही लोकांना इथे हाईट चा त्रास होतो पण आम्हाला फार जाणवला नाही. याच्या बॅकग्राउंड ला मस्त डोंगर आहेत.
शेवटी बेअर लेक हे ट्रेत हेड जवळ आहे. अजून एक मैल गेले तर अल्व्रटा फाॆल आहे.
काही महत्त्वाच्या टिप्स ... माउंटन मध्ये गार व गरम दोन्ही हवा असते, त्यानुसार जॅकेट टोपी गाॅगल्स सन स्क्रीन , आणि हो जाड सोलचे शूज मस्ट. वाटेत बरेच दगड आहेत म्हणून चांगले शूज हवेत. पाणी भरपूर प्यायचे आणि हाय कार्ब वाटले स्नॅक्स जवळ ठेवायचे. शक्यतोवर लवकर ट्रेक चालू करायचा , थोडे उन वाचते. वाटेत फोटो साठी खूप वेळा आपण थांबतो. एवढ्या तयारीनंतर आपण हाय अल्टिट्यूडवर आहोत हे विसरतो.
संध्याकाळी फ्रेश होउन रेंजर चा अॅस्ट्राॅनाॅमी इन द पार्क प्रोग्रॅम अटेंड केला. खूप उत्साही मंडळी कुडकुडत आली होती. खूप दुर्बिणी सेट केल्या होत्या. शनि व त्याची कडी, गुरू व त्याचे चार चंद्र मस्त दिसले. आकाशगंगेचे पण दर्शन झाले. थोडे आभाळ असल्याने आकाशभर चांदण्या मात्र दिसल्या नाहीत. लहान व मोठ्याना हा एक चांगला अनुभव होता.
जाता येतां वाटेत थोडे वाईल्ड लाईफ दिसले. त्यासाठी पहाटेची किंवा तिन्हीसांजेची वेळ योग्य. तुम्ही जर खूप दमला नसाल तर सनसेट बरोबर हे करता येते.
एस्टेस पार्क मधे खूप रेस्टॅरंटस आहेत. जेवून किंवा पार्सल घेउन हाॅटेलवर जाता येईल. केबिन मधे राहिल्या कुकिंग ची सगळी सोय आहे.
दुसरे दिवशी लवकर वाॅटरफाॅल हाइक साठी निघालो. हे ट्रेल हे दूर असल्याने लवकर निघालेले चांगले. सुरूवातीला थोडी थंडी वाजली पण नंतर फारच छान झाडीतला रस्ता होता. एकदम रेिफ्रेशिंग. या ट्रेल वर सतत एका बाजूला पाणी असल्याने मजा येते. ५.४ मंगलाचा आमचा पल्ला होता.
Calypso Cascade .. उंची फार नाही पण भरपूर पाणी. बाजूला सतत अस्पेन ची सळसळ व पाईन्स साथीदार. वाईल्ड फ्लाॅवर्स भरपूर.
copeland falls upper ani lower. हा एकदम जोरदार धबधबा होता. आॅगस्ट सप्टेंबर वाईल्ड मशरूम्स खूप दिसले. ते विषारी असतात पण रंग फार सुंदर. लाल पिवळा तपकिरी केशरी राखी खूप मस्त होते.. टराविक गारवा न मिळाल्यानंे बरीच वाईन ची झाडे जुळली होती. किती गोष्टी हवेवर अवलंबून असतात.
मध्येच एक निनावी धबधबा लागला....मला हा जास्त आवडला. सगळ्यात शेवटी ओझूल फाॆल लागतो. त्यापूर्वी जरा चढण आहे दमवणारी, पण नंतरचे रूप ते विसरायला लावत होते. अजून थोडे वर गेल्य़ास जास्त चांगला व्ह्यू दिसतो.ओझूल हे राखी रंगाचे पक्षी असतात.
संध्याकाळी व्हिजिटर सेंटर ला फिल्म बघून पुढे ट्रेल रोज रोड, बरेच व्ह्यू पाॅईंटस बघितले. अल्पाईन व्हिजिटर सेंटर हून परंतु फिरलो. काॅंटिनेंटल डिव्हाईड कॅनडा ते मेक्सिको जातो तोंही पाहिला. य़ा डोगराची रचना कौलासारखी असते.एका बाजूचे पाणी पॆसिफिक सागरात तर दुसरीकडते अॆटलांटिक मध्य़े जाते. सॆध्य़ाकाळी येताना थोडे वाईल्ड लाईफ दिसले. या सगळ्या ट्रीप मध्ये सतत माहिती आमच्या भाच्याने पुरवली म्हणूनच आम्ही एवढ्या गोष्टी पाहू शकलो. रेंजर प्रोग्रॅम ची माहिती व्हिजिटर सेंटर वर मिळते.

निसर्ग हा मोठा गुरू आहे हे पुन्हा एकदा अनुभवले. धबधबे, लेक्स, फुले, टॆड्रा वनस्पती, वाइल्ड लाईफ, सूर्यास्त, रात्रीचे आकाश, आकाशगॆगा, उॆच शिखरे ..... अनॆत हस्ते कमलावराने ..... खरेच आहे